जिवलगाssssssss

Submitted by मीनाक्षी कुलकर्णी on 24 April, 2019 - 06:37

स्टार प्रवाह वर भव्य दिव्य स्टारकास्ट असलेली 'जिवलगा' मालिका नुकतीच (२२ एप्रिल) पासून सुरु झाली आहे. स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, आणि मधुरा ( आडनाव आठवत नाहीये आत्ता, पण गुलाबजाम चित्रपटात सिद्धार्थ ची प्रेयसी दाखवली होती ती ) असे नावाजलेले कलाकार आहेत.

त्यांच्यापेक्षा सतीश राजवाडे मुळे ही मालिका पाहण्याची उत्सुकता आहे, कारण मालिकेची संकल्पना त्याची आहे,
तर उमेश नामजोशी यांनी दिग्दर्शन केले आहे. विषय पण तसा बोल्ड दिसतोय थोडा.. विवाहबाह्य संबंध ( नवऱ्याला माहीत असते, असं )...
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा..
अजून कोणी पाहतं का ही मालिका???

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काव्याचे कपडे अन् दागिने आवडतात. कालचं ऑक्सिडाईज्ड गळ्यातलं फारच गोड होतं. >>> हो पण ती घरी येऊन कपडे बदलते आणि सलवार कमीझ (ओढणीवाला ) घालते ते काही पटत नाही.

हो पण ती घरी येऊन कपडे बदलते आणि सलवार कमीझ (ओढणीवाला ) घालते

>>> आणि वेगळं मोठं कानातलंही दिसतं Lol

काव्या-विश्वासचं घर, काव्या-निखिलचं ऑफिस, निखिलच्या घराचं स्वयंपाकघर - हे सगळं किती रंगीबेरंगी, चकचकीत दाखवलंय... होम-एक्स्पो टाईप प्रदर्शनात इंटिरिअर डेकोरेटरच्या स्टॉलवरचा देखावा असतो तसं वाटतं ते.

अमृताचा वॉर्डरोब जिने केलाय तिचं नांव येतं, स्पेशल मेहेनत घेतलीय. ती साडीत जास्त ग्लॅमरस दिसते मात्र. तो एक शर्ट आणि त्याखाली टाईटस लांब थ्री फोर्थ टाईप बरेचदा घालते ते मला नाही आवडत, दोन्ही व्हाईट आहेत.

ती साडीत जास्त ग्लॅमरस दिसते मात्र. तो एक शर्ट आणि त्याखाली टाईटस लांब थ्री फोर्थ टाईप बरेचदा घालते ते मला नाही आवडत,>>+१

निखिलचे तिच्यावर प्रेम नाही याची कधीतरी तिला जाणिव होईल आणि आपल्याकडे ती परत येईल या आशेवर विश्वासचे तिला परत मिळवायचे प्रयत्न प्रामाणिक वाटतात. ती मात्र विश्वासला खूपच गृहीत धरते आहे. निखिलला हा टाईमपास लय महागात पडणार आहे.

तो फोटो आईचा असावा असं वाटतंय मला.

हि काव्या थापा मारते विश्वासला, हिला फक्त निखिल आवडतो आणि ती गुंतली आहे त्याच्यात. तोच हवाय तिला. सवय वगैरे नाही, गुंतणं आहे तिचं.

किती वेळा ठरवते नाही बघायची ही सिरीयल पण ते अमृता सिद्धार्थ मोहात टाकतात. त्या दोघांमुळे लावली जाते. आज उदय टिकेकर कसा घुसला निखिलच्या घरात, कोणी पाठवलं त्याला विश्वास कि अमृता की आई तिची का अजून कोणी.

तसं असेल कारण एक कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो सुरु होणार आहे प्रवाहवर. बिग बॉस सुरु होणार आहे त्याचवेळी असेल, सोनीवर कोण होणार करोडपतीपण सुरु होतोय पण त्याचं टाईमिंग साडेआठ ते साडेनऊ आहे, बि बि चं साडे नऊ.

मला वाटले कि कोणत्यातरी नवीन मालिकेच्या जाहिरातीसाठी तो आलाय. >>>>>>>> मलाही. जॉनी लिव्हरच्या कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो ची अ‍ॅड करायला आलाय का अस वाटत होत.

