आजचा खयाली पुलाव जो उद्या खायचाय अर्थात 'असा शोध लावलेला' आवडेल मला

Submitted by हर्पेन on 2 October, 2014 - 02:08

अनेकदा कोण्या एका लेखकाच्या कल्पनेचा विस्तार असणार्‍या आणि तत्कालात असंभव वाटणार्‍या गोष्टी नंतर खरोखरच प्रत्यक्षात आलेल्या आहेत. आयझॅक असिमोव्ह, आर्थर क्लार्क अशी नावे या संदर्भात लगेचच आठवणारी.....

जुन्या गोष्टींमधला उडन खटोला ही भन्नाट कवीकल्पना पण 'ड्रोन'द्वारे वस्तू पोहोचवल्या जाणार ही लवकरच प्रत्यक्षात येऊ घातलेली घटना.

आपल्यालाही अशा काही कल्पना सुचत असतील तर त्या इथे मांडा. किंवा आपण त्याला विज्ञानाकडून असलेल्या अपेक्षा म्हणूया ! त्यामुळे आपल्याला लहानपणापासून चॉकलेट्चा बंगला ई. कल्पना कानावर पडत असतात, त्या प्रकारच्या कल्पना इथे मांडणे अपेक्षित नाहीत.

तसेच ह्या कल्पना केवळ मानवाच्या सुविधेकरता न असता, समष्टीच्या कल्याणाकरता असाव्या. हे मागणे लई होत असेल तर निदान विध्वंसक स्वरूपाच्या नसाव्या ही अपेक्षा तर नक्कीच अवाजवी नाही.

तर

मला स्वतःला असे एक उपकरण हवे आहे की जे जवळ खिशात देखिल बाळगता येईल आणि स्पिकर्सच्या भिंती जेव्हा ठराविक डेसिबल्स पेक्षा जास्त आवाज करू लागतील तेव्हा त्या जास्तीच्या ध्वनीलहरींना अटकाव करतील. मोबाईल चे जॅमर असतात ना त्या धर्तीवर....

किती मजा येईल अशा कानठळ्या बसवणार्‍या आवाजाला असे काबूत ठेवता येईल तर....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमचे खोक्याबाहेरचे विचार माबोच्या वर्गीकरणात बसेनात, त्यामुळे ललित लेखनाखाली गोड मानून घ्या.

मला एक फ्रीज जो विना इलेक्ट्रिसिटी चालेल-८ सेल्सिअस तापमान मेंटेन करेल.
टेंपरेचर सेन्सिटिव औषधं खेड्यापाड्यात मेंटेन करायला.
खास करून इन्सुलिनच्या रूग्णांसाठी व्यक्तिगत वापराकरिता.

बहुतेक रामन नावाच्या एका तमिळ माणसाने कुठल्याश्या झाडाच्या पानापासून पेट्रोल ला पर्याय ठरेल असे इंधन बनवले होते. पण ते कमर्शियली यशस्वी नाही झाले.... यावर काही अजून काम झाले तर खरंच बहार येईल

चारचाकी गाडीला असते तशी घराला कीलेस एंट्री पाहिजे, कुलूप/लॅच वगैरे लावयचा त्रासच नको.

प्रवासात मोठ्या अवजड बॅगा ऊचलतांना जो त्रास होतो, त्यासाठी बॅगांमध्ये हॉवरिंग/ग्लायडिंग मेकॅनिझम पाहिजे, म्हणजे तरंगणार्‍या बॅगा नुसत्या दोरी लाऊन विनाप्रायास ऊचलता/ ओढता येतील.

श्री काय करायचंय नक्की गायब होऊन. Wink
ईथे चालत्या फिरत्या माणसांकडे लोकं ढुंकून बघत नाही, कोणाला कुणाकडे बघायला, विचारपूस करायला, दोन शब्द बोलायला वेळ नाही, तर गायब होता आल्याने अजून काय (लीगल गोष्टी Wink ) करता येणार आहेत.

फेसबूक वरून, ऑफिसातून किंवा घरातून कोणालाही न सांगता गायब होऊन बघ दोन दिवस (लास वेगासला जाऊन मजा कर), आणि ईथे सांग काय घडले तू गायब होतास तेव्हा.

चारचाकी गाडीला असते तशी घराला कीलेस एंट्री पाहिजे, कुलूप/लॅच वगैरे लावयचा त्रासच नको.

चमन, हे बघा..

http://www.bestbuy.com/site/kwikset-kevo-bluetooth-deadbolt-venetian-bro...

http://www.gokeyless.com/product/43/lockey-m210-keyless-deadbolt

http://www.zoro.com/i/G1490221/?utm_source=google_shopping&utm_medium=cp...

मायबोलीवर एक असा टपलीचा आयकॉन पाहिजे. जो प्रतिसादात लिहिला की ज्याला तो प्रतिसाद मिळाला त्याला एक हलकी टपली मिळेल.

