पुनश्च एकदा बिटकॉइन

Submitted by कूटस्थ on 25 November, 2017 - 13:44

मध्यंतरी इथे बिटकॉइन बद्दल माहिती देणारे आणि प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण करणारे धागे निघाले होते. त्यामध्ये बिटकॉइन किंवा तत्सम डिजिटल चलन हे गुंतवणुकीसाठी योग्य कि अयोग्य यावर बरीच चर्चा देखील झाली. अनेकांचे मत सावध पवित्र्यामुळे म्हणा, अपुऱ्या कायदेशीर प्रणाली अथवा मान्यतेमुळे किंवा त्यामध्ये असलेल्या जोखीम मुळे म्हणा, हे बिटकॉइन किंवा बाकी डिजिटल चलन गुंतवणुकीसाठी प्रतिकूलच होते. इथे काय, अगदी जगभरात मोठ्या मोठ्या तज्ज्ञ लोकांची मते बिटकॉइन च्या भविष्याविषयी परस्पर विरोधी होती. काहींनी आपली प्रामाणिक मते दिली (जसे कि बिल गेट्स), तर काहींनी त्याच्या भविष्याच्या किमतीबाबत थोडी अतिरंजित मतेही दिली ( २०२० मध्ये १ बिटकॉइन ची किंमत ही १ मिलियन डॉलर तर काहींनी ५मिलियन डॉलर होईल असे सांगितले). काही प्रतिष्ठित व्यक्तींनी चक्क याला scam ठरवले (त्यातले बरेच जण banker होते आणि त्यांचे मत हे व्यावसायिक हितसंबंधामुळे biased होते). एकीकडे चीन सारख्या देशांनी बिटकॉइन ची देवाणघेवाण बंद करून बंधने आणण्याचा प्रयत्न केला तर एकीकडे जपान आणि इतर काही देशांनी याला चलन म्हणून मान्यताही दिली.
कोणतीही नवीन गोष्ट आल्यावर त्याला विरोध होणं साहजिकच आहे. अगदी पहिली रेल्वे धावली तेंव्हा अनेकांनी तो चेटूक असल्याचा संशय व्यक्त केला. इतके लांब कशाला, काही वर्षांपूर्वी कॉम्पुटर, इंटरनेट याच्या sustainability बद्दलदेखील अनेक प्रश्न उठवले गेले होते. तसेच बिटकॉइन किंवा तत्सम डिजिटल चलनाचे आहे. खरं तर जालावर बिटकॉइन, ब्लॉकचेन याबद्दलची प्रचंड माहिती उपलब्ध आहे. त्याबद्दल थोडेसे जाणून घेतल्यावर कळेल कि या तंत्रज्ञानात प्रचंड क्षमता आहे (निदान माझे तरी असे मत झाले आहे).
उगाचच कायदेशीर मान्यता आणि चलनाच्या तांत्रिक बाबी , उपयुक्ततेबद्दलच्या शंका कुशंका यांना फाट्यावर मारून ज्यांनी केवळ गुंतवणूक म्हणून याकडे पाहिले आणि यामध्ये योग्य वेळी गुंतवणूक केली त्यांचे अभिनंदन ! यामध्ये जोखीम आहे हे नक्की परंतु शेवटी जोखीम कशात नसते? अगदी रस्त्यावरून चालण्यात देखील जोखीम आहेच म्हणून काही आपण बाहेर जाणं सोडत नाही. शेवटी महत्वाचे आहे ते जोखीम आपल्या क्षमतेप्रमाणे व्यवस्थितपणे हाताळणे.
काहीही असो, हा लेख लिहिताना १ बिटकॉइन ची किंमत $८७०० इतकी पोहोचली आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने म्हणाल तर वर्षभरात किंमत साधारण ८ पट झालीये. अनेक विरोधांना सहजपणे पचवून बिटकॉइन चा वारू चौफेर दौडतो आहे आणि त्याला थांबवणं आता सहज शक्य राहिलेलं नाही.
बिटकॉइन किमतीबद्दल थोडक्यात सांगायचे झाल्यास हाथी चले बाजार और कुत्ते भोंकें हजार !

नोट: वरील लेखाचा हेतू हा बिटकॉइन किंवा तत्सम डिजिटल चलनात कोणालाही सल्ला देण्याचा किंवा गुंतवणूक करण्यास उद्दीपित करण्याचा नाही. प्रत्येकाने योग्य अभ्यास करून आपल्या सद्सद्विवेकबुद्धीने निर्णय घ्यावा ही विनंती.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

लेखातली भाषा आणि विचार यांचा खाली दिलेल्या नोट शी काहीही संबंध वाटत नाही.
तुम्ही केलीये ना गुंतवणूक? खुश आहात ना?
मग बिटकॉइन गुंतवणुकीवर टिका करणार्‍यांना कुत्ते म्हणायची खुमखुमी का उद्भवत असावी?

