जिवलगाssssssss

Submitted by मीनाक्षी कुलकर्णी on 24 April, 2019 - 06:37

स्टार प्रवाह वर भव्य दिव्य स्टारकास्ट असलेली 'जिवलगा' मालिका नुकतीच (२२ एप्रिल) पासून सुरु झाली आहे. स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, आणि मधुरा ( आडनाव आठवत नाहीये आत्ता, पण गुलाबजाम चित्रपटात सिद्धार्थ ची प्रेयसी दाखवली होती ती ) असे नावाजलेले कलाकार आहेत.

त्यांच्यापेक्षा सतीश राजवाडे मुळे ही मालिका पाहण्याची उत्सुकता आहे, कारण मालिकेची संकल्पना त्याची आहे,
तर उमेश नामजोशी यांनी दिग्दर्शन केले आहे. विषय पण तसा बोल्ड दिसतोय थोडा.. विवाहबाह्य संबंध ( नवऱ्याला माहीत असते, असं )...
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा..
अजून कोणी पाहतं का ही मालिका???

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिद्धार्थची आई अती करते आहे असं वाटायला लागलंय. किती ते बाळाचं रडगाणं! त्या दोघांना ठरवूदे की!! >>> हो ना. आता मला पाठ झालंय, ती दिसली की हीच चर्चा.

एकंदरीत ही सिरीयल मी फार बघु शकणार नाही. ती काव्या काही निखिलला विसरणार नाही, तो निखिल तुटक वागत असला तरी काहीना काही कारणाने ह्यांच्या भेटीगाठी होत रहाणार, सिरीयल तिथेच फिरत रहाणार गोल गोल. त्या बायकोला कळणार, ती हर्ट होणार आणि ते बरोबर आहे म्हणा. तो विश्वास त्या काव्याच्या अवतीभोवती मी कित्ती समजुतदार नवरा, गोड, कुल नवरा असे डायलॉग्ज ऐकवत बसणार.

साडीत अमृता छान दिसत होती मात्र, ते कानातलेपण शोभून दिसत होते. एरवीचे ड्रेसेस मला नाही आवडले.

हो, सारखं ते 'जिवलगा ssss' बोअर होतंय...

मधुरा देशपांडेही बोअर झाली जरा... सहज अभिनय या नावाखाली ओव्हर अ‍ॅक्टिंग होतंय

पण तरी काही दिवस आणखी बघणार आहे.

जोश्याला त्याची बायको त्याच्यापेक्षा दुसर्याला जास्त भाव देते,आणि ह्याच्यावर काहीच परिणाम होत नाही(दगडपण म्हणता येत नाय,दगडावर परिणाम होईल पण याच्यावर नाय) .त्याची साबा (साबाच ना?) म्हणते कि बाबारे तु तिला घटस्फोट दे तर ते हि नाही.

काव्यालासुद्धा दोघही हवेत.बये एकालाच पकड की.

कैच्याकै दाखवतात लोक बघतात म्हणून,वैताग नुस्ता! Angry Angry

@ मन्याS +११११११
धाग्याचं नाव जिवलगाSSSSSSS! असं बदलावं ही विनंती!

धाग्याचं नाव जिवलगाSSSSSSS! असं बदलावं ही विनंती! >>> बदल केला Happy
एकंदर पाहता मालिकेपेक्षा त्याचं फक्त शीर्षकगीतच चांगलं आहे म्हणायचं. जास्त दिवस बघू ही मालिका असं वाटत नाहीये काही

धाग्याचं नाव बदलल्याबद्दल धन्यवाद!
मी ऑलरेडी सोडलीये ही मालिका बघणं, कारण एकदा मालिकेत भिकारपणा दिसला, की तो दिवसेंदिवस वाढतच जातो, पण कमी होत नाही, असं माझं ठाम मत झालंय.
काहीतरी बोल्ड विषय दाखवू म्हणताना पुन्हा तोच दळभद्रीपणा या मालिकेत दिसतोय.
थँक्स स्वप्नील जोशी, त्या मला पुन्हा बरोबर ठरवलंस. सोन्या, बाललीला बालपणातच चांगल्या वाटतात. मोठेपणी त्या केल्या तर एकतर तो यडपट ठरतो किंवा सायको, आणि प्लिज, स्वतःच रोमँटिक हिरोच टॅग मिरवण सोड... तुझ्यापेक्षा तो लाल स्वेटर घातलेला ऋषी कपूर बरा वाटायला लागलाय आजकाल...
अँड प्लिज, लूज सम वेट. बॉडी शेमिंग नाही, पण तुला ढोबळ्याशिवाय दुसरी उपमा द्यावीशी नाही वाटत. कुणीही राम कपूरसारखी ओबेस बॉडी नाही कॅरी करू शकत. इट नीड गट्स अँड स्टाईल, जी तुझ्याकडे नाहीये...

स्वप्निल जोशी विश्वासपेक्षा एलदुगोमधला घना जास्तconvincing वाटायचा मला,पण जिवलगा ऽऽत बघवतच नाही.मुपुमु2-3 मध्येपण तसंच.

