नरेंद्र मोदींचे अभिनंदन!

Submitted by भरत. on 23 May, 2019 - 06:12

लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवल्याबद्दल नरेंद्र मोदी, भाजप आणि त्यांच्या समर्थकांचे अभिनंदन!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरत, हे आवडलं Happy

भारतीय लोकशाहीत पुन्हा एकदा जनतेने कौल दिल्याबद्दल नरेंद्र मोदी व NDA चे अभिनंदन.

भरत, तुमच्या स्पोर्टींग स्पिरिटचं कौतुक आहे.
याआधीच्या चर्चेमध्ये माझ्याकडून अधिकउणं बोललं गेलंच आहे, त्यासाठी सॉरी!

आणि हो, मोदींचं अभिनन्दन! ५ वर्ष पूर्ण करून दुसरी टर्म मिळवणारे पहिले बिगर काँग्रेसी पीएम बनले!

धन्यवाद.

विरोधकांनी गेल्या पाच वर्षात जे काही केले त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांनी शांत डोक्यावर विचार करून 2024 च्या तयारीला लागावे ही विनंती. गेल्या 5 वर्षात जे बीबी आले त्यांचे परत रिपीट टेलकास्ट नको.

>>गेल्या 5 वर्षात जे बीबी आले त्यांचे परत रिपीट टेलकास्ट नको.<<

हो राव!
झाली तेव्हढी शोभा पुरी झाली ना?
शहाण्यास अधिक सांगणे न लगे!

नरेंद्र मोदींचे अभिनंदन! जातीपातीचे व द्वेषाचे राजकारण करणार्‍या पक्षाच्या नेत्यांना नाकारून भारतात बहुमताचे सरकार निवडून देणार्‍या भारतीय मतदारांचे सुध्दा अभिनंदन!

जागतिक नेते सुध्दा नरेंद्र मोदींचे अभिनंदन करत आहेत.
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/pm-narendra-modi-cong...

खरे तर मोदी विरोधकांचेच अभिनंदन.

आजवर असा प्रकार कधी घडला नव्हता. लोक काँग्रेसला मत द्यायचे, त्या पक्षाचे गुणगान करायचे, काही जण कॉंग्रेसच्या विरोधात मत द्यायचे, पक्षाला व नेत्यांना शिव्याही घालायचे. पुढे काँग्रेस पक्षाच्या जागी इतर कुठल्याही पक्षाचे नाव टाकून पुढे मत देणे / नाकारणे / गुणगान गाणे / शिव्या घालणे हे समीकरण चालूच राहिले. मतदारांना शिव्या घालणे हा प्रकार इतिहासात कधीच घडला नव्हता.

तो मोदीविरोधकांनी करुन दाखविला. मोदींना / भाजपला मत देणार्‍या मतदारांची अक्कल काढणे, त्यांना भक्त असे शिवीप्रमाणे संबोधणे असे अश्लाघ्य प्रकार झाले. मतदारांना तुम्ही जितकं चिडवाल / खिजवाल तितकं त्यांचं मत पक्कं होत जातं हे मोदीविरोधकांना कळलेच नाही. मतदारांनी काँग्रेस पक्षावर नाही तर त्यांची अंध / बिनडोक भक्त अशी हेटाळणी करणार्‍या मोदीविरोधकांवर काढलाय.

मोदींनी यावेळी ज्या असंख्य मुलाखती आणि भाषणे दिली त्यात एक कॉमन विधान होते ते बहुदा कोणी नीट लक्षात घेतलेच नाही. मोदी म्हणत होते, "यावेळी मी प्रचार करतच नाहीये, मी तर फक्त ५ वर्षे साथ दिल्याबद्दल जनतेचे आभार प्रकट करतोय. भाजप कार्यकर्तेही प्रचार करत नाहीयेत तर यावेळी आमचे सामान्य मतदार, कुठल्याही पक्षाचे लेबल नसलेली जनताच आमचा प्रचार करतेय. ही लढाई मोदी किंवा भाजप करता देशाची जनताच लढतेय."

मोदींचे हे म्हणणे तंतोतंत खरे होते. मोदी सरकार पुन्हा यावे याकरिता माझ्यासारखे अगणित बिगर राजकीय सामान्य नागरिक सोशल मीडियावरुन प्रचार करत होते. तर अशा सामान्य मतदारांना मोदी विरोधक ४० पैसे कॉमेंटवाले असे संबोधून हिणवत होते. स्वतःचं कौतूक म्हणून नाही पण चाळीस वर्षे देशात आणि देशाबाहेरही वरिष्ठ पदांवर नोकरी करुन आणि रिटायरमेंटनंतर इंडस्ट्रियल ट्रेनिंग्स देऊन मी बर्‍यापैकी पैसा कमावला आहे, सिनेमा नाटक आणि मालिकांमधून लेखन दिग्दर्शन व अभिनय करुनही पैसा व थोडीफार प्रसिद्धीही मिळवली आहे. तरीही इथे मी ७०+ वयात उत्स्फुर्तपणे स्वतःचा वेळ पैसा (लॅपटॉप + इंटरनेट + वीज याकरिता) व ऊर्जा खर्च करुन काही लिहिले तर मलाही कॉमेंटमागे ४० पैसे मिळतात का? असे विचारणारे भेटले.

या सगळ्याचा राग म्हणून मी अधिकच जोमाने भाजप व मोदींचा प्रचार केला. माझ्यासारखीच इतर अनेक मोदीसमर्थकांची परिस्थिती आहे. या सगळ्याचं फळ म्हणजे हा आजचा निवडणूकीचा निकाल आहे.