अगदी रस्त्यावरून चालण्यात देखील जोखीम आहेच म्हणून काही आपण बाहेर जाणं सोडत नाही.
जोखीम असलेल्या गुंतवणुकीचे समर्थन करताना हे " बचाववाक्य" नेहमीच वापरले जाते. निरोगी गुंतवणूकदार अशा प्रकारची गुंतवणूक करणे शक्यच नाही, फक्त "रेबीज" झालेलेच करू शकतात.

हा हा, एक बंबर हा मार्मिक.... रिस्क मॅनेजमेंट आणि गोल्ड रश मॅडनेस मधला फरक नाही कळत लोकांना. फावडे-कुदळ विकणारेच श्रीमंत झाल्याचे बघितले आहे आजवर.

मार्मिक, निरोगी गुंतवणुकीबाबत अजून एक वाक्य फेमस आहे "Invest which you are afford to lose". ज्याला हे समजले आणि त्यानुसार ज्याने इन्व्हेस्टमेंट केली तो यशस्वी गुंतवणूकदार आणि ते करण्याचे कष्ट न घेता केवळ लांबून टीका करणारे "रेबीज" चे रोगी गुंतवणूकदार.
नानाकळा, "रिस्क मॅनेजमेंट आणि गोल्ड रश मॅडनेस मधला फरक नाही कळत लोकांना" -- हे मात्र अगदी बरोबर बोललात. इथे मात्र ते कोणाला लागू होते हे समजले की झाले. जमल्यास हा विडिओ नक्की पहा https://www.youtube.com/watch?v=k4FNmp3mKp4

असो. एखादी बस चुकली म्हणून बस लाच नावे ठेवण्यापेक्षा पुढच्या बसच्या वेळापत्रकाकडे थोडेसे लक्ष दिले तर बस सुटणार तर नाहीच उलट बसायलाही जागा मिळेल. नाही का?

बिटकॉइनमधली गुंतवणूक ही नक्की कोणत्या प्रकारच्या असेटमधली गुंतवणूक म्हणायची?
ती एक व्हर्च्युअल करन्सी असेल, तर तिचे फंडामेंटल्स काय आहेत, की ज्याच्या जोरावर तिची किंमत वाढत जाईल असे म्हणता येईल?

