नरेंद्र मोदींचे अभिनंदन!

Submitted by भरत. on 23 May, 2019 - 06:12

लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवल्याबद्दल नरेंद्र मोदी, भाजप आणि त्यांच्या समर्थकांचे अभिनंदन!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरात 9 आहेत म्हणून 9 मलाच पडली पाहिजेत , हे पटत नाही.
राहुल आणि वरूण , भिन्न पक्षास मत देणार ना ?

मशीनवर अविश्वास दाखवण्यापेक्षा घरातल्या 4 लोकांना आपण नको आहोत , हे उमगून गप्प बसावे.

Proud

तर अण्णा,
ज्याच्या निकालात गडबड झाली आहे तो कर भरत नाही का? इंग्रजीत काय म्हणतात ते बघून घ्या. आणि नसेल भरत तर करदात्यांच्या (..........) पैशासाठी त्याने दाद मागू नये
गेला बाजार फेरमोजणी न करताच निकाल बदलणार नसेल हे ठरवणे..

यासाठी काही वेगळे शिक्षण लागते का?

गेला बाजार फेरमोजणी न करताच निकाल बदलणार नसेल हे ठरवणे..

यासाठी काही वेगळे शिक्षण लागते का?

नवीन Submitted by किरणुद्दीन on 24 May, 2019 - 09:21 >>>

त्याच्या घरातील लोक मतदान करत असताना तो त्यांच्या बाजूला उभा राहून कुणाला मत जातेय याची शहानिशा करत होता का?

निरुत्तर क्लबच्या अध्यक्षांचं आणि इतरांचं या पानावर वारंवार धूळ झाडणं पाहून मी आतापर्यंत लिहीत असलेलं किती टोचत होतं याच्या पावत्या मिळाल्या. पण हे टोचणं मी लिहिलेलं अस्वस्थ करीत होतं यापेक्षाही जास्त , बहुमताने निवडून आलेल्या आमच्या नेत्याच्या विरोधात कोणी बोलूच कसं शकतं? हे होतं हे आताच्या आणि गेल्या पाच वर्षांतल्या अधिकतर प्रतिसादांवरून जाणवलंय.
"आमच्या लोकशाहीत बहुसंख्येपेक्षा वेगळं मत उच्चारणं ब्लासफेमस आहे."

तरीही शेवटचा एक धागा सोडला तर माझा रोख सरकारच्या वक्तव्य, निर्णय आणि नीती यांकडेच होता.
आता मोदींनी पाठ केलेली मुलाखत देऊन इतकं खाद्य दिल्यावर त्याचा आस्वाद न घेण्याइतका थोरपणा माझ्याकडे नाही.

अश्विनी, माझा धागा पूर्णपणे स्पोर्टिंग स्पिरिटमध्येच होता. पण त्यावरच्या प्रतिसादांतली तडतड पाहून, 'पराभूत झालेल्यांनी नाक घासून शरण यावं आणि माफी मागावी' टाइप भाषा वाचून मी उत्तर दिल्याशिवाय का राहायचं? इथली मंडळी आपल्या विजयाच्या उन्मादात किती ग्रेसफुल आहेत, तेही दिसतंय की.

या ट्वीटमध्ये quote केलेल्या ओप इंडियाच्या संपादिका नूपुर शर्मा आणि इथे लिहिणार्‍यांत फार फरक नाही.
https://twitter.com/amitmehra/status/1131717161527889920

Amit Mehra Retweeted Nupur J Sharma

What is this false victimisation disease that each one of the Right Wing people suffer from? Why do they have meltdowns on every given opportunity? they are either crying, whining or abusing. Strange funny lot.
What is this false victimisation disease that each one of the Right Wing people suffer from? Why do they have meltdowns on every given opportunity? they are either crying, whining or abusing. Strange funny lot.

ते शब्द वरच्या लिंकवर वाचता येतील. इच्छुकांना वापरताही येतील.

शेवटी - मोदी अगदी ५४३ जागा घेऊन निवडून आले असते तरीही ; त्यांना खोटं बोलायची ओसीडी आहे; खर्‍याखुर्‍या प्रेस कॉन्फरन्सला सामोरं जायचा दम त्यांच्या ५६ इंची छातीत नाही ; शहाणी माणसं मोदीं सोबत काम करायला तयार असणार नाहीत किंवा त्यांच्यासमोर तोंड उघडणार नाहीत, ही सत्यं बदलत नाही.

तूर्तास ब्रेक घेतोय. तुमचं चालू द्या.

अडवाणींनी केले होते का पि-या २००९ ला? >>>

किरणूद्दीन वरील प्रश्न माझसाठी आहे का?
तसे असेल तर माझा आयडी नीट लिहा. घाबरण्याचं कारण नाही.

