आपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.
आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443
शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
पात्र परिचय :
माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट
मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?
शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .
आज विशेष
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!
रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न
१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .
मग? थेंबभर रक्ताने अख्खा शर्ट
मग? थेंबभर रक्ताने अख्खा शर्ट भिजण्याइतक काय असत वकीलांच्या रक्तात म्हणे?
अशिलांचं शोषलेलं रक्त
अशिलांचं शोषलेलं रक्त
मुग्धा, अख्खा नाही पण बराचसा
मुग्धा, अख्खा नाही पण बराचसा भिजतो. ते रक्त भळाभळा वाहत नसतं.. हळूहळू झिरपतं...
ओके, पण मी म्हटल तस तिने जर
ओके, पण मी म्हटल तस तिने जर काही केल असेल तर त्याचा इफेक्ट लगेच व्हायला हवा ना? दत्ताने लक्षात आणुन दिल्यावर मग भोवळ येउन पडण म्हणजे कैतरीच.
तर त्याचा इफेक्ट लगेच व्हायला
तर त्याचा इफेक्ट लगेच व्हायला हवा ना >> लगेच होतो हे कन्फर्म आहे का?
लगेच होतो हे कन्फर्म आहे का?
लगेच होतो हे कन्फर्म आहे का? >>>>>> मी तुमच्या गळ्यावर रक्त येण्याइतपत वार केला तर त्याची जाणीव तुम्हाला त्याच वेळी होईल की १०-१५ मिनिटांनी? साधा डास अंगावर बसला तरी सेकंदात इफेक्ट होतो..
तिने वार केला होय? आमच्या
तिने वार केला होय? आमच्या टीव्हीवर असे काही नाही दाखविले.
मी तुमच्या गळ्यावर रक्त
मी तुमच्या गळ्यावर रक्त येण्याइतपत वार केला तर >>>> काही मार्ग निघत असेल तर बघाा की
त्याला गावाकडे ( ग्रामिण
त्याला गावाकडे ( ग्रामिण भागात ) मुठ मारणे म्हणतात. म्हणजे जो मनुष्य बाधित होतो, तो रक्ताच्या उलट्या होऊन मरतो. असे वाचले आहे, पाहीले नाही. त्यामुळे वकिलांना ते जाणवले नसेल.
अहो कापोचे ती सुसल्या हे
अहो कापोचे ती सुसल्या हे अमानवी शक्तींमार्फत करते असे निर्मात्याला दाखवायचे असेल.
रश्मी, पण त्या केसमध्ये
रश्मी, पण त्या केसमध्ये शरीराच्या बाहेरच्या भागावर काही खूण दिसणार नाही ना आणि यात नेने वकीलांना उलट्या बिलट्या होत नाहीत.
असे निर्मात्याला दाखवायचे
असे निर्मात्याला दाखवायचे असेल. >>>> दिग्दर्शक कुठे गेले?
अगं तसेच झाले पाहीजे असे नाही
अगं तसेच झाले पाहीजे असे नाही तर वेगळी युक्ती दाखवली असेल. कारण आजच्या भागात सुसल्या गावकर्याना सांगतांना दाखवलीय की जमिनीच्या वादातुन नाईकांनी वकिलांवर वार केले.
दिग्दर्शक कुठे गेले?>>>> अहो
दिग्दर्शक कुठे गेले?>>>> अहो ते लिहीतांना चुकले. दिग्दर्शक लिहायच्या ऐवजी निर्माता लिहीले.
रश्मी तै, या सिरीयल मध्ये
रश्मी तै, या सिरीयल मध्ये लॉजिक शोधणे म्हणजे..
नावावर फुली मारल्याने वार होत असेल तर इफेक्ट कधी होइल हे कोण ठरवणार?
शास्त्रच शोधायचं तर २ मोबाइल
शास्त्रच शोधायचं तर २ मोबाइल जवळ आले म्हणून कॉल लगेच लागतो का? तिथून आपल्या कंपनीच्या टॉववर जाणार, तिथून रिसिव्हरच्या टॉवरला. तिथून दुसऱ्या फोनवर.
येळ लागता हा. हा साधा नाय.
भगवती पण थकली
भगवती पण थकली
हा साधा नाय.> हा काहीतरी
हा साधा नाय.> हा काहीतरी भयंकर आसा!
अरे! नेट उडाल्याने लिहीलेले
अरे! नेट उडाल्याने लिहीलेले उडाले. मुळात काय दाखवायचे यात दिग्दर्शक आणी लेखक यांच्यातच ताळमेळ नाहीये, जे काय दाखवतात त्याचा आगा न पिछा असतो. त्या दिवशी ते कपाट, त्याचे दार आणी साखळ्या गदागदा हलत होत्या, मला वाटले अण्णा प्र्कट होतील मग बाकीचे दिवे ओवाळतील. पण कसच काय!
