पुनश्च एकदा बिटकॉइन

Submitted by कूटस्थ on 25 November, 2017 - 13:44

मध्यंतरी इथे बिटकॉइन बद्दल माहिती देणारे आणि प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण करणारे धागे निघाले होते. त्यामध्ये बिटकॉइन किंवा तत्सम डिजिटल चलन हे गुंतवणुकीसाठी योग्य कि अयोग्य यावर बरीच चर्चा देखील झाली. अनेकांचे मत सावध पवित्र्यामुळे म्हणा, अपुऱ्या कायदेशीर प्रणाली अथवा मान्यतेमुळे किंवा त्यामध्ये असलेल्या जोखीम मुळे म्हणा, हे बिटकॉइन किंवा बाकी डिजिटल चलन गुंतवणुकीसाठी प्रतिकूलच होते. इथे काय, अगदी जगभरात मोठ्या मोठ्या तज्ज्ञ लोकांची मते बिटकॉइन च्या भविष्याविषयी परस्पर विरोधी होती. काहींनी आपली प्रामाणिक मते दिली (जसे कि बिल गेट्स), तर काहींनी त्याच्या भविष्याच्या किमतीबाबत थोडी अतिरंजित मतेही दिली ( २०२० मध्ये १ बिटकॉइन ची किंमत ही १ मिलियन डॉलर तर काहींनी ५मिलियन डॉलर होईल असे सांगितले). काही प्रतिष्ठित व्यक्तींनी चक्क याला scam ठरवले (त्यातले बरेच जण banker होते आणि त्यांचे मत हे व्यावसायिक हितसंबंधामुळे biased होते). एकीकडे चीन सारख्या देशांनी बिटकॉइन ची देवाणघेवाण बंद करून बंधने आणण्याचा प्रयत्न केला तर एकीकडे जपान आणि इतर काही देशांनी याला चलन म्हणून मान्यताही दिली.
कोणतीही नवीन गोष्ट आल्यावर त्याला विरोध होणं साहजिकच आहे. अगदी पहिली रेल्वे धावली तेंव्हा अनेकांनी तो चेटूक असल्याचा संशय व्यक्त केला. इतके लांब कशाला, काही वर्षांपूर्वी कॉम्पुटर, इंटरनेट याच्या sustainability बद्दलदेखील अनेक प्रश्न उठवले गेले होते. तसेच बिटकॉइन किंवा तत्सम डिजिटल चलनाचे आहे. खरं तर जालावर बिटकॉइन, ब्लॉकचेन याबद्दलची प्रचंड माहिती उपलब्ध आहे. त्याबद्दल थोडेसे जाणून घेतल्यावर कळेल कि या तंत्रज्ञानात प्रचंड क्षमता आहे (निदान माझे तरी असे मत झाले आहे).
उगाचच कायदेशीर मान्यता आणि चलनाच्या तांत्रिक बाबी , उपयुक्ततेबद्दलच्या शंका कुशंका यांना फाट्यावर मारून ज्यांनी केवळ गुंतवणूक म्हणून याकडे पाहिले आणि यामध्ये योग्य वेळी गुंतवणूक केली त्यांचे अभिनंदन ! यामध्ये जोखीम आहे हे नक्की परंतु शेवटी जोखीम कशात नसते? अगदी रस्त्यावरून चालण्यात देखील जोखीम आहेच म्हणून काही आपण बाहेर जाणं सोडत नाही. शेवटी महत्वाचे आहे ते जोखीम आपल्या क्षमतेप्रमाणे व्यवस्थितपणे हाताळणे.
काहीही असो, हा लेख लिहिताना १ बिटकॉइन ची किंमत $८७०० इतकी पोहोचली आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने म्हणाल तर वर्षभरात किंमत साधारण ८ पट झालीये. अनेक विरोधांना सहजपणे पचवून बिटकॉइन चा वारू चौफेर दौडतो आहे आणि त्याला थांबवणं आता सहज शक्य राहिलेलं नाही.
बिटकॉइन किमतीबद्दल थोडक्यात सांगायचे झाल्यास हाथी चले बाजार और कुत्ते भोंकें हजार !