तसे नसेल तर उत्तर दिले नाही तरी चालेल.

इथे लोक याता गुद्द्यांवर आलेले दिसताहेत.

>>> जाऊ देत, 'रागा'वलेत ते. आपण सोडून देऊ (उनको उनके हाल पर). Happy

तूर्तास ब्रेक घेतोय. तुमचं चालू द्या.

Submitted by भरत. on 24 May, 2019 - 09:28 >>>

तुम्हाला ब्रेक ची नितांत गरज आहे. पुन्हा भेटू.

या निवडणुकीत सत्तापालट होणार नाही हे माहीत होतं पण तरी संसदेत विरोधी पक्षाच्या जागा थोड्या फार वाढतील अशी अपेक्षा होती. त्या बाबतीत साफ निराशा झाली आहे. याचा दोष सर्वस्वी कॉंग्रेसच्या नेतृत्वाकडे जातो.
मावळमध्ये पार्थ पवार? मी जरी भाजप समर्थक नसले तरी मी माझे मत पार्थ पवार नावाच्या केवळ घराणेशाहीने पुढे आलेल्या माणसाला निश्चित देणार नाही. इव्हीएम मध्ये चूका असतीलही पण या पराभवाची यापेक्षा अधिक गंभीर कारणे आहेत ज्यांचा विचार काँग्रेसने केला पाहिजे.

काँग्रेस समर्थक सोडुन बाकी सगळे लोक काँग्रेसने आता तरी जागे व्हायला हवे म्हणून ओरडताहेत तर काँग्रेस समर्थक अजूनच रागावताहेत.

प्रॉब्लेम थेट नेत्यापासून तळातल्या कार्यकर्त्यापर्यंत एकच आहे का?

बर, क्येल अभिनंदन मोदी आणि कंपनीचे

आता फुड काय?

पुन्न्यांदा मोदी विरोधकांच्या पोपटपंचीला हिथ पाच वरीस झेलायच? अरे बाबोsssssss

बर, क्येल अभिनंदन मोदी आणि कंपनीचे

आता फुड काय?

पुन्न्यांदा मोदी विरोधकांच्या पोपटपंचीला हिथ पाच वरीस झेलायच? अरे बाबोsssssss

अश्विनी, माझा धागा पूर्णपणे स्पोर्टिंग स्पिरिटमध्येच होता. >>> तो तसाच राहू द्यावा. इतर मतांशी जसे प्रामाणिक असता तसेच ह्याच्याशीही राहावे. उकसवण्याला बळी पडू नये.

तडतड, उन्माद, गलिच्छ/असभ्य भाषा, शिव्याशाप, दुसर्‍याला हीन लेखणे, अक्कलशून्य समजणे, भक्त्/भाट/भामटे आणि अजून काय काय संबोधन वापरून सामान्य माणसांना नको त्या वातावरणात खेचून घेणे..... हे सगळं ह्या वेळच्या निवडणुकीचे निगेटिव्ह पॉइंट होते आणि जातपात्/धर्म ह्याइतकेच पोलरायझेशन करणारे होते. आतापर्यंत इतकी खालची पातळी कधीच पाहिली नव्हती. कुणीही जिंकलं असतं तरी निकाला नंतर हे होणारच होतं. विरुद्ध पार्टीच्या लोकांना ही बोलणी लागणारच होती. यूपीए जिंकली असती तरी हेच झाले असते. एनडीए वाल्यांना असंच ऐकावं लागलं असतं. ह्या निवडणुकीत नक्कीच कितीतरी चांगले संबंध खराब झाले असणार. कारण काय? तर अशी अनपेक्षित असलेली भाषा.

निवडणुकीच्या आधीच ह्या प्रकारावर स्वतःच निग्रहाने कंट्रोल ठेवायला हवा आपल्या वाहून जाण्यावर आणि आपण काय, किती, कुणाला आणि कश्या पद्धतीने बोलतोय ह्यावर. सोशल मिडिया जाऊच दे, निदान स्वतःपुरतं तरी हे वाहून जाणं थांबवायला हवं. नाहीतर सोशल मिडियावर धुणी निघतातच. प्रत्येकाला राजकीय मतं असतातच. त्या मतांचा आदर न राखता त्यांना बिनदिक्कत पणे लेबल लावणे हे स्वतःपुरतंही रोखू शकत नसू तर दुसर्‍या कुणाला काय रोखणार?

https://abpmajha.abplive.in/election/punjab-candidate-neetu-wala-cries-a...