मी पण नाही बघत आता. परवा रिपीट मध्ये एक शॉट बघितला तर अमृता खरंच प्रेमात आहे सिद्धार्थच्या असं वाटतं. बरोबर आहे तिचे. स्वप्निलच्या प्रेमात पडण्यासारखे काहीच नाहीये, किती बोअर करतो Wink Lol

एनीवे पण तिने जबरदस्ती करू नये, सिद्धार्थ म्हणजे निखीलला हे नातं पुढे न्यायचं नाहीये तर थांबावं तिने. दोघांनाही सोडावं आणि कामावर लक्ष केद्रित करावं. एकटीने आयुष्य एन्जॉय करावं.

काव्या आणि निखीलला हे नातं पुढे न्यायचं असेल तर जोडीदारांना घटस्फोट द्यावा. असं त्यांची फसवणूक करून हे अनैतिक नातं पुढे नेऊ नये.

काव्या आणि निखीलला हे नातं पुढे न्यायचं असेल तर जोडीदारांना घटस्फोट द्यावा. असं त्यांची फसवणूक करून हे अनैतिक नातं पुढे नेऊ नये.>
हा विचार कदाचित पटणार नाही, पण हे नातं त्यांनी लग्नाच्या नात्यात नसलेल्या किंवा मिसिंग असलेल्या एखाद्या फीलींगसाठी जवळ केले आहे..ते कायमचे करणे हा दोघांचाही उद्देश नाही....

बाकी बायकोला फसवून करण्यापेक्षा स्व. जो. सारखं सांगून करावं

एनीवे पण तिने जबरदस्ती करू नये, सिद्धार्थ म्हणजे निखीलला हे नातं पुढे न्यायचं नाहीये तर थांबावं तिने. दोघांनाही सोडावं आणि कामावर लक्ष केद्रित करावं. एकटीने आयुष्य एन्जॉय करावं >>> पण मग मालिका कशी पुढे जाईल आणि आपण पिसं कशी काढणार ना Happy

पाहिली मालिका, बरी वाटली. स्वजो आणि मधुरा इरीटेटिन्ग वाटले.

शनिवारच्या भागात काव्या सायको वाटली. पुढे जाऊन ति व्हिलन होऊ नये म्हणजे मिळवल.

काव्या आणि निखीलला हे नातं पुढे न्यायचं असेल तर जोडीदारांना घटस्फोट द्यावा. >>>>>>> पण विश्वासला नाही दयायचाय ना घटस्फोट. मेल व्हर्जन ऑफ राधिका सुभेदार आहे तो. Lol

'म्हायी बायको,म्हायी बायको' नाही केलं म्हणजे मिळवलं! >>>>>>>>> Lol

Lol

'म्हायी बायको,म्हायी बायको' नाही केलं म्हणजे मिळवलं!

बादवे ही सीरिअल बघणं सोडलंय मी, पण इथल्या मंडळींनी पिसे काढण्याचं पुण्यकार्य सोडू नये ही विनंती!

थांकू मन्या!

बादवे ते जिवलगाSSSSSSS ऐकून कुणी झोपेतून दचकून पडल्याची उदाहरणे आहेत का?
का माझंच असलं झालंय?

सिरियल मधे उत्कन्ठावर्धक अस काहिच नाही, मोस्टली असे प्लॉट लुकाछुपी टाइप ट्रिटेमन्ट मधेच जमुन येतात, स्वजो महाराज येवुन उपदेश सागरातुन डोस पाजतात ते अनरियल आणी अ‍ॅनॉयिन्ग वाटत...

निखिलची बायको म्हणते लग्न झाल्यावर काहीही झालं तरी लग्न मोडायचं नाही, निखिल मिळालाय म्हणून असं म्हणतेय लब्बाड Wink विश्वास मिळाला असता नवरा म्हणून तर स्वत:च घटस्फोट मागितला असता तिने.

पण मग मालिका कशी पुढे जाईल आणि आपण पिसं कशी काढणार ना >>> Lol

मी आज एक दोन shots बघितले ती विधी निखीलला म्हणते मला तुझ्या मनातलं समजतं वगैरे वगैरे, हा हिला फसवून अफेअर करत होता ते समजलं नाही, आत्ताही खोटं बोलतोय काव्याबद्दल ते समजत नाही. वा विधी वा, टाळ्या तुझ्यासाठी.

निखील आणि विधीच्या शॉट मध्ये निखीलचा प्रचंड राग आला. किती खोटं बोलतो, काव्याचे नाव पुढे करून स्वतःची कातडी वाचवतो, हिंमत नाही बायकोला स्वत:चे अफेअर होतं काव्याशी ते सांगायची त्यापेक्षा काव्या बरी नवऱ्याला सर्व सांगते.

मी पहिला भाग पाहिला. थँक्स प्राजक्ता.
शेवटी जोशीनवरा त्याच्या बायकोला चक्क 'तुमच तुटलं का?' अशा अर्थाचे विचारतो आणि ती 'त्याच्या बाजुने तोटलं पण माझ्या बाजूने नाही' असं उत्तर देते. नवरा-बायकोत इतका मोकळेपणा ?? की माझी ऐकण्यात चूक झाली?

त्यापेक्षा काव्या बरी नवऱ्याला सर्व सांगते. >>>

काव्याने सांगितलेलं नाही, मला दुसरीकडून समजलंय - असं विश्वास काव्याच्या आईला सांगताना दाखवलंय.

अमृता फारच छान काम करते आहे... सीनच्या मूडनुसार तिच्या चेहर्‍यावरची रेष अन रेष बोलते... तिचे सिनेमे पाहिलेले आहेत, पण तिचा अभिनय याआधी कधी इतका नजरेत भरला नव्हता.

Pages