भरतजी, बिटकॉइन बाबत एका समंजस गुंतवणूकदाराप्रमाणे तुम्ही प्रश्न विचारलात याबद्दल प्रथम अभिनंदन.
बिटकॉइन हि एक डिजिटल करन्सी आहे. तिचे फंडामेंटल्स आणि ऍसेट आहेत त्यामागची टेक्नॉलॉजी आणि त्याची उपयुक्तता. बिटकॉइन ही एक decentralized peer to peer payment system आहे. समजा 'अ' व्यक्तीस 'ब ' ला काही रक्कम द्यायची आहे तर साधारणपणे २ मार्ग आहेत. एक म्हणजे समोरासमोर रोख रक्कम देणे आणि दुसरी म्हणजे डिजिटली रक्कम ट्रान्फर करणे. यातील दुसरा मार्ग हा सद्यकाळात पहिला मार्ग जिथे वापरणे शक्य नाही किंवा रोख रक्कम देणे शक्य नाही तिथे वापरला जातो. परंतु या प्रकारात हा व्यवहार फक्त २ 'अ' आणि 'ब ' या दोन व्यक्तीमधील न राहता एका तिसऱ्याची मदत यावेळी आपल्याला घ्यावी लागते उदाहरणार्थ क्रेडिट कार्ड अथवा बँक.
आणि जिथे third party येते तिथे त्याचे कमिशन पण येतेच ज्याचा फटका शेवटी अ' अथवा 'ब ' ला बसतो.
उदाहरण द्यायचे झाल्यास आपण एक consumer म्हणून जरी क्रेडिट कार्ड अगदी सहजपणे वापरत असलो तरी त्याची transaction फी मर्चंट किंवा आपल्याला भरावीच लागते. त्यामध्ये रक्कम जितकी जास्त तितके कमिशन जास्त. तसेच मला समजा एक भारतातील व्यापारी म्हणून अमेरिका स्थित व्यापाऱ्याला payment करायचे असेल तर मला प्रथम बँकेचा आधार घेऊन रुपयाचे डॉलर करून पाठवावे लागेल. परंतु असे करण्यात मला एक बँकेचा ग्राहक म्हणून बरेच पैसे चार्जेस म्हणून द्यावे लागतात. तसेच ज्याला पैसे हवे असतील त्याला देखील बँकेचा आधार घ्यावा लागतो. काही प्रकारात बँकेला सर्व्हिस फी देखील बरीच द्यावी लागते ( उदा wire transfer). या प्रकारात वेळ जातो तो वेगळाच.
परंतु बिटकॉइन ने हे सर्व बदलत आहे. याद्वारे कोणत्याही third party चा आधार न घेता 'अ' व्यक्तीस 'ब ' ला काही सेकंदात पैसे पाठवण्यात येऊ शकतात.आणि हे transaction अतिशय सुरक्षित आहे. Transaction केल्यावर ते हॅक करून दुसरीकडे वळवणे अथवा त्यातील काही रक्कम पळवणे हे जवळपास अशक्य आहे. डिजिटल payment मधील सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे double payment हा देखील बिटकॉइन मुळे सॉल्व्ह झालेला आहे याचा कारण आहे त्यामागील 'Blockchain Technology'
कधीतरी या technology वर सविस्तर लिहीन. परंतु थोडक्यात सांगायचे झाल्यास यामुळे 'अ' या व्यक्तीने पाठवलेले पैसे ब व्यक्तीस अत्यंत सुरक्षितपणे आणि अत्यंत कमी वेळात तेही कोण्या तिसऱ्याच्या (बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपन्या) आधाराशिवाय पोहोचणे शक्य झाले आहे.
बिटकॉइन हि पहिली डिजिटल करन्सी आहे त्यामुळे ती सध्या जास्त फेमस आहे इतकेच. परंतु 'Blockchain Technology' चा उपयोग करून अजूनही काही इतर डिजिटल करन्सी आल्या आहेत उदा Ethereum ज्यामुळे अजून काही उपयुक्त प्रकार जसे कि 'स्मार्ट फ्युचर काँट्रॅक्ट्स' करणे शक्य झाले आहे. केवळ इन्व्हेस्टमेंट आणि परतावा याचा विचार केल्यास Ethereum ने गेल्या वर्षात बिटकॉइन च्या अनेक पटीने परतावा दिला आहे. त्याची किंमत ८ वरून ४७०+ (लेख लिहीतानाची किंमत) झाली आहे. असे समजले जाते की Ethereum चा उपयोग बिटकॉइन पेक्षा जास्त आहे. असो.
सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या प्रकारामुळे व्यवहारासाठी कोण्या तिसऱ्याच्या आधाराची गरज लागत नाहीये त्यामुळे अत्यंत सुरक्षितपणे आणि अत्यंत कमी वेळात पैसे पोहोचण्याशिवाय transaction cost अत्यंत कमी झाली आहे. वित्त जगतातील हि एक क्रांतीच आहे. परंतु त्यामुळे बँकांचे धाबे दणाणले आहे. अनेक बँकांनी त्यामुळे यामध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केलेली आहे. Ethereum या करन्सी चा उपयोग औद्योगिक जगतात बराच मोठा आहे. त्यासाठी मध्ये अमेरिकेत एक conference देखील झाली होती आणि त्यात ३० मोठ्या बॅंक्स, मायक्रोसॉफ्ट, इंटेल अश्या मोठ्या कंपन्यांनी सहभाग घेतला होता. पुढील औद्योगिक वापरासाठी मोठे फंडिंग देखील दिले गेले आहे. अश्याच प्रकारची development आणि फंडिंग बिटकॉइन मध्ये देखील सुरु आहे. जपान सारख्या अनेक देशांनी बिटकॉइन ला अधिकृत मान्यता दिली आहे. अमेरिकेत हि अनेक ठिकाणी बिटकॉइन हे payment म्हणून स्वीकारत आहेत. CME Group (Chicago Mercantile Exchange & Chicago Board of Trade) ने तर बिटकॉइन ला फ्युचर ट्रेडिंग मध्ये आणण्याचा प्रस्ताव दिला आहे. यावरून समजून येते की बिटकॉइन वर असलेला भरवसा वाढत चालला आहे.

परंतु अनेकांना याबाबत जास्त जाणून घेण्यापेक्षा केवळ हि एक हवा आहे म्हणण्यात आणि नावे ठेवण्यातच जास्त आनंद वाटतो. असो.

परंतु असे म्हणतात की अजूनही बिटकॉइन हे बाल्यावस्थेमध्येच आहे जसे की इंटरनेट हे नव्वदीच्या दशकात होते आणि याची व्याप्ती भविष्यात खूप मोठी असणार आहे. बिटकॉइन ची संख्या मात्र मर्यादित आहे (२१ मिलियन). केवळ गुंतवणूकीचा विचार केल्यास याचा वाढता व्यावहारिक वापर आणि असलेली मर्यादित संख्या यामुळे याची किंमत वाढत आहे आणि अनेकांचे असे म्हणणे आहे की बिटकॉइन आणि बाकीच्या मोठ्या डिजिटल करन्सी यांचा उपयोग जसा वाढेल तशी त्याची किंमतही वाढतच जाईल. काही काळासाठी करेक्शन पण येईल पण दीर्घ काळ गुंतवणुकीसाठी नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तरीही लेखामध्ये लिहिल्याप्रमाणे प्रत्येकाने योग्य अभ्यास करूनच स्वजोखमीवर गुंतवणूक करावी.