बोलण्यावरुन तरी तो विश्वासचा वडील असावा अस वाटतय.

आडनाव देशपांडे होतं का त्याचं तर असेल विश्वासचा बाबा. विश्वास देशपांडे आहे ना. >>>>>>> हा त्याने आडनाव देशपांडे सान्गितल होत. विश्वास देशपांडे आहे हे नाही माहीत.

बादवे, आता विश्वास विधीच्या प्रेमात पडणार अस तर नाही ना दाखवणार. कालचा एपिसोड बघून असच वाटत होत.

आडनाव देशपांडे होतं का त्याचं तर असेल विश्वासचा बाबा. विश्वास देशपांडे आहे ना.>> हो. विनोद देशपांडे नाव होते. हास्यक्लबचे संचालक. वा!! म्हणजे ह्याची सून सगळ्यांना रडवणार आणि हा हसवणार!!!
पण मागे विश्वास म्हणत होता कि त्याच्या लग्नानंतर इतक्या वर्षात त्याचे बाबा त्याला भेटले नाहीत.

बादवे, आता विश्वास विधीच्या प्रेमात पडणार अस तर नाही ना दाखवणार. कालचा एपिसोड बघून असच वाटत होत.>> होना. तो विधीकडे असा बघत होता कि वाटले आता तिच्याच प्रेमात पडतो कि काय!

मी आधीच सुरु झाली तेव्हा लिहिलं की त्यांच्या फेसबुकवर की विश्वास विधीच्या प्रेमात पडलाय असं दाखवू नका. त्यादिवशी त्याची सासू पण म्हणाली की प्रेमात पडशील तिच्या Lol

आडनाव देशपांडे होतं का त्याचं तर असेल विश्वासचा बाबा. विश्वास देशपांडे आहे ना.>> हो. विनोद देशपांडे नाव होते. >>> मग बाबाच विश्वासचे.

मला तर वाटतं की विश्वास आणि विधीचंच जमावं उलट! कधीतरी इतकं बोल्ड व्हावं मराठी सिरीअल्सनी. सारखं कशाला माझी बायको आणि माझा नवरा मोड मधे रहायचं?

मला तर वाटतं की विश्वास आणि विधीचंच जमावं उलट! कधीतरी इतकं बोल्ड व्हावं मराठी सिरीअल्सनी. सारखं कशाला माझी बायको आणि माझा नवरा मोड मधे रहायचं?">>>>+१११११

मला तर वाटतं की विश्वास आणि विधीचंच जमावं उलट! कधीतरी इतकं बोल्ड व्हावं मराठी सिरीअल्सनी. सारखं कशाला माझी बायको आणि माझा नवरा मोड मधे रहायचं?>>>111111
सगळीकडे एवढा गवगवा चालला होता म्हणून star प्रवाह घेतला 2 दिवसापूर्वी. म्हणजे आजचा मिळून 3 एपिसोड पाहिलेत. एवढी काही खाआआआस नाही वाटली. May be सुरुवातीपासून नाही बघितली म्हणून असेल. अमृता सिद्धार्थ सोडून सगळेच अगदी गोड गोड वागताहेत. अगदीच आदर्श सासू सासरे. सगळेच आदर्श. विधी चे डोळे मोठे आहेतच कि उगा डोळे मोठे करून बोलते. आणि बरंय बाई जरा इमोशनल बोलले कि पैसे घेत नाही cake चे.

पण मागे विश्वास म्हणत होता कि त्याच्या लग्नानंतर इतक्या वर्षात त्याचे बाबा त्याला भेटले नाहीत. >>>>>>>>> आता भेटले असतील. बाकी विश्वास काय, आणि त्याचे बाबा काय दोघही अशक्य बोरिन्ग बडबड करतात.

तो कुरळ्या केसांचा कोडी घालणारा माणुस कोण होता? >>>>>>>>> विनोद देशपाण्डे. विश्वासचे वडील असावेत मेबी.

मला तर वाटतं की विश्वास आणि विधीचंच जमावं उलट! कधीतरी इतकं बोल्ड व्हावं मराठी सिरीअल्सनी. सारखं कशाला माझी बायको आणि माझा नवरा मोड मधे रहायचं? >>>>>>>>>> ++++++++११११११११ त्यापेक्षा ती केकता कपूर बरी. तिच्या हिरो- हिरवीणीन्ना पार्टनर्स बदलण्याचे फ्रिडम तरी असते.

