वारी

Submitted by दत्तात्रय साळुंके on 28 June, 2019 - 03:08

वारी

पांडूरंग ध्यानी पांडूरंग मनी
निघाली वारी वैराग्य लेऊनी
तुटे ऐहिकाचे मजबूत बंध
मुखी गोड नाम हरीचे मरंद

कंटक जळाले वादळ पळाले
वाटेवर विठूच्या देहभान गळाले
भूकही निमाली तहान शमली
टाळ निनादे अंतरी विठूमाऊली

नुरे गुणदोष अतंरी प्रदोष
जपा तपा विना भेटे श्रीकृष्ण
मन स्थिरावले चित्तही पावन
नाचे आनंदे अवघे त्रिभुवन

विठू होय सखा विठू होय बंधू
सोयरा तो पाठीराखा तया वंदू
मागणे ना काही मन तृप्त होई
ऐसे वारी सुख वैकुठीही नाही
© दत्तात्रय साळुंके
२७-०६-२०१९

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ अजय,मन्याS, शशांक,प्राचीन,राजेंद्र देवी, डॉ. विक्रांत,खान९९
आपणा सर्वांचे अनेक धन्यवाद...