इतरांना सल्ला देण्याआधी आपण किती बिटकोईन विकत घेतले? ते स्पष्ट करा
की धावत असलेल्या गाडीमागे बसायचे नसून देखील उगाच पळत आहात?

दिलप्या, मी किती बिटकोईन विकत घेतले ते इथे स्पष्ट करायला मी बांधील नाही. मी बिटकॉइन मध्ये गुंतवणूक केलेली आहे एवढे सांगेन. केली नसती तर वरचा सगळा खटाटोप केला नसता. तसेच मी गुंतवणुकीचा कोणताही सल्ला दिलेला नाही. तो द्यायला मी काही सल्लागार नाही. मी फक्त बिटकॉइन बाबत माहिती सादर केली आहे आणि शक्यता स्पष्ट केलेली आहे. प्रत्येक वेळी शेवटी disclaimer दिला आहेच.

तुम्ही केलीये ना गुंतवणूक? खुश आहात ना?
मग बिटकॉइन गुंतवणुकीवर टिका करणार्‍यांना कुत्ते म्हणायची खुमखुमी का उद्भवत असावी?

>> याबद्दल उत्तर मिळालेले नाही हे इथे नमूद करतो.

प्रथमतः तो एक वाक्प्रचार आहे आणि त्याचा अर्थ वाक्प्रचाराच्या अर्थाप्रमाणे घ्यावा ना कि शब्दशः. दुसरे म्हणजे वाक्य नीट वाचल्यास लक्षात येईल कि तो वाक्प्रचार हा बिटकॉइन च्या वर जाणाऱ्या किमतीबाबत होता ना की त्यामध्ये गुंतवणूक न केलेल्यांबद्दल. जालावर अनेकांनी बिटकॉइन ची किंमत हि पुन्हा काही सेंट (अत्यंत कमी) होईल असे अनेकदा वक्तव्य केले होते. तो वाक्प्रचार त्यासाठी दिलेला.

उगाचच कायदेशीर मान्यता आणि चलनाच्या तांत्रिक बाबी , उपयुक्ततेबद्दलच्या शंका कुशंका यांना फाट्यावर मारून ज्यांनी केवळ गुंतवणूक म्हणून याकडे पाहिले आणि यामध्ये योग्य वेळी गुंतवणूक केली ....
>> असे लोक गुंतवणूकदार असतात?

का नसावेत? समजा माझ्याकडे एक चांगली व्यावसायिक कल्पना आहे आणि मला ती प्रत्यक्षात आणायला भांडवल हवे आहे. अश्या वेळी केवळ कल्पेनेतील सामर्थ्य आणि भविष्यात होणार फायदा तसेच योग्य जोखीम ओळखून कायदेशीररित्या कंपनी स्थापन झाली नसताना देखील ते भांडवल मला जो देईल तो गुंतवणूकदार नाही का? कारण त्याला विश्वास असतो की नवीन कल्पनेला कायदेशीर मान्यता वगैरे बाबी पुढे मिळतीलच. बिटकॉइन च्या बाबतीत सांगायचे झाल्यास त्याला करन्सी म्हणून मान्यता नसेल अजूनपर्यंत काही देशात परंतु त्याचा अर्थ त्यामधील केलेली गुंतवणूक हि अवैध ठरत नाही. वरच्या एका प्रतिसादात मी लिहिलेच आहे की जपान ने याला कायदेशीर मान्यता दिली आहे तसेच अमेरिकेतील CME Group (Chicago Mercantile Exchange & Chicago Board of Trade) ने बिटकॉइन ला फ्युचर ट्रेडिंग मध्ये आणण्याचा प्रस्ताव दिला आहे. आणि हे सर्व कायदेशीररित्या होत आहे. हळूहळू असे बदल होत राहतीलच. हे सर्व आधीच ओळखून ज्यांनी गुंतवणूक केली असे लोक गुंतवणूकदार का नसावेत?

कूटस्थ, तुमच्या या लेख्/प्रतिसादांवरुन जाणावतंय कि तुम्ही बिटकॉइन्च्या बाबतीत पॅशनेट आहात आणि त्या पॅशनला अभ्यासाची हि जोड आहे/असावी. या अनुषंगाने या दोन प्रश्नांची उत्तरं द्याल अशी आशा करतो.

