सुखाच्या सीमेवर दुःखांची घरे वसतात

Submitted by सिद्धेश्वर विला... on 9 July, 2019 - 09:54

सुखाच्या सीमेवर दुःखांची घरे वसतात

तुम्ही हसा प्रसन्नतेने ,मग बघा आजूबाजूला कश्या चीता पेटतात

तुमच्या हसण्याची किंमत , तुम्हालाच ठाऊक नाही

तुम्हाला हसताना बघून, त्यांचं स्वतःच कामच होत नाही

त्यांचं खिन्नपण जणू तुमच्याशीच निगडित असतं

वाया घालवत असतात वेळ , हळूहळू प्रारब्ध बदलत असतं

रोवूनीया झेंडे कैक , कैफ मिरविती एकमुखाने

एक हास्याची लकेर मात्र , सारं काही उधळत असतं

कोण कुणाच्या मनी वसला , तरीहि गवसत नाही कुणाला

फक्त एका हर्ष होता , सारे बैसती पुसत दुःखाला

षड्रिपूंच्या विळख्यात सारे ऎसेकाही गुरफटलेले

बघा इथे ओ पूर आला , जो तो संगे वाहत गेला

विचारले मी त्याला , हसण्याचे कारण ओ कैसे ?

तो उत्तरला उत्तर देउनी , वेड लागले मला जरासे

या वेडातच दुनिया सारी , दुःखीकष्टी झाली भारी

हासुनिया त्याने पेटवल्या , चीता सर्वदूर घरोघरी

{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

होय अमा तै,, ती चिता असायला हवं होतं पण चुकलं .. असो , संपादकांनी ती चूक सुधारली तर बरे होईल .. एक नम्र विनंती आहे संपादक मंडळाला..
आणि धन्यवाद अमा तै

संपादक चुका सुधारण्याची कामं करत नसतात. आपल्याला आपले लेखन स्वत: सुधारता येते. वरती अवलोकन व संपादन असे शब्द दिसत असतील, तर संपादन शब्द क्लिक करून चूक दुरुस्त करून परत सेव्ह करावे. त्याचप्रमाणे प्रतिसाद चार तासांच्या मुदतीत संपादित करता येतात.

धन्यवाद डीजे साहेब

खान साहेब मार्गदर्शनाबद्दल आभार . दुर्दैवाने मला वाटत आता मी ते सुधारू शकत नाही आहे .. असो ,, प्रतिसादांमधून कळेलच ते वाचनाऱ्याला

यु आर ऑन टु सम थिंग बिग हिअर. एक तर शी र्षक जबरदस्त सापडले आहे. फार पुढे काही लिहीले नाही तरी वाक्यच जबरदस्त आहे व्हिजुअ लाइज करायाला. व संकल्पना मस्त आणि दणकट आहे. शैली, शुद्धलेखन सर्व बाहेर्च्या गोष्टी आहेत. आशय ग्रेट आहे. अजून लिहीत राहा.
आतल्या आवाजाला जपा.

@ अमा तै

वा अमा तै , किती स्फूर्तिदायक प्रतिसाद दिलाय आपण .. आपल्या तोंडात साखर पडो अमा तै.. खरंच छान वाटलं हे वाचून .. काही बनेन कि ते माहित नाही पण एक मात्र नक्की आतल्या आवाजाला नक्कीच जपत जाईन .. कधी कधी फार वंगाळ होतात , पण त्यामागे कारणही तसेच असते ... आणि मग या अश्या उत्स्फूर्त ओळी बाहेर पडतात ..

कधीकधी मी हळवा होतो

बघुनी देव दानवांत

का उगविली हि बीजे तू ?

अर्धपोटी मानवात

@ केशव तुलसी साहेब

आपल्याला पण धन्यवाद ...

कधीकधी मी हळवा होतो

बघुनी देव दानवांत

का उगविली हि बीजे तू ?

अर्धपोटी मानवात

>> हे पण छान आहे फुल डेव्हलप करच.

मी पूर्वी एक कविता केली होती त्यात बरोबर उलटे होते. म्हणजे दु: खाचा कोअर आहे भला मोठा पण शेजारी बारकीशी सुखाची आरास पण मांडली आहे अश्या अर्थाचे. त्याच्या उल टे पण असू शकते हे खूप मस्त आहे विचार करायला. वहीत शोधते माझी कविता.

बघतो अमा तै , कसं जमतंय ते ...या ओळी उत्स्फूर्तपणे बाहेर आल्या आहेत , तुमच्या प्रतिसादाला मानवंदना म्हणून .. कविता बनायला काहीतरी या उघड्या डोळ्यांनी बाहेर जाऊन बघावे लागेल . पण कारेन एवढं नक्की .. सध्या बाहेर चालूच आहे काहीनाकाही ..