शशक - एक शतशाब्दिका!

Submitted by मी मधुरा on 6 September, 2019 - 02:14

खोटं आणि मी? हम्म्म.... काय करणार, पांढऱ्या वस्त्रावर काळे आवरण घालण्याची आमची प्रथाच आहे. कोर्टातून बाहेर निघाल्यावर नेहा भेटली. नोटा मोजून घ्यायची गरज नव्हती. दिलेलं पाकिट जड होतं आणि नेहा प्रामाणिक.

अजूनही आठवते आहे..... समीरच प्रेत....तिचे रक्ताने माखलेले हात.... खूनाचा आरोप.... अटक झाली तेव्हा केवढी सैरभैर झाली ती! मी केस घेतली. शेवटी फॅमिली फ्रेंड. कोर्टाला पटले - कुंडीवर डोके आपटून अपघाती मृत्यू. रक्ताच्या थारोळ्यातल्या प्रेताला नेहाने केवळ हलवून पाहिले होते.

नवरा कसाही असला, तरी त्यांच्या बायका त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतातच. आता हेच बघा.... छोट्याश्या भांडणाचं निमित्त. समीर ह्यांच्या अंगावर धावला नसता तर ह्यांनी त्याला कुंडी फेकून मारलीच नसती! नै का?

©मधुरा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

धन्यवाद हर्पेन, सस्मित. Happy Happy

च्रप्स, मधुरा d यांचा तर्क बरोबर आहे. कथा पुन्हा एकदा वाचलीत तर कदाचित लक्षात येईल चटकन. Happy

नवरा कसाही असला, तरी त्यांच्या बायका त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतातच.
>>> तिच्या नवऱ्यावर संशय आहेच कुठे?

च्रप्स,

एक वकिल असते. तिच्या फॅमिली फ्रेंड समीरचा खून तिच्याच नवऱ्याच्या हातून होतो. समीरची बायको नेहा, सत्यापासून अनभिज्ञ असते. ती जेव्हा समीरचे प्रेत पाहते, तेव्हा त्याला हलवून पाहते तो जिवंत असेल म्हणून. तिच्या हाताला त्याचे रक्त लागते. तेव्हाच पोलिस येऊन तिला पकडतात. ती वकील बाईलाच तिच्या बाजूने लढायला बोलावते जवळची वकील म्हणून.

वकिल बाई तिला सोडवतेच. पण सोबतच समीरचा खून झालेला नसून अपघाती मृत्यू असल्याचे दाखवत संपूर्ण केस मधून स्वतःच्या नवऱ्यालाही अप्रत्यक्षपणे वाचवते.

इथे जर नेहा गुन्हेगार नाही तर खरा गुन्हेगार कोण हे शोधून काढावे लागणार पोलिसांना. परत चौकशीत नवरा फसला तर??? म्हणून तो खून नव्हताच, अपघात होता असे तिने कोर्टाला पटवून दिले.
_________

_________

मैत्रीण आणि नवरा दोघेही वाचले. पुन्हा घसघशीत फी पण मिळाली.. आणि दोघेही आयुष्य भर कृतज्ञ राहणार ते निराळंच... एका दगडात अनेक पक्षी! Happy copy paste