Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35
हाय फ्रेण्डस,
मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.
दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.
शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.
शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.
सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
शिव जिंंकल्याचा आणि वीणा
शिव जिंंकल्याचा आणि वीणा शिवानीच्या पुढे राहिल्याचा आनंंद झाला. फायनलसाठी मी शिव वीणाला मतं दिली. आधीच्या भागांत किशोरी, हीना यांना दिलीत.
साडेतीन तास चालेल असं सांगितलेला (टाटा स्काय प्रोग्राम गाइड) ग्रँड फिनाले साडेचार तास चालला. मी रेकॉर्ड करून मग पाहतो. त्यामुळे अकरानंतरचा भाग हुकला. सेफटी म्हणून १०:३० ते ११ चा कार्यक्रमही रेकॉर्ड केला होता. वीणा बाहेर पडली आणि मांजरेकर लग्नाची बोलणी करत होते, तिथवर दिसलं. शिव- नेहा लाइट्स ऑफ करून बाहेर पडतात ते नाही दिसलं . . इथेही वाचत असल्याने विजेत्याची अनाउन्समेंट टेलिकास्ट होतानाच पाहिली. थँक्स टु अंजू.
शनिवारचा भाग मी काल दुपारी आणि संध्याकाळीच पाहिला. बाप्पांचं शिवानीबाबत यु टर्न? माधव काय बोलतो ते अजूनही कळत नाही. फायनलिस्टबद्दल जे बोलला तेही गोल गोल होतं. मांजरेकरांनी तीन पॉइंट म्हटलं तरी त्याने सब पॉइंट्स घातले. अभिजीत केळकर बिग बॉसच्या घरात जास्त रमला का? त्याला बाहेर जाऊन स्पेस स्टेशनवरून पृथ्वीवर परतल्यासारखं अॅडजस्ट करायला लागतंय.
शेवटचे दोनतीन दिवस फायनलिस्ट फिनालेतल्या पर्फॉर्मन्सची रिहर्सल आणि शुटिंग करत होते. म्हणून काल पर्यंत ९६ वा दिवस दाखवत होते तर.
फिनाले साठी आरोह-नेहा-शिवानीचा मेकप दिसत होता. म्हणजे मेकप कडे लक्ष जात होतं, इतका. शिव वीणा किशोरीचा असा जाणवत नव्हता.
शेवटच्या चारांत नेहा- शिवानी एकमेकींसमोर असताना हाउसमेट्स मधून शिवानीला जास्त मतं? लोक तिला टरकून आहेत की काय?
वीणा हीनाकडून घरात डान्स शिकत होती हे काल आणि आधीच्या एका भागात ऐकलं . ते का दाखवलं नाही?
ज्याच्या निगेटिव्ह गोष्टी सगळ्यांत कमी तो विनर हे दीपांजलींनी लिहिलंय. मांजरेकरही म्हणाले.
शिवने इतर कोणाला दुखावलेलं नाही. ग्रजेस ठेवलेले नाहीत आणि निर्माणही केलेले नाहीत. कोणाबद्दल मागे वाईट बोलताना दिसलेला नाही, एवढ्या कारणासाठी माझा तो फर्स्ट चॉइस होता. किशोरीने शेवटी शेवटी अभिजीत केळकरच्या जोडीने आरोहबद्दल कुचाळक्या केल्या. तसंच शिव वीणाबद्दलच्या गॉसिपमध्ये योगदान दिलं होतं, यासाठी ती मागे. वीणाच्या फटकळपणामुळे शिवानी शिवाय इतर बरेच जण तिच्यापासून लांब गेले. नेहाने तर शब्द चाकूसुर्यांसारखे वापरलेत. शिवानी बाहेर पडल्यावर सुद्धा रडण्यासारखं काय होतं?
पंचिंग बॅग टास्कनंतर नेहा बरीच पॉझिटिव्ह झालीय. तिच्या चाहत्यांनी त्यापूर्वीच्या नेहासारखं वागू नये
शिव आणि त्याच्या चाहत्यांचं अभिनंदन !
