जिवलगाssssssss

Submitted by मीनाक्षी कुलकर्णी on 24 April, 2019 - 06:37

स्टार प्रवाह वर भव्य दिव्य स्टारकास्ट असलेली 'जिवलगा' मालिका नुकतीच (२२ एप्रिल) पासून सुरु झाली आहे. स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, आणि मधुरा ( आडनाव आठवत नाहीये आत्ता, पण गुलाबजाम चित्रपटात सिद्धार्थ ची प्रेयसी दाखवली होती ती ) असे नावाजलेले कलाकार आहेत.

त्यांच्यापेक्षा सतीश राजवाडे मुळे ही मालिका पाहण्याची उत्सुकता आहे, कारण मालिकेची संकल्पना त्याची आहे,
तर उमेश नामजोशी यांनी दिग्दर्शन केले आहे. विषय पण तसा बोल्ड दिसतोय थोडा.. विवाहबाह्य संबंध ( नवऱ्याला माहीत असते, असं )...
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा..
अजून कोणी पाहतं का ही मालिका???

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, आणि मधुरा
यान्चि सिरीयल मधलि नाव काय आहेत? आणि जोड्या कोणाच्या आहेत ते सांगा ना प्लीज

कळलं , स्वप्नील जोशी - विश्वास
अमृता खानविलकर - काव्या
सिद्धार्थ चांदेकर - निखील
मधुरा देश्पान्डे - विधी

बरोबर ना ?

हो.

लग्न झालेल्या जोड्या विश्वास काव्या, निखिल विधि.

अफेअर असलेली जोडी काव्या निखिल.

विबासंवर आधारित कथानक चटपटीत करण्याच्या नादात बटबटीत होत जातं.
त्या तुलनेत हे टोन-डाऊन केलेलं कथानक बघायला मला सध्या तरी चांगलं वाटतंय.

स्व.जो. आणि सि.चां.मधला सीन आवडला. सर्वांचे संवाद खालच्या पट्टीत असतात... त्याने विषयाचं आणि प्रसंगाचं गांभीर्य राखलं जात आहे, असं मला वाटतं.

सि.चां. फारच छान काम करतोय. तो अ.खा.कडे नेमका कसा आकर्षित झाला याचा स्व.जो. शोध घेईल तेव्हा ते प्रेक्षकांना दाखवतील बहुतेक

@ललिता- प्रिती :तुम्ही लिहिलेले स्व. जो. आणि सि.चां.मधला सीन आवडला. हे वाक्य वाचून आजचा एपिसोड पूर्ण पाहिला.. नाहीतर स्व. जो. आला की फॉरवर्ड करते मी... पण आज खरच स्व. जो. पण मस्त वाटला त्याच्या भावना त्याने अभिनयातून उत्तम दाखवल्या... श्वेता (विधीच्या केक shop मधली ) पण छान आहे.. दिसायला आणि अभिनय पण..

बकवास मालिका आहे बिलकुल आवडली नाही,
मराठी मध्ये कलाकार उत्तम आहेत पण लेखक अत्यंत बकवास आहेत
Side धंदा असल्या सारखे मालिका लेखन करत आहेत

स्व.जो. आणि सि.चां.मधला सीन आवडला. सर्वांचे संवाद खालच्या पट्टीत असतात... त्याने विषयाचं आणि प्रसंगाचं गांभीर्य राखलं जात आहे, असं मला वाटतं. >>> अगदी अगदी. दोघांनी छान अभिनय केला. ह्यातले काही प्रसंग असे मस्त वाटतात बघायला. फार तमाशा आरडाओरडा नाही.

मी मधेच एखादा बघते, शनिवारचा नाही बघितला.

श्वेता (विधीच्या केक shop मधली ) पण छान आहे.. दिसायला आणि अभिनय पण.. >>> ती फार गोड, विधि फिकी पडते तिच्यापुढे, अभिनयात. अतिशय सहज करते. तिला लीड रोल मिळतील पुढे मागे. तिला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय.

