रात्रीस खेळ चाले १

Submitted by मी_इंदू on 22 March, 2016 - 01:34

2016 - 1 (1).jpgआपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.

आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443

शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..

पात्र परिचय :

माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट

मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः

१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?

शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .

आज विशेष

अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!

रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न

१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच्या भागात, माधव निलीमाला रागावतो की काय असं वाटलं. " अगं निलीमा, तुला गंगावन नीट नाही का बांधता येत, ती छाया बघ जरा.. "
आजच्या भागात धमाल येणार आहे असं दिसतंय. निलीमा 'आमी मोंजोलिका' करत हळूहळू सिरीयल 'भूल भूलैय्या' च्या वाटेने नेणार बहुधा .
किंवा दुसरी शक्यता अशी की, निलीमा ही नासा ची शिक्रेट एजंट असणार . नासावाल्यांनी काही वर्षांपूर्वी मोहन भार्गव यांना पाठवलं होतं, कोकणातली भूतं ही भूतं नसून एलियन आहेत हे सिद्ध करायला. पण भार्गव साहेब, 'ये तारा, वो तारा' करत अंधारात भरकटले आणि परत नासाकडे गेलेच नाहीत. तेव्हा आता निलीमा तरी हे मिशन पूर्ण करेल अशी आशा.... नव्हे खात्री नासाला आहे. त्यामुळे निलीमा हे सगळं नाटक करतीये.

<< मिसिन्ग भगवती . >> बापरे ! आतां हो एक सस्पेन्स वाढलो !! >>>>> काकांनु , आय अ‍ॅम मिस्सिन्ग भगवती .
भगवती असताला खयतरी . Happy

पण भार्गव साहेब, 'ये तारा, वो तारा' करत अंधारात भरकटले आणि परत नासाकडे गेलेच नाहीत. तेव्हा आता निलीमा तरी हे मिशन पूर्ण करेल अशी आशा.>>>>>>>>>> Rofl

कसे आहात मंडळी? ह्या मालिकेत फार काही घडत नसल्याने घरी दुसरेच कार्यक्रम बघीतले जाताय. मीच ही मालिका मीसतेय. कधीतरी रीपीट भाग पहायला मिळाला तर इथे हजेरी लावेन.

भगवती, माका वाटला आजारी पडलंस की काय??? असो. आम्हीच शिरेल कधीतरी बघताव तुझ्यावर कशाक जबरदस्ती करुची बघच म्हणून. Happy पण तुझ्या डिटेल एपिसोड रायटिंगाक मिस करु एवढा नक्की. Happy

कालचा एपि बरा होता. प्रेडिक्टेबल पण चांगला. Happy

निलिमा भारी डोळे फिरवत होती. शेवटी बसायची स्टाईल पण मस्त जमली.

आधी मितनी म्हटलंय तसं निलिमाची मोंजोलिका आणि आम्ही भुलभुल्लैय्यात अडकणार असंच कालच्या भागावरुन वाटलं. Wink

काही सस्पेन्स गोष्टी फक्त अभिरामाला कळतायत, त्यावरुन तोच या सगळ्याचा शोध लावणार असं पण वाटायला लागलंय. Uhoh

देविकाचा गौडबंगाल कळेना झालाय.. अति डोक्यात जाते. Angry

आधी मितनी म्हटलंय तसं निलिमाची मोंजोलिका आणि आम्ही भुलभुल्लैय्यात अडकणार असंच कालच्या भागावरुन वाटलं. डोळा मारा>>>>>+१०००

कालच्या भागात निलिमा म्हणते कि माझी शॅम्पूची बॉटल संपली म्हणुन इतके केस गळाले असतील. नक्की त्या बाटलीत शॅम्पूच असेल ना कि फेव्हिकॉल लावते ती शॅम्पू समजून, एक दिवस नाही लावला तर इतके केस गळाले Proud

बारावीचा निकाल जाहिर.... कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९३.२९...

"रात्रीस खेळ चाले" मालीकेच्या प्रभावामुळे कोकणातील मुलांनी रात्री बाहेर न फिरता जोरदार अभ्यास केला... या बद्दल मालिकेचे व सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे अभिनंदन...

<< कोकणातील मुलांनी रात्री बाहेर न फिरता जोरदार अभ्यास केला. >> पण माकां काळजी पडलीहा पुढचीं दोन तीन वर्सां पोरां कोरो पेपर देवनच भायेर पडतलीं ह्येची; ह्या सिरीयलमुळे सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनावर एकच बिंबवलां जातलां - ' प्रश्नांचीं उत्तरां देवचीच असतत, ह्यां अजिबात खोटां आसा !' Wink

प्रोमो बघितला. सुषमाला जेवणात विष घालून मारणार आहेत अस दिसतय. तिची death body गोणीत टाकून ती गोणी जाळताना दाखवल आहे. Sad

नउवारी मधल्या सुषमाला बघताना, मला महान्नदा चित्रपटातील शशिकला आठवली. डिट्टो तसाच मेकअप.

