नरेंद्र मोदींचे अभिनंदन!

Submitted by भरत. on 23 May, 2019 - 06:12

लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवल्याबद्दल नरेंद्र मोदी, भाजप आणि त्यांच्या समर्थकांचे अभिनंदन!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>निरुत्तर क्लबच्या अध्यक्षांचं आणि इतरांचं या पानावर वारंवार धूळ झाडणं पाहून मी आतापर्यंत लिहीत असलेलं किती टोचत होतं याच्या पावत्या मिळाल्या. पण हे टोचणं मी लिहिलेलं अस्वस्थ करीत होतं यापेक्षाही जास्त , बहुमताने निवडून आलेल्या आमच्या नेत्याच्या विरोधात कोणी बोलूच कसं शकतं? हे होतं हे आताच्या आणि गेल्या पाच वर्षांतल्या अधिकतर प्रतिसादांवरून जाणवलंय.
"आमच्या लोकशाहीत बहुसंख्येपेक्षा वेगळं मत उच्चारणं ब्लासफेमस आहे."<<<

भरत.. तुम्ही पर्टिसन होतात व तुमची मते सुद्धा.. अता हा न्युट्रलिटिचा आव कशाला ? सगळी पोस्टस ही एका विचारसरणिच्या/पक्षाच्या/घराण्याच्या भक्तीने लिहिलेलीच होती. अता तुम्ही मंदीरात बसुन टाळ वाजवणारे माळकरी भक्त होतात व दुस्र्या बाजुचे ढोल घेऊन चौकात नाचणारे... इतकाच काय तो फरक...

पण तुमच्या सगळ्या धाग्यांवर दोन्हिकडचे "कडवे" मुद्दे तरी कळाले.. माझ्यासारख्याला "स्टेक नसलेल्याला" काही गोश्टि समजायला मदत झाली हेही नसे थोडके ... त्याबद्दल तुमचे आभारच

मा नरेंद्र मोदीजी व NDA च ह्या अभुतपुर्व विजया बद्दल अभिनंदन !

ह्या निमित्याने निखिल वागळे, पुण्य प्रसुन , विनोद दुआ सारख्या जनमानसाशी व्यक्तीशः निगडीत असल्याचा दावा करत NDA ला 150 च्या आसपास जागा मिळतील असा दावा करणारे उघडे पडले !!

निरुत्तर क्लबच्या अध्यक्षांचं आणि इतरांचं या पानावर वारंवार धूळ झाडणं पाहून मी आतापर्यंत लिहीत असलेलं किती टोचत होतं याच्या पावत्या मिळाल्या. >>

त्या निरुत्तर वरुन आठवल. निदान आतातरी तुम्हाला "उगवता तारा " सरचिटणीस झाल्यावर लोकान्च्या मनात उगवलेल्या खालील प्रश्नान्ची उत्तरे मिळाली असतील अशी आशा करतो.

१) रागा, सोगा व प्रिव्र यान्चे गेल्या १५ वर्षात देशाच्या, कुठल्याही राज्यच्या व त्यान्च्या स्वतःच्या (फक्त रागा व सोगा) मतदार सन्घातील योगदान काय?
२) सोगा, रागा व प्रिव्र यान्नी उप्र शिवाय एखाद्या राज्याच्या विकासकामान्साठी शिफारस केली व ती विकासकामे जातीने करुन घेतली असे काही उदाहरण आहे काय?

याचीच उत्तरे कदाचित मतदारही शोधत होते, पण जे स्वतः कोन्ग्रेस्च्या समर्थकन्नाच माहीत नाही ते मतदाराना कुठुन कळणार?

(टीप: वरिल प्रश्न फक्त भरत यान्च्यासाठी आहे)

राहुलजींचे खरे तर अभिनंदन!! सर्व विरोधकांनी पप्पू म्हणून हिणवले तरी पक्षाध्यक्ष नात्याने अमित शहांपेक्षा त्यांची टक्केवारी जास्त सुधारली आहे!

काँग्रेस = २०१४ जागा ४४ २०१९ जागा ५२ - १८.२% जास्त जागा मिळाल्या

भाजपा= २०१४ २८२ जागा, २०१९ ३०३ जागा - ७.४४% जागा जास्त मिळाल्या..

टक्केवारी राहुलजींची सरस अमित शहांपेक्षा!

