सोळा आण्याच्या गोष्टी - मी? मजेत! - मॅगी

Submitted by मॅगी on 8 September, 2019 - 08:50

काल दुपारपासून ती बाथरूमच्या कोपऱ्यात गुडघ्याला मिठी मारून बसली होती. टाईल्सच्या थंडाव्याने हातपाय बधीर होत चालले होते, तरीही घामाने तळवे ओलसर झाले होते.

बाहेर तिचा मोबाईल ठणाणत होता. मुख्य दारावरचे धक्के आणि आरडाओरड अंधूक ऐकू येत होती. "मीरा ss  मीरा दार उघड. तुला वाटतंय ते सगळं खोटं आहे. मीराss"

तिने नकारार्थी मान हलवून समोर पाहिलं. काळोखात बिनचेहऱ्याचा तो माणूस अजूनही तिच्याकडे रोखून पहात उभा होता. तो कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो. ती तेरा वर्षाची असल्या पासून तो कायम तिच्या मागावर होता...

त्याला संपवण्याचा एकच मार्ग आहे.

तिने खाली पाहिलं. चार निळ्या गोळ्या पाण्यात विरघरळून चालल्या होत्या. तिच्या चिमटीतलं ब्लेड चकाकलं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डोक्यात न शिरता पार झाली शशक. आता संत्र आयतं कोण सोलून देईल याची वाट पहाणे आले!
मलाही स्किझोफ्रेनियाची शक्यता वाटली पण मग निळया गोळ्यांचा संदर्भ नाही समजला.

वेल , मला वाटतं टीनेज आणि सोशल मिडिया बद्दल आहे.
१३ व्या वर्षांपासून म्हणजे सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरची एज लिमिट तेरा आहे म्हणून.
सोशल मिडियावरची खोटी निंदा-नालस्ती तिचा ईमोशनल पाठलाग करते आहे - अदृष्य चेहर्‍याचा पुरूष आणि फोन वरचे नॉन-स्टॉप नोटिफिकेशन्स.
दारावर ठोठावणारे पालक आहेत, ते फिजिकली आजूबाजूला आहेत पण ईमोशनली खूप दूर आणि मध्ये अनेक दारे आहेत.
चार निळ्या गोळ्या म्हणजे जनरली निळ्या रंगात असणारे सोशल मिडिया अ‍ॅप्सचे आयकन्स - which have dissolved in her life like poison pills.

मला 13 Reasons Why शी बरेच पॅरलल दिसले.

भरत, रेड पिल-ब्लू पिल आणि मॅट्रिक्सचा विचार खरं केला होता
पण ह्या दोन सिंबॉलिक कलर्ड पिल्स म्हणजे अ चॉईस गिवन टू अ सेन पर्सन आहे (थोडक्यात खोटे लक्झुरिअस आयुष्य सोडून खरे अ‍ॅडवेंचर्स/रिस्की आयुष्य जगण्यापैकी एकाची निवड करण्यासाठी) आणि माझ्यामते कथेतली मुलगी पूर्णपणे डिस्ट्रेस मध्ये आहे.

मला ही निळी गोळी वाचून ब्लू पिल आणि ब्लेड रक्त लाल वरून तिने रेड पिल घेण्याचं ठरवलं असंच वाटतंय. 13 रिझन्स बघितलेली नाही, 13 चा नक्की संबंध असेल काहीतरी
हाब चं स्पष्टीकरण जुळतंय

सोशल मीडिया बुलिंग, डिप्रेशन आणि रेड पिल चूझ करणं आहे.

हाब, 13 एज लिमिट आणि निळ्या गोळ्यांचे आयकॉन्स परफेक्ट गेस!

भरत आणि अमितचा व्ह्यू पण बरोबर आहे.

धन्यवाद सगळ्यांना आणि वाचून विचार केल्याबद्दल जास्त आभारी आहे Happy

साधारण कळली पण तेरा कारणे मालिका पाहिली नाहीये म्हणुन १३ नंबर, निळ्या लाल गोळ्या वगैरे काहीच कळत नाही.

अरेच्चा! म्हणजे मला अजिबातच कळाली नव्हती ही गोष्ट....
13 Reasons Why पुस्तक वाचलं आहे पण त्यात रेड-ब्लु पील, जालीय सोशल मिडिया असल्याचं आठवत नाहीय...

हॅनाच्या 'फोटो'वरून तिची तिच्या सोशल सर्कलमध्ये छळवणूक होते आणि ती कथेतल्या मीरासारख्याच बाथरूममध्ये हाताच्या शीरा कापून घेते.
मी '१३ रिझन्स व्हाय' वेबसिरिज बद्दल बोलत आहे ...पुस्तकात कदाचित वेगळे असू शकेल.

मी 13 रिझन्स पुस्तक वाचलंय, शो बघितला नाही. या कथेचा 13 रिझन्सशी संबंध नाही. मी जनरलच सोशल मीडियाच्या आभासी जगात हरवून जाणे (ऍलिस इन वंडरलँड), त्यातले वेगवेगळ्या प्रकारचे बुलिंग, व्हर्चुअली सतत आनंदी दिसत राहण्याचे प्रेशर, डिप्रेशन आणि शेवटी ब्लु पिल, रेड पिल रेफरन्स यावर कथा बेतली आहे.

मीपण फक्त पुस्तक वाचलंय, शो बघितला नाही.
> या कथेचा 13 रिझन्सशी संबंध नाही. > मलादेखील जाणवला नाही. 'तेरा कारणे?' असा प्रतिसाद वाचूनपण जाणवला नाही Lol

मला वाटतं पुस्तक २००७ साली आलंय (जेव्हा सोशल मिडिया एवढा प्रबळ नव्हता). मालिका बरीच उशिरा आलीय त्यामुळे कालसुसंगत होण्यासाठी त्यात बदल केले असतील, बुलिंगमुळे झालेली पौगंड वयातील आत्महत्या ही थीम सारखीच ठेऊन.

म्यागी, तुझी कथा वाचायच्या आधी प्रतिसाद वाचते मग कथा ... पार डोक्यावरुन जातात पण तुझं खूप कवतिक Happy कसं काय सुचतं म्याडम तुम्हाला:)

भारी आहे गोष्ट. आधी काहीच कळली नव्हती. प्रतिसाद वाचून कळली. पण एक नाही कळलं- ती नक्की काय करते शेवटी? ब्लेडने नसा कापून आत्महत्या? इथे रेड पिल म्हणजे नेमकं काय आहे?

कथा समजवून सांगावी लागते याचा सरळ-सोपा अर्थ म्हणजे कथा गंडली आहे.>> बरं Happy

हो सनव, सोशल मीडिया जगू देत नाही आणि डिप्रेशन मरु देत नाही म्हणून ती रिऍलिटीमध्ये येऊन स्वतःला संपवू पाहतेय. तिच्यासाठी तीच तिची रिऍलिटी (रेड पिल) आहे.

पण एक नाही कळलं- ती नक्की काय करते शेवटी? >> तिने शेवटी काही डिसायसिव्ह केलंच पाहिजे असं ही अजिबातच नाही. आणि मला ही गोष्ट आवडण्यामागे ते ही एक कारण होतं. शेवट ओपन एंडेड ठेवून तो वाचकांना विचार करायला/ इंटरप्रिट करायला सोडून देणे मला फार आवडतं.
किंवा शेवटच न करणे..... आपल्या जगण्याचा शेवट थोडी रोज करतो? आपण जगतच रहातो ना? मग प्रत्येक गोष्टीचा शेवट कशाला व्हायला हवा?

Pages