कधीकधी मी हळवा होतो , बघुनी देव दानवांत

Submitted by सिद्धेश्वर विला... on 11 July, 2019 - 05:43

कधीकधी मी हळवा होतो

बघुनी देव दानवांत

का उगविली हि बीजे तू ?

अर्धपोटी मानवात

कधीकधी मी कठोर होतो

बघून साऱ्या वेदनांना

भळभळ त्या वाहत असतात

पण पुन्हा करतो सुरुवात

कधीकधी मी हळहळतो

कोमेजल्या कळ्या बघुनी

नव्या उमलताना बघून

त्याला करतो कुर्निसात

कधीकधी मी बिथरतो

भविष्यकाळ चिंतूनि

कल्पनांच्या माध्यमातून

पेटवतो नवी वात

कधीकधी मी शोधतो

हरवलेली जुनी वाट

मिट्ट काळोख दूरदूर

आता हीच माझी वहिवाट

हीच माझी वहिवाट ....

{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बघ. मस्तच जमली आहे ही पण. शेवटच्या चार ओळी एकदम मस्त. आता संपलेल्या गेम ऑफ थ्रोन्स सीझन ८ एपिसोड ३ मध्ये रात्रीच्या लढाईचे चित्रण आहे. अंधारातच पण वाती दूर दूर जातात मशालीच्या. असे व्हिजुअल मस्त जमेल

करून बघेन अमा तै .. पण असे विस्तृत आणि दिशादर्शक प्रतिसाद आले कि बरे वाटते .. अश्याच प्रतिसाद देत राहा ..

छान.
पण शिर्षकला न्याय मिळाला असे मात्र वाटले नाही.