गोडा मसाला-ऐनवेळी कराव्या लागणाऱ्या स्वयंपाकासाठी

Submitted by 'सिद्धि' on 21 July, 2019 - 06:51

आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरले जातात. प्रत्येक घरी एक विशिष्ट प्रकारचा मसाला वापरात असतोच. कांदा-खोबर मसाला,तिळकुट,गरम मसाला,घाटी पद्धतीचा मसाला, मालवणी मसाला, कोंकणी मसाला वगैरे वगैरे. असे मसाल्याचे खुप प्रकार आहेत आणि त्यांचा वापर ही वेगवेगळ्या पदार्थांसाठी केला जातो. पण ऐनवेळी पाहुणे वैगरे आले आणि एखादा मसाला करायचं झालं तर वेळ जास्त लागतो आणि जेवणासाठी उशीर होऊ शकतो.
यासाठी मी आईनेच शिकवलेल्या पद्धतीने गोडा मसाला नेहमी तयार ठेवते. आपल्याला माहितच असेल की गोडा म्हणजे प्रत्यक्ष गोड चव नसुन हे त्याचं एक नाव आहे. हा नेहमी च्या वापरातला एक कॉमन मसाला आहे. कॉमन यासाठी कारण कडधान्य उसळी पासून ते तिखट आमटी, सुक्क चिकन,मटण, खेकड्यांचा रस्सा तसेच मच्छी चे कालवन/ तिखल अश्या सगळ्या प्रकारच्या स्वयंपाकासाठी आपण हा मसाला वापरू शकता. रेसिपी झटपट होते. उदा. चण्याची भाजी करायची असेल तर आपण करत असलेल्या फोडणी मध्ये नेहमी प्रमाणे मोहरी,थोडा कांदा आणि टोमॅटो, यामध्ये हा गोडा मसाला ३-४ चमचे तुमच्या अंदाजाने घाला, आणि त्यानंतर हळद, मिरची पावडर, मिठ, गरम मसाला पावडर घालून मस्त रसरशीत चण्याची भाजी होते.
1563607570749.jpg

तर याची पाककृती पुढील प्रमाणे आहे.

साहित्य:- मिडियम आकाराचे ९ कांदे, सुख खोबरं २ वाटी आणि ओल खोबर १ वाटी, (तीन कांद्यासाठी एक वाटी खोबरं हे प्रमाण. ओल किंवा सुख कोणत्याही प्रकारे खोबरं वापरु शकता)
३ लसुण चे कांदे, बोटभर आदरक स्वच्छ धुवून छोटे तुकडे करून घ्यावेत, एक वाटी पुदीना व एक वाटी कोथिंबीर स्वच्छ करून घ्यावी. २-३ चमचे तेल. १ मोठा चमचा मीठ.
1563607157638.jpgकृती:-
प्रथम कांदे उभे पातळसर कापुन घ्या. गॅस लावुन मंद आचेवर कढई मध्ये २-४ चमचे तेल आणि मीठ घालून त्यात सर्व कांदे मस्त मऊ, एकजीव आणि लालसर होईपर्यंत भाजून घ्या. जास्त करपु देउन नये, थोडंफार चालेल. मध्ये मध्ये कालथ्याने ढवळुन घ्यावे. हे डिश मध्ये काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घ्या.
नंतर किसुन घेतलेलं खोबरं कढई मध्ये घालून सारखे व्यवस्थित ढवळून घ्या. तांबुस सोनेरी रंग आल्यावर गॅस बंद करावा व हे देखील थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घ्या. ओल व सुख दोन्ही खोबरं वेगवेगळ भाजून घ्या.
आता थंड झाल्यावर कांदे,खोबरं मिक्सर मधून बारीक करून घ्या. आदरक व लसूण एकत्र करून त्याची पेस्ट तयार करावी, तसेच पुदीना आणि कोथिंबीर यांची देखील मिक्सर मधून पेस्ट करून घ्यावी.
1563607190760.jpg
शेवटी वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे. आत्ता हा मसाला तयार आहे.
डब्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या.
1563607599462.jpgटीप:-
* पानांबरोबर कोंथिबीरी चे कोवळे देठ देखील टाकून न देता या मध्ये वापरता येतात.
*ओल खोबर भाजायला सुक्या खोबऱ्याचा तुलनेने जास्त वेळ लागतो. एकत्र केल्यास कच्च राहू नये म्हणून ते वेगवेगळे भाजून घ्यावेत.
* वरिला प्रमाण घेऊन अर्धा ते पाऊण किलो मसाला तयार होतो. अर्थात कांदे आणि खोबर वैगरे चां आकार कमी जास्त असु शकतो म्हणून थोडासा फरक पडू शकतो.
*तुमची मसाल्याची पाककृती नक्की शेअर करा.