कुटुंबातल्या नऊ जणांनी मतं दिली. मात्र पाचच मतं मिळाली.
हा उमेदवार तक्रार करू शकणार नाही. कारण आयोगाने लोकशाही विरोधी अन्यायकारक नियम बनवले आहेत. ज्यात व्हीव्हीपॅटच्या सर्व चिठ्ठ्यांच्या मोजणीच्या मागणीचा अधिकार फक्त दुस-या क्रमांकाच्या उमेदवाराला देण्यात आलेला आहे. म्हणजे जर या उमेदवाराची मतं चोरीला जाऊन हा क्रमांक एक वरून शेवटी आला असेल तर हा काहीही करू शकत नाही. या नियमांविरोधात विरोधी पक्षांनी अनेकदा आयोगाला निवेदन दिले आहे. न्यायालयाने आयोगाच्या कामकाजात ढवळाढवळ करायला नकार दिलेला आहे. त्याचे कारण आयोगाने तसे निवेदन न्यायालयाला दिले आहे. घटनादत्त आयोगाचे अधिकार हे ते कारण.

यामुळेच सर्व निकाल सुरळीत असल्याची खात्री पटलेली आहे. २००९ मधे विरोधक सुखी होते.

Submitted by किरणुद्दीन on 24 May, 2019 - 08:22

>>>>>
सोशल मिडिया वरुन काहिहि वाचुन/बघुन मत बनवन्यापेक्शा facts चेक केलेले कधिहि चान्गले नाहि का??
त्या उमेदवाराला ८५६ मते मिळालेली आहेत.
Test.png

आदरणीय श्री नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष एन डी ए सरकारचे मंन:पूर्वक हार्दिक अभिनंदन आणि शूभेच्छा... यांना येंत्या काळात सर्व आघाड्यांवर उदंड यश व कीर्ती मिळो आणि भारतीय जनेतेसाठी सुख समाधानाचे दिवस येवोत, श्री नरेंद्र मोदी हे भरत भाग्य विधाता आहेत त्यांना उदंड आयुष्य व यश मिळो ही ईश्र्वर चरणी प्रार्थना

अप्पा
जी लिंक मी दिलेली आहे त्यात सुरूवातीलाच प्रत्यक्षात ८५६ मतं मिळाली असे म्हटले आहे. तरीही हीच लिंक का दिली हे सुद्धा सांगितले आहे. आधी पूर्ण वाचायला शिका की. . आकलन नंतरच होईल... मग शिकवा ना. आम्ही पाटी पेन्सिली घेऊन येऊ शिकवणीला. किमान तुमचंच काम कमी झाले असते...

बरेच जण समान बुद्धीमान आहेत असे वाटते

किरणुद्दिन, तुम्ही दिलेली लिंक चालत नाहिये. इतरत्रही बातमी पाहिली/वाचली. उमेदवाराला ८५६ मते मिळाली आहेत. घरातल्या ९ लोकांनी दिलेल्या मतांपैकी फक्त ५च मते या उमेदवारास मिळाली हे या उमेदवारास खात्रीशीर रित्या कसे माहिती झाले हे मला अजून उलगडलेले नाही.

एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर आता ही बातमी दिसत आहे: https://abpmajha.abplive.in/election/punjab-candidate-neetu-wala-cries-a...

कुणालाही फेरमतदान मागण्याचा हक्क दिला तर, सगळ्याच जागान्वर त्याची मागणी होईल आणि एकच निवड्णुक वर्षभर चालेल. निवड्णुक आयोगाने "व्यावहारीक" विचार करुन तो नियम ठेवलाय, जो योग्य आणि आवश्यक आहे.

इथल्या ठराविक लोकांनी केलेल्या अभिनंदनाच्या पोस्ट्स पाहून मला राहून राहून संजय मांजरेकरची आठवण येतेय Wink

बाकी संभ्रमकारांचे नरो वा कुंजरो वा प्रयोग इथेही चालू झालेले दिसतायत Proud

लिंक चालत नाही त्याला नाईलाज आहे. पण त्याच वेळी खुलासा केला तर त्याला गोलपोस्ट चेंज म्हणतात हे ही नव्यानेच समजले.

>>खपुमीमाझा... एकाच आयडीने लिहीले तरी समजेल इतरांना<<

याला म्हणतात "चोराच्या मनात चांदणे" Wink

याला म्हणतात "चोराच्या मनात चांदणे" Wink। >>>

चोराच्या मनात चांदणे या मताशी मी सहमत नाही. मला वाटते की काही लोकांना "अख्ख जग माझ्याविरुद्ध कट रचतंय" किंवा " अख्ख जग मला मूर्खांत काढायला निघालय " असे भास होतात, आणि मग ती व्यक्ती सगळ्यांवरच विविध प्रकारचे संशय घेऊ लागते, वस्कन अंगावर यायला लागते वा विनाकारण दुसऱ्यांची अक्कल काढू लागते, त्यातला हा प्रकार असावा.

Pages