हा खेळ बाहुल्यांचा! - भाग २

Submitted by अज्ञातवासी on 6 June, 2019 - 09:59

IMG_20190606_211522.jpg
हा खेळ बाहुल्यांचा! - भाग १

https://www.maayboli.com/node/70130

खालून मला आवाज ऐकू येऊ लागला...
मी प्रचंड घाबरलो होतो. त्या आवाजाबरोबर माझ्या छातीतील धडधड वाढत होती...
मात्र त्या आवाजाची तीव्रता, वाढतच होती.
ते काय होतं, त्याची मला जाणीव नव्हती. मला तडक उठून पळत जावं वाटत होतं.
पण खाली उतरतानाच त्या अनामिकाने मला काही अपाय केला असता तर?
मी मनातल्या मनात हनुमान चालीसा पुटपुटत होतो.
हळूहळू तो आवाज कमी होत गेला, की मला झोप लागली, हे मलाच कळलं नाही.
सकाळी प्रचंड उशिरा मला जाग आली.
रात्रीचा प्रसंग आठवून माझ्या अंगाला काटा आला. अशा प्रसंगात मला झोपच कशी लागली?
प्रचंड थकवा आणि मानसिक तणाव याचा परिपाक असावा बहुतेक...
मी तसाच उठलो, पटकन आवरलं, आणि ब्रँचवर निघालो...
ब्रँचवर तसंही काही इतकं काम नव्हतं. बाहेरून डबा आला होताच. दुपारी जेवण झाल्यावर मी रामरावाला केबीनमध्ये बोलावून रात्री घडलेला किस्सा सांगितला.
रामराव आधी थोडा घुटमळला, पण नंतर तो बोलू लागला.
"साहेब, तसं बघायला गेलं तर, भूताखेताची कधी वानगी ऐकू नाही आली वाड्याविषयी, पण..."
पण काय रामराव?
"पण साहेब त्या वाड्यावर कधी कोणी काही थांबलं नाही. तो कातळ्या डोंगर कसा आ जबड्या वासून बघतोय असं वाटतं. वाडा गावापासून दूर, एवढा भला मोठा आणि एकदम अभद्र वातावरण. भीतीनेच जीव जाईल माणसाचा! बँकेला काय माहिती बुद्धी सुचली तुम्हाला तिथे ठेवायची. "
"रामराव पण कालच्या प्रसंगाचं काय?"
"साहेब भूतखेत जाऊदेत, पण मला वाटत एखादं चुकार जनावर तिथं असावं. वटवाघुळ म्हणा, मांजर म्हणा, मोठी घूस म्हणा...काहीतरी इकडे तिकडे धडका देत असेल. मी एक काम करतो, आपल्या गावातला नामदेव सुतार आल्याबरोबर घेतो. बघू तरी कुठे काय दिसते ते?"
त्याचं बोलणे ऐकून मला बराच धीर आला तसंही माझा भूत खेतांवर तितकासा विश्वास नव्हता.
संध्याकाळी कामे आवरून मी, रामराव आणि नामदेव सुतार बरोबर निघालो.
वाड्याचा दरवाजा उघडताच नामदेव सुतार म्हणाला.
"साहेब दरवाजाचं लाकूड फार जुनं दिसतंय. दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीचा तरी पाहिजे."
आम्ही सगळे मध्ये गेलो. रामरावाने आधीच लाईट लावली होती.
अचानक प्रचंड अंधारुन आले...
...आणि बाहेर जोराचा मुसळधार पाऊस चालू झाला
"पावसामुळे कायम तळे साचलेलं म्हणूनच नाव तळेगाव," नामदेव हसत म्हणाला
मला मात्र पुन्हा त्या अभद्राची जाणीव सुरू झाली.
धडधडधडधडधड.........
पुन्हा तोच आवाज सुरू झाला.
आमचं तिघांची पाचावर धारण बसली
त्याक्षणी सोसाट्याच्या वाऱ्याने दरवाजाही बंद झाला, आणि त्या खोलीतला बल्ब खळकन फुटला.
"साहेब हे काहीतरी वेगळंच आहे," रामराव घाबरत म्हणाला.
नामदेव सुताराने हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली.
धडधडधडधडधड.........
जमिनीखालून प्रचंड आवाज येऊ लागला,
ते अभद्र जमीन फाडून वर येऊ बघत होतं.
मी घाबरून मागे सरकलो...
धडधडधडधडधड.........
आता आवाज माझ्या पायाखाली येत होता...
...आणि पुढच्या क्षणी माझ्या पायाखालची जमीन सरकली...
काहीतरी लिबलिबीत माझ्या पायाखाली जाणवलं...
प्रचंड भितीमिश्रीत, किळस, घृणा या सगळ्या भावना माझ्या मनात दाटून आल्या...
...त्या लिबलिबीतात माझा पाय रुतत चालला होता!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

