लव्ह इन ट्रबल भाग- 3

Submitted by स्वरांगी on 14 May, 2019 - 10:17

लव्ह इन ट्रबल भाग- 3
अनु धावत पळतच अभिजीतच्या घरातून बाहेर पडली आणि बस स्टॉप वर जाऊन सरळ सिटी बस पकडली..बसूनच ती काल जे काही झालं त्याचा विचार करत बसली. शुभमला मेसेज करावा असा तिला वाटून गेलं आणि तिने मोबाइल बाहेर काढला. मेसेज टाईप करायला घेणार एवढ्यात तिला त्याचं वाक्य आठवलं, “ अनु आत्ताच्या अत्ता तिथेच थांब नाहीतर खरंच breakup होईल आपलं!!”
“ काहीच उपयोग नाहीये आता शुभमचा विचार करून.. सगळं संपलंय आता.. आणि त्याच्या अशा वागण्यानंतर मीच पुन्हा लोचटासारखी नाही जाणार त्याच्याकडे... तो जरी आला माफी मागायला तरी मी नाही माफ करणार त्याला!!! कधीच नाही!!!!” अनुने मनाशी पक्कं ठरवलं..
इकडे अभिजीत त्याची dezire घेऊन office ला जायला बाहेर पडला.
“ हॅलो!! काय झालं रे मग काल रात्री??” अभिजितने बत्तीसावा adv. बर्व्यांचा incoming कॉल अटेंड केल्यावर पहिलाच प्रश्न त्यांनी हा विचारला.
“ 31 मिस कॉल्स??!! फक्त 12 तासात आणि तेही अख्या रात्रीत 31 मिस कॉल्स???!!” अभिजितने हसत हसत विचारलं. “ मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढे मिस कॉल्स आले तेही एकाच माणसाचे!!” अभिजित म्हणाला..
“ अरे! काल तू आणि ती मुलगी असे अचानक बाहेर पडलात, मला रात्रभर झोप नाही माहितेय?? सांग की आता काय झालं तुमच्या दोघांच्यात??” बर्व्यांनी उत्सुकतेने विचारलं..
“ तुम्हाला वाटतंय तस काही नाही झालं सर!!” अभिजित म्हणाला..
“ असं कसं काही नाही झालं?एवढ्या हक्काने हात पकडून घेऊन गेलास तिला, आणि तीही आली तुझ्यासोबत!!! कुठेतरी पाणी मुरतय एवढं नक्की!!!” बर्वे अभिला चिडवत म्हणाले.
“ तस काही नाही ओ सर!! मी ओळखत देखील नाही तिला..” अभिजित हसत म्हणाला.
“ तसं नाही रे, पण प्रियाशी breakup झाल्यानंतर तू कुणाकडे कधीच पाहिलं नाहीस आणि पाहशील असंही वाटलं नव्हतं!! म्हणून विचारलं रे!!” बर्वे मनातलं बोलून गेले..
अभिजितच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू मावळलं. तो serious झाला.ल
“ सर, मी आत्ता ड्रायव्हिंग करतोय..मी नंतर कॉल करतो तुम्हाला.Ok??” अभिजीतने लगेचच फोन कट केला. लक्ष रोड वर असलं तरी त्याचं मन आता भूतकाळात गेलेलं..
अभिजित आणि प्रिया दोघ एकाच batch चे.. दोघही lawyer होणार होते आणि एकमेकांच्या प्रेमात होते.. त्या दिवशी प्रियाचा वाढदिवस होता पण अभिजीतला काही कामानिमित्त बाहेर जावं लागणार होतं..त्यावर तिचे रुसवे फुगवेही झालेले..पण अभिने समजवल्यावर ती शांत झाली. प्रिया तिच्या भाड्याच्या फ्लॅट मधेच होती. तोच फ्लॅटच मेन दार उघडलं गेलं. प्रिया बेडरूम मध्ये होती बहुतेक..तोच अभि दबकत दबकत आतमध्ये आला..प्रियाला surprise देण्यासाठी त्याने बाहेर जातोय असं खोटंच सांगितलं. एका हातात गिफ्ट आणि दुसऱ्या हातात रेड रोझेस बुके घेऊन तो अलगद बेडरूच्या दाराशी आला आणि अर्धवट उघडया दारातून त्याने आत पाहिलं.. पाठमोरा उभा एक तरुण अंगावर शर्ट चढवत होता.. अभिजीतच्या हातातून बुके गळून पडला… प्रियाला कुणीतरी आल्याची चाहूल लागली आणि तिने दरवाजा उघडून पाहिलं…
प्रियाची मान खाली झुकली आणि अभिजीतच्या डोळ्यातुन अश्रू ओघळला….
हाच प्रसंग अभिजीतच्या डोळ्यासमोर उभा राहिला जेव्हा त्याने अनु आणि शुभमला कोहिनूर मध्ये पाहिलं.. अनुच्या जागी तो स्वतःला पाहत होता.. आणि त्याची पावलं आपोआप अनुकडे वळली..
“ काय झालं होतं तुला अभि त्यावेळी??!!” डोकं खाजवत अभि स्वतःशीच म्हणाला आणि त्याने कारचा स्पीड वाढवला…

दोन महिन्यांनंतर…..

