सोळा आण्याच्या गोष्टी - खिडकीबाहेरचं जग! - मन्या ऽ

Submitted by मन्या ऽ on 4 September, 2019 - 07:10

खिडकीबाहेरचं जग!

ती आपले पाणीदार डोळे किलकिले करुन खिडकीबाहेरच जग बघण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती.

शाळा-ऑफिसात जाणार्यांची गडबड,रस्त्यावरची वर्दळ, फेरीवाले हे सारं तिला एकदातरी जगता यावं. असं वाटे; पण बाहेरच्या दुनियेत मात्र तीच अस्तित्व नव्हतं..

ती आजही नेहमीप्रमाणे किरणची वाट बघत होती. खरं तिला किरणच्या सहवासात स्वतःचा जीव नकोसा होई.

किरणचं तिला नको असताना उगाच जवळ घेणं, बोलतं करायचा प्रयत्न करणं.हे सारं तिला अजिबात आवडत नसे.तरी ती सहन करी.फक्त झोक्यावर बसण्यासाठी.

किरण तिला झोक्यात बसवुन अखंड बडबड करे त्यावेळीही तिचं लक्ष मात्र खिडकीबाहेरच असे.

आत्ताही किरण तिला उचलुन घेणार ईतक्यात आईचा आवाज येतो."बाहुलीसोबत नंतर खेळआधी हातपाय धुवून जेवायला ये बरं."

(Dipti Bhagat)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Chhan

छान

ही गोष्ट वेगळी आहे पण मायबोलीवर एक बाहुलीवर Horror Story वाचली होती ...... ती आठवली
कोणाला माहित आहे का?

92 words

Chhaan.

खिडकीबाहेरचं जग! >.......
आपले काय आणिक बाहुलीचे काय...... सारखेच
मन्या... मस्त लिहिले आहे

Pages