विश्वास विधी यान्च सुखी साहित्यिक कुटुम्ब. विश्वासचे वडिल विनोदी साहित्याचे जाणकार, विधीचे वडिलान्ना वाचनाची, कलेची आवड, विधी स्वत: केकमेकर, केकवर कविता लिहून पाठवणारी. अहाहा! काय यान्ची फॅमिली असेल. दिवसभर एकमेकान्शी साहित्यिक संवाद साधून एकमेकान्ना बोर करतील. Biggrin

अमृता सिद्धार्थ सोडून सगळेच अगदी गोड गोड वागताहेत. अगदीच आदर्श सासू सासरे. >>>>>>>>> विधीची सासू कसली आलीये आदर्श? सतत आपली हिची ' घरात पाळणा हलायला हवी' ची भुणभुण. सुनेला छळत नाही, टोमणे मारत नाही, नातूच हवा अस म्हणत नाही एवढाच काय तो तिचा चान्गुलपणा.

मलापण आता वाटायला लागलं विधी आणि विश्वासचं जमावं >>>>>>>> अगदी अगदी. म्हणजे विश्वास आणि विधीला कळेल तरी विबान्स कसे होतात ते. निखिलच सत्य कळल्यावरसुद्दा ति कमी चिडचिड करेल. तिला त्याला ओरडण्याची सोय सुद्दा राहणार नाही. विश्वास म्हणतोय की निखिल काव्याच कळल्यावर विधी बिचारी कोसळून जाईल, ति स्वत: च्या कोशात जाईल. अस असेल तर बाबारे तूच का नाही तिला पाडत प्रेमात स्वतः च्या.

अमृता सिद्धार्थ छान वाटतात एकत्र. >>>>>>>>>>> +++++++२२२२२२२२२२ विधीची सुटका तरी होईल नवरा आणि सासूच्या जाचातून . निखिलच्या आईला काव्यासारखीच सून मिळायला हवी होती. ओव्हर एम्बिशिअस काव्याने मुळीच टॉलरेट केल नसत सासूच्या भुणभुणीला. लग्नान्तर दोनच दिवसात निखिलला वेगळ राहायला लावल असत. Lol

बादवे, त्या एम्पलॉयीने कुणाला फोन केला? विश्वासच्या वडिलान्ना?

विधी निखिलशी कोडयात बोलत होती. दोघात तिसरा, बाहेर जेवायला जाऊया वै वै. ती प्रेगनन्ट आहे की काय? म्हणून गुड न्यूज सान्गायला त्याला बाहेर घेउन जात असेल? तिला डाउट तर नसेल आला त्याचा? Uhoh

कुरळ्या केसांचा माणुस विश्वासचा बाप Uhoh पटलं,नक्कीच असु शकतो.तरीच विश्वा सारखा फिलोसॉफी च्या मुडमधे असतो.

पण एवढे सगळे कलाकार एकत्र आणूनही अजून तुपारेएवढी प्रसिद्धी नाहीच..
'इट्स सो बॅड दॅट इट्स गुड' असं तर नसेल काही?

ILU मला गेल्या १-२ भागात विधीची अ‍ॅक्तिन्ग आवडली आहे पण विश्वासचा जरासुद्धा विचार काव्या करत नाही? तिला तो सपोर्ट म्हणूनच हवा आहे आणी निखिलची सवय म्हणून पण सगळ्यात महत्वाचा तिचा इगो आहे तिच्या द्रुश्टिने!
प्रोमोत विधी ने निखिल-काव्याला हग करताना पाहिलिय .

प्रोमोत विधी ने निखिल-काव्याला हग करताना पाहिलिय >>> ते फक्त प्रोमोपुरतं असू शकतं Wink

अ.खा.चे मराठी उच्चार या मालिकेत खूपच सुधारलेले आहेत. विशेषत: 'फ' चा योग्य तिथे ph असा उच्चार. याआधी तिच्या सिनेमांमध्ये वगैरे तिचे मराठी उच्चार खूपच आंग्लाळलेले असायचे.

`मला कळलाय माझा प्रॉब्लेम काय आहे...' हा सीन तिनं खूपच छान केला.

Pages