२ ते ५ नंबरला तसा काही अर्थ
२ ते ५ नंबरला तसा काही अर्थ नसतो. मागच्या वेळी तर पुष्कर जोग रनर अप होता जो प्रेक्षकांचा अतिशय नावडता होता. यावेळी नेहा! हे रँक बरेचदा बिग बॉसने मॅनेज केलेले असतात. पुष्करचा कलर्समध्ये जोरदार वशिला असावा अन्यथा सूर नवा मध्ये त्याला कोण घेईल होस्ट म्हणून!
मी पाहिलेल्या सर्व ऑनलाइन पोलमध्ये शिव एक नंबरवर होता व २ ते ५ रँक वेगवेगळ्या होत्या. किशोरी बहुतेक वेळा २ नंबरवर होती.
किशोरीला रँक पाचवी दिली पण शिवव्यतिरिक्त वैयक्तिक खेळासाठी viewers choice ट्रॉफी मिळालेली ती एकटीच! कुठेतरी हा डॅमेज कंट्रोल बिग बॉसला करावा लागला अन्यथा लोकांनी अजून तोंडात शेण घातलं असतं.
किशोरीने बाहेर पडताना तुळशी वृंदावनाचा निरोप घेतला आणि तुळस सांभाळण्याची इच्छा व्यक्त केली तर लगेच मांजरेकर म्हणाले की तुळस तुझ्याकडेच येईल. अजून एक गंमत शिवने केली - किशोरी बाहेर जाणार तर सगळ्यांनी ताईला मुजरा करावा असं फर्मान सोडलं. शिव वीणा शिवानी प्रमाणे मग नेहालाही नावडत्या किशोरीला कुर्निसात करावा लागला.
अजून एक म्हणजे नेहाची 'मैत्रीण' असलेली शिवानी- जी कधी कोणाला सॉरी म्हणत नाही ती किशोरीला सतत सॉरी म्हणत होती आणि तुम्हीच जिंकायला पाहिजे हेही! नेहा माधवशी बोलत होती तेव्हा तो पण नेहाला 'तुझं बरोबर होतं' म्हणायला तयार नाही. 'शिवानीचं पण बरोबर आहे, बाहेर असंच दिसलं जसं शिवानी म्हणाली' टाईप. शेवटीही तो विनर म्हणून शिवानीचं नाव घेत होता.
अन्जू अनुश्री दिक्षीत म्हणजे
अन्जू अनुश्री दिक्षीत म्हणजे मन बावरे सिरीयल मधली अनु.
फिनाले मधे शिवच्या आईला
शिव जिंकला, मजा आली बघताना !
हिनाचा परफॉरमन्स हॉट होता, बिचुकलेचाही धमाल !
शिवच्या आईला वीणाचं जामच टेन्शन आलेल दिसतय , मांजरेकरने खूपच टिझिंग केलं पूर्ण शो भर , त्याच्या फॅमिलीने एकही शब्द काढला नाही , गंमत म्हणूनही होकार दिला नाही, शिवलाही शाब्दिक सोट्टे हाणले त्याच्या आईने ‘आमचं ऐकल नाही’ म्हणून, शिवचे रिअल टास्क आता सुरु
ग्रँडफिनालेला मेघा सई , शर्मिष्ठा आणि स्मितालाही बोलवायला हवं होतं.
आजही लाइट बन्द करायची मोमेंट छान होती, नेहाच्या रडण्याचा फारच अतिरेक झाला पण अपेक्षितच होतं.
शिवने जिंकल्यावर वैशालीताई केळकरदादाला एकत्रं उचलून घेतलं ती मोमेंट मस्त होती, या सिझनच बेस्ट ट्रायो, एकमेव ट्रु बाँडींग !
Btw, अॅवॉर्ड्स शुटींग २ दिवस चालल असं वाटत तर नव्हतं, सगळ्यांचे कपडे-मेकप -हेअरस्टाइल सेम होती, एक केस इकडचा तिकडे झाला नव्हता, ऑडीयन्स आणि एव्हिक्टेड काँन्टेस्टंट्ही सेम दिसत होते , मांजरेकर फक्त बदलून आला कपडे.
