आजचा खयाली पुलाव जो उद्या खायचाय अर्थात 'असा शोध लावलेला' आवडेल मला

Submitted by हर्पेन on 2 October, 2014 - 02:08

अनेकदा कोण्या एका लेखकाच्या कल्पनेचा विस्तार असणार्‍या आणि तत्कालात असंभव वाटणार्‍या गोष्टी नंतर खरोखरच प्रत्यक्षात आलेल्या आहेत. आयझॅक असिमोव्ह, आर्थर क्लार्क अशी नावे या संदर्भात लगेचच आठवणारी.....

जुन्या गोष्टींमधला उडन खटोला ही भन्नाट कवीकल्पना पण 'ड्रोन'द्वारे वस्तू पोहोचवल्या जाणार ही लवकरच प्रत्यक्षात येऊ घातलेली घटना.

आपल्यालाही अशा काही कल्पना सुचत असतील तर त्या इथे मांडा. किंवा आपण त्याला विज्ञानाकडून असलेल्या अपेक्षा म्हणूया ! त्यामुळे आपल्याला लहानपणापासून चॉकलेट्चा बंगला ई. कल्पना कानावर पडत असतात, त्या प्रकारच्या कल्पना इथे मांडणे अपेक्षित नाहीत.

तसेच ह्या कल्पना केवळ मानवाच्या सुविधेकरता न असता, समष्टीच्या कल्याणाकरता असाव्या. हे मागणे लई होत असेल तर निदान विध्वंसक स्वरूपाच्या नसाव्या ही अपेक्षा तर नक्कीच अवाजवी नाही.

तर

मला स्वतःला असे एक उपकरण हवे आहे की जे जवळ खिशात देखिल बाळगता येईल आणि स्पिकर्सच्या भिंती जेव्हा ठराविक डेसिबल्स पेक्षा जास्त आवाज करू लागतील तेव्हा त्या जास्तीच्या ध्वनीलहरींना अटकाव करतील. मोबाईल चे जॅमर असतात ना त्या धर्तीवर....

किती मजा येईल अशा कानठळ्या बसवणार्‍या आवाजाला असे काबूत ठेवता येईल तर....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अज्ञा.अरे मला आवडतात लहान मुलं पण ती रडायला लागली कि माझी जाम चिडचिड होते जशी सगळ्यांची कधी न कधी होत असते.त्यासाठी वेगळ्या उपकरणाची काय गरज?

मानवदादा! अहो भविष्यात होणारी अवेळी झोपमोड होणार नाही आणि जरी झोपमोड झालीच तरी त्याची सगळी चिडचिड छोट्या निरागस जिवावर होणार नाही,त्या यंत्रावर होईल. Happy

आता तुला नेहमी असं जबरदस्त, ठोस (आणि मेन म्हणजे लगेच पटणारं) एक्सप्लेनेशन कसं सुचत याचा शोध घेणारे यंत्र हवे आहे!
Wink

Happy ह्या बाबतीत मी अजुनही अज्ञानीच आहे.कदाचित रोकठोक बोलायची आजीने लावलेली सवय असावी.

समोरच्या व्यक्तीचा आवाज कमी जास्त करणार उपकरण हवे आहे.
मी मोबाईल, चावी, चष्मा यांना हाक मारताच त्यांनी ओsssss दिली पाहिजे. अशी उपकरण आणि अॅप हवी आहेत.

मी मोबाईल, चावी, चष्मा यांना हाक मारताच त्यांनी ओsssss दिली पाहिजे. अशी उपकरण आणि अॅप हवी आहेत.
>>>>

एखादी चिप वा स्टिकर या सर्व वस्तूंना जोडता येईल ज्याचे लोकेशन मोबाईलमध्ये ट्रॅक होईल.

आमच्याकडे टीव्हीचा रिमोट मला कधीच सापडत नाही. आणि मी नेहमीच गोंधळून मिसकॉल द्यायला मोबाईल उचलतो.

अहो भविष्यात होणारी अवेळी झोपमोड होणार नाही >>> तान्हे मूल भुकेने रडण्याआधी कळावे असे म्हणत असाल तर ठीक आहे.
पण भोकाड पसरणे म्हणजे ५- ६ वर्षापर्यंतचे मूल सुद्धा पसरते, आणि कारण काय असेल हे सांगता येत नाही. म्हणून प्रश्न पडलेला.

चष्मा कुठे ठेवलाय हे नेहमी विसरते, डोळ्यावर चष्मा नसल्यामुळे शोधायला कठीण जाते, चष्म्याला मिस्ड कॉल देता आला। पाहिजे

चष्मा कुठे ठेवलाय हे नेहमी विसरते, डोळ्यावर चष्मा नसल्यामुळे शोधायला कठीण जाते, चष्म्याला मिस्ड कॉल देता आला। पाहिजे>>>>>ह्याला उपाय शक्य आहे. आपण कॉर्डलेस फोन हरवला घरात कुठे तर बेसचा बटण दाबल्यावर तो आवाज करतो. असच काहीतरी मिनिएचर मॉडेल चष्म्याला जोडून मोबाईलवर कनेक्ट करता येऊ शकेल

https://www.foxsmart.eu/
Findy is tiny
Swiss engineering

With a size of only 28mm x 5mm FINDY is the smallest Bluetooth tracking device on the market. With our special adhesive FINDY is fitted on your eyewear frame. FINDY will not bother you in any way. In most cases FINDY is completely invisible to you or anyone else. FINDY disappears on the inner side of the temple or behind your ear. FINDY suits any frame material
पण ते कसं काम करतं ते दिलं नाहीए.
टीवटीव आवाज करणार का?