१. प्रत्येक करंसीला त्या-त्या राष्ट्रांची हमी असते - गोल्ड रिझर्व, इकानमी वगैरे. बिटकॉइन वर्च्युअल करंसी अस्ल्याने कोणा एका राष्ट्राचा तिच्यावर अधिकार्/पाठिंबा नाहि. अशी परिस्थिती असताना बिटकॉइनची किंमत कोसळली तर फॉल्बॅक मॅकनिझम काय आहे?
२. बिट्कॉइनचा कणा ब्लॉकचेन टेक्नॉलजी आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलजी ओपन सोर्स असल्याने या टेक्नॉलजीवर अनेक वर्च्युअल करंसीज मश्रुमसारख्या उगवण्याचा संभव आहे (सुरुवात झालेली आहे). तर या स्पर्धेत बिटकॉइन (फर्स्टमुवर अ‍ॅडवांटेज असुनहि) तग कसा धरुन राहिल?

(या विषयावर एक धागा ऑलरेडि आहे आणि हि चर्चा झालेली आहे असं आठवतंय...)

<--बिटकॉइन वर्च्युअल करंसी अस्ल्याने कोणा एका राष्ट्राचा तिच्यावर अधिकार्/पाठिंबा नाहि. अशी परिस्थिती असताना बिटकॉइनची किंमत कोसळली तर फॉल्बॅक मॅकनिझम काय आहे---> प्रत्येक राष्ट्र हे आपापल्या गोल्ड रिसर्व प्रमाणे करन्सी छापते (आयला अपवाद अमेरिका) पृथ्वीतलावर गोल्डचा साठा मर्यादित आहे. बिटकॉइन ची संख्या देखील मर्यादित आहे. एखादी गोष्ट जर उपयुक्त परंतु मर्यादित असेल तर तिचा फॉल मर्यादित असतो. तसेच एखाद्या करन्सी वर राष्ट्राचा अधिकार किंवा पाठिंबा असेल तर ती सुरक्षित राहिलच याची हमी देता येत नाही. हे आजच्या व्हेनेझुएला आणि झिम्बाब्वे राष्ट्राच्या झालेल्या करन्सी अवमूल्यन(devaluation) वरून कळून येते. याउलट बिटकॉइन हि जगातल्या सर्वसामान्य लोकांकडून आपोआप नियंत्रित होणारी करन्सी आहे त्यामुळे एकाद्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अथवा निर्णयामुळे अचानक परिणाम होण्याची शक्यता मलातरी तशी कमी वाटते. परंतु आत्ता कुठे या करन्सी बाबत कुतूहल/जागरूकता निर्माण होत आहे त्यामुळे volatality नक्की असेल. जर योग्य दिशेने तिचा प्रवास झाल्यास बिटकॉइन चे भविष्य उज्ज्वल असेल असे माझे मत आहे.
<--बिट्कॉइनचा कणा ब्लॉकचेन टेक्नॉलजी आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलजी ओपन सोर्स असल्याने या टेक्नॉलजीवर अनेक वर्च्युअल करंसीज मश्रुमसारख्या उगवण्याचा संभव आहे (सुरुवात झालेली आहे). तर या स्पर्धेत बिटकॉइन (फर्स्टमुवर अ‍ॅडवांटेज असुनहि) तग कसा धरुन राहिल?---> अत्यंत योग्य प्रश्न आहे. आणि तसे होईल ही. म्हणतात कि येत्या काही वर्षात ethereum बिटकॉइन ला Market Capitalization मध्ये मागे टाकेल (सध्या ते एक तृतीयांश आहे). परंतु जेंव्हा जगामध्ये सॉफ्टवेयर बूम १९९५-२००० च्या काळात आला तेंव्हा अनेक कंपन्या उदयास आल्या परंतु अगदी सुरुवातीपासून असलेल्या Infosys, Wipro, आणि TCS यांना बराच फायदा झाला कारण त्यांचे पाय अगोदरच रोवले गेले होते. तसाच फायदा बिटकॉइन ला मिळेल असे वाटते. जेंव्हा आणखी काही करंसीज येऊन रोजच्या जगण्यात त्याची उपयुक्तता वाढेल तोपर्यंत बिटकॉइनची मुळे खोलवर रुजली गेली असतील. परंतु तुमची शंका रास्त आहे आणि भविष्यात बिटकॉइन पेक्षाही उजवी आणि उपयुक्त करन्सी आलीच तर स्पर्धा नक्कीच असेल आणि त्यात टिकून राहण्यासाठी काही ना काही उपाययोजना होतीलच (त्याचाच एक भाग म्हणून ऑगस्ट २०१७ मध्ये बिटकॉइन पासून बिटकॉइन कॅश या नवीन करन्सीचा जन्म झाला Happy ) परंतु सध्या तरी अर्ली बर्ड चा advantage काही वर्ष असेल बिटकॉइन ला असे वाटते. परंतु भविष्यात नक्की काय होईल हे काळच ठरवेल आणि ते पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