पण सगळ्या खबरी अकाउंट्सनी सांगितलं कि २ एलिमिनेशन्स शुक्रवारी रात्री आणि उरलेली शनिवारी दुपारपासून पुढे कंटीन्यु केली म्हणून पण मला तसं वाटल नाही. कदाचित खबरींना बिबॉने थांबवल असेल न्युज स्प्रेड करायला !
फिनालेला बिचुकलेनी अजुन काहीतरी भयंकर राडा केला म्हणे शिवानीला टार्गेट करून, बिचुकले शिवानीची लायकी काढायला सुरवात करत आरडाओरडा सुरु केला, काहीतरी तिच्या कॅरॅक्टरवर बोलला ती स्टेजवर येताच, इतका राडा झाला कि शिवानी तिच्या नावाची पाटी घेऊन त्यांना मारायला धावली म्हणे जे अर्थातच दाखवल नाही, शुटींग थांबवाव लागलं पार.
इथे बघा सांगितलय https://youtu.be/bJFBgNTyP8Q
बिचुकल्यांना अजून तो राग येत
बिचुकल्यांना अजून तो राग येत असेल की शिवानीला कंटेस्टंट केल आणि त्यांना गेस्टच ठेवल.तसच शिवानी त्यांना मध्ये मध्ये धमक्याही द्यायची,तुमच भांड फोडीन वगैरे
१७ लाख बक्षिस खूप कमी रक्कम
१७ लाख बक्षिस खूप कमी रक्कम आहे...वीणाने ते दहा लाख घेतले पाहिजे होते..
नेहा घरातून निघताना नुसती रडत होती आणि आतिषबाजी सुरू झाल्यावर आंनदाने नाचायला लागली..काहीतरीच तिचं.. नंतर
स्टेजवर आल्यावर ती नुसतं हसणं दाबत होती.
दहा लाख होते का 5लाख . विनर
दहा लाख होते का 5लाख . विनर ला फक्त 17लाख इतकेच बक्षिस होते का आणखीन ही काही होते?
सुरुवात पाच लाखापासून झाली.
सुरुवात पाच लाखापासून झाली. वाढवून सात की आठ लाख .
ओके थैंक यू भरत. अजुन
ओके थैंक यू भरत. अजुन एपिसोड पाहीला नाही आहे . 3.15तास इतका मोठा एपिसोड आहे वूट वर
टीवी वर तर advertisements वगैरे धरुन किती वेळ लागला असेल.
साडे चार तास.
साडे चार तास.
बाप रे ! ते ऑनेस्टली इनसेननी
बाप रे ! ते वरच्या व्हिडिओत ऑनेस्टली इनसेननी म्हटलेले खरे असेल तर बिचुकले सटकलाच पूर्ण असे दिसतेय! परवा लक्षण दिसतच होते घरात खुर्च्या फेकायला वगैरे लागला त्यावरून. कशाला बोलवायचे त्याला फायनल ला? पराग ला पूर्ण वगळले तसे त्यालाही वगळायला हवे होते. पण बिबॉ ना तो देत असलेल्या एंतरटेनमेन्ट चा मोह सुटत नाही. त्याला पुन्हा किती फूटेज दिले. अगदी टॉप ३ च्या वेळी दाखवला होता त्याचा परफॉर्मन्स! त्यातल्या त्यात ममांनी स्टेज वर चांगले झापलेले दाखवले ते बरे केले.
शिव च्या आईने वीणाला बहीण मान हेच वाक्य कायम ठेवले ते फनी वाटले 
शिवानी ला फायनल पर्यन्त फ्री राइड दिली असली तरी तिलापण बिबॉ ने शेवटच्या आठवड्यात व्यवस्थित जाणीव करून दिली की तू विनर होणार नाहीयेस. आणि मानाने परत आलेय वाले तिचे भांडे फोडले. तिला टॉप३/मनीबॅग ऑफर ची संधी नाही दिली ते मला आवडले.
ममांनी शिव आणि वीणाच्या घरच्यांना फार ऑकवर्ड सिचुएशन मधे टाकले! सगळेच लोक, त्यात पण मागच्या पिढीतले लोक, असले जोक्स नाही घेऊ शकत. ममां पार देण्याघेण्याचे बोलायला लागले
शिव जिन्कला, आनन्द झाला.
