जिवलगाssssssss

Submitted by मीनाक्षी कुलकर्णी on 24 April, 2019 - 06:37

स्टार प्रवाह वर भव्य दिव्य स्टारकास्ट असलेली 'जिवलगा' मालिका नुकतीच (२२ एप्रिल) पासून सुरु झाली आहे. स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, आणि मधुरा ( आडनाव आठवत नाहीये आत्ता, पण गुलाबजाम चित्रपटात सिद्धार्थ ची प्रेयसी दाखवली होती ती ) असे नावाजलेले कलाकार आहेत.

त्यांच्यापेक्षा सतीश राजवाडे मुळे ही मालिका पाहण्याची उत्सुकता आहे, कारण मालिकेची संकल्पना त्याची आहे,
तर उमेश नामजोशी यांनी दिग्दर्शन केले आहे. विषय पण तसा बोल्ड दिसतोय थोडा.. विवाहबाह्य संबंध ( नवऱ्याला माहीत असते, असं )...
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा..
अजून कोणी पाहतं का ही मालिका???

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ता adमध्ये पाहिल विश्वास काव्याला निखिलमधुन बाहेर काढणार? शेवटी जोश्या म्हायी बायको म्हायी बायकोच करणार! Lol

कंटाळा आला बुवा इतक्यातच, यापुढे कधीतरीच बघणार मालिका, स्व.जो जाम डोक्यात जातो हल्ली Sad

हो मी पण त्याचे scenes forward करते... 5-6 episodes झाले तरी नवीन काहीच घडलं नाही... गोल गोल फिरत आहेत नुसते

काव्याने सांगितलेलं नाही, मला दुसरीकडून समजलंय - असं विश्वास काव्याच्या आईला सांगताना दाखवलंय. >>> हो का अच्छा.

अमृता फारच छान काम करते आहे+111
विधी अजिबात आवडली नाही मला.. >>> अगदी अगदी.

सिद्धार्थला ग्रे शेड दाखवतील बहुतेक, खोटं बोलतो. ते काव्याला समजेल मग विश्वास कित्ती चांगला हे पटेल असं सर्व ओढूनताणून दाखवणार.

मधुरा देशपांडे मला याआधीपण कधीच आवडली नाही, ती असली की मी सिरीयल बघत नाही. स्वप्निल पण फार कृत्रिम वाटतो. घना तरी जरा आवडलेला पण इथे अजिबात नाही.

स्वप्निल पण फार कृत्रिम वाटतो. +11

3 वर्ष नवरऱ्याचे अफेयर सुरू आहे आणि बायकोला काहीचं doubt नाही. हे अशक्य आहे...

निखिलची बायको म्हणते लग्न झाल्यावर काहीही झालं तरी लग्न मोडायचं नाही, निखिल मिळालाय म्हणून असं म्हणतेय लब्बाड Wink विश्वास मिळाला असता नवरा म्हणून तर स्वत:च घटस्फोट मागितला असता तिने. >>>>>>>>> खर तिला विश्वासच सूट होतो नवरा म्हणून. दोघे अतिआदर्शवादी आहेत. अरे, इकडे नवरा कुठल्याच गोष्टीसाठी स्पष्ट स्टॅण्ड घेत नाही, सासू सारखी ' मूल हवय' ची भुणभुण करतेय आणि तरीही हिला लग्न मोडायचं नाही म्हणे.

3 वर्ष नवरऱ्याचे अफेयर सुरू आहे आणि बायकोला काहीचं doubt नाही. हे अशक्य आहे... >>>>>>>>>> राधाक्काने तर तिचा रेकॉर्ड कधीच मोडलाय. Proud

खर तिला विश्वासच सूट होतो नवरा म्हणून. दोघे अतिआदर्शवादी आहेत.+111

राधाक्काने तर तिचा रेकॉर्ड कधीच मोडलाय> खरंय..

मी हल्ली नाही बघत, शेवटी लावलं काल. तर एक सीन विश्वास येतो, तेव्हा ती तू कसा आलास, etc, flashback होता बहुतेक, कारण तो विचारतो तुमचं अफेअर आहे का, ती हो म्हणते, तेव्हा त्याने दुखावला गेल्याचा अभिनय चांगला केला, मग घरी येते का विचारतो, ती म्हणते येऊ का. पण ते कुठे असतात निखिल, काव्या आणि हा तिथे कसा येतो ते मला समजलंच नाही.

