जिवलगाssssssss

Submitted by मीनाक्षी कुलकर्णी on 24 April, 2019 - 06:37

स्टार प्रवाह वर भव्य दिव्य स्टारकास्ट असलेली 'जिवलगा' मालिका नुकतीच (२२ एप्रिल) पासून सुरु झाली आहे. स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, आणि मधुरा ( आडनाव आठवत नाहीये आत्ता, पण गुलाबजाम चित्रपटात सिद्धार्थ ची प्रेयसी दाखवली होती ती ) असे नावाजलेले कलाकार आहेत.

त्यांच्यापेक्षा सतीश राजवाडे मुळे ही मालिका पाहण्याची उत्सुकता आहे, कारण मालिकेची संकल्पना त्याची आहे,
तर उमेश नामजोशी यांनी दिग्दर्शन केले आहे. विषय पण तसा बोल्ड दिसतोय थोडा.. विवाहबाह्य संबंध ( नवऱ्याला माहीत असते, असं )...
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा..
अजून कोणी पाहतं का ही मालिका???

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा तुमची ईच्छा पूर्ण झाली. नुसतं भांडणच नाही तर झटापटी झाली निखिल आणि विश्वासची. फारच हॅपनिंग एपि. विधी घर सोडून जाणार पुढच्या भागात आणि कानाखालीपण मारणार निखिलच्या. त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. निखिल आणि काव्या दोघंही स्वार्थी आहेत. सगळं सोयीस्कर आठवतं आज विश्वास म्हणाला तसं. स्वत: काय पाहिजे ते करतील पण त्यांच्या जोडीदाराने ईकडेतिकडे बघायचंही नाही. वा!!

निखिल आणि काव्या दोघंही स्वार्थी आहेत. सगळं सोयीस्कर आठवतं आज विश्वास म्हणाला तसं. स्वत: काय पाहिजे ते करतील पण त्यांच्या जोडीदाराने ईकडेतिकडे बघायचंही नाही. वा!! >>> अगदी अगदी.

ती बॅग फेकली तेव्हा मला वाटलंच, त्यातलं फोटो असलेलं वॉलेट पडेल आणि विधीला मिळेल. तसंच होणार आज. विश्वास विधीने आपापल्या जोडीदारांना डीव्होर्स द्यावा. ह्या दोघांचं पुढे एकत्र येणं झालं तर ठीक नाहीतर मुव ऑन होऊन आपापली आयुष्य जगावीत.

ह्या दोघांचं पुढे एकत्र येणं झालं तर ठीक >>>>>> आ अन्जूतै, पण तुम्हीच फेसबुकवर लिहिल होत ना की विश्वास आणि विधीला एकत्र आणू नका म्हणून? Uhoh

बादवे, विधीला कळल का काव्या विश्वासची बायको आहे ते?

विश्वास आणि विधीला एकत्र आणू नका म्हणून? >>> हो हो, मीच लिहिलेलं पण आता आले तरी चालतील असं वाटायला लागलंय Lol

किंवा त्यांचे त्यांचे स्वतंत्र विश्व आहे, फक्त निखळ मैत्रीही होऊ शकते.

बादवे, विधीला कळल का काव्या विश्वासची बायको आहे ते? >>> हो तिला वॉलेट मिळालं विश्वासचं, त्यात त्या दोघांचा एकत्र फोटो होता.

निखीलचे बाबा काव्याला संस्कार वगैरे सुनावत होते, विधी कशी संस्कारी आहे . तेव्हा काव्याचा डायलॉग मस्त होता, निखिलवरचे संस्कार काढले तिने.

हे संस्कार कधी काढले गेले, आज रात्रीच्या एपिमध्ये का. सोमवारी रिपीट बघावा लागेल. निखिलने तमाशा केल्यानंतर विधीने चांगला अभिनय केला. निखिल कधीही निघाला की काव्या म्हणते तू जाऊ नकोस, मला तुझी सवय झालीये, हसायलाच येतं, लहान मुलांचं आवडतं खेळणं असतंं ना, तसं. निखिलही खूप वैतागला आणि काव्याच्या एकाच डोळ्यातून पाणी येतं होतं.

सवय झालीय, सवय झालीय हे डोक्यात जातं अगदी.