काल एक प्रोमो बघितला बरेच मिस्कॉल्स काव्याचे विधिला दिसतात, तिचा आणि निखिलचा सीन, तो विधिने चांगला केला, आदरवाईज ती एवढी आवडत नाही मला. गुणी आहे पण ओवरअ‍ॅक्टींग करते, असं मला वाटतं

अतिशय सहज करते. तिला लीड रोल मिळतील पुढे मागे. तिला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय.
>>>
ती 'वादळवाट' मालिकेत रमाची असिस्टंट होती बहुतेक... तिच्यावर ट्रेनमध्ये बलात्कार होतो असं एक मोठं प्रकरण मालिकेत होतं.

अरे वा! शंभरी गाठली कि या धाग्याने. Happy
जिवलगाऽऽऽऽऽ पाहताना अशक्य वाटत होत शंभरी ईतक्या लवकर गाठेल म्हणून..

सध्या हि मालिका बघायला सुरु केली आहे.
विश्वास किती लाडात बोलतो. बायको म्हणते मला तो टाळतोय... तर 'आपण ओरडू त्याला.' 'आपण भांडू त्याच्याशी.'.....
'आपण त्याचे घर उन्हात बांधू.' एव्हढेच बोलायचे बाकी होते.
निखिल मात्र सगळ्यांनाच शेंड्या लावत आहे. विधीला सांगतो बॉस माझ्याबद्दल काहीही पसरवेल. मित्राला सांगतो आता हा विषय कायमचा संपला. अन काव्याला सांगतो विधीला सगळे सांगितले.
मालिका खूपच हळू पुढे सरकते. पण ते सहाजिक वाटते. काव्या लगेच त्याला सोडणार नाही. आता ते जेव्हा जेव्हा भेटतील तेव्हा ती त्याला सतत सोडून जाऊ नको म्हणणार, चिडणचि, रडणार. विश्वास मात्र राधाक्काचा शांत, संयमित अवतार वाटला.

मी काल नेटवर परवाचा भाग बघितला. विधीला इतक्या उशिरा संशय येतोय नवऱ्याचा, सरप्राईजिंग. चार वर्ष अफेअर सुरु होतं दोघांचे. हिला पत्ताच नाही आणि म्हणे मी तुझ्या मनातलं ओळखते, चेहेऱ्यावरून समजतं मला.

काल विश्वास काव्या सीन मध्ये काव्या फेकाफेकी जास्त करत होती, माझं मन जरी निखीलमध्ये असलं तरी आत्मा तू आहेस वगैरे. खरं म्हणजे तिला choice दिला तर ती सारखी सुभाषिते ऐकवणाऱ्या नवऱ्याला सोडेल पण निखीलला सोडणार नाही, असं वाटतं एकंदरीत.

विधीच्या मैत्रिणीने सरळ सरळ सांगून, ते कागद आणि त्यावर काव्याने लिहिलेलं वाचूनही, विधी फक्त confused असेल तर ग्रेट. नवरा बिनधास्त इतकी वर्ष अफेअर करत होता, हिला पत्ताच नाही. मान गये निखील, बायकोला गाफील ठेऊन अफेअर करू शकला वरून काव्याबद्दल चुकीची प्रतिमा बायकोच्या मनात निर्माण करू शकला. एखाद्या भोळसट, नवऱ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या बायकोला सहज उल्लू कसं बनवलं जातं. समाजात ही वृत्ती, अशी माणसे असतात काही प्रमाणात त्याचं प्रतिक आहे ते charactor.

विश्वास काव्याचे काही सीन्स छान होतात, दोघेही मस्त अभिनय करतात. एरवी स्व जो आवडत नाही मला पण कधी कधी छान करतो. पण शनिवारच्या एपिसोड मधला त्यांचा सीन, डायलॉग्ज मला फेक वाटले. दोघांनी पाट्या टाकल्या त्या सीनमध्ये असं वाटलं मला.

ती 'वादळवाट' मालिकेत रमाची असिस्टंट होती बहुतेक... तिच्यावर ट्रेनमध्ये बलात्कार होतो असं एक मोठं प्रकरण मालिकेत होतं. >>> अच्छा. अजून पण कुठेतरी बघितली आहे बहुतेक, छाप पाडणारी आहे ती.