तो एपि मीपण बघितला आत्ता. ते विश्वासचं आॅफिस आहेे बहुतेक. काव्या म्हणतेे, तुला ईथे येऊ नको म्हणून सांगितलंय ना Uhoh त्याच्या आॅफिसात तो येणार नाही का. अपराधीपणाचा मागमूस नाही. अफेअर आहे का विचारलं तर हो म्हणते आणि लगेच विचारते, तू काही खाणार का. विबासं फारच काॅमन आणि साधी गोष्ट आहे वाटतं त्यांच्यात कारण विश्वासच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं पण तो तिला विचारतो की तू घरी येणार का. कैतरीच वाटलं मला हे सगळं. तिनेही जायचं ना त्याच्याबरोबर घरी. परत ही वेगळी जाणार त्याचा वेगळा खर्च. आॅफिसात आल्या आल्या निखिल त्याच्या मित्राबरोबर विबासंबद्दल चर्चा करतो, मग काव्या आल्यावर केबिनमध्ये जाऊन परत तेच. काम कधी करतात हे लोक्स.

ऑफिस नव्हे, ते त्यांचं दुसरं घर असतं... विश्वास तसं म्हणताना दाखवलंय

तो सीन चांगला होता, कुणाचाच आवाज जराही न चढता प्रसंगातला ताण चांगला दाखवला.

ती लोकं हापिसात जातात तिथ येणार्या लोकांच चहापाणी विचारतात आणि ज्युनियरवर डोळे मोठे करून वरडतात,तेच त्यांच काम.

घरी परतल्याव घरातला आपला मानुस(नेमकं कोण असेल माहित नाय) त्यांना इचारणार आज लय काम होत का हापिसात?तर ते बाहेरन दमुन Uhoh आलेल मानुस एकतर समोरच्याव कावणार..

नायतर

"हो अगं!आज workload? खुप होता.लागोपाठ client meetings? होत्या."हिच ठरलेली पुणेरी प्रमाणभाषेतली वाक्य चिटकवणार!

मी कालचा एपी बघीतला, त्यावरुन मी काढलेला निष्कर्श काहीसा असा आहे की, लफडी करा ती चांगली असतात, त्याने तुम्ही आंनदी राहता , अन तुम्ही खुश राहीला न कि तुमच्या जोडीदाराला तुमच्या वर संशय येत नाही. पण
पण पण पण जर का तुम्ही त्यातुन बाहेर पडायचा प्रयत्न वा विचार जरी केला न तर तुमची शांतता, मनस्वास्थ सगळे सगळे संपलेच म्हणुन समजा, मग काय ईतका वेळ / वर्शे बाहेर शेण खावुनही ज्या बायको / नवर्याला काही कळलेले नसते . त्यांना अचानक तुमच्यावर संशय येवु लागतो, ले मज्जा.

ऑफिस नव्हे, ते त्यांचं दुसरं घर असतं... विश्वास तसं म्हणताना दाखवलंय >>> अच्छा. मी येता जाता बघितला त्यामुळे कळलेच नाही.

तो सीन चांगला होता, कुणाचाच आवाज जराही न चढता प्रसंगातला ताण चांगला दाखवला. >>> हो मला स्वप्नीलचा अभिनय पहिल्यांदा natural वाटला, ह्या सिरीयलमधला.

मी चक्क पूर्ण एपिसोड बघितला. डायलॉग्ज काही काही फार सुरेख आहेत. विधी काव्या भेटीत, विधींचे डायलॉग्ज मस्त होते अभिनय सहज नव्हता.

काव्याच्या आईचे डायलॉग्ज पण अप्रतिम होते, आई नाटकी वाटत नाही, रियल वाटते. अभिनय सहज करते. मुलीला उगाच पाठीशी घालणारी वाटत नाही, मध्ये मध्ये विश्वासला मस्त झापत होती.

