आजचा खयाली पुलाव जो उद्या खायचाय अर्थात 'असा शोध लावलेला' आवडेल मला

Submitted by हर्पेन on 2 October, 2014 - 02:08

अनेकदा कोण्या एका लेखकाच्या कल्पनेचा विस्तार असणार्‍या आणि तत्कालात असंभव वाटणार्‍या गोष्टी नंतर खरोखरच प्रत्यक्षात आलेल्या आहेत. आयझॅक असिमोव्ह, आर्थर क्लार्क अशी नावे या संदर्भात लगेचच आठवणारी.....

जुन्या गोष्टींमधला उडन खटोला ही भन्नाट कवीकल्पना पण 'ड्रोन'द्वारे वस्तू पोहोचवल्या जाणार ही लवकरच प्रत्यक्षात येऊ घातलेली घटना.

आपल्यालाही अशा काही कल्पना सुचत असतील तर त्या इथे मांडा. किंवा आपण त्याला विज्ञानाकडून असलेल्या अपेक्षा म्हणूया ! त्यामुळे आपल्याला लहानपणापासून चॉकलेट्चा बंगला ई. कल्पना कानावर पडत असतात, त्या प्रकारच्या कल्पना इथे मांडणे अपेक्षित नाहीत.

तसेच ह्या कल्पना केवळ मानवाच्या सुविधेकरता न असता, समष्टीच्या कल्याणाकरता असाव्या. हे मागणे लई होत असेल तर निदान विध्वंसक स्वरूपाच्या नसाव्या ही अपेक्षा तर नक्कीच अवाजवी नाही.

तर

मला स्वतःला असे एक उपकरण हवे आहे की जे जवळ खिशात देखिल बाळगता येईल आणि स्पिकर्सच्या भिंती जेव्हा ठराविक डेसिबल्स पेक्षा जास्त आवाज करू लागतील तेव्हा त्या जास्तीच्या ध्वनीलहरींना अटकाव करतील. मोबाईल चे जॅमर असतात ना त्या धर्तीवर....

किती मजा येईल अशा कानठळ्या बसवणार्‍या आवाजाला असे काबूत ठेवता येईल तर....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिवाय इतक्यातच एका प्रोफेसर्ने प्लास्टीक विघटन करणारी बुरशी शोधल्ये अशी बातमी कुठेतरी वाचल्याचे आठवते आहे >>>> मागच्या आठवड्यात लोकसत्तामध्ये आली होती. दिवस बघावा लागेल.
(रविवार १२ मे २०१९) बरोबर भरतनी दिली आहे ती बातमी.

पुण्यातच एका संशोधकांनी प्लस्टिक विघटन करणार्‍या अळ्यांची जात शोधली / विकसित केली आहे. पण त्यांचा मधमाशांच्या जीवनचक्रावर परिणाम होऊ शकतो म्हणून उघड्यावर वापरणे शक्य नाही. त्याबाबत प्रयोग चालू आहेत असे लिहीले होते. लोकसत्तातच आले होते. नाव आणि अंकाची तारीख आठवत नाही.
( डॉ राहुल मराठे, लोकसत्ता २९ जुलै २०१८ )

आणि अजून एक प्रयत्न हैदराबाद येथील -- near-virgin grade recycled plastic बनवण्याचा.
http://banyannation.com

https://www.loksatta.com/pune-news/plastic-decomposition-in-pune-1891959/

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधकांची कामगिरी

प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने होणाऱ्या प्रदूषणाचे दुष्परिणाम आज प्रचंड प्रमाणात जाणवू लागले आहेत. प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधकांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले असून, त्यांनी प्लास्टिकचे विघटन करू शकणारी बुरशी शोधून काढली आहे.

विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागातील डॉ. मनीषा सांगळे, डॉ. मोहम्मद शाहनवाज आणि डॉ. अविनाश आडे यांनी हे संशोधन केले आहे. २०१४ पासून ते या विषयावर संशोधन करत आहेत. त्यांनी शोधून काढलेली बुरशी खारफुटी झाडांच्या मुळांवर आढळून येते. ‘अ‍ॅसपरगिलस टेरस स्ट्रेन’ आणि अ‍ॅसपरगिलस सिडोवी या दोन बुरशींमध्ये प्लास्टिकच्या विघटनाची क्षमता अधिक असल्याचे दिसून येते. या बुरशीमुळे पॉलिथीन या प्लास्टिकच्या प्रकारातील रेणू (मोलेक्युल) कमकुवत होऊन त्याचे विघटन करण्याची पद्धत सोपी होत असल्याचे त्यांना आढळून आले. त्यांच्या या संशोधनाची दखल प्रतिष्ठित ‘नेचर’ या संशोधन पत्रिकेनेही घेतली आहे. या संशोधनपत्रिकेच्या मार्चच्या अंकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

१२ ठिकाणांहून मातीच्या नमुन्यांचे संकलन

खारफुटी वनस्पती समुद्र किनाऱ्याजवळ वाढतात. बुरशीच्या संशोधनासाठी या वनस्पतीच्या मुळांजवळच्या मातीचे नमुने घेण्यात आले. पश्चिम किनारपट्टीजवळ हे नमुने गोळा करण्यात आले. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आदी राज्यांतील किनारपट्टीवरील १२ ठिकाणांवरून हे नमुने संकलित करण्यात आले.

महत्त्वाचे काय?

‘प्लास्टिकचे विघटन करण्याच्या संशोधनातील हा पहिला टप्पा आहे. आतापर्यंत केलेल्या संशोधनातून बुरशीद्वारे प्लास्टिकचे ९५ टक्क्यांपर्यंत विघटन होऊ शकते, तर वजन ५० टक्क्यांपर्यंत कमी होते असे दिसून आले. या बाबतीत आणखी संशोधन आवश्यक आहे. तसेच या संशोधनाचा प्रत्यक्ष वापर करण्यासाठी आणखी चार ते पाच वर्षे लागतील. या संशोधनाचे स्वामित्व हक्क घेण्यासाठीही प्रक्रिया केली जाईल,’ असे संशोधकांचे म्हणणे आहे

गुगलबाबाला दंडवत

धन्यवाद भरत
आधीची फाईंडीची लिंक ही माहितीपुर्ण

शॉपिंगला गेले की बायकाना "सेल सेल भव्य सेल" सदृश फलक न दिसणारे एखादे यंत्र विकसित झाले तर फार बरे होईल ... विशेषतः शेवटच्या आठवड्यात समस्त नवरे मंडळींना फार उपयोग होईल !

सिवेज साफ करताना भरपूर गरीब लोक विषारीवायू/गुदमरून दगावतात त्याला काही उपाय नाही का ?
Submitted by जिद्दु on 21 May, 2019 - 18:12 >>>>>>>>>>>>>

त्यासाठी मार्केट मधे गॅस डिटेक्टर आणि एस्केप हूड मिळतात. H2S/sewer gas detector, H2S/sewer gas escape hood असे गूगल करुन बघा.
हे घातक वायू ऑईल अँड गॅस क्षेत्रात पण आढळतात. या वायूंमुळे अगदी काही मिनिंटात मृत्यु येऊ शकतो. कित्येक ऑईल अँड गॅस प्लँट मधे gas detector, escape hood सोबत असल्याशिवाय प्रवेश पण करता येत नाही. परदेशी बर्‍याच ठिकाणी याविषयी कठोर नियम आहेत. भारतात जागरुकता कमी आहे.

Pages