विरोधकांनी मोदींसमोर शेतकऱ्यांच्या समस्या, रोजगाराच्या समस्या,>>>>>>> असे मटात त्या विदेशीवाल्यांनी म्हणले आहे. गंमत आहे ना, बरेच वर्षे एका मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री आणी केंद्रात पण ( स्वतःला शेतकरीपुत्र म्हणवून घेणारा ) कृषी मंत्री असे पद भुषवणारा एक जाणता राजा कार्यरत होता. महाशय शेतीच्या नवीन तंत्रासाठी इस्झ्रायल ला पण जाऊन आले होते. मग महाराष्ट्रात इतक्या शेतकर्‍यांनी का आत्महत्या केल्या? मग शेतीचे ते विकसीत तंत्र स्वतःच्या गावातच वापरुन करोडो रुपये त्यांच्या कन्येने काढुन दाखवले का ? गुणी बाय माझी ती.

मोदींचे राज्य असतांना शेतकरी पटापट किड्यामुंग्यांसारखे गेले का? आणी सोनियाचे दिनु, वर्षे शरदाचे चांदणे असतांना शेतकरी मालामाल होते का? सोडा !! शेतकरी हा श्रीमंत कधीच नव्हता ( अपवाद आहेत ) तो बिचारा कायम कष्टच करतो, आणी त्याचा कष्टाचा माल मध्येच दलाली करुन हे हरामखोर, *********** व्यापारी खातात. मुळशी पॅटर्न मधला मेथी विकण्याचा सीन आठवा. मधले ते दलाल काढा आणी शेतकर्‍याला डायरेक्ट माल विकु द्या. खोटे वाटेल पण रतन टाटांसारख्या देशभक्त, प्रामाणीक माणसाच्या कंपनीत सुद्धा टेंडर मध्ये पैसा खाणारे लोक आहेत. माझे मेव्हणे त्या कंपनीत होते.. कोणाला घेणे देणे नसते कोणाशी, मग मोदींना दोष कशाला. राफेल मध्ये घोटाळा झालाय ना, मग सिद्ध करा कोर्टात जाऊन.

बिबीसीवाल्यांना म्हणावे आधी स्वतःच्या बुडाखाली काय जळते आहे ना ते पहा. इथे ढुंगी भाजतेय तरी चाल्लेत राष्ट्रवादावर टीका करायला.

खोटे वाटेल पण रतन टाटांसारख्या देशभक्त, प्रामाणीक माणसाच्या कंपनीत सुद्धा टेंडर मध्ये पैसा खाणारे लोक आहेत. माझे मेव्हणे त्या कंपनीत होते.. कोणाला घेणे देणे नसते कोणाशी, मग मोदींना दोष कशाला.

मग गांधी नेहरूंना का दोष ?

मग गांधी नेहरूंना का दोष ?>>>>> गांधीजी आणि नेहरूंना भ्रष्टाचारावरून कधी दोष दिला जातो का? त्यांचे काही निर्णय आहेत जे स्वातंत्र्योत्तर भारतासाठी चांगले नाहीत असे काही लोकांना वाटते त्या निर्णयांबद्दल त्यांच्या वर टिका केली जाते.

डॉक्टर, महात्मा गांधी व पं. नेहेरु या दोघांच्या शब्दांना तेव्हा मान होता . ( आज ते हयात नाहीत त्यामुळे त्यांच्या समवयीन लोकांसोबत जे झाले त्याला आता महत्व नाही ) म. गांधी त्या वेळेस भगतसिंग, राजगुरु यांची फाशी टाळु शकले असते. इंग्रज त्यांच्या पुढे नक्कीच नमले असते. पण त्यांनी ते केले नाही त्यामुळे लोक नाराज झाले. केरळात स्वामी दयानंद यांच्या वेळी सुद्धा जे झाले ते तुमच्या आधीच्या पिढीला विचारा, ते नक्कीच सांगतील.

मोदींनी राफेल डिल मध्ये जर पैसे खाल्ले असते तर लोकांनी त्यांना आज निवडुन दिले असते का ते लोकांनाच विचारा. बिजेपीला इतके बहुमत का हा प्रश्न काँगींनी स्वतःलाच विचारावा. आत्मचिंतन करावे, कारण त्यांचे रथी महारथी आज कोसळले आहेत. ज्योतिरादित्यासारखा अनूभवी, अभ्यासु तरुण नेता निवडणूक का हरला? त्या उर्मिलाचे जाऊ द्या. ती नुसतीच बोलबच्चनसारखी मटकली. पण या अभ्यासुंचे काय? आहे उत्तर?

आणि मला त्यात नेहरू गांधी अपेक्षित होते , बापू गांधी नव्हे,

टाटात भ्रष्टयाचार झाला तर मोदीना का दोष द्यायचा , असे लिहिले आहे , मग भ्रष्टाचारबद्दल नेहरू गांधींना तर का दोष द्यायचा ?