जिवलगामधे काही डायलॉग्ज अप्रतिम असतात, काल आवर्जुन नावं बघितली. स्वामी बाळ आहेत संवादलेखक. स्टार प्रवाहच्या फेसबुक पेजवर पण लिहून आले.

कालचा स्वप्निल अमृता सीन मस्त झाला, डायलॉग्ज पण मस्त. सिद्धार्थ आणि राजन भिसे सीनपण मस्त झाला. सिद्धार्थ मधुरा सीन बोअर मात्र.

मालिकेत अजून तरी ढणाढणा पार्श्वसंगीत, शेकडो अँगल्सनी प्रत्येक पात्राचे क्लोज-अप्स असलं काही नाहीये... ही एक जमेची बाजू

चौघांना चार स्टॉक एक्स्प्रेशन देऊन ठेवलेत, इनोसंट बाई तिचा गंडलेला बाप्या, चिरडीला आलेली बाई आणि तिचा भकास पेन्सिव पकाव बाप्या.

सीरिअल आणि धाग्याचे जितके गाजावाज्यात आगमन झाले तितके प्रतिसाद मात्र पडत नाहीत इथे. बहुदा लोक कंटाळा करतात चांगल्या सिरीयल वर लिहायला का हि सुद्धा पकाऊ असल्यामुळे लिहिण्याचा लायकीचे सुद्धा लोक समजत नाही आहेत इथे. (विचार करणारी बाहुली).

बाकी काही हि म्हणा एन्टरटेनिंग धागे काय ते 'झीम' च्या सिरियल्सवरच निघू शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

हि सुद्धा पकाऊ असल्यामुळे लिहिण्याचा लायकीचे सुद्धा लोक समजत नाही आहेत इथे. (विचार करणारी बाहुली).>> मला पण वाटले लिहूया पण ह्यात विबासं चा काहीही चेव नाहीये. जेव्हा चांगले भांडण व्हायला हवे तेव्हा अखंड समजुतदार पणा चालू आहे. निखिल च्या घरी सगळे गोड.
बरे त्यांचे दोघांचे प्रस्म्ग पण फार पॅशन जनरेट करत नाहीत. काव्या सारखी बाई मला भेटती तर तुकडेच केले अस्ते. पण सबकु चल रहा है तो मै कायको परेशान होना. एकूण सर्व पीळ वाटले मला तरी. दे आर गोइन्ग थ्रू द मोशनस. व एकदम चटपटीत लुक आहे. दर वाक्याला सुभा षिते नाहीतर ग्रेट एपि फनी बोलायचा मोठा आव आण णे आहे. व स्वजो डफर

दर वाक्याला सुभा षिते नाहीतर ग्रेट एपि फनी बोलायचा मोठा आव आण णे आहे. व स्वजो डफर >>> Lol

टायटल song आणि काही डायलॉग्ज आवडतात मला पण रोज अगदी बघावी असं नाही वाटत. अमृता आवडते पण कधी कधी छान दिसते, कधी कधी खप्पड. तिची आई आवडली मला मात्र, फार रियल दाखवली आहे. उगाच लेकीला पाठीशी घालत नाही आणि त्या जावयाला पण सुनावत असते. मी माय लेक सीन मात्र बघितला नाहीये त्यामुळे ती काव्याला काय बोलते, सुनावते missed.

अमा यु रॉक ऑलवेज, एक्दम भारी पोस्ट लिहलिये तुम्ही,
विवाहबाह्य सबन्ध यावर चटपटित अस बरच काही करता आल असत पण इथे सगळ सन्थ, अतर्मना तु धिर धर टाइप सगळ चालु आहे, मधुरा पहिल्या एपिसोड ला अति गोड गोड वाटलेली आता टोन डाउन वाटतेय, बाकी निखिलला कव्याला का सोडायच ते कळत नाही? ढेरपोट्या स्वजो ची प्रवचन एक्वत नाही( ते सगळच मी पुढे करते)), राधिका सारख स्वजो माझी काव्या निखिलला सोडुन येइलच किवा तिला मी त्यातुन सोडवेल वैगरे जाम पकावु प्रकार चालु आहे.
काव्या स्वजोला समोरही उभ करत नाही

Pages