मनात क्रोध साठतो, तटस्थ व्हायला हवे

Submitted by बेफ़िकीर on 16 June, 2019 - 10:43

मनात क्रोध साठतो, तटस्थ व्हायला हवे
अथांग शांततेकडे मला निघायला हवे

विकारयुक्त देह, एकमेव प्रश्न आपला
बनून धूलिकण हवेत विरघळायला हवे

अनिश्चितात बावरून नाव हेलकावते
दिसेल त्या दिशेस स्वत्व वल्हवायला हवे

जुन्यास लांघल्यावरी नवे शिखर सतावते
स्वतःच एकदा तरी शिखर बनायला हवे

हिशोब कोणता इथे अपूर्ण व्हायला नको
रडून जन्म घेतला, हसून जायला हवे

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच.

छान.
कलिंद नंदिनी वृत्त

अभी न जाओ छोडकर

सरस

हिशोब कोणता इथे अपूर्ण व्हायला नको
रडून जन्म घेतला, हसून जायला हवे
________________________________

अहाहा भूषण सर काटा आला अंगावर!! बऱ्याच दिवसांनी तुमची गझल वाचायला मिळाली

जुन्यास लांघल्यावरी नवे शिखर सतावते
>> असमाधान, अतृप्तता मानवी स्वभावच आहे. अपुर्णाकडून पुर्णत्वाकडे प्रवास सुरू राहतो. सर्व ओळी सुंदर आहेत. धन्यवाद.

सुन्दर. सगळे शेर मस्त.
बऱ्याच दिवसांनी तुमच लिखाण दिसल. छान वाटल.

हिशोब कोणता इथे अपूर्ण व्हायला नको
रडून जन्म घेतला, हसून जायला हवे ---- वाह

विकारयुक्त देह, एकमेव प्रश्न आपला
च्या ऐवजी
विकारयुक्त देह, एकमेव प्रश्न हा
अस कहिस हव होत >>>> शिल्पाजी शंका विचारलीत तर नक्कि आहे तो शेर आहे असाच मीटर मधे का बसतो हे समजावून सान्गणारी लोक आहेत ईथे. गझल च्या रचने ची खूप माहिती आहे मायबोलि वर

सुपर

झकास!