झाडं लावणे

Submitted by vichar on 11 June, 2019 - 14:19

प्रश्न:
कृपया मार्गदर्शन करावे की कोणती झाडे / वृक्ष आहेत जी भरभर वाढतात आणि ज्यांना फार देखभालीची
नंतर गरज पडत नाही?

सर्वसाधारणपणे सहज उपलब्ध होणाऱ्या आणि भरपूर प्रमाणात प्रसार करता येऊ शकणाऱ्या बिया जर suggest केले तर अति उत्तम.

पावसाळ्यात थोडीफार तरी जमीन सुजलाम-सुफलाम करण्याचा संकल्प आहे.

तुम्हीही स्वतः प्रयत्न करून शुभ कार्यात सामील व्हा.

हे कुणा दुसऱ्यासाठी नव्हे आणि social media वर सेल्फी साठी तर अजिबात नव्हे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

vichar हा प्रश्न हर्पेन यांच्या मियावाकी या धाग्यावर विचारलात तर एकाच ठिकाणी माहिती जमा होईल.

तुम्ही कुठे झाडे लावणार आहात हे समजले तर नावे सुचवता येतील. जेथे झाडे लावायची आहेत त्याच परिसरातील झाडांपासुन मिळणारी रोपे लावली तर ती जास्त जोमाने व कमी देखभालीत वाढतात.

तुमच्या प्रयत्नांना शुभेच्छा!!!

धन्यवाद शाली.
मला पुण्यातील अनेक जागांवर झाडे लावण्याचा मानस आहे.
जांभूळ आणि आंब्याची सहज उपलब्ध बिया / कोया प्रयत्न करीन.