<--बिटकॉइन वर्च्युअल करंसी अस्ल्याने कोणा एका राष्ट्राचा तिच्यावर अधिकार्/पाठिंबा नाहि. अशी परिस्थिती असताना बिटकॉइनची किंमत कोसळली तर फॉल्बॅक मॅकनिझम काय आहे---> प्रत्येक राष्ट्र हे आपापल्या गोल्ड रिसर्व प्रमाणे करन्सी छापते (आयला अपवाद अमेरिका) पृथ्वीतलावर गोल्डचा साठा मर्यादित आहे. बिटकॉइन ची संख्या देखील मर्यादित आहे. एखादी गोष्ट जर उपयुक्त परंतु मर्यादित असेल तर तिचा फॉल मर्यादित असतो. तसेच एखाद्या करन्सी वर राष्ट्राचा अधिकार किंवा पाठिंबा असेल तर ती सुरक्षित राहिलच याची हमी देता येत नाही. हे आजच्या व्हेनेझुएला आणि झिम्बाब्वे राष्ट्राच्या झालेल्या करन्सी अवमूल्यन(devaluation) वरून कळून येते. याउलट बिटकॉइन हि जगातल्या सर्वसामान्य लोकांकडून आपोआप नियंत्रित होणारी करन्सी आहे त्यामुळे एकाद्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अथवा निर्णयामुळे अचानक परिणाम होण्याची शक्यता मलातरी तशी कमी वाटते. परंतु आत्ता कुठे या करन्सी बाबत कुतूहल/जागरूकता निर्माण होत आहे त्यामुळे volatality नक्की असेल. जर योग्य दिशेने तिचा प्रवास झाल्यास बिटकॉइन चे भविष्य उज्ज्वल असेल असे माझे मत आहे.
<--बिट्कॉइनचा कणा ब्लॉकचेन टेक्नॉलजी आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलजी ओपन सोर्स असल्याने या टेक्नॉलजीवर अनेक वर्च्युअल करंसीज मश्रुमसारख्या उगवण्याचा संभव आहे (सुरुवात झालेली आहे). तर या स्पर्धेत बिटकॉइन (फर्स्टमुवर अ‍ॅडवांटेज असुनहि) तग कसा धरुन राहिल?---> अत्यंत योग्य प्रश्न आहे. आणि तसे होईल ही. म्हणतात कि येत्या काही वर्षात ethereum बिटकॉइन ला Market Capitalization मध्ये मागे टाकेल (सध्या ते एक तृतीयांश आहे). परंतु जेंव्हा जगामध्ये सॉफ्टवेयर बूम १९९५-२००० च्या काळात आला तेंव्हा अनेक कंपन्या उदयास आल्या परंतु अगदी सुरुवातीपासून असलेल्या Infosys, Wipro, आणि TCS यांना बराच फायदा झाला कारण त्यांचे पाय अगोदरच रोवले गेले होते. तसाच फायदा बिटकॉइन ला मिळेल असे वाटते. जेंव्हा आणखी काही करंसीज येऊन रोजच्या जगण्यात त्याची उपयुक्तता वाढेल तोपर्यंत बिटकॉइनची मुळे खोलवर रुजली गेली असतील. परंतु तुमची शंका रास्त आहे आणि भविष्यात बिटकॉइन पेक्षाही उजवी आणि उपयुक्त करन्सी आलीच तर स्पर्धा नक्कीच असेल आणि त्यात टिकून राहण्यासाठी काही ना काही उपाययोजना होतीलच (त्याचाच एक भाग म्हणून ऑगस्ट २०१७ मध्ये बिटकॉइन पासून बिटकॉइन कॅश या नवीन करन्सीचा जन्म झाला Happy ) परंतु सध्या तरी अर्ली बर्ड चा advantage काही वर्ष असेल बिटकॉइन ला असे वाटते. परंतु भविष्यात नक्की काय होईल हे काळच ठरवेल आणि ते पाहणे उत्सुकतेचे ठरेल

वेन्झुएला, झिंबाब्वे, ग्रीस इ. टोकाची उदाहरणं झाली. जागरुक गुंतवणुकदार या अशा करंसीमध्ये गुंतवणुक करत नाहित...

