सोळा आण्याच्या गोष्टी - घटनाक्रम - कविन

Submitted by कविन on 12 September, 2019 - 01:16

घटना घडत गेल्या, क्रम काहीही असेल याचा.

थांब ॲडम! ती विनवणीच्या स्वरात म्हणाली. माझा श्वास थांबला एक क्षण.

त्या बंद दारापलिकडे म्हणे सैतानाचे राज्य आहे आणि कसलेसे संस्कार केलेल्या मंतरलेल्या धाग्याने म्हणे त्याला रोखून धरलय. बूलशीट! या अंधश्रद्धेलाच मला तोडायचे आहे.

तिच्या म्हाताऱ्या हाताचा खरखरीत स्पर्श गालाला झाला. फूल पडलेल्या डोळ्यातून अश्रू तिच्या गालावर ओघळले.

“ती सैतानाची खोली आहे. त्याला बाहेर येऊ दिला तर अनर्थ होईल. काळजी वाटते रे मला तुझी” ती कळवळून म्हणाली.

म्हातारी सरणावर गेली. मी दोर कापून टाकला. दार उघडले. खोल भरून श्वास घेतला.

घटना घडत गेल्या, क्रम काहीही असेल याचा. लोकं म्हणतात ”ॲडम आता कुमार्गाला लागलाय”

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Chhan

आता जरा इस्कटून सांग बरे, कळेल अशी. Lol>>> थांब अजून पुरेसे प्रेशर येऊदे Lol (कोणीतरी कळतेय म्हणणार निघेल या आशेवर आहे मी अजून Wink )

अ‍ॅडमच सैतान आहे. म्हणूनच तो <<< त्या बंद दारापलिकडे म्हणे सैतानाचे राज्य आहे आणि कसलेसे संस्कार केलेल्या मंतरलेल्या धाग्याने म्हणे त्याला रोखून धरलय.>>> ह्याला अंधश्रद्धा म्हणतो.

आवडली. मला दोर हे रूपक वाटले माणसाच्या सद्सदविवेकबुद्धीचे, त्याच्यावर आईने केलेल्या चांगल्या संस्कारांचे. तो दोर तुटला की माणसाची अधोगती निश्चित.

मलाही अ‍ॅडम सैतान वाट्ला.
मी दोर कापून टाकला.>>> हे वाचल्यावर चंद्रा म्हणतात तसे दोर हे रूपक वाटले माणसाच्या सद्सदविवेकबुद्धीचे, त्याच्यावर आईने केलेल्या चांगल्या संस्कारांचे. तो दोर तुटला की माणसाची अधोगती निश्चित.

घटनांचा क्रम असा बदलून पाहिला.... अर्थात त्याने काही फार पडत नाही.

घटना घडत गेल्या, क्रम काहीही असेल याचा.

त्या बंद दारापलिकडे म्हणे सैतानाचे राज्य आहे आणि कसलेसे संस्कार केलेल्या मंतरलेल्या धाग्याने म्हणे त्याला रोखून धरलय. बूलशीट! या अंधश्रद्धेलाच मला तोडायचे आहे.

थांब ॲडम! ती विनवणीच्या स्वरात म्हणाली. माझा श्वास थांबला एक क्षण.
“ती सैतानाची खोली आहे. त्याला बाहेर येऊ दिला तर अनर्थ होईल. काळजी वाटते रे मला तुझी” ती कळवळून म्हणाली.
तिच्या म्हाताऱ्या हाताचा खरखरीत स्पर्श गालाला झाला. फूल पडलेल्या डोळ्यातून अश्रू तिच्या गालावर ओघळले.

म्हातारी सरणावर गेली. मी दोर कापून टाकला. दार उघडले. खोल भरून श्वास घेतला.

घटना घडत गेल्या, क्रम काहीही असेल याचा. लोकं म्हणतात ”ॲडम आता कुमार्गाला लागलाय”

--------------------------------------------------------------
गार्डन ऑफ ईडन, 'ब्रेथ ऑफ लाईफ", ओरिजिनल सिन, फॉल ऑफ अ‍ॅडम, ट्री ऑफ द नॉलेज गूड अँड ईविल, फॉर्बिडन फ्रूट ह्या संदर्भाने लिहिले आहे असे वाटते.

म्हातारी (पुसट होत चाललेला देवावरचा विश्वास किंवा आता म्हातारी झालेली ईव किंवा साध्या रेफरंसने संस्कार करणारी आई) बाळ अ‍ॅडमला सुरक्षित वातावरणात मोठे करते त्याला सगळे दैवी ज्ञान देते.... पण तिचे प्रेम अ‍ॅडमला वाईट, सैतानी विषयांबद्दल ज्ञान देऊ देत नाही. म्हणून अ‍ॅडमला सैतान (वाईट लोक जगात असणे) वगैरे अंधश्रद्धा वाटतात. (थोडक्यात सुरक्षित वातावरणात वाढल्याने, फक्त चांगल्याच आणि दैवी गोष्टींचे ज्ञान मिळाल्याने (संस्कार) त्याला वाईट अनुभव येणे, धोके होणे ही अंधश्रद्धा वाटते)
पण आता अ‍ॅडम "मॅन" झाला आहे आणि बाहेरच्या जगात जाण्यास सज्ज आहे.