हे संस्कार कधी काढले गेले, आज रात्रीच्या एपिमध्ये का. >>> हो. निखिलचे बाबा काव्याला भेटायला ऑफिसमध्ये येतात. तिला सुनावतात, मग तीही सुनावते. संस्कार तिचे काढायचे असतील तर निखिलचे काढायला नकोत का, योग्य होतं तिचे.

विधी किती वेळा विचारते कि तुझे बाहेर अफेअर आहे का? निखिलला पूर्ण कल्पना आहे कि तिला कळले आहे तरी एकच वाक्य 'माझे कुठेही अफेअर नाही.' आता पुढे याचे स्पष्टीकरण देईल कि आधी होतं पण तू विचारले तेव्हा संपले होते.
काव्या म्हणते तू जाऊ नकोस, मला तुझी सवय झालीये, हसायलाच येतं, >>+१ त्यावरून चांगले सुनावतो तो तिला.
संस्कार तिचे काढायचे असतील तर निखिलचे काढायला नकोत का, योग्य होतं तिचे.>>+१

निखिलचे बाबा शेवटी सुनावतात जे काव्याला, विधीचा दाखला देऊन तो एकप्रकारे शाप होता पण हेच त्यांनी लेकालाही सुनवायला हवं होतं, तिथे उलट सांगत राहतात की विधीला कळता कामा नये हे अफेअर. विधीचा शाप लागयचाच असेल तर दोघांनाही लागायला हवा की निखिल आणि काव्याला.

गंडल्ये ही सीरियल, काल तो निखिल विश्वास वर डायरेक्ट हात उचलतो, बायकोला केक शॉप मध्ये भेटला म्हणून... का सुरुये मालिका का ???????

मालिका बर्‍यापैकी पकड घेत सुरू आहे.
काव्या आणि आबांचा सीन आवडला. (पण बहुतेक सगळी कन्फ्र्न्टेशन्स केक शॉपमध्ये नाहीतर काव्या-निखिलच्या ऑफिसमध्येच दाखवतात Uhoh )

यात बहुतेक सगळी पात्रं काही ना काही चुका करताना दाखवली आहेत. ते आवडलं. सद्गुणाचे पुतळे पाहायचा वीट येतो.
तरी त्यातल्या त्यात विधी (म्हणजे मधुरा देशपांडे) मी किती साधी, सरळ, सोज्ज्वळ असं दाखवत वावरते; ते कधीकधी बोअर होतं. तिचा केक शॉपमध्ये कपाटाच्या कोपर्‍यात बसून, दु:खाच्या पोझेस घेत रडतानाचा सीन तसाच होता.
तिच्यापेक्षा स्व.जो. आतल्या आत धुमसणारा विश्वास चांगला दाखवतोय.

त्याआधीच्या सीनमध्ये तिची संगम सिनेमातली वैजयंती माला झाली होती. Biggrin (राजकपूरचं विमान उडल्यावर ती खालून म्हणते मैं तुम से प्यार नहीं करती; तसंच ही निखिल निघून गेल्यावर म्हणते मी तुला पाहिलंय काव्याच्या मिठीत) पण पुढच्या एपिसोडमध्ये ती दूध का दूध पानी का पानी करणार बहुतेक.

तिचा केक शॉपमध्ये कपाटाच्या कोपर्‍यात बसून, दु:खाच्या पोझेस घेत रडतानाचा सीन तसाच होता.>>> अरे हा फार रिअ‍ॅ लिस्टिक दाखवला आहे.
असे साधे लोक असेच कोलमडतात. मला तर एकदम आव डला. खात्रिशीर रीत्या प्रेम भंग झाला आहे हे कळण्याचा क्षण माणूस असाच पोटात सुरी खुपस ली गेली असल्या सारखा डगमगतो. व खाली बस्तो कुठेतरी.

त्या आधीचे दोन एपिसोड पण एकदम मस्त घेतले आहेत. बिल्ड अप व मग स्फोट. काव्या व निखिल भेटतात त्या इमारतीतली ती जाडी मुलगी कोण आहे?

निखिल ला च सत्त्य पचवायला जड जाते आहे. तो काव्याला काय सवय सवय म्हणून ओरडतो ते लै भारी.