नोट: वरील लेखाचा हेतू हा बिटकॉइन किंवा तत्सम डिजिटल चलनात कोणालाही सल्ला देण्याचा किंवा गुंतवणूक करण्यास उद्दीपित करण्याचा नाही. प्रत्येकाने योग्य अभ्यास करून आपल्या सद्सद्विवेकबुद्धीने निर्णय घ्यावा ही विनंती.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हो, रिपल च्या कस्टमर्स ची लिस्ट: https://ripple.com/

रिपल बाकीच्या Crypto पेक्षा जास्त वेगाने देवाणघेवाण करू शकतो म्हणून बर्‍याच फर्म्स त्याना प्राधान्य देतात. फोर्ब्स चा लेख: https://www.forbes.com/sites/tomgroenfeldt/2017/11/01/leading-banks-in-u...

Max Speed of transactions/Second
BitCoin (BTC) 16 TPS
Ethereum (ETH) 15 TPS
LiteCoin (LTC) 28 TPS
Ripple (XRP) 1500 TPS

माझ्या मते Ripple and IOTA ही खरी पक्की coins आहेत ज्याना blockchain based transactions potential आहे

लिंकबद्दल धन्यवाद. Ripple चा ऍक्सिस बँकेसोबत तसेच इतर काही Japenese बॅंक्स जसे कि MUFG, MIZUHO यांची आयडिया होती. SEBI बद्दलच्या कराराची फारशी माहिती नाही. मला personally टॉप ५ करंसीचे भवितव्याबाबत आशा वाटते. Ripple त्यात आहेच.

लाइटकॉइन महाग झालाय हे खरे. पण काय वाढला आहे अचानक. लाइटकॉइन ची दौड निव्वळ अकल्पनीय !! मी कालच एक लेख लिहिला होता काही महत्वाच्या करन्सी रिटर्न्सबद्दल.... https://www.maayboli.com/node/64715
त्यात आज लगेच मोठा बदल करावा लागेल असे वाटले नव्हते. गेल्या २ दिवसात डॅश आणि लाइटकॉइन जवळपास दुप्पट झालेत.

अश्याच एका दुसऱ्या लेखात लिहिल्याप्रमाणे फ्युचर काँट्रॅक्टस ट्रेडिंग सुरु झाल्यावर बिटकॉइन वाढेल असे म्हणालो होतो आणि त्याला कारणही दिले होते. https://www.maayboli.com/node/64706
आता त्याच कारणामुळे वाढलाय कि नाही माहीत नाही परंतु बिटकॉइन देखील $१३५०० वरून २-३ दिवसातच $१७५००-१८००० पर्यंत पोहोचला आहे. आता पुढे काय होणे थोडे सांगणे अवघड आहे.

बिटकॉइन च्या स्पीड बद्दल म्हणाल तर काही दिवस थांबा. सध्या Lightening Network बद्दल टेस्टिंग सुरु आहे. आणि गेल्या काही दिवसातच एक चाचणी यशस्वी देखील झाली आहे. जर सर्व चाचण्या यशस्वी होऊन Lightening Network implement झाले तर बिटकॉइन चा स्पीड प्रचंड वाढणार आहे तेही अत्यंत कमी Transaction Fee मध्ये. तसे झालेच तर अगदी दुकानात कॉफी देखील विकत घेता येऊ शकेल बिटकॉइन चा वापर करून.

सॉरी फेला, आय रिअली कान्ट फाइन्ड सेबी अ‍ॅज कस्टमर ऑफ रिपल....
आर यु टॉकिंग अबाउट Securities and Exchange Board of India (SEBI) ऑर S|E|B..? प्लीज हेल्प.

मी फेला नाही, फेली आहे. Happy

सेबी नाही, SBI direct कस्टमर आहे. translation मधे चुक झाली, क्षमस्व.
https://ripple.com/insights/ten-new-customers-join-ripples-global-paymen...
मी फक्त ही लिंक वाचून सांगत होते, YEs आणि AXIS सुद्धा कस्टमर्स आहेत रिपल चे.