या दोन महिन्यात अनु मागचं सगळं विसरून आपल्या करियर कडे concentrate करू लागली होती.. तसं तिने law च्या सेकंड इयर पासूनच इंटर्नशिप सुरू केली होती. पण आता तिला मुंबई हाय कोर्ट च्या सिनिअर आणि experienced advocate कडे इंटर्नशीप करून खूप शिकायचं होत.. आणि त्यासाठीच तिने कॉलेज through मुंबईतल्या बेस्ट हाय कोर्ट advocate, ‘A. V. Kulkarni ‘ यांना आपला cv मेल केलेला आणि इंटर्नशिप साठी apply केलेलं.. तिथूनच तिला visit साठी मेल आला होता आणि ती खूप खुश झाली.. मधून मधून तिला शुभम त्यांच्याच batch च्या मोनिका सोबत दिसायचा.. त्याला एक जोरात लाथ मारावी अस तिला खूप वेळा वाटलं पण ती येता जाता त्याला मानेवर हात फिरवून, “ I will kill you!!” अशी खुन्नस कम वॉर्निंग द्यायची..
त्या दिवशी अनु adv. कुलकर्णींच्या ऑफीसला त्यांना भेटायला निघाली होती. तिचा cv बघून तीचं selection झालं होतं..आता अनु एक महिना इंटर्नशीप करून मग ती स्वतःची प्रॅक्टिस सुरू करणार होती.पत्ता शोधतच ती एका ऑफिस समोर आली. तिला नेम प्लेट दिसली त्यावर नाव होतं ‘adv. A. V. Kulkarni'. अनुने एक मोठ्ठा श्वास घेतला.
“ आजपासून नव्याने सुरवात करायची. मागचं सगळं विसरून जायचं आणि मनापासून स्वतःला कामात झोकून द्यायचं!!”अनुने मनशी पक्कं ठरवलं आणि ती दरवाज्यावर knock करून आत शिरली.
“ Hello sir!!! Good morning! Nice to meet you for the first time... I am Anagha Mehendale your new intern. I will work hard and do my best.” अनघाने स्वतःला introduce केलं आणि ती adv. कुलकर्णींच्या रिस्पॉन्सची वाट पाहू लागली..
“ सर आपली नवीन इंटर्न मिस. अनघा!!” लीगल सेक्रेटरी मि. झेंडे कुलकर्णींना उद्देशुन म्हणाले. सरांच्या टेबलवर फाईलचे गठ्ठे होते. हातातली फाईल चाळत कुलकर्णी खुर्चीतुन उठले आणि त्यांनी मान वर करून अनुकडे पाहिलं..
अनुच्या चेहऱ्यावरचं स्माईल हळूहळू मी होऊन तिचे डोळे मोठे झाले आणि हात आश्चयाने तोंडावर आला… समोर अभिजित होता!!
Adv. अभिजित विलास कुलकर्णी म्हणजेच adv. A.V.Kulkarni..
अनुने दोन्ही हात तोंडावर ठेऊन डोळे गच्च मिटून घेतले.. “आता हेच बाकी राहिलं होतं!!” ती मनातच म्हणाली..
“ Nice to meet you for the first time..म्हणालीस तू. पण मला वाटत नाहीये की आपण पहिल्यांदा भेटतोय..कुठेतरी पहिल्यासारखं वाटतंय तुला..कुठे बरं??? अभिजित आठवत म्हणाला,” हा!! तू मेट्रोने ट्रॅव्हल करतेस का?? अभिने मुद्दाम विचारलं..
“ नाही! मी usually बस नेच ट्रॅव्हल करते किंवा चालत जाते!!” अनुला कळलं होतं की तो मुद्दाम असं विचारतोय.
“ मग तुम्ही कोहिनूरला डिनर साठी जाता का??” अभिने पुढची गुगली टाकली.
“ नाही सर ते खूप एक्सपेन्सिव आहे त्यामुळे मी नाही जात.” ती मी नव्हेच!! या अविर्भावात अनु म्हणाली.
“ ओह कमॉन मिस अनघा!! एवढं पण निर्लज्ज असू नये माणसाने.” ती ऐकत नाही हे पाहून अभिजित खोटं हसून म्हणाला.. त्यांची चाललेली बाचाबाची समोरच बसलेले सेक्रेटरी ‘मि. झेंडे’ आणि ‘मायरा’ बघत होते..त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि काय झालं काय माहीत म्हणून खांदे उडवले आणि पुन्हा कामाला लागले.