तेव्हा या सगळ्याच्या मूळाशी आहे ते विरोधकांचं भाजप समर्थकांना चिडवणं. सो भाजपच्या यशाचं क्रेडिट त्यांनाच.

भरत. यांचं विशेष अभिनंदन. संकोच्यापोटी त्यांनी धाग्यात स्वतःचं नाव टाकण्याऐवजी मोदींचं नाव टाकलंय. आत्मप्रशंसा टाळण्याच्या या त्यांच्या मोठेपणाबद्दलही त्यांचे आभार.

नवीन Submitted by बिपीन चन्द्र हर... on 23 May, 2019 - 17:20 >>
सर , मनातल लिहिलात ...

खरं म्हणजे आपले भरत सर हे भाजप समर्थक आहेत परंतु भाजप हारेल या भीतीने ते इतके दिवस काँग्रेसकडून बोलत होते.

धन्यवाद मी माझा हे तुमच्या माझ्या सारख्या कोट्यावधी लोकांच्या मनातलं आहे. आपल्याच कोषात वावरणार्‍या मुठभर मोदी विरोधकांना हे कधी कळलंच नाही.

मोदींना / भाजपला मत देणार्‍या मतदारांची अक्कल काढणे, त्यांना भक्त असे शिवीप्रमाणे संबोधणे असे अश्लाघ्य प्रकार झाले. मतदारांना तुम्ही जितकं चिडवाल / खिजवाल तितकं त्यांचं मत पक्कं होत जातं हे मोदीविरोधकांना कळलेच नाही. मतदारांनी काँग्रेस पक्षावर नाही तर त्यांची अंध / बिनडोक भक्त अशी हेटाळणी करणार्‍या मोदीविरोधकांवर काढलाय.

~ लोल! ह्या भाजपच्या भामट्यांनी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या समर्थकांना फारच सभ्य भाषेत संबोधले हो! भामट्यांना तर भामटेच म्हणणार! जनतेची मते मिळवली म्हणजे आपली भामटेगिरी योग्यच आहे असा कुणाचा समज असेल तर असो.

We get what we deserve!!

नवीन Submitted by ॲमी on 23 May, 2019 - 17:34 >>

And we all know what is not good for us !

We get what we deserve!!>>>>>>>
यावर न जाणे का मला जबरदस्त हसू आलंय.
जियो ॲमी!

>>मोदी सरकार पुन्हा यावे याकरिता माझ्यासारखे अगणित बिगर राजकीय सामान्य नागरिक सोशल मीडियावरुन प्रचार करत होते.<<

हे मात्र अगदी खरय..... कार्यकर्त्याच्या वरचढ प्रचार जनतेने स्वयंस्फूर्तीने केला

हे मात्र अगदी खरय..... कार्यकर्त्याच्या वरचढ प्रचार जनतेने स्वयंस्फूर्तीने केला>>> तेच ना, मी तर पाण्यात एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली, फळाला आली म्हणायची. मोदीजी आपल्या सगळ्यांना स्विगीवरून चाळीस रुपयांचा एक गुलाबजामुन पाठवणार आहेत.

People get the government ,they collectively deserve.
लोकसभा निवडणूक जिंकल्या बद्दल भाजप, नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजप समर्थकांचे अभिनंदन

एकाच ओळीचा धागा? जखम बहुत गेहरा होगा. असो. प्रोइंकंबंसी वोट्सवर लँडस्लाइड विक्टरी मिळवणारं हे पहिलंच सरकार असावं. नोटाबंदि, जीएसटी, बालाकोट आणि शेवटी-शेवटी इव्हिएमच्या मुद्द्यांवर हंबरडा फोडणार्‍यांना अंडरकरंट्स समजलेच नाहित. मोदिंच्या हगल्यामुतल्या बाबींवर नळावरच्या चर्चा घडवुन आणुन ज्यांनी आपापल्या वैचारीक दिवाळखोरीचं प्रदर्शन घडवलं, त्यांचं सुद्धा या निमित्ताने हबिणंडण...

रागा अमेठित हरला, केरळमधे जिंकला हे एक चांगलं झालं. लोकसभेतलं मनोरंजन अबाधित राहिल...

आता जागता पहारा २ लवकर काढा... Lol

लोकशाहित हि एक मजा असते. आपल्या आवडिची माणसं/पक्ष जिंकले तर तो लोकशाहिचा विजय असतो, आणि हरले तर नालायक माणसं सत्तेत हिच तुमची लायकि - असं मानभावीपणे बोलताहि येतं... Lol

correction May 23, 2019:
People (of India) elected the Government they very well deserve!
अखिल मतदारापेक्षा स्वता:ला अती शहाण्या समजणार्‍या व काल रात्री पर्यंत देशाच्या पंतप्रधानांबद्दल अतीशय नीच पातळीची भाषा वापरणार्‍या सुंभांना मतदाराने दिलेली ही चपराक कायम स्मरणात राहील.
जो बूंद से गई वो हौद से नही आयेगी, तरिही बाफ चे नाव बदला: guilty conscience धोबी तलाव.

>या सगळ्याचा राग म्हणून मी अधिकच जोमाने भाजप व मोदींचा प्रचार केला. माझ्यासारखीच इतर अनेक मोदीसमर्थकांची परिस्थिती आहे. या सगळ्याचं फळ म्हणजे हा आजचा निवडणूकीचा निकाल आहे.
+100.

>>आता जागता पहारा २ लवकर काढा... Lol
Rofl

वाचतोय , मजा येतेय.
माझ्या आतापर्यंत व्यक्त केलेल्या सगळ्या मतांवर मी कायम आहे. अगदी मोदींच्या चमत्काराच्या धाग्यावर लिहि लेल्या प्रत्येक प्रतिसादावरसुद्धा.

Pages