एग्गलेस चॉकलेट कपकेक बनवा १० मिनीटात by Namrata's CookBook:३

Submitted by Namokar on 21 June, 2019 - 03:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ चमचे मैदा
२ चमचे पीठी सखर
१/२ चॉकलेट पावडर / कोको पावडर
१/४ चॉकलेट इसेन्स / व्हॅनिला इसेन्स
१/४ बेकिंग सोडा
१ चमचा पातळ तुप/बटर
दूध
टूटी फ्रूटी
चॉकलेट सिरप (आवडीप्रमाणे)

क्रमवार पाककृती: 

१. एक कप घ्या
२. त्यामध्ये ३ चमचे मैदा ,२ चमचे पीठी सखर, १/२ चॉकलेट पावडर , १/४ चॉकलेट इसेन्स,१/४ बेकिंग सोडा ,१ चमचा पातळ तुप/बटर घ्या आणि मिक्स करुन घ्या
३. आता थोडे थोडे दूध घालत मिश्रण एकत्र करुन घ्या (मिश्रण जास्त पातळ करायचे नाही)
४. आता हे साधारण २ते ३ मि. फेटून घ्या
५.आवडीप्रमाणे टूटी फ्रूटी घाला
६. ओव्हन मध्ये मायक्रोवेव + कन्वेक्शन मोड वर ५ मिनीट(240 degree) ठेऊन घ्यावे
कप केक तयार
image 2.jpg

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

* चॉकलेट सिरप आवडीप्रमाणे तयार कपकेक वर घालून खाऊ शकता
*मायक्रोवेव सेफ कप चा वापर करा

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही रेसीपी इंटरनेट वर फेमस आहे. केक बनलेला दिसत नाही. कपात च ठेवतात. रूढ अर्थाने हा कप केक नव्हे. कपात बनवलेला केक.
टुटी फ्रूटी का बरे चॉकोलेट वर? फ्लेवर मिक्स होतो की.

धन्यवाद कुसुमिता१२३४ , जाई. सस्मित
@अमा
चालेल आपण अस म्हणू- कपात बनवलेला केक. Wink
ही रेसीपी इंटरनेट वर फेमस आहे >> हो थोड्याफार वेगवेगळ्या पद्धतीने फेमस आहे Happy
* चॉकलेट सिरप आवडीप्रमाणे तयार कपकेक वर घालून खाऊ शकता
टुटी फ्रूटी सुध्दा छान लागते (नाही घातली तरी चालेल) Happy