आपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.
आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443
शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
पात्र परिचय :
माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट
मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?
शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .
आज विशेष
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!
रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न
१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .
पोरखेळ आवडता हा माका, काकानु.
पोरखेळ आवडता हा माका, काकानु.
<< पोरखेळ आवडता हा माका, >>
<< पोरखेळ आवडता हा माका, >> माकांय तो आवाडता आणि मी पण वाट बघतहंय त्येची !
धागा निर्मात्याप्रमाणे मलाही
धागा निर्मात्याप्रमाणे मलाही काही प्रश्न पडलेत...
आण्णा प्रत्यक्ष दिसतात पण ती बाई माधवच्या बायकोच्या अंगात येते. यातून आण्णा सुनेला त्रास देतील का?
कथेचा मूळ विषय आण्णांची प्रॉपर्टी आहे का आण्णांचं लफडं?
ती मेलेली बाई आली है का नाही? आण्णा सदेह आले तशी?
आत्म्यांचा रोमांस बघायला मिळेल का?
पांडू हाच या सिरीयलचा हिरो आहे हे माझे मत चुकीचे आहे का?
गणेशची काय गरज आहे मालिकेत?
गुरवाने विधी केला त्याचा माधव वर किती परिणाम झाला?
पण मालिका मला आवडतेच.
सिरियलमधे घडणार्या
सिरियलमधे घडणार्या घटनांबद्दल कुठलंच स्पष्टीकरण नाही, लॉजिक नाही.
त्यामुळे (फारसे ओळखीचे चेहरे नसूनही) सिरियलमधील पात्रांच्या अभिनयाच्या जोरावर
ही सिरियल फार दिवस तग धरू शकेल असे आता वाटत नाही.
बाहुल्याच्या गळ्यातून रक्त येणे या प्रसंगाने सिरियलचा दर्जा खूप घसरला असे माझे वैयक्तिक मत आहे.
फार भडक वाटला तो प्रसंग.
एकूणच अतार्किक वाटणार्या अनेक प्रसंगांमुळे परवाच मनात एक हास्यास्पद विचार आला तो असा :
कुणाला तरी पडलेलं हे प्रदीर्घ स्वप्न होतं असा सिरियलचा शेवट होऊ नये म्हणजे झालं......
<< कुणाला तरी पडलेलं हे
<< कुणाला तरी पडलेलं हे प्रदीर्घ स्वप्न होतं असा सिरियलचा शेवट होऊ नये म्हणजे झालं......>> कृपया माझी ४मे '१६ ची पोस्ट पहा !
कृपया माझी ४मे '१६ ची पोस्ट
कृपया माझी ४मे '१६ ची पोस्ट पहा ! >>> भाऊ, कृपया पान क्र. देता का ?
मी या धाग्यावर (आणि सद्ध्या मायबोलीवरही) फार कमी वेळा आलो आहे.
"मोठ्या कौतुकाने बघत असे ही
"मोठ्या कौतुकाने बघत असे ही मालिका पण काय, ' भंरवशाच्या म्हशीक टोणगो !"
हीच पोस्ट का ?
माझंही तसंच मत झालंय या सिरियलबद्दल.
म्हणूनच मी वर म्हटलंय ना,
"कुणाला तरी पडलेलं हे प्रदीर्घ स्वप्न होतं असा सिरियलचा शेवट होऊ नये म्हणजे झालं...... "
भाऊ नमसकर | 4 May, 2016 -
भाऊ नमसकर | 4 May, 2016 - 21:17
मला तर या सिरीयलचा एकच शेवट संभवतो -
डांबरी रस्त्यावरून आर्चिस गाडी मातीच्या कच्च्या रस्त्यावर वळवतो व हंळूवार आणून नाईकांच्या घरासमोर उभी करतो. आल्याची सूचना द्यायला तो हॉर्न वाजवतो . निलीमाची उतरण्याची लगबग सुरुं होते व तिच्या लक्षांत येतं माधव गाढ झोंपला आहे. "माधव, चल उठ, घर आलं." माधव खडबडून जागा होतो . निलीमाच्या लक्षांत येतं , तो घामाने डबडबला आहे. " काय रे, काय झालं ? " " अग भयानक स्वप्न पडलं. कशाचा कशाला मेळ नाहीं. पण इथलीं सगळीं माणसं काय काय रुपं घेवून मला भेडसावत होतीं." हें सांगतानाही माधवचा आवाज अजूनही कांपराच. " तुझं रहस्यकथांचं वेड तुला खरंच एक दिवस वेडा करणार आहे ", मिष्किलपणें हंसत निलीमा त्याला कोपरखळी मारते. "हें बघ माधव, यापुढे १५ दिवस इथल्या साध्या ,भाबड्या लोकांत आपणही तसंच होवून रहायचं. मस्त कोकणाचं वातावरण एंजॉय कारायचं. मीं लॅपटॉप आणला असला तरीही तो उघडणार नाही व तूंही तुझ्या रहस्यकथांची टिपणवही बंद करून ठेव".
इतक्यांत अण्णा, माई , दत्ता, सरिता, छाया, गणेश, अभिराम सगळे येवून गाडीला गराडा घालतात. सगळ्यांच्या चेहर्यावर आनंद ओसंडत असतो. पांडू हंळूंच पुढे सरकत " माधवानुं, मीं वळखलंय तुमकां. नाय इसरांक मीं !" म्हणतो. नाथा, त्याची बायको व मुलगीही लांबून हें बघत आनंद व्यक्त करत असतात. माधव घरांता शिरतां शिरतां हंळूच समोरच्या झाडाकडे बघून गालातल्या गालांत हंसतो ! समाप्त !!
