Submitted by मी मधुरा on 6 September, 2019 - 02:14
खोटं आणि मी? हम्म्म.... काय करणार, पांढऱ्या वस्त्रावर काळे आवरण घालण्याची आमची प्रथाच आहे. कोर्टातून बाहेर निघाल्यावर नेहा भेटली. नोटा मोजून घ्यायची गरज नव्हती. दिलेलं पाकिट जड होतं आणि नेहा प्रामाणिक.
अजूनही आठवते आहे..... समीरच प्रेत....तिचे रक्ताने माखलेले हात.... खूनाचा आरोप.... अटक झाली तेव्हा केवढी सैरभैर झाली ती! मी केस घेतली. शेवटी फॅमिली फ्रेंड. कोर्टाला पटले - कुंडीवर डोके आपटून अपघाती मृत्यू. रक्ताच्या थारोळ्यातल्या प्रेताला नेहाने केवळ हलवून पाहिले होते.
नवरा कसाही असला, तरी त्यांच्या बायका त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतातच. आता हेच बघा.... छोट्याश्या भांडणाचं निमित्त. समीर ह्यांच्या अंगावर धावला नसता तर ह्यांनी त्याला कुंडी फेकून मारलीच नसती! नै का?
©मधुरा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
धन्यवाद किल्ली
धन्यवाद किल्ली
नक्की खून केलाय कोणी? नेहा कि
नक्की खून केलाय कोणी? नेहा कि नेहाच्या बॉयफ्रेंड ने?
वकिलीण बाईंच्या नवऱ्याने..
वकिलीण बाईंच्या नवऱ्याने.. नेहाला पण माहीत नाही.. खून कोणी केलाय.
आवडली कथा
आवडली कथा
मस्त! आवडली कथा.
मस्त! आवडली कथा.
धन्यवाद हर्पेन, सस्मित.
धन्यवाद हर्पेन, सस्मित.
च्रप्स, मधुरा d यांचा तर्क बरोबर आहे. कथा पुन्हा एकदा वाचलीत तर कदाचित लक्षात येईल चटकन.
आवडली!
आवडली!
धन्यवाद वावे
धन्यवाद वावे
नवरा कसाही असला, तरी
नवरा कसाही असला, तरी त्यांच्या बायका त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतातच.
>>> तिच्या नवऱ्यावर संशय आहेच कुठे?
एक वकिल असते. तिच्या फॅमिली
च्रप्स,
एक वकिल असते. तिच्या फॅमिली फ्रेंड समीरचा खून तिच्याच नवऱ्याच्या हातून होतो. समीरची बायको नेहा, सत्यापासून अनभिज्ञ असते. ती जेव्हा समीरचे प्रेत पाहते, तेव्हा त्याला हलवून पाहते तो जिवंत असेल म्हणून. तिच्या हाताला त्याचे रक्त लागते. तेव्हाच पोलिस येऊन तिला पकडतात. ती वकील बाईलाच तिच्या बाजूने लढायला बोलावते जवळची वकील म्हणून.
वकिल बाई तिला सोडवतेच. पण सोबतच समीरचा खून झालेला नसून अपघाती मृत्यू असल्याचे दाखवत संपूर्ण केस मधून स्वतःच्या नवऱ्यालाही अप्रत्यक्षपणे वाचवते.
इथे जर नेहा गुन्हेगार नाही तर खरा गुन्हेगार कोण हे शोधून काढावे लागणार पोलिसांना. परत चौकशीत नवरा फसला तर??? म्हणून तो खून नव्हताच, अपघात होता असे तिने कोर्टाला पटवून दिले.
_________
_________
मैत्रीण आणि नवरा दोघेही वाचले. पुन्हा घसघशीत फी पण मिळाली.. आणि दोघेही आयुष्य भर कृतज्ञ राहणार ते निराळंच... एका दगडात अनेक पक्षी! copy paste
भारीच! शेवटच्या वाक्यात मस्तच
भारीच! शेवटच्या वाक्यात मस्तच ट्विस्ट आहे..
धन्यवाद अथेना!
धन्यवाद अथेना!
आवडली.
आवडली.
धन्यवाद ॲमी
धन्यवाद ॲमी
मधुरा... शेवटली ओळ वाचताना
मधुरा... शेवटली ओळ वाचताना काटाच आला एकदम! जम्ली आहे मस्तच.
शशक चे लेखन पण छान झाले आहे .
शशक चे लेखन पण छान झाले आहे .
धन्यवाद रमणी, धन्यवाद अशोक
धन्यवाद रमणी
धन्यवाद अशोक
मस्तच आहे.
मस्तच आहे.
धन्यवाद प्राचीन
धन्यवाद प्राचीन
छान
छान
धन्यवाद पीनी
धन्यवाद पीनी
लय भारी
लय भारी
भारी लिहिता...
भारी लिहिता...
धन्यवाद योगिता, धन्यवाद पद्म
धन्यवाद योगिता, धन्यवाद पद्म
कथा दोन वेळा वाचली पण
कथा दोन वेळा वाचली पण कळली खूप छान
धन्यवाद निशा
धन्यवाद निशा
भारी आहे कथा!
भारी आहे कथा!
धन्यवाद चंद्रा
धन्यवाद चंद्रा
आता समजली-मधुराजी
आता समजली-मधुराजी