Submitted by बेफ़िकीर on 16 June, 2019 - 10:43
मनात क्रोध साठतो, तटस्थ व्हायला हवे
अथांग शांततेकडे मला निघायला हवे
विकारयुक्त देह, एकमेव प्रश्न आपला
बनून धूलिकण हवेत विरघळायला हवे
अनिश्चितात बावरून नाव हेलकावते
दिसेल त्या दिशेस स्वत्व वल्हवायला हवे
जुन्यास लांघल्यावरी नवे शिखर सतावते
स्वतःच एकदा तरी शिखर बनायला हवे
हिशोब कोणता इथे अपूर्ण व्हायला नको
रडून जन्म घेतला, हसून जायला हवे
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Khas befikir touch
Khas befikir touch
मनात क्रोध साठतो, तटस्थ
मनात क्रोध साठतो, तटस्थ व्हायला हवे
अथांग शांततेकडे मला निघायला हवे
<<<<<+1111
खुपच छान
छानच.
छानच.
हिशोब कोणता इथे अपूर्ण
हिशोब कोणता इथे अपूर्ण व्हायला नको
रडून जन्म घेतला, हसून जायला हवे>>> मस्त!
सगळेच शेर भारी आहेत. गझल खूप
सगळेच शेर भारी आहेत. गझल खूप आवडली
सुंदर .. खूप सुंदर.
सुंदर .. खूप सुंदर.
फारच सुंदर गझल.
फारच सुंदर गझल.
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर
खुप सुंदर !!
खुप सुंदर !!
छान.
छान.
कलिंद नंदिनी वृत्त
अभी न जाओ छोडकर
सरस
सरस
वाहह वाहह, वाहह वाहह
वाहह वाहह, वाहह वाहह
हिशोब कोणता इथे अपूर्ण
हिशोब कोणता इथे अपूर्ण व्हायला नको
रडून जन्म घेतला, हसून जायला हवे>>> छान .
हिशोब कोणता इथे अपूर्ण
हिशोब कोणता इथे अपूर्ण व्हायला नको
रडून जन्म घेतला, हसून जायला हवे
________________________________
अहाहा भूषण सर काटा आला अंगावर!! बऱ्याच दिवसांनी तुमची गझल वाचायला मिळाली
जुन्यास लांघल्यावरी नवे शिखर
जुन्यास लांघल्यावरी नवे शिखर सतावते
>> असमाधान, अतृप्तता मानवी स्वभावच आहे. अपुर्णाकडून पुर्णत्वाकडे प्रवास सुरू राहतो. सर्व ओळी सुंदर आहेत. धन्यवाद.
सुरेख
सुरेख
विकारयुक्त देह, एकमेव प्रश्न
विकारयुक्त देह, एकमेव प्रश्न आपला
च्या ऐवजी
विकारयुक्त देह, एकमेव प्रश्न हा
अस कहिस हव होत
अहो शिल्पाजी आपण कुणाला
अहो शिल्पाजी आपण कुणाला सुचवितो ते लक्षात घ्या. बेफिकीर यांना?
सुन्दर. सगळे शेर मस्त.
सुन्दर. सगळे शेर मस्त.
बऱ्याच दिवसांनी तुमच लिखाण दिसल. छान वाटल.
हिशोब कोणता इथे अपूर्ण व्हायला नको
रडून जन्म घेतला, हसून जायला हवे ---- वाह
विकारयुक्त देह, एकमेव प्रश्न
विकारयुक्त देह, एकमेव प्रश्न आपला
च्या ऐवजी
विकारयुक्त देह, एकमेव प्रश्न हा
अस कहिस हव होत >>>> शिल्पाजी शंका विचारलीत तर नक्कि आहे तो शेर आहे असाच मीटर मधे का बसतो हे समजावून सान्गणारी लोक आहेत ईथे. गझल च्या रचने ची खूप माहिती आहे मायबोलि वर
हिशोब कोणता इथे अपूर्ण
हिशोब कोणता इथे अपूर्ण व्हायला नको
रडून जन्म घेतला, हसून जायला हवे
वाह
सुपर
सुपर
शेवटचे दोन फार आवडले
शेवटचे दोन फार आवडले
सुंदर!
सुंदर!
झकास!
झकास!