पूर्वसुचना:- एवढ्यातच माझ्या एका कथेवर ओरिजिनल नसल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. त्यावरून ही कथा ओरिजिनल आहे असा दावा मी करू शकत नाही. कथेवर कोणाही वाचकाचा आक्षेप असल्यास प्रतिसादात नि:संकोच कळावावा.
तोवर माझी ह्या कथेमागची प्रेरणा ईथे नोंदवून ठेवतो. त्याच्याशी वा ईतर कुठल्याही साहित्याशी आक्षेपार्ह साम्यस्थळं वाचकांना जाणवल्यास मी आनंदाने जबाबदारी स्वीकारण्यास कटिबद्ध आहे.
कळावे लोभ असावा.
---------------------------------------------------------------------------------
मोतीबिंदू झाल्यापासून म्हातारा तोंडाने विक्षिप्त बडबडत आणि हातांनी चोपन्नं पत्ते पिसत वाड्यातल्या पलंगावर पडून राही. अशात शहरातून म्हातार्याची दोन्ही मुलं मृत्यूपत्रासाठी पोराबाळांसाहित वाड्यावर ऊतरली.
दोन मुलं आणि दोन मुली, म्हातार्याच्या शाळकरी नातवंडांची चौकडी विक्षिप्त बडबड ऐकून फिदीफिदी हसे.
एकदा चौकडी म्हातार्याजवळ जाऊन म्हणाली,
आजोबा मी कोण?
तू बेट्या ईस्पिकचा राजा! पाताळयंत्री!
मी आजोबा?
तू बदामची राणी! लालची!
मी?
तू चौकटचा राजा! अहंकारी!
आजोबा मी?
तू किलवरची राणी! कारस्थानी!
चौकडी फिदीफिदी हसली.
आणि मी मोठे-मालक?
तुम्ही? जोकर!
चौकडी पुन्हा फसफसली.
बेटेहो! ते हुशार, बहुरूपी! राजा-राणी भिकारी!
***********************************************************************************************************************
संध्याकाळी विहिरित एक शाळकरी प्रेत तरंगतांना सापडले. दोन जिवंत शाळकरी डोळे आईला बिलगून चौकडीकडे त्वेषाने बघत होते.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
टीपः- संयोजकांनी कथेचे परिक्षण करणे मान्य नसल्याने जोवर सालाबादप्रमाणे लोकशाही पद्धतीने मतदान होत नाही तोवर कृपया ही कथा स्पर्धेतून बाद समजावी.
Comments मधून कळली
Comments मधून कळली
शशक आवडली
हाडळीचा आशिक (कसे सुचले असे नाव..? )
भारी आहात..! तुम्हाला बरोबर कळली.. हुशार दिसताय
हायझेनबर्ग कृपया विचारपुस पहा
हायझेनबर्ग कृपया विचारपुस पहा
स्पष्टीकरण द्यावे लागते याचा
स्पष्टीकरण द्यावे लागते याचा सरळ-सोपा अर्थ म्हणजे कथा गंडली आहे >> हो. माझी कथा नक्कीच गंडलेली असू शकते.
पण दुसर्या कथांबाबत हे खरे नाही. मला बहुतेक सगळ्या कथा (एक जव्हेरगंज ह्यांची सोडली तर... माबुदोस) कुठल्याही स्पष्टीकरणाशिवाय व्यवस्थित समजल्या आणि त्या समजून घेतांना फार मजा सुद्धा वाटली.
बोस्टिंग किंवा कुणाला शिकवण्याचा वा पढवण्याचा हेतू नाही पण पुढे येणार्या कथांचा आस्वाद घेण्यासाठी काही मदत म्हणून (किंवा जंम्म्त म्हणून करावयाची एक एक्क्सरसाईझ म्हणून) खालचे वाचावे.
As they say, the real story is told in spaces between the words, lines and pages.
If you want to stop the the time - Meditate
If you want to feel the the time - Write
If you want to escape the time - Listen Music
If you want to travel the time - Read
And if you want to pass the time - use social media.
