पुनश्च एकदा बिटकॉइन

Submitted by कूटस्थ on 25 November, 2017 - 13:44

मध्यंतरी इथे बिटकॉइन बद्दल माहिती देणारे आणि प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण करणारे धागे निघाले होते. त्यामध्ये बिटकॉइन किंवा तत्सम डिजिटल चलन हे गुंतवणुकीसाठी योग्य कि अयोग्य यावर बरीच चर्चा देखील झाली. अनेकांचे मत सावध पवित्र्यामुळे म्हणा, अपुऱ्या कायदेशीर प्रणाली अथवा मान्यतेमुळे किंवा त्यामध्ये असलेल्या जोखीम मुळे म्हणा, हे बिटकॉइन किंवा बाकी डिजिटल चलन गुंतवणुकीसाठी प्रतिकूलच होते. इथे काय, अगदी जगभरात मोठ्या मोठ्या तज्ज्ञ लोकांची मते बिटकॉइन च्या भविष्याविषयी परस्पर विरोधी होती. काहींनी आपली प्रामाणिक मते दिली (जसे कि बिल गेट्स), तर काहींनी त्याच्या भविष्याच्या किमतीबाबत थोडी अतिरंजित मतेही दिली ( २०२० मध्ये १ बिटकॉइन ची किंमत ही १ मिलियन डॉलर तर काहींनी ५मिलियन डॉलर होईल असे सांगितले). काही प्रतिष्ठित व्यक्तींनी चक्क याला scam ठरवले (त्यातले बरेच जण banker होते आणि त्यांचे मत हे व्यावसायिक हितसंबंधामुळे biased होते). एकीकडे चीन सारख्या देशांनी बिटकॉइन ची देवाणघेवाण बंद करून बंधने आणण्याचा प्रयत्न केला तर एकीकडे जपान आणि इतर काही देशांनी याला चलन म्हणून मान्यताही दिली.
कोणतीही नवीन गोष्ट आल्यावर त्याला विरोध होणं साहजिकच आहे. अगदी पहिली रेल्वे धावली तेंव्हा अनेकांनी तो चेटूक असल्याचा संशय व्यक्त केला. इतके लांब कशाला, काही वर्षांपूर्वी कॉम्पुटर, इंटरनेट याच्या sustainability बद्दलदेखील अनेक प्रश्न उठवले गेले होते. तसेच बिटकॉइन किंवा तत्सम डिजिटल चलनाचे आहे. खरं तर जालावर बिटकॉइन, ब्लॉकचेन याबद्दलची प्रचंड माहिती उपलब्ध आहे. त्याबद्दल थोडेसे जाणून घेतल्यावर कळेल कि या तंत्रज्ञानात प्रचंड क्षमता आहे (निदान माझे तरी असे मत झाले आहे).
उगाचच कायदेशीर मान्यता आणि चलनाच्या तांत्रिक बाबी , उपयुक्ततेबद्दलच्या शंका कुशंका यांना फाट्यावर मारून ज्यांनी केवळ गुंतवणूक म्हणून याकडे पाहिले आणि यामध्ये योग्य वेळी गुंतवणूक केली त्यांचे अभिनंदन ! यामध्ये जोखीम आहे हे नक्की परंतु शेवटी जोखीम कशात नसते? अगदी रस्त्यावरून चालण्यात देखील जोखीम आहेच म्हणून काही आपण बाहेर जाणं सोडत नाही. शेवटी महत्वाचे आहे ते जोखीम आपल्या क्षमतेप्रमाणे व्यवस्थितपणे हाताळणे.
काहीही असो, हा लेख लिहिताना १ बिटकॉइन ची किंमत $८७०० इतकी पोहोचली आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने म्हणाल तर वर्षभरात किंमत साधारण ८ पट झालीये. अनेक विरोधांना सहजपणे पचवून बिटकॉइन चा वारू चौफेर दौडतो आहे आणि त्याला थांबवणं आता सहज शक्य राहिलेलं नाही.
बिटकॉइन किमतीबद्दल थोडक्यात सांगायचे झाल्यास हाथी चले बाजार और कुत्ते भोंकें हजार !

नोट: वरील लेखाचा हेतू हा बिटकॉइन किंवा तत्सम डिजिटल चलनात कोणालाही सल्ला देण्याचा किंवा गुंतवणूक करण्यास उद्दीपित करण्याचा नाही. प्रत्येकाने योग्य अभ्यास करून आपल्या सद्सद्विवेकबुद्धीने निर्णय घ्यावा ही विनंती.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

भारतात व्यवहार करायला परवानगी नाही.
>>
कशाचा व्यवहार करायला परवानगी नाही?
कोणत्या परिस्थीतीत?
कोणत्या कायद्यानुसार?

भारतात ते चलन अधिकृतपणे मान्य नाही म्हनजे ते अनधिकृत आहे.
>>
ते चलन आहे हे तुम्हाला कोणी सांगीतले?
ते चलन म्हणुन कोण वापरत आहे?