>>याउलट बिटकॉइन हि जगातल्या सर्वसामान्य लोकांकडून आपोआप नियंत्रित होणारी करन्सी आहे त्यामुळे एकाद्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अथवा निर्णयामुळे अचानक परिणाम होण्याची शक्यता मलातरी तशी कमी वाटते.<<

तोच लोचा आहे. बिटकॉइनची वॅल्यु तीची संख्या मर्यादित (सेट अपर लिमिट) अस्ल्याने वाढत जाणार आहे. त्यावर कोणाचा हि कंट्रोल नाहि फक्त एक माणुस (संस्था?) सोडुन. शेअर्स बायबॅक/बोनस्/राइट्स करुन कंपन्या जसं त्यांचं मार्केट वॅल्युएशन कंट्रोल करायचा प्रयत्न करतात तसंच काहिसं सटोशी आणि कंपनी भविष्यात करेल याची शक्यता नाकारता येणार नाहि.

नव्वदच्या दशकापर्यंत तरी युएस डॉलरला जागतीक मागणी/मान्यता होती जी आता काहि प्रमाणात घसरत चाललेली आहे. हि परिस्थिती ओळखुन युएस डॉलरला जागतीक स्तरावर पर्याय म्हणुन बिटकॉइनची निर्मिती करणं हे प्रशंसनीय आहे. सध्यातरी फायद्यांपेक्षा तोटे जास्त दिसत असल्याने बिटकॉइनचा अ‍ॅडाप्शन रेट मर्यादित आहे. शिवाय अंकल सॅम तिला कितपत पसरु/वाढु देइल हा प्रश्नहि विचारात घेण्यासारखा आहे.

तर माझ्या आतापर्यंतच्या रीड नुसार बिटकॉइन काहिकाळ तग धरुन राहिल पण ती ज्या अंडरलाइन प्लॅटफॉर्मवर उभी आहे (ब्लॉकचेन), तीच्यात छोटिशी क्रांती आणण्याची कुवत आहे... Happy

कोण्याही एका व्यक्ती किंवा संस्थेचा कंट्रोल नाही हे एका दृष्टीने चांगलंदेखील आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेली सिस्टीम आहे.
शेअर्स बायबॅक/बोनस्/राइट्स करुन कंपन्या जसं त्यांचं मार्केट वॅल्युएशन कंट्रोल करायचा प्रयत्न करतात तसंच काहिसं सटोशी आणि कंपनी भविष्यात करेल याची शक्यता नाकारता येणार नाहि. --> तसे करणे अवघड आहे कारण बिटकॉइन च्या उद्गमावर कोण्या एकट्याचा किंवा कंपनीचा हक्क नाही.
---सध्यातरी फायद्यांपेक्षा तोटे जास्त दिसत असल्याने बिटकॉइनचा अ‍ॅडाप्शन रेट मर्यादित आहे---> माझ्या मते अ‍ॅडाप्शन रेट मर्यादित असण्याचे कारण त्याच्या फायद्यातील अनभिज्ञता आहे. फायदे नक्कीच जास्त आहेत परंतु नवीन कन्सेप्ट असल्यामुळे रुजायला थोडा वेळ लागेलच. परंतु सध्याचा त्याचा वाढता प्रसार पाहता डिजिटल करन्सी हि कन्सेप्ट जनमानसात लवकरच रुजेल. तसेच अँड्रॉइड प्रमाणे open system असल्याने सर्व निर्णय लोकहितासाठी घेतले जातील ना कि कोण्या एका व्यक्तीसाठी किंवा कंपनीच्या फायद्यासाठी. त्यामुळे transparency आहे बरीच सध्यातरी.
तसेच त्यामागील Blockchain Technology तुम्ही म्हणालात तशी potentially क्रांतिकारी आहे. म्हणूनच गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहता दीर्घ काळ गुंतवणुकीसाठी फक्त बिटकॉइन बरोबर इतरही उत्तम crypto currencies चा पर्याय मलातरी चांगला वाटतो.

त्याला विश्वास असतो की नवीन कल्पनेला कायदेशीर मान्यता वगैरे बाबी पुढे मिळतीलच.
>> ह्म्म्म..... इमूपालन, महोगनी झाडे, इत्यादी असंख्य गोष्टीत करोडो लोकांनी विश्वास टाकून प्रचंड फायदा मिळवल्याची उदाहरणं आहेतच.

>> ह्म्म्म..... इमूपालन, महोगनी झाडे, इत्यादी असंख्य गोष्टीत करोडो लोकांनी विश्वास टाकून प्रचंड फायदा मिळवल्याची उदाहरणं आहेतच" ---> असतीलच आणि पुढेही असणार. कारण त्यांनी स्वतःहून फारशी शहानिशा, अभ्यास न करता हव्यासापोटी पैसा गुंतवलेला असतो. त्यांना गुंतवणूकदार म्हणता येणार नाहीच.
परंतु त्याचबरोबर योग्य वेळी, योग्य ठिकाणी/बिसिनेस मध्ये अभ्यासांती गुंतवणूक करून फायदा झालेली उदाहरणेही नक्कीच सापडतील.