तुम्हाला शब्दांमागच्या खर्या कथेचा आनंद घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रतलांमध्ये टाईम ट्रॅवल करून एकेक धागा जुळवत असंच जावं लागेल. वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचल्यासारखी कथा वाचून किंवा कथेतला शेवटचा शब्द वाचून झाला रे झाला की सगळी कथा समजलीच पाहिजे असे ठरवून कसे चालेल. शब्द वाचल्यानंतर कथालेखकाच्या डोक्यात शिरून त्याची कथा आपल्या डोक्यात डाऊनलोड करतांनाचा आनंद काय वर्णावा... ज्याचा त्यानेच हा अनुभव घेतलेला बरा.
संयोजक, ओळखा पाहु - सोळा
संयोजक, ओळखा पाहु - सोळा आण्याच्या गोष्टींचं रहस्य अशी स्पर्धा ठेवा
ही प्रतिक्रिया आवडली
कथा आवडली , हटके लेखन .
कथा आवडली , हटके लेखन .
शब्द वाचल्यानंतर कथालेखकाच्या
शब्द वाचल्यानंतर कथालेखकाच्या डोक्यात शिरून त्याची कथा आपल्या डोक्यात डाऊनलोड करतांनाचा आनंद काय वर्णावा... >>>> हम्म्म
पटतय तुमचं पण तरीही काही इतर कथा उलगडल्यावरही तितक्या भावल्या नाही… तुमच्या कथांतलं वरवर सांगितलेलं कळालं पण सटल विचार कळायला कुणीतरी उलगडावी लागली. मग भारी वाटली.
पण काही इतर कथांत उलगडल्यावरही काही खास वाटलं नाही. बौद्धिक कंटाळा केला त्याचं फार वाटलं नाही. त्यामुळे त्यांना पास दिला.
हाब, धन्यवाद. डोक्याला सॉलिड
हाब, धन्यवाद. डोक्याला सॉलिड खुराक कथा होती. आवडली.
खरं सांगेन,पहिल्यांदा वाचली
खरं सांगेन,पहिल्यांदा वाचली तेव्हा नाहीच कळाली...मग दुसर्यांदा थोडी कळाली पण सस्पेन्स उलगडत नव्हता...
तुम्ही स्पष्टीकरण दिल्यानंतर पूर्ण कळाली..
मस्त जमलेय
मस्त जमलेय
जोकर आणि भिकार सावकार मोतीबिंदू या सगळ्याच एकमेकांशी रिलेशन आणि त्यांचा वापर मस्तं
चार मुले एकाचा खुन करतात . एक
चार मुले एकाचा खुन करतात . एक जण घाबरतो.
याच्यात कथा नक्की काय आहे?
चार मुले एकाचा खुन करतात . एक
चार मुले एकाचा खुन करतात . एक जण घाबरतो.
याच्यात कथा नक्की काय आहे?>> चार मुले चार वृत्ती / प्रवृत्ती रिप्रेझेंट करतायत
लालसा अहंकार पाताळयंत्री कारस्थानी अंगी असलेली मुले (इथे मुले कारण दुसरी पार्टीही मुलच आहे म्हणजे तुलनेने समान / एका लेव्हलचे शारीरिक बळात किंवा बाह्यता समान शारीरिक बळाचे) तरी दुसऱ्या पार्टीचा बळी जातो कारण या वृत्ती तिथे ओव्हरपॉवर करतात.
चार प्रवृत्तिनि एक वृत्ति ला
चार प्रवृत्तिनि एक वृत्ति ला मारले. सिरियसली - कथा कुठे आहे?
मांडणी आवडली हो कथेची. एक
मांडणी आवडली हो कथेची. एक साधा विषय कसा सादर केला जातो हे खुप महत्वाचे असते. त्यातच त्याचे वेगळेपण खुलते.
दर्जेदार लेखन वर काढतोय.
दर्जेदार लेखन वर काढतोय.