जर रिझर्व्ह बँक नोटीस काढून यात गुंतवणूक करू नका आमची मान्यता नाही आहे तर त्या विरुद्ध जाणे गुन्हा असेलच.
>>
Last time i checked it was a democracy in India.

रिझर्व्ह बॅंकेची त्याला चलन म्हणून मान्यता नाही.
गुंतवणूअ करु नका हा "सल्ला" आहे कायदा नाही.
त्यांची मान्यता नाही याचा अर्थ त्याची कायदेशीर खरेदी केली जाऊ शकत नाही, असा होत नाही.

आमच्या अनेक मित्रांनी बिटकॉईन मध्ये गुंतवणूक केली आहे(फार नाही.)
सध्या भारतात बिटकॉइन चे स्टेटस 'नोडॉक' सॉफ्टवेअर एपीआय सारखे असावे. या आपल्या कोड मध्ये वेळ वाचवायला वापरणं हा गुन्हा नसतो.पण या नोडॉक असतात. डॉक्युमेंटेशन नाही.त्या कधीही बदलू शकतात (म्हणजे तुम्ही तुमच्या कोड मध्ये १० वेळा नोडॉक एपीआय कॉल केली आणि त्यांनी ती बदलून त्यात ३ ऐवजी ४ इन्पुट घ्यायला चालू केले तर तुम्हाला त्यांना 'काय हो तुम्ही का बदलली, आम्हाला आता १० ठिकाणी बदल करुन चौथा इन्पुट द्यावा लागेल' असा जाब विचारता येत नाही.हीच जर पब्लिक एपीआय असली तर त्यांना 'कॉन्ट्रॅक्ट' चा आदर करावा लागतो.त्यांनी केलेला बदल त्यांच्या वापरकर्त्यांचा कोड ब्रेक करायला/खूप ठिकाणी बदलायला कारणीभूत नाही झाला पाहिजे.तसे अगदी अपरीहार्यच असल्यास, या सर्व वापरकर्त्यांना बर्‍याच आधी आगाऊ मेल आणि सूचना देऊनच करावे लागते.)

Last time i checked it was a democracy in India.

असला कुजकतपणा केला तर अशीच उत्तर मिळतील
सुरू तुम्ही केले आहे लक्षात ठेवा.
मी तुमच्या प्रश्नाची नीट उत्तर देत होतो

जर रिझर्व्ह बँक नोटीस काढून यात गुंतवणूक करू नका आमची मान्यता नाही आहे तर त्या विरुद्ध जाणे गुन्हा असेलच.
>>
अशी हुकुमशाही भाषा केलीत तर असेच प्रश्न येतील...

आहेच आणि असेलच या दोन शब्दाचा अर्थ जर तुम्हाला कळत नसेल तर पुन्हा बालवाडीत जाऊन बसा.
काय लिहिले ते नीट वाचून मत प्रदर्शित करा म्हणजे पुन्हा सांगावे लागणार नाही

आणि मी कुठस्थ यांना उत्तर दिले मध्ये नाक तुम्ही खुपसल्याने तुम्हाला नीट उत्तर द्यायचा प्रयत्न केला .. पण बहुदा पालथ्या
घड्यावर पाणी ओततोय असे वाटते..

प्रदीप, कूटस्थ कदाचित प्रतिसाद देतीलच...त्यांचा या विषयातील चांगला अभ्यास दिसतो परंतु माझ्या माहितीप्रमाणे सांगतो- बिटकॉइन विकत घेण्याचा त्याला देशात चलन म्हणून व्यवहारासाठी मान्यता आहे किंवा नाही याच्याशी काहीही संबंध नाही. संपूर्ण धागा वाचल्यावर लक्षात आले कि इथे काही लोकांचा त्याबद्दल बराच गैरसमज झालेला दिसतोय.
चलन म्हणून मान्यता नसणे म्हणजेच बिटकॉइन चा वापर करून तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करू शकत नाही अथवा कोणत्याही वस्तूचे मोल हे बिटकॉइन च्या रूपात स्वीकारु शकत नाही. परंतु याचा अर्थ असा नाही कि तुम्ही exchange वर बिटकॉइन ची खरेदी विक्री करु शकत नाही. अभि_नव यांनी वर म्हणल्याप्रमाणे RBI ने गुंतवणूकदारांना केवळ सावधानतेचा इशारा दिला आहे. ट्रेडिंग वर (exchange वर बिटकॉइन विकत घेण्यावर किंवा विकण्यावर) बंदी नाही. ...सावधानतेचा इशारा देण्याची २ कारणे आहेत- एक म्हणजे बिटकॉइन ची volatility आणि २रे म्हणजे अनेकांनी बिटकॉइन च्या नावाखाली अनेकांनी(अपेक्षेप्रमाणे) Multi Level Marketing Schemes उघडल्या आणि पैसे घेऊन पसार झाले.