ह्यावरून मला अक्षय पेंडसे आठवला, अतिअवांतर लिहितेय मी पण त्यातली रमा आधी अक्षयच्या प्रेमात पडतेय असं दाखवलं मग त्यानंतर लोकेश गुप्ते, छान वाटायची त्यांची जोडी मग ती सु भा च्या प्रेमात पडायच्या आधी मी सिरीयल बघणे सोडलं होतं. सगळेच आवडायचे तिला.

निखिलला दोघीन्नी सोडाव. >>> निखिलला दोघी सोडू शकत नाही, आपल्या सिद्धार्थने केलीय ना ती भूमिका Lol , सगळे फिदा त्याच्यावर. एनीवे किडिंग.

एका सीन मध्ये स्व जो त्याच्या सासूला म्हणतो की काव्या जर नात्यांशी प्रामाणिक नसती तर सारखी नवीन लोकांच्या प्रेमात पडली असती पण ती एवढे वर्ष निखिल च्याच प्रेमात आहे... I mean seriously? असं कुठला नवरा म्हणु शकतो? वर ही किवी स्वतःचं कौतुक करते की मी मोकळ्या वार्‍या सारखी.. मला बांधुन ठेवायचा प्रयत्न करू नका... मला तर ती मोकळ्या वार्‍या सारखी न वाटता मनोरुग्ण आणि तोल गेलेली वाटते... She needs a psychiatrist Uhoh

मला तर आता काव्या म्हणजे कुठला तरी एक जुना पिक्चर होता, शत्रुघ्न सिन्हा, रीना रॉय, शबाना आझमी आणि विनोद मेहेरा होता की राकेश रोशन ते नक्की आठवत नाही, मेहेराच बहुतेक. त्यातल्या शबाना आझमी सारखी वाटायला लागलीय, ती दोघांच्या प्रेमात असते. त्यात ते गाणं आहे, हम तेरे बिनाभी नही जी सकते और तेरे बिनाभी नही जी सकते. दोन्ही दगडांवर पाय ठेवायला हवेत काव्याला. त्यातला एक कधी कधी खरोखर दगड वाटतो, ते वेगळं Wink .

राजन भिसेचे डायलॉग्ज चांगले होते पण मी विद्यार्थी कसा आहे ओळखतो वगैरे थापा, अरे मुलगा जवळजवळ चार वर्ष अफेअर करत होता, तेव्हा नाही ओळखता आलं.

मुलगा जवळजवळ चार वर्ष अफेअर करत होता, तेव्हा नाही ओळखता आलं. >>> इतके दिवस मुलगा रेस्टलेस नव्हता, त्यामुळे असेल.

बाप-मुलामधला सीन आवडला. मला तुला काहीतरी विचारायचंय, मला तसं नव्हतं म्हणायचं, वगैरे गोल गोल फिरून हाती काहीच न लागणारे इतर मालिकांमधले अगणित सीन्स पाहिल्यावर या सीनमध्ये बापाने खिश्यातून थेट ते फाडलेले कागद काढून मुलासमोर धरल्यावर बरं वाटलं.

'कीप स्मायलिंग, विश्वास' - हे पण आवडलं. या सार्‍यात डोकं शांत ठेवणं विश्वासला किती जड जातंय ते स्व.जो.ने त्या एका शॉटमध्ये दाखवलं.

मधुरा देशपांडे किती हाय पिचमध्ये बोलते.... Uhoh कानांना टोचतं ते

मधुरा देशपांडे किती हाय पिचमध्ये बोलते. >>> हो ना. मला वाटलं की मला ती आवडत नाही एकंदरीत म्हणून मलाच तसं वाटतंय, मी तिच्याकडे विशिष्ठ चष्मा लाऊन बघते असं वाटतं कधी कधी.

आत्ता बने मधे मात्र आवडली.>>कोण आहे रमा>>तुलिका (अदिति सारंगधर) >>> येस्स तीच. थँक्स श्रद्धा उत्तर देण्यासाठी.

कालचा लास्ट सीन बघुन माझ्या डोळ्यातून पाणी आलं, स्वप्निलने छान केला. त्याच्या डोळ्यातलं पाणी बघून मलाही रडू आलं. स्वप्निल कधी कधी छान करतो काही सीन्स. कधी कधी अजिबात नाही आवडत.

Pages