“ सर!! आत्ताच मला तुमचं बोलणं ऐकून एक व्यक्ती आठवली..” आता अनुने सुरवात केली होती.
“ कोण??” अभिने विचारलं.
“ मेट्रोतला मवाली!!” अनुने घाव घातला आणि तो वर्मी लागला सुद्धा.
“ हजार वेळा सांगितलंय तुला की मी काही केलं नाही!!” अभिजित दात ओठ खात म्हणाला. त्यांचे खटकेबाज संवाद ऐकून झेंडे आणि मायरा हळूहळू ऑफिस बाहेर येऊन उभे राहिले. तेवढ्यात पुष्कर तिथे आला. तोहि advocate होता. आधी adv. बर्वे, पुष्कर आणि अभिजित एकत्र काम करायचे पण आता अभिजीतने स्वतःचं ऑफिस बर्व्यांच्या ऑफिस समोरच सुरू केलं. “ तुम्ही दोघ बाहेर का उभे आहात”? पुष्करने विचारलं.
“ सरांची आत महत्त्वाची मिटिंग सुरू आहे म्हणून बाहेर थांबलोय आम्ही.” झेंडे म्हणाले.
“मग त्यासाठी तुम्ही बाहेर थांबायची काय गरज?!!एवढं काय चाललंय आतमधे!!” असं म्हणून त्याने दाराला कान लावला आणि काही ऐकू येत का ते पाहू लागला. “ असं चोरून ऐकू नका,सर मला झापतील!!” झेंडे पुष्करला बाजूला ओढायचा प्रयत्न लागले तेवढ्यात धाडकन दरवाजा उघडला गेला आणि पुष्करच्या डोक्याला जोरात आपटला..
“ ओह माय गॉड!!! आय एम सो सॉरी!! माझं लक्षच नव्हतं..
फार लागलं का तुम्हाला?? अनुने काळजीने विचारलं.
“ त्याला सॉरी म्हणण्याची काही गरज नाही.” अभि बाहेर येत म्हणाला.
“ का?!! माझ्यामुळे त्यांना लागलं. मला सॉरी म्हणायलाच हवं त्यांना..” अनु आश्चर्याने म्हणाली.
“ तुला सांगितलय तेवढं कर.. उद्यापासून तू माझं ऑफिस जॉईन करतेयस. उद्या शार्प सकाळी 10 ला तू मला ऑफिस ला आलेली दिसली पाहिजेस. तुझं काम झालय आता. निघ तू..” अभिजित शांतपणे म्हणाला..
उद्यापासून अनु महिनाभर अभिजीतसोबत त्याच्या हाताखाली काम करणार होती.. अभिजीतने त्याला झालेल्या त्रासाचा पुरेपूर बदला घ्यायला सुरुवात केली.. अनुच्या टेबल वर फाइल्स आणि डॉक्युमेंट्स चे गठ्ठेच गठ्ठे होते.. खूप काम होतं.. घरी जायलाही खूप उशीर व्हायचा तिला..पण तिला खूप शिकायलाही मिळत होत. एकदा अनु सगळ्या फाइल्स complete करून थकून खुर्चीला टेकून बसली तेवढ्यात अभिजीतने अजून एक फाईलचा गठ्ठा समोर आणून टाकला आणि म्हणाला, “ तुला मी माझ्या हाताखालून पूर्ण ट्रेन करून पाठवणारे आणि तुला कामाची सवय, आणि शिक्षण एकदम होईल नाही का??!” अभिजित हसून म्हणाला.
“ हो नक्कीच!!” खोटं खोटं हसून अनु म्हणाली आणि रडवेल्या चेहऱ्याने पुन्हा काम करू लागली..
एकदा ती ऑफिस बाहेर बेंच वर बसून लंच ब्रेकमध्ये सँडविच खात होती.. तेवढ्यात तिला समोरून शुभम आणि मोनिका हसत हसत येतांना दिसले.. जवळ आल्यावर शुभमचं अनुकडे लक्ष गेलं आणि तो तिच्याजवळ मोनिका सोबत आला आणि म्हणाला, “ काय मग!! दुसरा कुणी मिळाला की नाही तुला?” शुभम कुत्सितपणे म्हणाला..
“ मरायचंय का तुला माझ्या हातून??” अनुने जळजळीत नजरेने विचारलं.. “ Get lost from here!!” अनु जोरात ओरडली..
“ रिलॅक्स!! रिलॅक्स!! जातो मी. पण मला माहितेय माझ्यापेक्षा चांगला तुला कुणीच मिळणार नाही rather मिळणारच नाही.” शुभमने तिला आणखी डिवचलं..