पन हे लोक्स लफड्याच्या नादात ऑफिसचे काम फारच विसरून चालले आहे इ नॉ चॉलबे.

काव्याची ऑरेंज साडी व ब्लाउज एकदम भारी. इतके मोठे कानातले घालून येतात ऑफिसला? हाइ.

खरे तर गॉन विथ द विंड मध्ये पण असेच आहे. स्कार्ले ट कायम अ‍ॅशली च्या प्रेमासाठी तडफ् डते. पण तिला ते मिळत नाही. शेव्टी ते उमजून एक मित्र म्हणून ती त्याला मि ठी मारते. तेव्हा नेमके अ‍ॅशलीची बायको मेलनी त्यांना बघते. व घात होतो.

ललिता प्रिती> डाउन टन अ‍ॅबीचा सिनेमा येतो आहे. बघायला विसरू नका तुमची फेवरिट सीरीअल ना?

आता विधी निखिलला थोबाडीत मारणार ना? वाट बघत आहे. >>> मी पण. मालिकांमधे असे प्रसंग फारसे नाही बघायला मिळत.

बाकी निखिल आणि काव्याच्या हापिसात हे घरचे लोक्स सारखेसारखे येऊन कॅंटीन मधे बसुन अश्या पर्सनल गोष्टी कश्याकाय डिस्कस करतात.

अरे हा फार रिअ‍ॅलिस्टिक दाखवला आहे >>>

तो सीन चांगला होताच, मी मधुरा देशपांडेच्या अभिनयाबद्दल बोलत होते.

विश्वास पटेल असं स्पष्टीकरण देतो. काव्याबद्दल तो वाईट बोलतो तर मा लगेच म्हणते की तुझ्यातही उणिवा आहेत. सिरीयसली? तो इतकी वर्षे त्या स्वार्थी काव्याला सांभाळून घेतो त्याचं काहीच नाही Uhoh त्याने त्याग मूर्ती बनून राहायचे का, काहीही अपेक्षा.

विश्वास पटेल असं स्पष्टीकरण देतो. काव्याबद्दल तो वाईट बोलतो तर मा लगेच म्हणते की तुझ्यातही उणिवा आहेत. सिरीयसली? तो इतकी वर्षे त्या स्वार्थी काव्याला सांभाळून घेतो त्याचं काहीच नाही Uhoh त्याने त्याग मूर्ती बनून राहायचे का, काहीही अपेक्षा. >>>>>>>> अगदी अगदी. कालपरवापर्यन्त हिच मा तु काव्याला घटस्फोट दे, राहू नको तिच्याबरोबर, ती स्वार्थी आहे बोलत होती. आज तिच्या मुलीवर शेकतय म्हणून सडनली तिची बाजू घेतली! हे तर मानबाच्या गुरुमायच्या वरताण झाल.

विधी अभिनय चांगला करतेय सध्या, मी fb वर पण लिहिलं कारण मागे कृत्रिम वाटायचा तेव्हाही लिहिलं होतं मग आता चांगला करतेय ते लिहिणंही माझं कर्तव्य होतं >>>>>>>>>> Lol मग आता पुढच्यावेळी हेही लिहा एफबीवर की विश्वास- विधीच जुळवा प्लीझ!

सूलू सेम pinch. एकाच वेळी आपल्या कमेंट्स पोस्ट झाल्या. >>>>>>>> +++++++++११११११११११११

हो ना, मां चे बोलणे कसं बदललं. मागे हीच सांगत होती विश्वासला की तिची मुलगी बरोबर नाही वागत, तू डिव्होर्स घे.

विधी अभिनय चांगला करतेय सध्या, मी fb वर पण लिहिलं कारण मागे कृत्रिम वाटायचा तेव्हाही लिहिलं होतं मग आता चांगला करतेय ते लिहिणंही माझं कर्तव्य होतं Lol

बराच ड्रामा चालू आहे. इतके दिवस सगळे जरा जास्तच शांत आणि समजुतीने, एकमेकांना मॅनेज करत प्रश्न सोडवत होते. पण विधीने निखिलची चांगलीच शाळा घेतली. बाबांच्या मते विश्वासही भडकला आहे. आता तो काय करतो ते बघायला पाहिजे.