मायबोलीवर एक असा टपलीचा आयकॉन पाहिजे.>>> हे भारीय... पण माबोकर त्याला क्रॅक करुन टपलीचा ठोसा करतील बरं.... नाद नाही करायचा माबो कराम्चा Wink

त्या हॅरी पॉटरच्या झाडू सारखे, खरे तर ती झाडूही न घेता स्वतालाही उडता यावे असे लहानपणापासून वाटतेय. ते देखील इतका अफाट स्पीड की क्षणार्धात इथून तिथे. किंवा चला २००-३०० किमी पर तासाला स्पीड दिला तरी चालेल. जगासमोर आँव वासून उभारलेला पेट्रोलचा प्रश्न तरी हलका होईल.

जर हे शक्य नाही झाले तर विडिओ चॅट थ्रू इथून तिथे `सदेह' जायला जमायला हवे. अर्थातच समोरचीने आपले येणे अ‍ॅक्सेप्ट केल्यावरच हा Wink

दाढीचा त्रास वाचवायला एखादा असा फडका किंवा एखादे असे लिक्विड ज्यात फडका बुडवून तो तोंड पुसल्यासारखा चेहर्‍यावरून फिरवला की कितीही वाढलेली दाढी का असेना सटासट सफाचट झाली पाहिजे.

अग्ग बाई अरेच्चा सारखे बायकांच्या ऊप्स सॉरी मुलींच्या मनातील निदान प्रपोज करतेवेळी तरी समजायला हवे Blush

जे गाणे ऐकायचा मूड होईल ते बस्स मनातल्या मनात गुणगुणले की ओरिजिनल गाणे थेट कानात ऐकू यायला हवे. स्साली हँडस्फ्रीची पण झंझट नको.

दाढीचा त्रास वाचवायला एखादा असा फडका किंवा एखादे असे लिक्विड ज्यात फडका बुडवून तो तोंड पुसल्यासारखा चेहर्‍यावरून फिरवला की कितीही वाढलेली दाढी का असेना सटासट सफाचट झाली पाहिजे.>>

हेअर रिमुव्हिंग क्रिम वापरा Lol

मला J.A.R.V.I.S सारखा असिस्टन्ट हवा. मोबाईल मधे घरात. सतत काहीना काही सांगणारा माहीती देणारा काम करणारा. उदा. फोन बरोबर बोलताना हवे ते अप्लिकेशन ओपन करुन त्यात मी सांगेल ते टाईप करणारा व्हाट्सअ‍ॅप ओपन बोलल्याबरोबर मोबाईल मधुन ते अप्लिकेशन चालु करुन देईल घरी गेल्यावर लाईट चालु करेल टिव्ही चालु करेल. मी झोपल्यावर टिव्ही बंद करेल ( हे महत्वाचे Wink ) माझ्या मिटींग्स ची माहिती अपडेत करुन ठेवेल आणि मला वेळेवर सांगेल. असे बरेच काही पर्स्नल असिस्टंट सारखा असावा.. रोबोट असला तरी चालेल Happy

अर्थात लग्नानंतर मी बायकोचा J.A.R.V.I.S झालेला आहे ही गोष्ट वेगळी Happy

डोळे मिटून मनात ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणाचे नाव घ्यायचे आणि डोळे उघडले की आपण तिकडे हजर ! Wink
तसेच काळाचे, अर्थात टाईम मशिन ! Happy

<<<मला स्वतःला असे एक उपकरण हवे आहे की जे जवळ खिशात देखिल बाळगता येईल आणि स्पिकर्सच्या भिंती जेव्हा ठराविक डेसिबल्स पेक्षा जास्त आवाज करू लागतील तेव्हा त्या जास्तीच्या ध्वनीलहरींना अटकाव करतील. मोबाईल चे जॅमर असतात ना त्या धर्तीवर....

किती मजा येईल अशा कानठळ्या बसवणार्‍या आवाजाला असे काबूत ठेवता येईल तर..>>>>>>
असे ऊपकरन खरेदि करायला मला आवडेल.

कुठलेही काम करयचे आसेल तर ते फक्त डोळे मीटुन मनात आणायचं.. कि ते केलं ..
ते काम आपोआप झलेलं असलं पाहीजे डोळे उघडल्यावर! Wink

रीया, त्यात्लं हवं तेव्हा हवं ते सापडायची युक्ती सुधा हवी सोबत..

( छोट्या पर्स मधुन अती छोट्या वस्तु न सापडणारी - धनुकली)

महेश यांना अनुमोदन. टाइम मशीन मस्तच कल्पना आहे. त्यावरील विज्ञानकथा वाचून असं प्रत्यक्ष झालं तर... असं वाटतंच.

लहान पोरगं भोकाऽऽड पसरायच्याधी ते भोकाऽऽड पसरणार आहे.याचा शोध घेणारं उपकरण तयार व्हायला हवं.

मन्या - तुझ्या डोक्यात ही आयडिया कुठून आली याचा शोध घेणारं उपकरण हवंय.
गेल्या १०००० वर्षात ही आयडिया कुणाला सुचलो नसेल....

लहान पोरगं भोकाऽऽड पसरायच्याधी ते भोकाऽऽड पसरणार आहे.याचा शोध घेणारं उपकरण तयार व्हायला हवं. >>>
त्याने काय साध्य होईल?

Pages