स्वप्नच म्हटलं कीं कशाचंही कांहींही स्पष्टीकरण देण्याची अर्थातच गरजच उरत नाही !!! >>
ही पोस्ट भाऊकाकांची.
भाऊकाका तुमकां 3डी आवडतां??
भाऊकाका तुमकां 3डी आवडतां?? कधी पोस्टी दिसले नायत तुमचे त्या धाग्यार..
निधि ग्रेट, शोधुन काढलीस
निधि ग्रेट, शोधुन काढलीस पोस्ट.
हो गं... वेळ होता तर एक
हो गं... वेळ होता तर एक चांगलं काम केलं.
व्वा ! मस्त पोस्ट आहे
व्वा ! मस्त पोस्ट आहे भाउंची.
धन्यवाद Nidhi
<< भाऊकाका तुमकां 3डी
<< भाऊकाका तुमकां 3डी आवडतां?? कधी पोस्टी दिसले नायत तुमचे त्या धाग्यार.. >> तीच एक सिरीयल मी खूपच नियमितपणे व आवडीने बघत असे.
बोलींग टाईट असली कीं माकां बॅटींग करूंक जमणां नाय. ह्या सिरीयलचां कसां सगळांच विस्कळीत त्यामुळे कशीय बॅट फिरवलेली चलता. ३डीच्या धाग्यार म्हणान माझे पोस्टी नाय .!!
मालिका बघणार्यांना मालिका
मालिका बघणार्यांना मालिका बघून एवढे प्रश्न पडतात, त्याची उत्तरे लेखक दिग्दर्शकाला का पडत नाहीत? कदाचीत त्याची उत्तरे विक्रमच (विक्रम वेताळ) देऊ शकेल.
काल बर्याच दिसानी आमच्या
काल बर्याच दिसानी आमच्या ज्येष्ठ नागरिक टोळक्याक भेटूंक गेलंय. त्येतलो मालवणी मित्र उठून धांवतच इलो माझ्या स्वागताक. सगळां टोळक्यां देखील कधीं नाय तां मोठ्या कौतुकान बघताहा माझ्याकडे, दहावीच्या नुकत्याच लागलेल्या निकालात जणूं मीं मेरीटमधे इल्यासारखो. माकां शेजारीं बसवून मालवणी मित्रान मग मोठ्यान मालवणीतच गजाली सुरूं केले, जां मीं बिगर-मालवणी ग्रूपमधी टाळतंय. पण तो मित्र माकां मालवणीतच बोलूक भाग पाडताहा आणि बाकिच्ये कौतुकान ऐकतहत.
मग कळलां. ' रात्रीस खेळ..'वर त्येंची चर्चा चललेली आठवडोभर. माझ्या मालवणी मित्रान त्येंकां सांगलेलां " तां कसलां रद्दड मालवणी; भाऊ इलो कीं तुमकां ऐकवतंय अस्सल मालवणी " !
ही सिरीयल कायव धुडगूस घालीना पण मालवणी बोलीची चटक मात्र हीच्यामुळे लोकांक लागलीहा, ह्यां नक्की !
भाऊकाका मस्तच
भाऊकाका मस्तच
तां माईंका कोणीतरी लवकरात
तां माईंका कोणीतरी लवकरात लवकर आवरुक होया. लई बोअर मारतल्या तां .
काल काय झालं शिरेलीत??
काल काय झालं शिरेलीत??
पांडू शिवाय दुसरो कोण आवरतलो
पांडू शिवाय दुसरो कोण आवरतलो ? तोच सगल्याचो कर्ता करविता असा ना?
.
.
सगळ्यांचा कर्ता करविता पांडूच
सगळ्यांचा कर्ता करविता पांडूच है पण तोच सगळं इसरतंय.
बोलींग टाईट असली कीं माकां
बोलींग टाईट असली कीं माकां बॅटींग करूंक जमणां नाय. ह्या सिरीयलचां कसां सगळांच विस्कळीत त्यामुळे कशीय बॅट फिरवलेली चलता. ३डीच्या धाग्यार म्हणान माझे पोस्टी नाय .!! सही भाऊकाका.
मी लिवून ठेवलेले 'रेसिपीज'
मी लिवून ठेवलेले 'रेसिपीज' आसत त्ये ! नाचताहास जशीं काय
सगळीं उत्तरांच गावलीं तुमकां नाईकांच्या घरातल्या प्रश्नांचीं !!
मी १६३ भाग परेन्त एक एक
मी १६३ भाग परेन्त एक एक पाहिले पण मग वैताग आला. इतके ग्रीडी स्टुपिड लोक. काही ही टूं झाले कि हा काय तो बघायला हवा. काहीतरी करायला हवे करून काय तर नारळ उतरवून टाकणे, नारळ कुठे तरी ठेवणे. बेसिक ह्युमन डिसेन्सी नाही. ती छाया प्रॉडक्टिव्ह काहीच करत नाही.
सरिता व माई किती ओरडोन बोलतात. विश्वास रावाचे हिंदी बोगस वाट्ते. उगीच खेचले आहेत भाग. मग शेवटचे दोन बघितले. २०८ २०९ व बंद करून टाकले. असल्या लोकांना बघणे नको व ते वराडणे ऐकायला नको. शेवटी गुंडा ळून टाकले आहे चक्क. तो पांडू पण वैतागच आहे.
एक सीन मात्र त्याचा मजेशीर आहे. तो रघुकाकांना म्हणतो मला नवरी हवी मला नवरी दिली नाहीत तुम्ही. पूर्ण सीन मजेशीर घेतला आहे. गुड डायलॉग डिलिव्हरी.
Pages