जिमीकंद (सुरण) अद्रकी

Submitted by मनिम्याऊ on 28 May, 2019 - 04:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सुरण 250 ग्रॅम (साल काढून, लहान चौकोनी फोडी करून)

वाटणासाठी -
आले - दीड इंच
टोमॅटो -2
कोथिंबीर
हिरव्या मिरच्या 2

लाल तिखट -1 लहान चमचा
मीठ -1 लहान चमचा
जीरे -1 लहान चमचा
गरम मसाला -1 लहान चमचा
हळद -1 लहान चमचा
धणेपूड -1 लहान चमचा
चिंच - सुपारीएव्हढी
तेल

क्रमवार पाककृती: 

1. एका भांड्यात पाणी घालून त्यात सुरणाचे तुकडे, चिंच, थोडे मीठ आणि हळद घालून कुकरमध्ये ठेवा. 2-3 शिट्ट्या करून घ्या. सुरण मऊ झाले पाहिजे पण गच्चगोळा होता कामा नये.
2. कुकर होत असतानाच एकीकडे टोमॅटो, आले, मिरच्या, आणि कोथिंबीर मिक्सरमधून बारीक पेस्ट वाटून घ्या. गरज पडल्यास थोडे पाणी घाला. (या वाटणाला आल्याचा स्ट्राँग फ्लेवर आला पाहिजे)
3. कुकरचे प्रेशर उतरले की सुरण निथळून कोरडे करून घ्या.
4. एका कढईत थोड़े तेल गरम करुन सुरण क्युब्स सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस परतून घ्या व बाजूला काढून ठेवा.
5. त्याच तेलात जीरे घालून ते तड़तड़ल्यावर आल्या- टोमॅटोचे वाटण घालून चांगले परतून घ्या.
6. मिश्रण तेल सोडू लागले की त्यात हळद, लाल तिखट आणि धणेपूड घाला. चवीनुसार मीठ घाला. एक वाटी गरम पाणी घालून उकळी येऊ द्या आणि आता त्यात सुरणाचे परतलेले तुकडे घालून झाकण ठेवा. 4-5 मिनिटे वाफ येऊ द्या.
7. झाकण काढून अंदाज घ्या व त्यात गरम मसाला घालून पुन्हा 5-7 मिनिटे वाफेवर शिजू द्या.

8 चपाती/ भातासोबत गरम गरम सर्व्ह करा.

IMG_20190527_223914.JPG

वाढणी/प्रमाण: 
2
अधिक टिपा: 

सुरण उकडलेले पाणी पुन्हा स्वयंपाकाला वापरायचे नाही.

सुरण उत्तर भारतात- प्रामुख्याने UP बिहारमध्ये आवडीने खाल्ला जातो

माहितीचा स्रोत: 
बिहारी शेजारीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Thanks मन्जूताई , देवकी ताई _/\_

>> मस्तच! नाव कसलं भारी वाटतय.
नवीन Submitted by शाली on 28 May, 2019 - 14:15>>

शालीदा, सुरणाचं हिंदी नाव आहे हे. Happy

तोंपासू
"सुरण उत्तर भारतात- प्रामुख्याने UP बिहारमध्ये आवडीने खाल्ला जातो"
मी पण आवडीने खाते पण मी युपी बिहारवाली नाही.
रच्याकने ते जिमीकंद वाचून डोळयासमोर जिमी शेरगूल आला.

सुरणाचे काप सोडून बाकी काहीच आवडत नाही , त्यामुळे माझा पास !
पण जिमीकंद नाव आवडलं , पहिल्यांदाच ऐकलं
रच्याकने ते जिमीकंद वाचून डोळयासमोर जिमी शेरगूल आला.>> ए ! शेरगील आहे तो , गूल नाही झालाय अजून Wink

सुरण एकदाच खाल्ला होता आणि किंचित खाजल होतं, त्यामुळे भीती बसली. शिवाय नाव Elephant foot was the biggest put off. त्यामानाने जिमीकंद नाव किती मस्त आहे. Happy हे कधी करणार नाही, पण कोणी केलं तर खायला नाही म्हणणार नाही..... in short रेसिपी आवडली.

तो भाजीचा फोटो मला आमसासारखा दिसतो आहे Happy

मस्त पाककृती मनिम्याऊ. नक्की करुन बघेन.
सुरण रक्तविकार,दमा, खोकला,बद्धकोष्ठता कमी करण्यास उपयुक्त आहे.

मी सुरण उकडुन पातळ पण आकाराने मोठे काप करते. मग मिठ आणि थोड पिठ लावुन fish सारख fry करते ते सुद्धा छान लागत.

मस्त.

आभार सगळ्यांचे. नक्की करून पाहा

रच्याकने ते जिमीकंद वाचून डोळयासमोर जिमी शेरगूल आला.
Submitted by किट्टु२१ on 28 May, 2019 Wink

IMG_20190529_133919.JPG

>>>सुरण एकदाच खाल्ला होता आणि किंचित खाजल होतं, त्यामुळे भीती बसली.>>>
म्हणूनच सुरण शिजवताना त्यात काही आंबट घालणं मस्ट आहे. शिवाय विकत घेतानाच आतील रंग बघून घ्यायचा. गुलाबी असेल तर हमखास खाजरा निघेल. पिवळा - पांढरा असेल तर कमी खाजवतो .

>>अवियल मध्ये सुरण , अळू कंद , बटाटा वगैरे भरीव भाज्या लागतातच>> हो

Mi tyache kap krun boil krte mg tyavr chich halad mith masala lavun thevte.... Nntr rava mith halad masala yach mixture krun fry fish sarkh shallow fry krte... Mstch lagt... Specially tandlacha bhakri sobat

मला सांगा बरं कोणीतरी खाजरा नखाजरा कसा ओळखावा
नवीन Submitted by मंजूताई on 30 May, 2019 >>>

विकत घेतानाच आतील रंग बघून घ्यायचा. गुलाबी असेल तर हमखास खाजरा निघेल. पिवळा - पांढरा असेल तर कमी खाजवतो