Submitted by दत्तात्रय साळुंके on 14 June, 2019 - 07:43
रानभूल
थाप डफावर देत
वीज आभाळी कडाडे
इंद्राच्या हो दरबारी
रंभा अत्तर शिंपडे
गंध अत्तराचा ओला
माती वेडीपिशी झाली
फेर धरुनी रानात
मोर पावले नाचली
रानोवनी पानथळ
त्याची रुपेरी नशा
पेरते व्हा पेरते व्हा
बोले फांदीत पावशा
नंदी ओढीतो पाभार
दोर सदाशिवा हाती
रासणं धरी पार्वती
झाली पावन धरती
बीज पेरता तिफन
ओली माती हुंकारली
स्पर्श पिवळा उन्हाचा
रानाला या रानभुली
© दत्तात्रय साळुंके
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अतिसुंदर!
अतिसुंदर!
वाह वा!
वाह वा!
एकदम मस्त!
अगदी वाफसा असलेल्या रानात घेऊन गेली कविता.
मस्त रानभूल...
मस्त रानभूल...
चित्रदर्शी!
चित्रदर्शी!
@ शाली, मन्याS, शशांकजी,
@ शाली, मन्याS, शशांकजी, अनन्तजी
खूप आभार...
मस्तच! शेवटचं कडवं जास्त
मस्तच! शेवटचं कडवं जास्त आवडलं
छानच आहे कविता.
छानच आहे कविता.
नंदी ओढीतो पाभार, दोर सदाशिवा
नंदी ओढीतो पाभार, दोर सदाशिवा हाती....
फारच मस्त, अप्रतिम, अगदी दृश्य उभं केलय तुम्ही साळुंखे सर.
वाह दत्तात्रयजी एकदम मस्त
वाह दत्तात्रयजी एकदम मस्त वर्णन केले आहे.....
anjali_kool, सिध्दि,जोतिराम,
anjali_kool, सिध्दि,जोतिराम, राजेंद्र देवी
खूप आभार, कविता वाचलीत, आवडल्याचे कळविलेत.
आवडली रानभूल
आवडली रानभूल
छान जमलीये
छान जमलीये
रानभूल मस्तच...
रानभूल मस्तच...
@आनंद तुमचा अधलामधला आनंददायी
@आनंद तुमचा अधलामधला आनंददायी प्रतिसाद सुखावतो. धन्यवाद...
@ आसा- तुमचा प्रतिसाद चोखंदळ असतो पण अप्रूप असतो. धन्यवाद...
@ निरु तुमचा प्रतिसाद लिहायला हुरुप आणेल. धन्यवाद.
जिवंत वर्णन करणारं दृश्य.
जिवंत वर्णन करणारं दृश्य. आवडलं!
दमदार कविता
दमदार कविता
अज्ञातवासी, डॉ. विक्रांत
अज्ञातवासी, डॉ. विक्रांत
धन्यवाद...