scared-smiley.gif

धारप आठवले.
भय/गुढ कथा असेल तर भाग नक्कीच मोठे असायला हवे. अगोदरचा आणि हा एक केला असता तरी चालले असते.

Mstch

छान झालाय हा भाग देखिल.
पण जरा मोठे भाग टाकलेत तर चांगला परिणाम साधता जाईल--+१११
पु.भा.प्र. Happy

याआधी ही अश्या प्रकारचा प्लॉट वाचलाय...
बँकेचा अधिकारी / एम्प्लॉयी , त्याला असा वाडा देतात रहायला, त्यात त्याला मदतीला दिलेला एक माणूस जुडेकर... आणि त्या लहान मुलीचं भूत.....
म्हणजे हे दोन भाग वाचून ती कथा आणि ही कथा बरीच सिमीलर वाटू लागलीय...
आय होप पुढे काही वेगळं घडेल...

छान लिहिलाय हा भागपण.. आणि महत्वाचं म्हणजे भयाच वातावरण कायम ठेवल, ते जास्त महत्वाचं असत.
यात घटना लवकर लवकर घडत आहेत उगाच timepass नाही केलाय म्हणून इम्पॅक्ट जास्त पडलाय.

लिबलिबीत आलं म्हणजे धारपांच्या वळणावर जाणार कथा. Lol
मी मागच्या भागावरच्या प्रतिसादातच लिहिलम्य की मिरींडा यांच्या कथेसारखा प्लॉट आहे.
पण अगदी शब्द न शब्द सेम नाही. ही कथा वेगळी आहे.

Jyana negative comments kraycha ahet tyana kuni aagrah kelela nahi ahe ki Katha vachach asa .... Kiti vait savay zaliy Yana.... Ata kharach yancha ilaj karayla lagel... Nahitr sampurn mayboli vr he virus sarkhe pasrtil... Ani lagan kartil.... Kiti Navin Navin nav tri shashiram ky vikshya ky shaktiram ky.. his highness .. sheeee laj kshi vatat nahi,...

अज्ञातवासी, शीर्षकात बाहुल्यांचा असं हवंय.
आणि एक पट्लं तर बघा. कथेवर चांगले वाईट, उकसवणारे, राग आणणारे, आनंद देणारे असे सगळ्या प्रकारचे प्रतिसाद येणारच. हे तुम्हाला पटत असेल तर तुमच्या फॅन्स ना आवरा. यातुन काही साध्य होत नाही.

अज्ञातवासी, शीर्षकात बाहुल्यांचा असं हवंय.
आणि एक पट्लं तर बघा. कथेवर चांगले वाईट, उकसवणारे, राग आणणारे, आनंद देणारे असे सगळ्या प्रकारचे प्रतिसाद येणारच. हे तुम्हाला पटत असेल तर तुमच्या फॅन्स ना आवरा. यातुन काही साध्य होत नाही. Sasmit ..... Tumhi nko tikde brach lecture deta ... Kadhi tri tyana pn dya na ... Aavrayla aamhi Kon vatato tumhala... Je vatat te khr bolle... Yat tumhi suggestions denyasarkh kahi nahi... Abhivyakti swatantry navachi cheej pratekala aste... Tumcha fans na sanga or samjva as lihayla have tumhi... Tumchi bhasha badal kelat tr khup yogya vatel tumcha pratisad...