हे फिंडी... किल्ली वर वापरता येइल का? माझी किल्ली नेहमी हरवते..विशेषतः साड्यां च्या/ कपड्यांच्या दुकानात ... एव्हढा ढीग समोर टाकला की
आठवते की किल्ली खाली रिकाम्या टेबल वर ठेवली होती!
ती काही सापडत नाही!

लावता येईल की. किमान २८ मिमि लांब सपाट भाग असणारी कीचैन वापरायची.
इथे अधिक माहिती सापडली भरतः

FINDY is the ultimate answer to the question: “where are my glasses”.
In the vicinity of a home just press the “buzzer” button in the FINDY app and your glasses will start to sound an acoustic signal that can be heard in anyone’s home, hotel room or office. Just make sure you turn your stereo system down a tiny bit when looking for your glasses.

https://www.foxsmart.eu/product/findy-tracker/

गाडीवरुन जातांना , कधी कधी पायाजवळ ठेवलेली बॅग सरकली कि नाही हे चेक करायची असो कि वळायच असतांना साईड मिरर मधुन मागे कुठली गाडी ओव्हरटेक तर नाही ना करत आहे हे बघायच असो, कित्येकदा मनात येत कि, श्या आपले दोन्ही डोळे वेगवेगळ्या दिशेने बघायची सोय हवी होती. म्हण्जे दोन्हीकडे नजर ठेवता आली असती. Lol
असा काही गॉगल/ चश्मा असता तर?

आपल्या जवळच्या व्यक्तीच्या अंतरंगात डोकावून पाहता आले पाहिजे, जे ओठात तेच ते पोटात आहे का बघण्यासाठी >>>>
यानंतर जगातलं सगळ्यात दुःखी माणूस होण्याचीही तयारी ठेवली पाहिजे Happy

ती यंत्रणा यायची तेव्हा येईलच.पण त्या यंत्रणेची वाट बघत बसण्यापेक्षा आपणच आपापल्यापरीने रबर/प्लॅस्टिकच्या वस्तुंचा वापर टाळला पाहीजे. Happy

जिथे मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे वर्गीकरण न करता कचरा dump केला जातो तिथे फार उपयोग होईल

I dont agree. कचर्‍याचं वर्गीकरणं कचरा जिथे निर्माण होतो, तिथेच व्हायला हवं. मुळात तो कचरा एकत्र आपण करतो. मग भरमसाठ पेट्रोल डिझेल जाळून दूर कुठेतरी पोचवतो. तिथे किंवा घराजवळच्या कच रा कुंड्यांत त्याचं वर्गीकरण करणारे जीव धोक्यात घालून काम करतात.
त्यांना सुका कचरा वेगळा मिळेल, अशी सोय करणं सहज शक्य आहे.

भरत +१

पण भोकाड पसरणे म्हणजे ५- ६ वर्षापर्यंतचे मूल सुद्धा पसरते, आणि कारण काय असेल हे सांगता येत नाही. म्हणून प्रश्न पडलेला.>> भोकाड फक्त ५-६ वर्षापर्यंतचे मूलच नाही तर इशाबाळासारखे लोक पण पसर्तात Happy

चष्मा कुठे ठेवलाय हे नेहमी विसरते, डोळ्यावर चष्मा नसल्यामुळे शोधायला कठीण जाते>> १-२ आगाऊ चष्मे घेऊन ठेवायचे. वापरायचा सापडत नसल्यास वापरायला.

प्लास्टिक खाणारे मायक्रोब्स
https://www.sciencealert.com/plastic-munching-microbes-in-the-ocean-coul...

शिवाय इतक्यातच एका प्रोफेसर्ने प्लास्टीक विघटन करणारी बुरशी शोधल्ये अशी बातमी कुठेतरी वाचल्याचे आठवते आहे पण आत्ता सापडत नाहीये.

आपल्या जवळच्या व्यक्तीच्या अंतरंगात डोकावून पाहता आले पाहिजे, जे ओठात तेच ते पोटात आहे का बघण्यासाठी > >>
नको नको,भविष्यात सुद्धा असे यंत्र कधी बनवू नये कोणी,ते म्हणतात न उम्मीद पे दुनिया कायम है,तसच काहीसं होईल आणि आत्महत्या,मानसोपचार वगैरे वगैरे चे प्रमाण भयानक वाढेल

मला असे एखादे यंत्र हवे आहे जे रात्री 1,2,3 वाजता गावात देखील डोळे मिटले आणि पदार्थ सांगितला की लगेच समोर हजर, झोमॅटो स्वीग्गी वगैरे नका सुचवू,आमच्या गावी नाही येत त्यांची सर्व्हिस

Pages