बागकाम अमेरिका २०१९

Submitted by मेधा on 1 April, 2019 - 12:56

कागदोपत्री इथला स्प्रिंग सुरु झाला म्हणे. गार्डन सेंटर्स मधे बियांची पाकिटे, अंगणातल्या गवतासाठी वीड & फीड ची पोती , माती, कॉम्पोस्ट , सीड स्टार्टिंग मिक्स यांच्या बॅगा दिसायला लागल्या. फोर्सिथिया, मॅग्नोलिया, चेरी ब्लॉसम यांच्या फांद्या टपोर्‍या कळ्यांनी डवरल्या आहेत. क्रोकस , हायासिंथ, डॅफोडिल्स बहरले आहेत. बर्फाच्छादित रस्ते आणि अंगण काही काळा करता विसरायला हरकत नाही ( बहुतेक) .

इथल्या मंडळींचे बागकामाचे काय बेत यावर्षी ? विंटर सोइंग केलं का कोणी ? अर्ली स्प्रिंग व्हरायटीज काय काय लावणार ?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेका
ही ऑफिशियल साइट https://planthardiness.ars.usda.gov/PHZMWeb/ हार्डीनेस झोन साठी

८ /९ असेल झोन तर बरेच ऑप्शन आहेत. दुपारचं टळटळीत उन नसेल अशा जागी बेसिल, रोझमेरी लावू शकता. टॉमेटो, मिरच्या, वांगी, दुधी, तोंडली ( सीड्स ऑफ इंडिया वर याची रोपं मिळावीत) , दोडके लावता येतील. तुमच्या काउंटीच्या एक्स्टेंशन ऑफिस कडून पण माहिती मिळेल - बहुतेक सर्व काउंटी ऑफिसेसच्या वेबसाइट आहेत , सोशल मिडिया प्रेझेंस आहे आणि फोन लाइन्स पण आहेत.
जी कुठली युनिव्हर्सिटी या एक्स्टेंशन शी संलग्न असेल त्यांच्या वेब्साइटवर पण माहिती मिळेल.
उदाहरणार्थ https://planthardiness.ars.usda.gov/PHZMWeb/ ही मेरीलँडची साइट .

धणे आणि बाळंतशोपा लावताना एखाद्या जाड टावेलमधे जरासे भरडून मग लावावेत .

अच्छा. धन्यवाद.
मी इथे विचारले कारण मला वाटतं जून मध्य म्हणजे पेरणीला अमळ उशीरच झाला. सीड्स आॅफ इंडियाच्या दुधीच्या बियांनी रोपं काढलीच नाहीत. असो. आता बहुतेक निदान एक काकडी आणि त्या दिवशी दुकानात काय बरं मिळेल ते लागवड करावी लागेल असं दिसतंय.
मागे माझ्याकडे पाॅटमध्ये पण कोथिंबीर आली आहे फक्त फार वाढली नाही सो थोडी चिडचिड.

फोर्थ ऑफ जुलै जातीचे टॉमेटो लावले होते यंदा. लावताना खरोखर इतक्या लवकर फळे येतील का अशी शंका होतीच. पण तिन्ही रोपांवर गेले आठ दहा दिवस टॉमेटोचे गुच्छ वाढताना दिसत आहेत. काल दोन चार टॉमेटोंवर लाल रंगाची सुरुवात दिसतेय. त्यांच्याशी स्पर्धा म्हणून की काय सान मार्झानो आणि चेरी टॉमेटो वर पण बरीच फळं धरली आहेत.
अरुगुला आणि रोमेन लेट्यूस एकदम जॅक अ‍ॅण्ड द बीन स्टॉक मधल्या बीन स्टॉक सारखे उंचच उंच व्हायला लागलेत. त्यांच्या जागी आता दुसरं काही लावायला हवे

Pages