सस्मित माझ्या चाहत्यांच म्हणाल, तर त्यांनी आयडीची नावे घेऊन सांगितलय, प्रॉब्लेम निगेटिव्ह कमेंटचा नाही. मी आजपर्यंत निगेटिव्ह कमेंटचा आदरच केलाय.
सस्मित तुम्हाला हे दिसलं, पण काही धाग्यांवर मी प्रतिसाद दिल्यावरही लगेच ट्रॉलिंग सुरू होते, तेही बघा. एका स्त्री आयडी वर किल्लीच्या कोणत्या लेखकांना भेटायचंय, या धाग्यावर झालेली चिखलफेक बघा. माझ्या प्रत्येक कथेवर विनाकारण निगेटीव्ह कमेंट देणारे बघा.
मी शांतच आहे, ना मी उत्तर देतोय. कारण मला फक्त मायबोलीचा चांगला भाग बघायचाय, वाईट नाही. मला ट्रोल करून कुणाला आनंद होत असेल तर घेऊ दे आनंद!
पण नेहमी मला सांगण्यापेक्षा फक्त दुसरी बाजू बघितली पाहिजे यासाठी प्रतिसाद देतोय!

ही कथा नाही आवडली,या प्लॉट च्या बऱ्याच कथा माबो वरच वाचल्या आहेत म्हणून असेल कदाचित.
तुमच्या कथा बऱ्याचदा आवडतात,प्रतिसाद याआधी दिलेत की नाही आठवत नाहीत,
अजून एक तुमच्या कथांवरील प्रतिसादाना तुम्ही उत्तर दिले तर बरे होईल,अर्थात हे मा वै म

सॉरी, थोडे दिवस कामानिमित्त बाहेर होते.
नाइस लिहिलंय, आवडलं मला. थोडा मोठा व्हायला पाहिजे होता, पण पुढचा नक्की मोठा टाकं.
लिहीत राहा, आणि छान हॅन्डल करतोय सगळं, फक्त एक सांगते, मायबोलीवर चांगल्यापेक्षा वाईटाचे साथीदार बरेच असतात. तू फक्त लिहीत रहा. तुझ्याइतकं प्रेम आणि चाहते त्यांना मिळत नसतील, म्हणून नवनवीन आय डी काढून तुला त्रास देत असतील. पण हीच शक्यतोवर तुझी महानतेकडे जाणारी खूण असेल Lol
-महाश्वेता

कथेवर चांगले वाईट, उकसवणारे, राग आणणारे, आनंद देणारे असे सगळ्या प्रकारचे प्रतिसाद येणारच. हे तुम्हाला पटत असेल तर तुमच्या फॅन्स ना आवरा.
>> अहो हे लेखक कसे करणार Lol ते फक्त स्वतःचे कंमेंट्स कंट्रोल करू शकतील, बाकीच्यांना कसे थांबवणार.

तुझ्याइतकं प्रेम आणि चाहते त्यांना मिळत नसतील, म्हणून नवनवीन आय डी काढून तुला त्रास देत असतील.
>> असे काही नसते हो, आता तुम्ही लेखकाला मित्र समजत असाल समजा, तर समजा एखादी कथा नाही आवडली तर तुम्ही तिथे फीडबॅक दिला पाहिजेच. लेखकाला राग येईल असे वाटून त्याची साईड घेणे बरोबर नाही ना.
चांगला लिहितात अज्ञातवासी, आणि कॉमेंट्स मुळे आणखी छान लिहितील ना.

अज्ञातवासी, तुमचं लिखाण आवडतं. पूर्वी अनेक वेळा तसं लिहिलंही होतं. पण तुम्ही फार क्रमशः कथा लिहिता आणि फार फार दिवस लटकवत ठेवता,म्हणून ही कथा अजून वाचायला सुरुवात केली नाही. 'अंतिम' चा बोर्ड दिसल्याशिवाय सुरूही करणार नाही. कथा विषय कळण्यासाठी प्रतिसाद मात्र वाचले. सस्मितशी सहमत. तुमच्या 4-5 फॅन्समुळे हल्ली तुमच्या लिखाणावर चांगला वाईट प्रतिसाद देणं टाळते. असे अनेकजण असू शकतात.

त्या दोन तीन आयडी नी कंपू बनवून ठेवलाय, कोणी काही बोलले की भांडणे सुरू करतात।

तुमची कथा चोरलेली वाटतेय असा प्रतिसाद देणार होतो कारण तुमच्या म्हणण्याप्रमाणे वाटतेय आणि आहे मध्ये फरक असतो असे तुम्ही मला माझ्या धाग्यावर म्हणाला होतात। लेखक म्हणून तुमचा आदर आहे, तुम्ही लिहितादेखील चांगले, उगाच वाद कशाला वाढवायचा म्हणून फार लिहीत नाहीय पण लेखक हा नुट्रल असला पाहिजे।

लेखक ??
Its difficult to say writer or author but one may define it as good narrator.