बागकाम अमेरिका २०१९

Submitted by मेधा on 1 April, 2019 - 12:56

कागदोपत्री इथला स्प्रिंग सुरु झाला म्हणे. गार्डन सेंटर्स मधे बियांची पाकिटे, अंगणातल्या गवतासाठी वीड & फीड ची पोती , माती, कॉम्पोस्ट , सीड स्टार्टिंग मिक्स यांच्या बॅगा दिसायला लागल्या. फोर्सिथिया, मॅग्नोलिया, चेरी ब्लॉसम यांच्या फांद्या टपोर्‍या कळ्यांनी डवरल्या आहेत. क्रोकस , हायासिंथ, डॅफोडिल्स बहरले आहेत. बर्फाच्छादित रस्ते आणि अंगण काही काळा करता विसरायला हरकत नाही ( बहुतेक) .

इथल्या मंडळींचे बागकामाचे काय बेत यावर्षी ? विंटर सोइंग केलं का कोणी ? अर्ली स्प्रिंग व्हरायटीज काय काय लावणार ?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेघा , अगं मी विसरलेच. अळु कशाला लावतेस? अळुपेक्षा काकड्या का नाही लावत. काहीही न करता समरभर भरपूर काकड्या मिळतील तुला. तेच कर तु. Happy
अ‍ॅडमिन ही पोस्ट नंतर उडवा.ल का ? मागील वर्षी जशी उडवलेली अजयच्या बाफवरची तशीच. गारबेज नको उगाच बागकाम बाफवर. काही लोक चिकट फार असतात. सुटता सुटत नाहीत.
अमित ,एवढा खवचटं पणा पुरे का ? Wink

काकड्या लावल्या आहेत. सीड्स ऑफ इंडिया वरुन मागवलेल्या आणि बर्पीच्या अशा दोन प्रकारच्या लावल्या आहेत.
मायाळु, चुका, चाकवत, करडई, चार्ड, अरुगुला लावले आहेत. पालक आणि क्रेस लावणार आहे १-२ दिवसात. अंबाडीच्या पण बिया पेरल्या आहेत.

अवांतर :
मेघा , अगं मी विसरलेच. अळु कशाला लावतेस? अळुपेक्षा काकड्या का नाही लावत. काहीही न करता समरभर भरपूर काकड्या मिळतील तुला. तेच कर तु>> . : रुसकी बाहुली: मेधा लिही १० वेळा Happy

महिन्याभरापूर्वी फ्रेंच ब्रेकफास्ट रॅडिश जातीच्या बारक्या लाल मुळ्याच्या बिया पेरल्या होत्या. त्याची मस्त ६ -८ इंच उंचीची रोपं झाली आहेत. आणि मुळे साधारण अंगठ्याएवढे जाड झाले आहेत. काल अजून दोन ओळींमधे बिया पेरल्या आहेत. बर्‍याच पुस्तकांमधे ८-१० दिवसाच्या गॅपने बिया पेरा असं लिहिलेलं असतं. ते बरोबर आहे. फॉलमधे आणि पुढच्या स्प्रिंग मधे असे १० दिवसाच्या अंतराने २ रो मधे लावणार मुळे.

वीकेंडला कोवळ्यापाल्याची पीठ पेरुन भाजी आणि मुळ्याचा चटका !

ग्रोसरी मधला अर्वी >>> त्याचा जो अळु असतो ते अळुभाजीचा असतो (Taro म्हणुन मिळतो तोच ना?). त्याची पाने न वापरता फक्त देठच वापरुन भाजी करतात. त्याला खाजरा अळु म्हणतो आम्ही. अळुवडीच्या अळुची पाने वेगळी असतात.
मला पण अळुवडीसाठी अळु लावायचा होता. पण खाजरा अळुचा कंद आहे बघुन मी नाद सोडला.

भाज्या व फळे लावल्यास उंदीर मामांना कसे दुर ठेवावे? नुकतेच एक पिल्लु गराज मध्ये आले होते.