शिव जिन्कला, आनन्द झाला. ( टाळया- शिट्टया वाजवणारी बाहुली)
नेहाचेही अभिनन्दन!!!!
नाही सुलू तो वीणा बद्दल बोलत होत की तिच्या ग्रुप मधले म्हणजे शिव केळकर जर दुसर्यान शी बोलायला गेले तर वीणा पझेसीव होते. >>>>>> धन्स अमुपरी.
वरती कोणीतरी लिहिल्याप्रमाणे शेवट घाईघाईत केला. खर तर ममांने विनर अनाउन्स करण्याआधी सस्पेन्स आणखी ताणून धरायला हवा होता, वि़णाच्यावेळी जसा केला होता तसा. शिवचा हात पण त्यान्नी उन्चावला नाही.
सगळ्यान्चे परफॉर्मन्सेस चान्गले झाले. ' अपना टाईम आयेगा' च्या वेळी विणाच्या डान्सवर फोकस मारला नाही.
किशोरीताई मात्र झोकात नाचत होती. तिचा ' घर आजा मोरे परदेसिया' वरचा डान्सही छान झाला.
विणाचा डान्स सरप्राईझिन्गली चान्गला झाला शिवबरोबर नाचताना.
क्रेडिटस गो टू हिना! 
शिवानी, विणा, नेहा ह्या अनॉयिग मुलीन्ना एकापाठोपाठ स्पर्धेबाहेर फेकले गेलेले पाहून बर वाटल. ह्यावेळी पॉझिटिव असलेला सदस्य विनर झाला, छान झाला. नाही म्हणायला मेघा थोडी निगेटिव्ह होती लास्ट सिझनला.
काल शिवानीला पचका कितीवेळा होत होता!
आधी आरोह गेला, तिला किशोरीताई जिन्कावी वाटत होती, तिही गेली. विणा गेल्यावर तिला थोडा दिलासा मिळाला. नेहा उपविजेती झाल्यावर मात्र तिच तोण्ड पाहण्यासारख झाल.
किशोरीताईला बाहेर पोचवताना नेहाच्या चेहर्यावर किती हसू फुलत होत. अगदी खलनायकी स्माईल देत होती.
म मां शिवला एक पिक्चर देणार आहेत, ऐतिहासिक आहे, सात मावळे आणि त्यातला एक मावळा शिव. बहुतेक वेडात मराठे वीर दौडले सात, ह्यावर असेल तो चित्रपट. नेहाला आपल्या एका पिक्चरमधे गाणं लिहायची संधी देणार आहेत. >>>>>>> तिलाही येरे येरे पैसा ३ मिळालाय.
१७ लाख बक्षिस खूप कमी रक्कम आहे >>>>>>> राजू७६, आधी मला वाटत २५ का १५ लाख होती. हाउसमेटसच्या मुर्खपणामुळे नन्तर ती प्राईझ कमी कमी होत गेली.
शिवसाठी सर्वात मोठा टास्क आता घरी गेल्यावर असेल.
ऑनेस्टली इनसेनचे जर खरे असेल तर अस वाटत की ह्या माणसाला बिबॉने त्याची लायकी नसतानासुद्दा पाहुणा म्हणून घरात ठेवल, शेवटी त्याला नाचायलाही दिल . चान्गले उपकार फेडले ह्याने बिबॉचे!
ममांने एक बिग जोक केला काल, ' ह्या सिझनचा टिआरपी मागच्या सिझनपेक्षा जास्त होता. हा शो रगन्तदार झाला मागच्यापेक्षा'
माझ्या मते हा सिझन अगदीच फ्लॉप नाही, पण Average होता.
आजही लाइट बन्द करायची मोमेंट छान होती >>>>>> ही माझी आवडती मोमेंट आहे लास्ट सिझनपासून.
भेटूया पुढच्या सिझनला, बाय बाय!