एक आठवण-
पाणी अजिबात वापरले नसल्याने मसाला महिनाभर आरामात टिकतो. खराब होत नाही किंवा चविमध्ये बदल होत नाही.
आई सांगत असते "पुर्वी गावी फ्रीज नसायचे त्या वेळी याच मसाल्या (सुख खोबरं वापरून आणि पुदीना नाही असा केलेला) मध्ये मसाल्याच्या १/४ लाल मिरची पावडर आणि ५-६ चमचे मीठ घालून ठेवायचे. १०-१५ दिवस हा मसाला फ्रीज चा बाहेर ठेवला तरीही खराब होत नाही".
साधारण तीन वर्षापूर्वी मी पुण्याला होते तेव्हा ची गोष्ट. पि.जी. राहत असल्याने माझ्या रुम मध्ये फ्रीज न्हवता. त्या वेळी आई असा मसाला बनवुन मला देत असे. जेव्हा मेस च्या भाजीचा कंटाळा यायचा तेव्हा पोळी किंवा भाकरी वरती छोटा मसाल्याचा गोळा असाच ठेवून खाण्यात वेगळाच आनंद होता.

(अपेक्षीत लेखनाच्या दुरुस्ती नक्की सांगा!)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे भरत सरांनी सांगितल्याप्रकारे हे वाटण करतात. आम्ही पाणी घालून वाटून घेतो. त्यात मीठ टाकतो आणि फ्रीजमधे ठेवतो त्यामुळे १५-२० दिवस पुरतो. मसाला तयार असल्यामुळे सकाळी ऑफिसचा डबा बनवताना गडबड होत नाही. आम्ही याला गोडा मसालाच म्हणतो.

गोड्या मसल्यात सगळे कोरडे घटक असतात आणि तो भारतात जाणं/ येणं झालं नाही तर वर्ष काय दोन वर्षे सुद्धा टिकतो. हा मसाला चांगलाच लागेल पण तो गोडा मसाला नाही.

तो भारतात जाणं/ येणं झालं नाही तर वर्ष काय दोन वर्षे सुद्धा टिकतो.>> मसाला टिकवायला भारतात जायच म्हणजे फारच खर्चिक होइल तो मसाला..smiley36_0.gif

आमच्याकडे गोडा मसाला म्हणजे खोबर, धने अ‍ॅड केलेला गरम मसाला हा रोजच्या भाजी, आमटी,उसळी ला वापरायचा , काळा मसाला म्हणजे ज्यात वाळलेला कान्दा,लसुण असतो तो ( हा घरी बनतच नाही लागेल तसा विकत आणायचा) , वर जे दिलय त्याला वाटप म्हणतात ते स्पेशल भाज्या किवा पाटवड्याची आमटी टाइप काही खास /क्वचित बेत केले जातात त्यासाठी तेही ताजच करायच लागेल तस.

थँक्स भरत.
सिद्धी, प्रोफाईल फोटो खुप सुंदर आहे.

Pages