गराज मध्ये आला असेल तर अल्ट्रा व्हॉयलेट का इन्फ्रा रेड (अशी स्पेक्ट्रमच्या कुठेल्या तरी एका साईडची फ्रिक्वेंसी आहे.) जी आपल्याला ऐकू येत नाही आणि उंदरांना अनॉय करते (पण ऐकायची आहे म्हणजे अल्ट्रा सॉनिक असावी) त्याचं प्लग पॉईंटला लावायचं बारकं डिव्हाईस मिळतं. मित्राकडे बघितलेलं. फायदा होतो असं ऐकलेलं (रादर ऐकू आलं न्हवतं) Wink
स्वस्त आणि सोपा उपाय वाटलेला. नाहीतर चिकट पट्ट्या लावायच्या पण ते उचलणं किळसवाणं वाटतं.

धन्यवाद अमितव . त्या आवाजाची सवय झाली की काही फरक पडत नाही असे गुगल वर वाचले. मुळात तो आतमध्ये आला कि सहजपणे निघुन जात नाही.

ते वरती अमित ने लिहिलय त्या उपकरणाचे अगदी उलट सुलट अनुभव आहेत. आम्ही सशासाठी आणलेलं. ससा अक्षरशः त्याच्या शेजारी बसुन झाड खात होता. काही उपयोग झाला नाही. दोन लेन सोडून पुढे एकांनी सिमिलर उपकरण लावलेलं. ससा फिरकत नव्हता असा रिपोर्ट त्यांनी दिला.

भाज्यांभोवती (रेझ्ड बेड भोवती )बारीक जाळी लावण हाच उपाय बेस्ट. लोज मध्ये ग्रीन कलरच्या जाळीचा (मेटलाचा)रोल मिळतो. फ्लेक्झीबल असल्यामुळ लावायला सोपा आहे.

काही फोटो: (टेबल फॉर्म मध्ये टाकता येत नाही, त्यामुळे एकाखाली एक दिसत आहेत, त्याबद्दल क्षमस्व)

१ बॉटलब्रश
२ पालक
३ वाफा, यात पालक, मिरच्या, वांगी, कांदे, सॅलड आहे. दुसर्‍या वाफ्यात टोमॅटो, काकडी आणि चिक्कार अळू आहे.
४ सॅलड
५ अंजीर
६ पेअर
७ पेअरची फळे अजून छोटी आहेत

९ टोमॅटो अजून कच्चा आहे
१० अनंत
११
१२ कर्दळ
१३ दुसरा टोमॅटो पिकला आहे
१४ पीच
१५ मेअर लिंबे

टीपः फळ झाडांच्या आसपास नेहमी फुलझाडे लावा, म्हणजे परागीकरण होण्यास मदत होते. सध्या बागेत खूप मधमाश्या येत आहेत विशेषतः बॉटलब्रशवर.

कर्दळ म्हणजे Canna indica.
माझ्याकडे आहे ती Canna tropicana gold असा अंदाज आहे, नक्की माहीत नाही.

ओके थॅन्क्स.
रच्याकने, बाग मस्तच आहे तुमची पैचान कौन.

मस्त आहे बाग पैचान कौन. यू एस डी ए झोन कोणता आहे ? लिंबं आणि अंजीर असे अंगणात लावता येतात हे एकदम भारी.
माझ्या इथे ( झोन ६) अंजीर टिकवायला फार खटपट आहे.

धन्यवाद सीमा
मस्त झाडे फुलली आहेत. पालेभाज्या किती छान दिसत आहेत. माझ्या पालकाला लगेच फुले यायला लागली जरा हवामान गरम झाले तर.