< हाउसमेटसच्या मुर्खपणामुळे
< हाउसमेटसच्या मुर्खपणामुळे नन्तर ती प्राईझ कमी कमी होत गेली. >- द ग्रेट शिवानी सुर्वे
हो ना, यावेळचा टिआरपी जास्त
हो ना, यावेळचा टिआरपी जास्त होता काय, काहीही जोक. बिबॉ यावेळी मला जरा खुनशी वाटतात
कोणी बिबॉ चा अपमान केला किंवा काही पंगा घेतला तर लगेच त्या सदस्यांचा दुप्पट अपमान करून गिव्ह बॅक करण्याकडे कल दिसतो आहे. पराग, बिचुकले, शिवानी ही उदाहरणे ताजी आहेत.
काल ममांचा आधी डायलॉग होता की मागच्या सीझन मधल्या काही सदस्यांनी या सीझन्ला नावे ठेवली, मुलाखती, व्हिडिओ केले. पण यावेळी त्यांच्यापेक्षा जास्त टिआरपी होता. खरा हेतू त्या एक कन्टेस्टन्ट्स ना त्यांची जागा दाखवण्याचा हेतू असावा हे म्हणण्यामागे. ( असे आपले मला वाटले)
अन्जू अनुश्री दिक्षीत म्हणजे
अन्जू अनुश्री दिक्षीत म्हणजे मन बावरे सिरीयल मधली अनु.>>>
अमूपरी. अन्जू मला वाटलं तू हे मन बावरे बघतेस गं. माझा ज्योकस् फुकट ग्येला.
शिव च्या आईला कदाचित
शिव च्या आईला कदाचित असुरक्षित वाटत असेल वीणा कडून... लग्न झाल्यावर शिव ला आपल्या पासुन दुर घेऊन जाईल...... हेमावैम
ममांचा आधी डायलॉग होता की
ममांचा आधी डायलॉग होता की मागच्या सीझन मधल्या काही सदस्यांनी या सीझन्ला नावे ठेवली, मुलाखती, व्हिडिओ केले. पण यावेळी त्यांच्यापेक्षा जास्त टिआरपी होता. खरा हेतू त्या एक कन्टेस्टन्ट्स ना त्यांची जागा दाखवण्याचा हेतू असावा हे म्हणण्यामागे. ( असे आपले मला वाटले)
<
हो, ममा स्वतः किती पर्सनल स्कोअर सेट्ल करत होते , त्यांना ट्रोल केलं गेलं सोशल मिडीयावर होस्ट बदला म्हणून , त्याला उत्तर म्हणून येडे टॉप ६ कडून स्वतःची स्तुति करून घेत होते काल,
हे जे वर लिहिलेले बोलले ते अस्ताद विषयी आहे, त्यानी सिझन सुरु झाल्यावर लग्गेच इंट्रव्ह्यु दिले होते कि या सिझनचे लोक पहिल्या दिवसापासून भांडतात , आमच्यावेळी असं नव्हतं वगैरे! याशिवाय तो म.मां बद्दल बोलला होता कि अस्तादला एकदा टास्कमधे चिटींग केलं तेंव्हा तो म्हणे त्याला सोलण्यात आलं , अख्खा सिझन त्याब्द्दल बोलण्यात आलं व्हिलन बनवल गेलं. वैशालीने सेम केलं होतं चोर पोलिस टास्कला तर तिला नाही बोलले यावरून आस्तादने सोशल मिडीया आणि इंट्रव्ह्युज देऊन बर्याच ठिकाणी निषेध केला होता म.मां चा.
आज शिव वीणाची लव्ह स्टोरी
आज शिव वीणाची लव्ह स्टोरी दाखवली.
अन्जू अनुश्री दिक्षीत म्हणजे
अन्जू अनुश्री दिक्षीत म्हणजे मन बावरे सिरीयल मधली अनु.>>>
, जरा उशिरा लक्षात आलं. अमुपरीने लिहायच्या थोडं आधी की ती अनु असावी जी आपल्याला आवडत नाही आणि नेमकं तिला bb च्या आधी मिनिटभर बघावं लागतं. नाही बघत ती सिरीयल.