दर्जेदार लेखन वर काढतोय>>कसं
दर्जेदार लेखन वर काढतोय>>कसं काढलं??मला तर यांचं इतर कोणतेही लेखन दिसत नाही,पान पहायची परवानगी नाही असा msg येतोय
कमेण्ट्स वाचण्याच्या आधी जशी
कमेण्ट्स वाचण्याच्या आधी जशी सऱळपणे कथा समजली, योगायोगाने तसाच खुलासा आहे कथेचा.
@मला तर यांचं इतर कोणतेही
@मला तर यांचं इतर कोणतेही लेखन दिसत नाही,पान पहायची परवानगी नाही असा msg येतोय≫≫
हायझेनबर्ग ह्यांचे लेखन
लिंक क्लिक करून पहा
धन्यवाद अज्ञानी, आधी सुदधा
धन्यवाद अज्ञानी, आधी सुदधा कुणीतरी सांगितले होते उडवलेल्या id चे लेख कसे पहायचे ते, पण नाही जमले मला
कुल्फी च्या बिस्कीट चे पापलेट ही खूप आवडलेली कथा होती
दर्जेदार लेखन वर काढतोय.
दर्जेदार लेखन वर काढतोय.
>>> नक्की कळवा वर काढल्यानंतर...
नक्की कळवा वर काढल्यानंतर...>
नक्की कळवा वर काढल्यानंतर...>>>
ॲग्रीड... एकंदरीत कथा contrived वाटली.
सुरवातीलाच 'आजोबा मी कोण?' असा रॅंडम प्रश्न नातू आउट ऑफ द ब्लू का विचारतो? म्हणजे उत्तरासाठी प्रश्न योजला आहे. म्हणजे हिंदी पिक्चरमध्ये कधीकधी हिरोला डायलॉग मारू देण्यासाठी दुसरं पात्र काहीतरी नॉन स्पेसिफिक संवाद म्हणत म्हणत हिरोला डायलॉगपर्यंत नेऊन सोडतं तसं. पुढे वेगवेगळ्या पत्त्यांना वेगवेगळे गुणधर्म चिकटवले आहेत. त्यामागे लॉजिक काय? उदा. बदामची राणी हे प्रेमाचं आणि चौकटची म्हणजे पैशाचं प्रतीक हा सर्वमान्य साहित्यिक संकेत आहे. इथे आपण बदामची राणी लालची आणि चौकट राजा अहंकारी असं मान्य करून पुढे जायचं. त्यानंतर 'शाळकरी प्रेत' ही शब्दरचना वाचून अंमळ मजा वाटली. शंभर शब्दांच्या मर्यादेसाठी असे चमत्कारिक शब्दप्रयोग केले आहेत असं समजून घेतलं तरी डोळ्यांसमोर दप्तर घेतलेले एक लहान मुलाचे प्रेत शाळेत चालले आहे असं दृश्य आलं. मूल शाळकरी असतं, प्रेत नाही. पुढे कोणीतरी पोराने दुसर्या पोराचा खून केला असं समजतं. नक्की कोणी कोणाचा, त्याला मोटिव्ह काय, हे ज्याने-त्याने आपापल्या कल्पनाशक्तीवरून उकलायचं. पुढे मग लेखकालाच कथेपेक्षा मोठे एक्ष्प्लेनेशन द्यायला लागले. ते एक्ष्प्लेनेशन घेऊन परत कथेची संगती लावायच्या प्रयत्नात 'अं??.. ओके व्हॉटेव्हर...' असं फिलिंग आलं.
एकूण काहीतरी भारी प्लॉट मनात होता पण तो शंभर शब्दांत बसवायच्या प्रयत्नात लेखकाची दमछाक झाली असं वाटतंय.
धन्यवाद अज्ञानी _/\_ लिंक
धन्यवाद अज्ञानी _/\_ लिंक दिल्या बद्दल.
धन्यवाद अज्ञानी. या आयडीचे
धन्यवाद अज्ञानी. या आयडीचे लिखाण वाचायचेच होते.
नाव ऐकून होतो, पण कधी वाचले नव्हते.
Pages