सोळा आण्याच्या गोष्टी - मी? मजेत! - मॅगी

Submitted by मॅगी on 8 September, 2019 - 08:50

काल दुपारपासून ती बाथरूमच्या कोपऱ्यात गुडघ्याला मिठी मारून बसली होती. टाईल्सच्या थंडाव्याने हातपाय बधीर होत चालले होते, तरीही घामाने तळवे ओलसर झाले होते.

बाहेर तिचा मोबाईल ठणाणत होता. मुख्य दारावरचे धक्के आणि आरडाओरड अंधूक ऐकू येत होती. "मीरा ss  मीरा दार उघड. तुला वाटतंय ते सगळं खोटं आहे. मीराss"

तिने नकारार्थी मान हलवून समोर पाहिलं. काळोखात बिनचेहऱ्याचा तो माणूस अजूनही तिच्याकडे रोखून पहात उभा होता. तो कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो. ती तेरा वर्षाची असल्या पासून तो कायम तिच्या मागावर होता...

त्याला संपवण्याचा एकच मार्ग आहे.

तिने खाली पाहिलं. चार निळ्या गोळ्या पाण्यात विरघरळून चालल्या होत्या. तिच्या चिमटीतलं ब्लेड चकाकलं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टीनेज आणि सोशल मिडिया बद्दल आहे इतकंच कळलं होतं. विचार करायला लावणारी गोष्ट.

शेवट ओपन एंडेड ठेवून तो वाचकांना विचार करायला/ इंटरप्रिट करायला सोडून देणे मला फार आवडतं. +१

Pages