“ अनु तू इथे बसलीयस?मला वाटलं कुठे बाहेर हॉटेलमध्ये लंच करायला गेलीस की काय.” अभिजित तिथे येत म्हणाला..
“ ओहह!! सॉरी सर, मी लगेचच येते ऑफिस मध्ये..” अनु शेवटचा घास तोंडात कोंबत म्हणाली..
“ फक्त लंच ब्रेकमध्ये तू नव्हतीस तर किती कासावीस झालो मी!! तुला माहितेय ना?!!मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय थोडाही वेळ..” अभिजित अनुकडे पाहत म्हणाला. शुभम आळीपाळीने अनुकडे आणि अभिजीतकडे पाहत राहिला..
“ हा?!!!” अनु कन्फ्युज होऊन म्हणाली..
“ तुला तो दिवस आठवतो जेव्हा आपण कोहिनूर मध्ये पहिल्यांदा भेटलो होतो?? तेव्हा तुला बघताक्षणीच तुझ्या प्रेमात पडलो होतो मी..” अभिजित smile करून म्हणाला..
“ सॉरी??!!!” अनु अविश्वासाने म्हणाली..
“ अनु तू ‘मंद’आहेस पण तुझ्यासोबत वेळ घालवणं हाच माझा ‘छंद’ आहे..” अभिजित तिच्या डोक्यावर हात फिरवत कसंनुसं हसत म्हणाला.. अनु अजून शॉक मधेच होती.. शुभमला तोंडावर पडल्यासारखं झालं.. तो मोनिकाला घेऊन गुपचूप निघून गेला..तो जाताच अभिजीतने झटकन आपला हात तिच्या डोक्यावरून बाजूला केला..
“ किती तेल थापलंयस डोक्यावर??! हात चिकट झाला माझा!!” अभिजित वैतागुन म्हणाला.
“ माझं पण डोकं मी कुठे गहाण टाकतो कुणास ठाऊक असं वागायला!!” अभि स्वतःवरच चिडला.. त्याने अनुकडे पाहिलं तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती मान खाली घालून बसली.
“ तुला काय वाटतं? तुझ्या अशा चिडचिड करण्याने, रडण्याने,मारण्याची धमकी देण्याने त्याला त्याची चूक समजणारे का? किंवा तो तुझ्याकडे परत येणारे का?” अभिजितने शांतपणे तिला विचारलं. ती काहीच बोलली नाही यावर..
“जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा आपल्याला कळत नाही आपण काय करावं.. माझं काही चुकलं का?? मी बोरिंग आहे का?? की मी अस काहीतरी केलंय ज्यामुळे समोरची व्यक्ती आपल्याशी असं वागली?? असं आपल्याला वाटत राहतं. मला चांगलंच माहितेय हे फीलिंग.पण हे सगळं खोटं असतं अनु.. चूक आपण केलेली नसते. चूक त्या समोरच्या व्यक्तीने केलेली असते आपला विश्वासघात करून!!” अभिजित अनुला समजावत म्हणाला.. अनु शांतपणे अभिकडे पाहत होती..
“ जस्ट ignore हिम.. बिकम मोअर cool.. अँड live वेल…” एवढं बोलून अभि ऑफिसला निघून गेला..
अनु त्याला जाताना पाहतच राहिली.. तीचं मन आता शांत झालं होतं.. “ किती छान समजावतो हा!!” अनुने मनातल्या मनात कबूल केलं..
“ उगाच त्रास दिला त्याला एवढा.” असं मनात म्हणून अनु स्वतःशीच हसली आणि पुन्हा काम करायला ऑफिस मध्ये शिरली..

क्रमशः

Group content visibility: 
Use group defaults

आजकालच्या २०-२५ वयातल्यांना काय आवडतं हे जाणून घेण्यासाठी वाचतेय. >>> मला वाटते हे वयच फिल्मी असते , त्या त्या काळानुरुप असेच फिल्मी वागणॅ / वाचणे आवडते बहुतांशी तरुणांना

Neilsagar ,पात्रांची नावं ठरवायची होती तेव्हा मला त्यांच्या व्यक्तिरेखेला suitable नावं सुचली नाहीत.. एकदा आई तुपारे बघत होती tv वर ते पाहून लक्षात आलं ही नावं सूट होतील. त्यामुळे तीच दिली. सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!