नाही, पण त्यांची फाशी टाळावी याकरता गांधीजींनी शब्द टाकावा अशी लोकांची विनंती होती. कारण त्यांच्या शब्दाला मान होता.

टाटात भ्रष्टयाचार झाला तर मोदीना का दोष द्यायचा , असे लिहिले आहे , मग भ्रष्टाचारबद्दल नेहरू गांधींना तर का दोष द्यायचा ?>>>>> अहो इथे कावळा उडाला तरी मोदींचे नाव घ्यायचे गठबंधन वाले. एवढ्या वेळा तर गांधी नेहेरुंना पण दोष दिला गेला नसेल.

>>आढ्याचे पाणी शेवटी वळचणीला जाऊन पोचले.
अजून ईतरत्र शिंतोडे ऊडताहेत मात्र... थोडा वेळ लागेल.. डबके पुरते ढवळून निघाले आहे.. Proud

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही पक्षाच्या कार्यालयात शोकसभे सारखे वातावरण झाले आहे. माया-ममता-मुलायम यांच्या फुग्यातली हवा निघून गेली. आपण मोठे किंगमेकर होणार असा भ्रम असलेले केजरीवाल आणि चंद्राबाबू नायडू यांचा भ्रमाचा भोपळा फुटला. लिबरल आणि टुकडे-टुकडे गैंगची तर बोलतीच बंद झाली आहे. बहुसंख्य भारतीय मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली ते बरं झालं. द्वेषाचं, जाती - धर्माचं राजकारण करणारे आता तोंडघशी पडले आहेत. दहा-पंधरा खासदारांच्या जीवावर पंतप्रधान पदाची स्वप्न बघणार्‍या या ढोंगी आणि संधीसाधू नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याबद्दल भारतातील बहुसंख्य मतदारांचे अभिनंदन करावे तेव्हढे थोडेच आहे.

लोकसभा निवडणुकीतल्या भव्य विजयाबद्दल नरेंद्र मोदी, भाजपा आणि मित्रपक्ष, त्यांचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मतदार यांचे मनापासून अभिनंदन

भारतीय जनतेने दिलेला जनमताचा कौल खुल्या मनाने स्वीकारण्याची आणि आत्मपरीक्षण करुन एक उत्तम विरोधी पक्ष म्हणून उभे रहाण्याची ताकद आणि नियत समस्त विरोधी पक्ष, त्यांचे कार्यकर्ते आणि इथले समर्थक यांना लाभो ही सदीच्छा

राजकीय भूमिका असणे किंवा एखादा नेता आवडता नावडता असणे इतपत ठीक आहे पण प्रश्न जेंव्हा देशाच्या सुरक्षेचा येतो, नैसर्गिक आपत्तीचा येतो किंवा एक राष्ट्र म्हणून आपल्या प्रतिष्ठेचा येतो तेंव्हा आपल्यातले राजकीय मतभेद (तात्पुरते का होईना) विसरुन जो एकदिलाने आपल्या सरकारमागे उभा राहतो तो खरा सुजाण समाज

राजकीय धाग्यावरचे रागलोभ शक्यतो त्या त्या धाग्यांपुरतेच मर्यादित ठेवून इतरत्र त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पडसाद उमटू न देण्याचा समंजसपणा इथल्या समस्त सुजाण आयडींना लाभो!

अहो चक्क निखिल वागळे ने पण अभिनंदन केलं मोदिंचं >> पण त्यानी असे ही लिहिले आहे की NDA got 45% vote, त्यात BJP 38%. 55% voted against Modi and BJP. Will you respect this mandate, Modiji? यावरून असे दिसते की याना भारतातील निवडणुक पद्धत समजलीच नाही. व mandate या शब्दाचा अर्थच समजलेला नाही. कारण या भाजप विरुद्ध असलेल्या या पत्रकाराना आपले दैवत र्‍अहुल यान्चा पराभव झालेला सहन होते नाही. २०१४च्या निवडणुकीत पण असा प्रश्न विचारलेला आहे. mandate हे फक्त निवदून आलेल्याना असते. बाकीच्यानी आपली पाळि येईल तो पर्यन्त जिन्कलेल्या सरकारला योग्य मदत व त्यानी काही अयोग्य केले तर ते सान्गून बदलायला लावायचे असते.

पात्रा का पडला ?

नवीन Submitted by BLACKCAT on 29 May, 2019 - 16:39
>>

पात्रा कुणी विशेष व्यक्ती होता काय?

Pages