Happy अमूपरी. अन्जू मला वाटलं तू हे मन बावरे बघतेस गं. माझा ज्योकस् फुकट ग्येला. >>>
ममांने एक बिग जोक केला काल, ' ह्या सिझनचा टिआरपी मागच्या सिझनपेक्षा जास्त होता. हा शो रगन्तदार झाला मागच्यापेक्षा' >>> अगदी अगदी.
खरा हेतू त्या एक कन्टेस्टन्ट्स ना त्यांची जागा दाखवण्याचा हेतू असावा हे म्हणण्यामागे. ( असे आपले मला वाटले) >>> असेल असंच.
ते बिचुकलेचं बघितलं नाहीये अजून.
तिलाही येरे येरे पैसा ३ मिळालाय. >>> हो तो आधीच मिळाला. हे फायनलला म मां नी दिलं गिफ्ट दोघांना.
शिव आणि त्याच्या चाहत्यांचं अभिनंदन ! >>> त्यात तुम्ही स्वत:ही आहात
.
< हाउसमेटसच्या मुर्खपणामुळे नन्तर ती प्राईझ कमी कमी होत गेली. >- द ग्रेट शिवानी सुर्वे >>> ती जे वागली task मध्ये, पूर्ण विकमध्ये त्याचाच पुरेपूर बदला घेतला bb यांनी. खरंतर तिला आ रो च्या आधी काढायला हवं होतं. जास्त मजा आली असती. आ रो चा oc अजून वाढला असता, या हु कदाचित ताई, वीणाही माझ्या आधी जातील असं वाटलं असते थोडा वेळ त्याला
.
आज शिव वीणाची लव्ह स्टोरी दाखवली. >>> आज होतं का bb.
https://www.youtube.com/watch?v=ejzj6tq7_1M
शिव सध्यातरी विनीबाबत सिरीयस दिसतोय. शुभेच्छा शिव वीणाला, गणपतीबाप्पा मोरया.
नेहा हसताना आणि रडताना खूप
नेहा हसताना आणि रडताना खूप वाईट दिसते . खूप दात पसरून हसते. . मी जर शिवानी असते तर हे सांगितलं असत. जरा मंद स्मित कर म्हणून . तिचे दात पण वाईट आहेत . शिव च अभिनंदन . आमच्या घरच्यांचा मनासारखा विनर झाला . शिव च ताई दादांशी आणि वीणाशी बॉण्डिंग छान आहे . वीणाने पैसे घ्यायला पाहिजे होते . बर तिला ती बाहेर पडणार असं वाटत होत असं स्टेजवर म्हणाली . मग का नाही घेतले ? का नाही नाही म्हणायचं नाटक करायचं असत. ?चॅनलच्या इंस्ट्रक्शन्स नुसार . काय माहित
नाही घेतले ते बरं झालं.
नाही घेतले ते बरं झालं. रिस्पेक्ट केला voters चा. मागच्यावर्षी स्मितानेपण नाही घेतले ते मला आवडलं, यावर्षीपण. पर्सनली माझ्या मनातून वीणा उतरली असती, जर तिने पैसे घेतले असते तर.
आत्ता मी नेहा शिव बाहेर पडतानाचा पूर्ण सीन नीट बघितला. नेहाने बोअर केलं फार, काय ते विचित्र रडणे, मनाला नाही भिडले. शिव फार natural वाटला.
शिवचे बाबा पण म मां ना अनुमोदन देत म्हणाले अरे मामेबहीण म्हण वीणाला, तो नाही म्हणाला. विनी बहिण नाही, तिला बहिण म्हणणार नाही. शिवचे बाबा, बहिण टेन्शनमध्ये नव्हते, हसतमुख होते, आई होती मात्र. ती फार एन्जॉय करत नव्हती, म मां अडचणीचे प्रश्न विचारत होते म्हणून.
नचिकेतला पाठवा पुढच्यावर्षी bb त. फार हसतमुख वाटतो. त्याचे आई बाबा आणि नेहाची आईही आलेले. त्या शिवानीच्या, वीणाच्या आई त्यानंतर शिवच्या family शी बोलले. आरोहच्याही बोलले म मां. ताईच्या आठवत नाही. मग नेहाच्या family शी नीट बोलायला हवं होतं, एवढं काय. किंवा बोललेत पण कट केलं काय माहिती.