अ. केवळ कल्पेनेतील सामर्थ्य आणि भविष्यात होणार फायदा तसेच योग्य जोखीम ओळखून कायदेशीररित्या कंपनी स्थापन झाली नसताना देखील ते भांडवल मला जो देईल
१. स्वतःहून फारशी शहानिशा, अभ्यास न करता हव्यासापोटी
२. योग्य वेळी, योग्य ठिकाणी/बिसिनेस मध्ये अभ्यासांती गुंतवणूक करून

------------------

कूटस्थ, यु आर टू मच एक्सायटेड, नॉट अ गुड साइन ऑफ अ वाइज इन्वेस्टर.

असो. शुभेच्छा! धन्यवाद! Happy

कूटस्थ, आज bitcoin 10000 USD वर गेलाय....अभिन्न्दन् ...... शंका कुशंका मुले BUS Missed zali..... Ripple बद्द्ल तुमचे मत काय? सद्या rate 17 Rs / 1 Ripple आहे.....SBI, AXIS bank ने मान्य ता दिलि आहे ........

रिपल चा उपयोग बँकांकडून RTGS साठी जास्त होऊ शकेल ज्यामुळे Transaction Settlement अत्यंत कमी वेळात होईल. माझ्या मते Blockchain Technology हि पुढील काही वर्षांसाठी तरी राहीलच आणि ज्या करन्सी काळाप्रमाणे टेकनॉलॉजी मध्ये बदल करून चांगली सुविधा देतील त्या नक्कीच टिकतील. मला पर्सनली बिटकॉइन व्यतिरिक्त सध्या तरी Altcoins मध्ये इथेरियम, रिपल, डॅश , आणि लाइटकॉइन यांचे भविष्य उज्ज्वल वाटते.

एक काल्पनि़क उदाहरण - समजा एखाद्याने काही वर्षापुर्वी त्याच्याकडचे १००० रुपये बिटकॉइनमधे गुंतवले होते आणि आता त्याचे १००००० रुपये झाले. गुंतवणुकिच्या नियमाप्रमाणे योग्यवेळी नफा काढुन घेणे चांगले (किवा आर्थिक अडचण आली), म्हणुन त्याने काही बिटकॉइन विकायचे ठरवले तर त्याचे हे उत्पन्न कसल्या प्रकारचे ठरेल? सफेद कि काळा पैसा? भारतात बिट्कॉइनला मान्यता नसल्याने त्याच्या विक्रिमधे मिळालेला नफा काळा की पांढरा? त्यावर कर निर्धारण कसे असेल?

vt220,

भारतात बिट्कॉइनला एक करन्सी म्हणून मान्यता नाही. परंतु बिटकॉइन मधील गुंतवणूक (खरेदी, विक्री) अवैध नाही. अमेरिकेमध्ये डिजिटल करन्सी मधील गुंतवणुकीवर टॅक्स साठी गृह खरेदी विक्री चे नियम लागू होतात. मी करतज्ञ नाही परंतु माझ्या अल्प माहितीनुसार भारतीय टॅक्स कायद्यामध्ये डिजिटल करन्सी साठी वेगळी तरतूद अजून अस्तित्वात नाही परंतु टॅक्स चे नियम इतर करन्सी/कमोडिटी ट्रेडिंग नियमानुसार लागतील. त्याच्या विक्रीमधे मिळालेला नफ्यावर शॉर्ट टर्म (१ वर्षाच्या आत विकला तर) or लॉन्ग टर्म गेन (१ वर्षानंतर विकला तर) प्रमाणे टॅक्स लागेल. चुकले असल्यास जाणकारांनी प्रकाश टाकावा.

आज १७००० !
हे मात्र ट्युलिपच्याही पुढे गेले. जो तो आपल्या कंपनीच्या नावात बिट कॉइन किंवा ब्लॉक्चेन शब्द घुसडतो व शेअर किंमत ३००% वर जाते !
आता ओक ट्री रोड वर ब्लॉकचेन आयब्रो थ्रेडिंग व फेशियल चे दुकान पाहिले की मी सु डो मी.

19000 पर्यंत जाऊन आलाय! आता १७००० च्या आसपास आहे. १५ दिवसात दुप्पट रिटर्न्स !!!! US मधील CME आणि Nasdaq ने बिटकॉइन च्या फ्युचर्स ट्रेडिंग ला मान्यता दिली त्यामुळे बराच वर गेला आहे सध्या. १० डिसेंबर ला याचे फ्युचर्स ट्रेडिंग सुरु होईल तेंव्हा फायद्यासाठी कोणी Short Positions घेतल्या तर पुन्हा खाली येऊ शकेल. परंतु लॉन्ग टर्म मध्ये price stability जरूर येईल...खास करून फ्युचर्स ट्रेडिंग मुळे. काय होईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Pages