नक्की त्या बाटलीत शॅम्पूच असेल ना कि फेव्हिकॉल लावते ती शॅम्पू समजून, एक दिवस नाही लावला तर इतके केस गळाले Rofl

प्रोमो बघितला. सुषमाला जेवणात विष घालून मारणार आहेत अस दिसतय. तिची death body गोणीत टाकून ती गोणी जाळताना दाखवल आहे.>>>>> पण ती येईल परत जशी शेवंता आली Proud

पण ती येईल परत जशी शेवंता आली >>>> मग नाईक कनफ्यूझड होतील, हे भूत नक्की कोणाच, शेवंताच कि सुषमाच.:अओ: कारण दोघीही सारख्याच दिसतात ना, दोघीही नऊवारी साड्यावरच गेल्या ना. दोघीन्नी जर एकत्र येऊन, एकाचवेळी नाईकान्ना छळले तर नाईकान्चे काही खरे नाही. Lol

झी मराठीच्या फेसबुक पेजवर पांडूचा नवीन टीझर दाखवताहेत " ते येतायत " ३१ तारखेला. अण्णांचं पुनरागमन होतंय. आता मजा येईल बघायला.

सुषमाला पोत्यात भरून नेलं हे दोन दिवसांपासून दाखवत होते तेव्हांच घरी गेल्यावर यांना सुषमा दिसेल असं वाटत होतं, तसंच झालं. गुन्हेगाराला पकडायचं असेल तर त्याच्यासारखा विचार करता यायला पाहीजे असं म्हणतात. रात्रीस खेळ चाले मधे काय होणार याचे अंदाज करायचे असतील तर लेखक दिग्दर्शकासारखा "विचार" करता यायला पाहिजे.

पोत्यात घरातलाच कुणी मेंबर नसला म्हणजे झालं..

झी मराठीच्या फेसबुक पेजवर पांडूचा नवीन टीझर दाखवताहेत " ते येतायत " ३१ तारखेला. अण्णांचं पुनरागमन होतंय. आता मजा येईल बघायला.>>>> ते येतायत हे मालवणी भाषेत लिहायला हव होत त्यान्नी.

गुन्हेगाराला पकडायचं असेल तर त्याच्यासारखा विचार करता यायला पाहीजे असं म्हणतात.>>>> घायल, अस्मिता भेटली का तुम्हाला?

पोत्यात घरातलाच कुणी मेंबर नसला म्हणजे झालं..:हहगलो:

खुप मागेच मला आणि ब-याच जणांना डाऊट होता की अण्णा जिवंत असणार आणि ते लिहीलंही होतं मी आणि अजुन काहींनी ते खरं असावं बहुतेक.

पण मला एक कळत नाही की वाईट काम अण्णांनी केली मग शे / सु ह्यांच्या मागे का? ह्यांनी पण सांगायचना सु ला, बाईग, तुझ्या आईनी जीव दिला तरी आम्ही तुला वारयावर सोडली नाही. मग आता आम्हाला का छळतेस?

<< ब-याच जणांना डाऊट होता की अण्णा जिवंत असणार आणि ते लिहीलंही होतं मी आणि अजुन काहींनी ते खरं असावं बहुतेक. >> माझी २९-३-'१६ची ही पोस्ट -
<<माकां आतां सॉल्लीड डाऊट आसा कीं ह्या सिरीयलचो पुढचो बरोचसो भाग "फ्लॅशबॅक'च असतलो; 'अण्णांक' काय दोन-तीन एपिसोड आणि फोटोत बसांकच 'साईन' केल्यानी ? इतक्या भानगडींच्ये पुड्यो सोडतहत, तर त्येचां मूळ दाखवल्याशिवाय कसां चलात ! >>

शक्यता अशीय आसा कीं कोणाक तरी 'पुरल्या'ची भानगड अंगलट येताहा असां वाटलां म्हणानय अण्णानी स्वतःच मेल्याची कंडी दिली असतली उठवून. ह्या सिरीयलीत अशक्य असां कायच नाय, फक्त एक सोडून - ही सिरीयल नियमित बघूनय माणसाचां डोक्यां फिरलां नाय !! Wink

पण माका एक कळत नाय का जर अण्णोबा जिवंत असां, तर घरच्यानी ( दत्ता, अभिराम आणी नाथा) कोणाक अग्नी दिलावं? का अण्णा बिरबलाच्या गोष्टीसारका चितेखालुन भुयार खणुन पळुन गेल असां?

काल ठोकळ्यानी हाईट केली. दत्ता त्या पोत्यावर रॉकेल टाकुन जाळत असताना ठोकळा मागे चक्क डायरीत नोंदी करत असतो. डायरी खंय सापडली त्येंका? आणी मग गॅलरीत कोण असां? सुसल्या का शेवंता?

अरारारा! एकदम हिट्ट धागो असां मागे का पडलावं? माका एक शंका असां की जेव्हा अभिराम, देविकाला भेटुक जातो, तेव्हा तो तिका जंगलात घेऊन जातो. देविकाने तोच फेमस पोशाक केलेला असतो. रानात वाळक्या फांदीचा तुटतानाचा होणारा आवाज ऐकुन देविका च्या अंगात हिरॉईन संचारते ( पुढचा प्रसंग सुज्ञांनी आपल्या जबाबदारीवर ओळखावा, मियां सांगणार नाय.:डोमा:) मग दोघे आपापल्या घरला जातात.

मग दुसर्‍या दिवशीच्याच एपिसोडमध्ये देविका अभिरामला फोन करुन असे का म्हणते की बरेच दिवस आपण भेटलो नाय्,आँ! लेखक ( पांडु ) इसरलाव काय्?:अओ:

अण्णांचा उद्या प्रकट दिन सोहळा आहे म्हणे.

देविकाने तोच फेमस पोशाक केलेला असतो. >>> कोणता गो?

बाद वे त्या जात्याची काय भानगड होती आणि?

Pages