अर्र... फेली हात का काय...? आय माय स्वारी बरं का...! Happy

सेबी यांची कशीकाय कस्टमर होऊ शकते ही शंका आली म्हणून जरा जास्त खोलात विचारले..
चला या निमित्ताने तुम्ही रिपल या पेमेंट नेटवर्कबद्दल चांगली माहिती उपलब्ध करुन दिलीत. धन्यवाद.

बिटकॉइन प्रमाणेच आहे. सध्या मार्केट कॅप प्रमाणे टॉप ५ व टॉप ७ मध्ये आहे. मागच्या वर्षीही होती. फक्त बॅंक्स पेमेंट्स नेटवर्क साठी जसे कि NEFT, RTGS transactions साठी जास्त उपयुक्त आहे. त्यामुळे बँकिंग क्लाएंट्स जास्त आहे. खूप जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. बिटकॉइन फक्त २१ मिलियन आहे. ही मात्र त्यापेक्षा बरीच जास्त प्रमाणात आहे सो खरेदी साठी स्वस्त पण आहे.

फक्त बॅंक्स पेमेंट्स नेटवर्क साठी जसे कि NEFT, RTGS transactions साठी जास्त उपयुक्त आहे. त्यामुळे बँकिंग क्लाएंट्स जास्त आहे. खूप जास्त प्रमाणात उपलब्ध आहे.

>> दॅट्स एक्झॅक्टली आय लव्हड..

प्रदीपके... बोला काय म्हणताय...

भरतजी, बिटकॉइन च्या करेक्शन बद्दल म्हणाल तर बिटकॉइन म्हणजे मारुतीची शेपूट नाही जी वाढतच जाईल. बिटकॉइन मधले करेक्शन हे बिटकॉइनसाठीच खूप हेल्दी आहे. $५००० पासून सुरु झालेली गाडी $१९००० पर्यंत जाऊन पुन्हा $१४-१५००० पर्यंत येऊन स्थिरावत आहे आणि हे उत्तमच आहे. The correction was long due and it is happening is graceful way...

प्रदीपके IT रेड च म्हणाल तर त्यात बिटकॉइन च काही दोष नाही..दोष टॅक्स चुकवणाऱ्यांचा आहे...अश्या रेड तर politician च्या घरांवर देखील पडतात म्हणून उद्या निवडणुका घेणं आणि लोकप्रतिनिधी निवडून देणं बंद करणार का?

<<<<<<करेक्शन होत्ये तोपर्यंत जमेल तितकी खरेदी करून घ्या.>>> Happy
नानाजी -- उत्तर आले नाही म्हणजे यावेळी पण द्राक्षे आंबटच का? Lol (ह. घ्या )

What the hell?
कुटस्थ, you are crossing your limits Here.

वेमा, कुटस्थ इथे माझ्यावर गरज नसतांना अतिशय वाह्यात पर्सनल कमेंट्स करत आहे ह्याकडे लक्ष द्यावे.

व्यवहार जर अनधिकृत असेल तर त्यात कमावलेले पैसे अधिकृत कसे करतात याची माहिती द्यावी.
बिटकोईन मध्ये कमावलेल्या पैश्यावर टॅक्स भरला नाही म्हणून रेड पडली असे काहीचे म्हणणे आहे.. जर बिट चे व्यवहार भारतात अधिकृत नाही तर त्यात कमावलेल्या पैसावर आयटी कशी आणि कोण भरणार?
उद्या दाऊद पण चरस गांजाच्या अनधिकृत व्यापारात कामवलेल्या पैस्यांवर आयटी भरून उजळ माथ्याने फिरेल.

अनधिकृत व्यापाराला प्रोत्साहन देण्याचे काम काही लोक करत आहे

भारतात व्यवहार करायला परवानगी नाही. भारतात ते चलन अधिकृतपणे मान्य नाही म्हनजे ते अनधिकृत आहे.
जर रिझर्व्ह बँक नोटीस काढून यात गुंतवणूक करू नका आमची मान्यता नाही आहे तर त्या विरुद्ध जाणे गुन्हा असेलच.

Pages