धाव पांडुरंगा

Submitted by पुरंदरे शशांक on 20 August, 2019 - 23:41

धाव पांडुरंगा

संवसारा लागी । व्याकुळ होऊनी ।
जातो विसरुनी । पांडुरंगा ।।

काय तो आठव । नाहीच सर्वथा ।
सदा व्यापी चित्ता । संसारची ।।

सुखदुःखी गोवे । सदा सर्वकाळ ।
नित्य हळहळ । ऐहिकाची ।।

नसेचि सत्संग । नसे नाम मुखी ।
अनुसंधानासी । तुटी पूर्ण ।।

धाव पांडुरंगा । नसावा वियोग ।
अनुताप योग । घडो मज ।।

दीनानाथ करी । साच तुझे ब्रीद ।
सर्व माझे हित । तुज पायी ।।

गोवणे.... गुंतणे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाहवा !!

मस्तच. हे वाचून करुणाष्टकामधील अनुदिनी अनुतापे तापलो रामराया हा श्लोक आठवला Happy