सगळ्यात जास्त ऑफ काव्या वाटतेय, नवरा रात्रभर घरी आला नाही तरी बाई नटुन थटुन हापिसात वर निखिलला फोन करुन म्हणते घरचे प्रॉब्लेम ही रुटिन गोष्ट आहे मितिन्गला ये .
काव्या आणी निखिलमधे निदान निखिलला आपल्या चुकिची जाणीवतरी आहे, काव्याचा तोही पत्ता नाही, मॅदम येगळ्याच ग्रहावर असतात.
विधीचा स्फोट अगदी परफेक्ट दाखवायलाय पण मुल होवु दिल नाही हा मुद्दा बर्‍याच वेळा आणतेय( अन्डरलाइन काहितरी वेगळ म्हणायच असाव शारिरिक सबन्ध एक-दोन नाही तर ३ वर्श चान्गले नाही हा अगदी योग्य सन्शय देणारा मुद्दा आहे.

काव्याला निखील हवाय हे सरळ दिसतंय, पण तरीही नवऱ्याला सोडायचे नाहीये. डिव्होर्स द्यायला तयार नाही. नवरा रात्रभर घरी आला नाही तरी हिचा इगो, निखील हवाय.

आता तर व्हिलन होईल बहुतेक काव्या Lol

विधीच्या दुकानाचे नाव बदनाम करायचा डाव पण विश्वास खोडून काढेल, प्रीकॅप मध्ये बघितलं.

विधीचा स्फोट अगदी परफेक्ट दाखवायलाय >>> अगदी. ती आता आवडायला लागली आहे. टिपिकल रडक्या, अती समजुतदार्, बुळ्या हिरवीणीपेक्षा छान आहे.

हो हो विधी मस्तच काम करते आहे. निखीलचे दूर जाणे काव्यासाठी इगो इशू झाला आहे. काल त्याने नोकरी सोडायची भाषा केली ही आधीच
करा यला हवी होती. मालिका चालू असताना ते फार संयत बोलताना आपल्या डोक्यात जे लै भारी प्रतिसाद येतात ते फार मनो रंजक इथे लिहिण्यासारखे नाहीत. पण लास्ट वन वीक एकदम हॅपनिन्ग झाले आहेत.

दोन्ही ही कपल ला मुल नाहीत सरळ वेगळे झाले पाहिजे .
विश्वास बावळट वाटतो आणि निखिल आणि काव्या महा swardhi.
दोघांना सुधा दोन पार्टनर पाहिजेत .

विधीचा स्फोट अगदी परफेक्ट दाखवायलाय हो हो विधी मस्तच काम करते आहे. >>>>>>>> अगदी अगदी. स्वजोचे काम सुद्धा सुधारले आहे.

विधीच्या दुकानाचे नाव बदनाम करायचा डाव पण विश्वास खोडून काढेल >>>>>>>> पण काव्याला काय मिळणारे तिला बदनाम करुन? तिला निखिल थोडीच मिळणार आहे?

मुल होवु दिल नाही हा मुद्दा बर्‍याच वेळा आणतेय( अन्डरलाइन काहितरी वेगळ म्हणायच असाव शारिरिक सबन्ध एक-दोन नाही तर ३ वर्श चान्गले नाही हा अगदी योग्य सन्शय देणारा मुद्दा आहे. >>>>>>> ती म्हणाली सुद्दा, बायकोच्या हक्काच सुख सुद्दा हयाने मला दिल नाही. हल्ली झीम असल्या मुद्दयान्चा उल्लेख करायलाही घाबरतात. Lol

विश्वासने दाढी वाढवली? Uhoh

विधी निखिलला हलकट म्हणते आणि हि डिझर्वज इट. आजपर्यन्त नायिकेने आपल्या नालायक नवर्याला थोबाडीत मारताना तर सोडा, पण हलकट म्हणताना सुद्दा कुठल्याच मराठी सिरियलमध्ये बघितल नव्हत. हा, बायकोला बावळट, बेअक्कल म्हणताना शेकडोवेळा दाखवलय.

काव्या म्हणते की विश्वास- विधी पळून गेले असावेत. आय होप तिच म्हणण खर ठराव एकेदिवशी. विधीची आई सुद्दा तिला समजून घेत नाही.

Pages