बागेचे कौतुक केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.
मेधा, झोन 9A आहे. (पारिजातक लावता येणार नाही, याचे दु:ख आहे पण. चूक करून, केवळ अट्टाहास म्हणून गेल्या वर्षी लावलेला जॅपनीज मेपल पण मेला यंदा. ते झाड झोन ६ साठी मस्त आहे.)
शक्तीराम, रेज्ड बेड करणे अगदी सोपे आहे. मी गेल्या वर्षीच १ केला. त्याचे फोटो या धाग्यावर आहे. सर्वात आधी 4"x6' ची फळकुटे आणून फ्रेम बनवायची. मग फ्रेमपेक्षा साधारण ६" बाहेरून इतपत गवत पूर्ण काढून टाकायचे आणि त्याच्यावर Landscape Fabric टाकायचे, नाहीतर गवत रेज्ड बेडमध्ये वाढत येते. मग ती रेज्ड बेड फ्रेम जमिनीत २-३ इंच खोल पुरायची. मी फ्रेम बनवतानाच 2"x2" ठोकळे वापरले होते आणि तेच जमिनीत पुरले. मग बेड फ्रेम मध्ये कंपोस्ट, cow manure (विकत मिळते), garden soil टाकून रेज्ड बेड करायचा. मातीने डोंगरासारखा उंचवटा करून तिथे बिया लावायच्या आणि उत्साहाने भसाभस पाणी घालायचे नाही. डोंगर केल्याने अधिक पाणी वाहून जाते आणि मुळांशी थारोळ्यात जमून राहात नाही. अगदी दाटीवाटीने झाडे लावायची नाहीत. भाजीच्या बिया ८-१० इंच अंतरावर आणि फळझाडे ६-८ फुटावर लावायची.
यंदा विशेष काही करायचा उत्साह नाहीये. जमले तर ड्रिप इरिगेशन करीन, पण यंदा शक्यता कमीच आहे.
अंजीर लावायचे असेल तर Black mission fig लावा. फळे खूप गोड असतात. माझ्याकडे पण तेच आहे.

धन्यवाद पैचान ताई/भाई. सविस्तर सांगितल्याबद्दल आभारी आहे. तिकडे खूप सुंदर बागेचे फोटो पाहून आनंद वाटला. तुमच्या बांधकामाला शुभेच्छा!!

केवळ अट्टाहास म्हणून गेल्या वर्षी लावलेला जॅपनीज मेपल पण मेला यंदा. ते झाड झोन ६ साठी मस्त आहे. >> जॅपनीज मेपल चे full Sun tolerate करतील असे कल्टिवार्स मिळतात हल्ली. तीन वर्ष डॅल्लसचा समर सहन करून वाढतोय मस्त. नेटवर शोधा तुमच्या इथे कुठल्या नर्सरीमधे मिळेल हे.

या वर्षी एक फोर्थ ऑफ जुलाय व्हरायटीची तीन टॉमेटो रोपं लावली आहेत. पहिल्यांदाच ही व्हरायटी लावली . रोप लावल्यापासून ५०-५५ दिवसात टॉमेटो पिकतील असं लिहिलं होतं. काल त्यातल्या दोन रोपांवर साधारण की लाइम एवढ्या आकाराचे हिरवे टॉमेटो दिसत आहेत. बाकी चेरी आणि सान मार्झानो टॉमेटोच्या रोपावर फुलं आहेत भरपूर पण अजून फळं नोटिसेबल नाहीत.

करडई आणि चुका एका वेळेची भाजी होईल एवढे उगवलेत. चुका बहुतेक पूर्ण रोप काढावं लागेल. करडईची पाने फक्त खुडून परत आणखीन पाने फुटतील का ?

यंदा पहिल्यांदीच कोथिंबीर आणि शेपू (दिल) च्या बीया लावल्या होत्या. त्यात काहीही उगवलं नाही आता त्या जागेत काहीतरी लावायचं आहे. काय लावू? बी आणि रोप दोन्ही पर्याय सुचवा. नेहमीच्या गोष्टी जसं टमाटे, झुकिनी, वाटाणे, बीन्स लावले आणि वाढताहेत. झोन ८ब/९अ.

८ ब /९ अ मध्ये कोथिंबीर /शेपु येणार नाही आता. तापमान ८५ वर गेल कि नाही उगवून येत कोथिंबीर/पालक इत्यादी. परत फॉल मध्ये लावा. वाटाणे पण येण अवघड आहे.
हिरव्या मिरच्या , दोडका, वाल, दुधी , अंबाडी आता लावल तरी हमखास उगवून येईल आणि साधारण ऑक्टोंबर पर्यंत भाज्या मिळतील.
वांगी , ढबु मिरची सुद्धा लावता येईल.

वाटाणे येतात इथे. झोनमध्ये गोंधळ झाला माझा. वरचा काहीतरी हार्डिनेसचा झोन पण कुठल्या सनसेट रेटिंगवरून झोन ६ म्हणताहेत.
धन्यवाद सीमा Happy

Pages