ताईच्या कुटुंबाशी नाही बोलले,
ताईच्या कुटुंबाशी नाही बोलले, कदाचित दाखवलं नसेल. नेहाचे रडणे बघून शिवलाही जबरदस्ती डोळे पुसावे लागले
शिवला मनापासून आनंद झाला होता कारण शेवटच्या क्षणापर्यंत माहित नव्हते की कोण जिंकणार. नेहालाही ट्रॉफी आणि चेक द्यायला हवा होता, ती बिचारी उगीचच शीवच्या मागे धावत होती.
किशोरी बाहेर यायच्या आधी
किशोरी बाहेर यायच्या आधी तिच्या नवर्याशी आणि मुलाशी थोडंसं बोलले होते.
पहिल्यालाच देतात आणि एक वेगळं
पहिल्यालाच देतात आणि एक वेगळं award देतात, ते यंदा ताईला मिळालं, मागच्यावर्षी स्मिताला.
त्यामुळे actually फायदा यंदा शिव ताई आणि मागच्यावर्षी मेघा स्मिताला झाला.
येस , अंजु आपली इच्छा पूर्ण
येस , अंजु आपली इच्छा पूर्ण झाली, शिव जिंकला आणि शिवानी विणाच्या अगोदर बाहेर पडली !
मं मा जेव्हा शिव विणाच्या फॅमिली सोबत त्यांच्या लग्नाबद्दल बोलत होते तेव्हा मागून शिवानी किती खोचकपणा करत होती मुद्दामहून. आणि म्हणे आमच्या दोघीतलं सॉर्ट झालंय माझ्याकडून यांव अन त्याव ..
आपल्या घरचेच कोणीतरी जिंकल्या
आपल्या घरचेच कोणीतरी जिंकल्या सारखं वाटतय, आणि हा आनंद इथे येउन शेअर करता येतोय. खुप भारी आहे .सगळी प्रोसेस खुप exciting, खुप ups & downs असलेली आहे पण आवडली मला. मेन इथलं discussion जास्त आवडलं. आता शिव विणा काय करत असतील आपापल्या घरी, असं वाटतय. त्या दोघांचं सगळं छान होउ दे असं वाटतय
Samaja paise ghetale tar
Samaja paise ghetale tar respect kasa Kay jato voters cha? Samjal nahi.Asha nyayane winner ne pan prise cheque gheu naye.phakt trophy ch ghyavi.karan 1st no var kay Ani 3 Rd number var Kay voters cha anatat na? Jar trophy cha cheque big boss ne deu kelay tar 3rd number cha cheque kivva cash big boss ch detey na?
बहुतेक स्पर्धा मधेच सोडली आणि
बहुतेक स्पर्धा मधेच सोडली आणि पैसे घेतले, तुम्ही स्वतः:ला ट्रॉफी चे दावेदार मानत नाही पैसे घेउन बाहेर पडता असं काहीसं फिलिंग असेल
मलाही वाटलं कि ऑफर १० लाख
मलाही वाटलं कि ऑफर १० लाख केल्यावर घ्यायला हवी होती वीणाने, तिला माहित होतं तिच्या जिंकायचे चान्सेस कमी आहेत ते.
अजुन जास्तं आयडीअल शेवट झाला असता शो चा शिवसाठी! शिवला ट्रॉफी+ १७ लाख, सिनेमाची ऑफर, वीणाला १० लाख, एक ताई वैशाली, एक दादा केळकर, एक मैत्रीण-डान्स पार्टनर हिना आणि वीणासोबत होऊ घातलेली प्रेमकहाणी !
अर्थात यातले ऑलमोस्ट सगळं झालय खरं, ड्रिम्स डु कम ट्रु !
हिंदी मधून दीपक ठाकूर पैसे
हिंदी मधून दीपक ठाकूर पैसे घेऊन गेलेला कारण त्याला माहीत होतं की आपण जिंकणार नाही आणि तेव्हा कदाचित त्याला पैशांची गरज होती.. (आता ace of space मध्ये त्याला बाकीचे यावरून टोमणे मारतात ही गोष्ट वेगळी)
Pages