बीबीसीवर बिटकॉइनसंबंधी चाललेलं काही कानांवर आणि डोळ्यांवर पडलं.
ड्रग डीलर्स, दहशतवादी संघटना, काळापैसावाले इत्यादींसाठी बिटकॉइन हे व्यवहाराचे अत्यंत सोयीचे आणि म्हणूनच त्यांना पसंत असलेले माध्यम आहे.

हो ना.
अगदी याच कारणासाठी, बंदुका, बाँब्स, कार (त्या किडनॅपिंगसाठी वापरता येतात), धारदार शस्त्र, किचनमधील कैची, छापील पैसा (त्याचा काळा पैसा करता इतो), नेलकटर, पोते (पोत्यात घालुन मारहाण करतात हे एका चित्रपटात बघितले मी), दोरी व ओढणी (गळफास घेता येतो), संगणक ( तो हॅक करता येतो) हे सगळे लवकर बॅन करायला घ्या भरतजी.

मी कुठे म्हठलं ban खरा म्हणून? उलट तुमच्यासारख्या एखाद्याला उपयोगी पडेल म्हणून लिहिलं ईथे.
ज्याचं करावं भलं तो म्हणतो हलवायाच्या घरावर तुळशीपत्र.

ही मला मेल आली एस बी आय मधून.

Dear SBI Cardholder,

We request you to take note of the following important information.

Reserve Bank of India has issued advisories to financial institutions and public that it has not given any license/authorization to any entity/company to operate in cryptocurrency schemes or any Virtual Currencies such as Bitcoins.

Given concerns, both globally and locally, SBI Card would like to advise you to be mindful of potential economic, financial, operational, legal, customer protection and security related risks associated in dealing with cryptocurrencies and virtual currencies.

Assuring you the best of our services.

Warm Regards,
SBI Card

भारतात Bitcoins नाही चालणार, करन्सी म्हणून मान्यता नाही. आज सरकारने डिक्लेअर केलं असं news मध्ये सांगितलं.

बहुतांश लोकांचा अजूनही समज आहे कि भारतात बिटकॉइन ला बंदी आहे म्हणजे ते विकत घेताच येणार नाही. परंतु तसे नाही आहे. त्याला फक्त करन्सी म्हणून मान्यता नाहीये. म्हणजेच तुम्ही बिटकॉइन चा करन्सी म्हणून वापर करून कोणतीही वस्तू विकू अथवा विकत घेऊ शकत नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही बिटकॉइन विकत घेऊ शकत नाही. गुंतवणुकीसाठी बिटकॉइन घेऊन ठेवायला कोणतीही बंदी नाही.

कुठे असतात हे कूटस्थ आजकाल? तब्येतपाणी बरे असूद्यात म्हणा. गोड द्राक्षे खाऊन शुगर वाढली असेल भर्पूर.

गेलेत कुठेतरी ते उडत. आयडी उडाला आहे बहुतेक त्यांचा पण बिटकॉइन सुद्धा पुन्हा उडायला लागलाय त्यामुळे खुश असतील कदाचित
त्यांच्या मार्गदर्शनाची जरा गरज होती. ऍडमिन, जरा त्यांचं अकाउंट enable करा की. बाकी इथे कोणी बिटकॉइन तज्ज्ञ आहे का? घ्यावा का मंडळी बिटकॉइन पुन्हा. काय म्हणताय?

@ कूटस्थ - तुमचे विश्लेषण बरोबर दिसत आहे... इतर लोक तुमच्याबद्दल टीकाकार होते पण तुम्ही खरे आहात असे दिसते...

बिटकॉईन मध्ये भारतात कशी गुंतवणूक करावी याबद्दल कोणी मार्गदर्शन करू शकेल का? मार्गदर्शन अकाउंट कोठे उघडावे, बँक अकॉउंट लिंक करता येते का, ट्रेडिंग साठी सरकारची परवानगी आहे का? विकल्यावर पैसे परत काढून बँक अकाउंट मध्ये टाकता येतात का? अशांवर हवे आहे.

जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा.

बिट कॉइन ने नवे रेकोर्ड गाठल्यावर ह्याच बाफ ची आठवण झाली . डोगे कॉइन पण आहे. कूटस्थ काय म्हणते तुमची इन्वेस्ट मेंट.

कोहंसोहं१०, भारतात क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगला मान्यता आहे. क्रिप्टोकरन्सी चलन म्हणून वापरणे अवैध आहे. गुंतवणूक करण्यासाठी अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत. त्यावरील अकाउंटला युपीआय अथवा बँक अकाउंट लिंक करू शकतो व झालेला गेन कॅश आऊट सुद्धा करू शकतो.
मी स्वतः क्रिप्टो ट्रेडिंग करत नाही. वरील सर्व माहिती ऐकीव व वाचलेली आहे.

Pages