म्हातारी जिने त्याला त्याचा पहिला श्वास दिला आहे त्याला असे करण्यापासून थांबवते आहे.

पण बंद दाराच्या पलिकडे सुद्धा जे सैतान आहे ते ह्या आधी येऊन गेलेले अ‍ॅडमच आहेत (जे अ‍ॅडमला अजून माहित नाहीये) ज्यांच्यावर सुद्धा संस्कार झाले होते पण सैतानाच्या प्रभावाने (जशी अ‍ॅडमला किंवा ईवला किंवा दोघांना सैतानाने भूल घातली आणि ट्री ऑफ द नॉलेज गूड अँड ईविल चे फॉर्बिडन फ्रूट खाण्यास ऊकसवले) ते सगळे सैतानी अंश झाले आहेत आणि फक्त म्हातारीने केलेल्या जुन्या संस्कारांनी (धागा) फक्त त्यांच्या अ‍ॅक्शन्स सध्या बांधलेल्या आहेत.

मॅन झालेल्या अ‍ॅडमच्या जीवनातून जेव्हा म्हातारीचे (अ पर्सन विथ विसडम) अस्तित्व संपते तेव्हा तो बाहेरच्या जगात (असुरक्षित वातावरणात) पाऊल ठेवतो. पण तिथले आधीचे अ‍ॅडम त्याला वाईट म्हणतात कारण तो अजून त्यांच्यासारखा झालेला नाहीये.

हे अविरत चक्र आहे कोणीही आधी आलेले असू शकते.... म्हातारी (देव) की अ‍ॅडम की सैतान.

हाबखेरीज इतर कोणीतरी (माझ्या प्रतिसादाआधी छान, कळाली वगैरे ज्यानी लिहलेय त्यापैकी कोणीतरी) स्पष्टीकरण द्यावे अशी इच्छा होती.

> घटनांचा क्रम असा बदलून पाहिला.... अर्थात त्याने काही फार पडत नाही.

गार्डन ऑफ ईडन, 'ब्रेथ ऑफ लाईफ" , ओरिजिनल सिन, फॉल ऑफ अॅडम, ट्री ऑफ द नॉलेज गूड अँड ईविल, फॉर्बिडन फ्रूट ह्या संदर्भाने लिहिले आहे असे वाटते. > +१.

दुसरा एक विचार म्हणजे -
मुल जन्माला येण्याबद्दल आहे का? 'कसलेसे संस्कार केलेल्या मंतरलेल्या धाग्याने' म्हणजे नाळ?

म्हातारी = पृथ्वी / निसर्ग
अ‍ॅडम = पहिला प्रगत मानव
सैतान = अंधाधुंद प्रगती
मंतरलेला धागा = निसर्गाभिमुखता

असं काही आहे का?

धन्यवाद लोकहो Happy

दोर सिंबॉलिक बरोबर

खरतर म्हंटले तर सगळेच सिंबॉलिक तसे

हायझेनबर्ग अचूक अगदी. माझ्या मेंदूत शिरुन डिकोड केल कि काय इतकं माझ्या मनातलं लिहीलय. अजून काही होतं लिहीताना ते म्हणजे सैतानाला रोखायच तर काही एक दोर (संस्कारांचा म्हण सुविचारांचा म्हणा सदसदविवेकाचा म्हणा) आवश्यक आहे. यश येईलच अस नाही दरवेळी. तरी आवश्यक आहे. आणि घटनाक्रम कोणताही असेल म्हणजे हे एका सर्कलमधे जर फिरतय अस इमॅजीन केलं तर त्याचा सुरवातीचा बिंदू मध्य बिंदू आणि अंतिम बिंदू हा वेगळा दाखवता येणार नाही. तो बदलता असेल किंवा जिथून आपण सुरु करु तिथून असेल आणि परत तिथेच येईल.

क्रम बदलला कि आऊटपूट बदलेलही

म्हणजे आधी कुकर्मी सैतान मग संस्कार करणार कोणी दोर बांधणार कोणी

किंवा आधी दार उघडल सैतान जागा झाला (मनातला) मग म्हातारीला संपवलं (संस्कार किंवा सदसदविवेकाची दोर बांधणारी आठवण देणारीला) पुरता सैतान जागा झाला

किंवा आधी म्हातारी गेली प्रोटेक्शन गेलं दोर गेला उत्सुकतेने मात केली रोखायला म्हातारी नव्हती सैतानाने तनामनात प्रवेश केला कुकर्माला लागला

घटनाक्रम बदलला कि सुरुवात मध्य शेवट बदलेल. घटनाक्रम काहीही असू शकतो. It is upto you to decide

भारीच कि.. हाब आणि कविन दोघांचा प्रतिसाद वाचल्यावर परत कथा नीट वाचली तेव्हा कळाली.. Happy

आवडली कथा
प्रतिसाद वाचल्यावर कळली होती हे ही कळले Happy