सुसल्या आता पांडुला काहीतरी सांगताना दाखवलीय. मला वाटत ( तसे बर्याच जणांना आधी वाटले पण असेल ) की पाण्डु येडा नाहीये. बहुतेक त्याच्या वाडवडिलांची जमीन अण्णांनी हडपली असेल. आणी लहानपणी त्याने ते पाहीले असेल, पण योग्य संधीची वाट पहात तो थांबला असेल.
भगवती पण थकली फिदीफिदी >>>
भगवती पण थकली फिदीफिदी >>> सगळेच थकलेत आता! यांचे रात्रीचे खेळ बघुन
मी तुमच्या गळ्यावर रक्त
मी तुमच्या गळ्यावर रक्त येण्याइतपत वार केला तर >>>> काही मार्ग निघत असेल तर बघाा की>>
हे कसं मिसलं सगळ्यांनीच.
सकाळपासून लिहायचं होतं पण वेळच नै मिळाला. आता लिहिते...
मुग्धा, सुषमा जाईपर्यंत आणि त्यानंतर नेने पाणी प्यायला जाईपर्यंत त्यांच्या मानेवर कसलीच खुण नसते. बाहेरुन पाणी पिऊन ते खुर्चीत येऊन बसतात तेव्हाच दत्ताला ते रक्त दिसत म्हणजे पाणी प्यायला गेलेले असताना त्यांच्यावर कोणीतरी वार करत.
अगदी धारदार पात्याने जर पटकन वार झाला असेल तर त्याची जाणीव होऊ शकते का?? असा प्रश्न पडलाय आता.
माझा अभिरामवर संशय आहे.. नेने बाहेर जाताना व आत येताना तो दाराच्या बाजूलाच उभा असतो. ते पाणी पिऊन बाजूने येताना त्यानेच वार केला असावा.. कारण दत्ता बघतो तेव्हा त्या जखमेतून नुकतेच रक्त येऊ लागलेले असते.. आणि त्त्यानंतर जेवढ्या वेळात नेने गचके देऊ लागतात ते पाहता बाहेर कुणी मारण्याची शक्यता कमीच वाटतेय.
आता सुसल्यानं काळी जादू केलान असली तर कै सांगता येत नै.
तां सुसल्याच काळो जादू
तां सुसल्याच काळो जादू करतांव. नाईकांच्या घरात कोंबड्या नाssssssssssय, तर मग अधून-मधून ती काळी-लाल कोंबुबाय पळत असतां, ती कोण असां? शेवंता?
रश्मी.. तुझी कोंबडी भारी..
रश्मी.. तुझी कोंबडी भारी..
त्या सुष्माला जाळलं होतं ना?
त्या सुष्माला जाळलं होतं ना? मग ती परत जिवंत बघून कोणालाच फार काही वाटलेलं दिसत नाहीये .
अगदी धारदार पात्याने जर पटकन
अगदी धारदार पात्याने जर पटकन वार झाला असेल तर त्याची जाणीव होऊ शकते का?? >>>>> अर्थात, म्हणुन तर मी अंगावर डास बसण्याच उदाहरण दिल ना? डासाच्या मानाने धारदार शस्त्राने केलेल्या वाराची जाणीव ही अजुन कमी वेळात लक्षात यायला हवी आणि त्यासाठीच जख्मींना अजुन जख्मी करायची इच्छा व्यक्त केली मी..
इसवीसनापूर्वीचे आहे ते..
इसवीसनापूर्वीचे आहे ते..
<< त्या सुष्माला जाळलं होतं
<< त्या सुष्माला जाळलं होतं ना? मग ती परत जिवंत बघून कोणालाच फार काही वाटलेलं दिसत नाहीये . >> -
सुष्माक मागणी घालूंक जातहस ? मीं सुनेक जाळणार्यातली सासू नाय.
पण जाळल्यारय परत येणारी सून नको रे बाबा या घरांत !!!
(No subject)
बाद्वे कालच्या ट्रेलरमध्ये ती
बाद्वे कालच्या ट्रेलरमध्ये ती सुसल्या पांडूला काय म्ह्णत असते ? मी मारले असते तर ते जिवंत राहीले असते असे का ? नीट कै कळलं नै
पांडु तिला विचारतो की तुच
पांडु तिला विचारतो की तुच मारलस ना नेने काकांना, त्यावर ती म्हणते की मी मारल असत तर ते जिवंतच राहिले नसते..
Pages