शेझवान चटणी

Submitted by स्स्प on 6 February, 2018 - 03:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सहित्यः
१०-१२ लाल सुक्या लाल मिरच्या.
दोन गड्डे लसुण.
५-६ पाकळ्या लसुण बारीक चिरुन.
१ कांदा बारीक चिरुन. (पांढरा असल्यास उत्तम)
२ इंच आल किसुन.
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन.
मीठ.
तेल.
१ चमचा कॉन फ्लॉवर.

क्रमवार पाककृती: 

कृती:
दोन गड्डे लसुण सोलुन, लाल मिरच्यां बरोबर १५-२० मिनिटं पाण्यात शिजत ठेवावा.
गार झाल्यावर. पाणी गाळुन मिरच्या आणि लसुण मिक्सर मध्ये वाटुन त्याची घट्ट पेस्ट करावी. पाणी फेकुन देउ नये.
एका भांड्यात २ चमचे तेल टाकुन त्यात मिरची लसुण आल परतुन घ्याव.
त्यात कांदा टाकुन तो चांगला गुलाबी होइस्तव परतुन घ्यावा. लाल रंगासाठी १ चमचा काश्मिरी मिरची पुड टाकुन चांगल परतुन घ्याव.
मग त्यात मिरची लसणाची पेस्ट टाकुन ३-४ मिनिट शिजवावे.
गाळलेले पाणी यात टाकुन योग्य प्रमाणात घनता आणावी.
उकळी आली की १चमचा कॉन फ्लॉवर पाण्यात मिसळुन यात टाकुन १-२ मिनिट शिजवाव.
पुर्ण पणे गार झाल्यावर हवाबंद बाटलीत काढुन फ्रिज मध्ये ठेवा.

वाढणी/प्रमाण: 
अन्दजे २ ते ३ वेल
माहितीचा स्रोत: 
मी अनि माझी मैत्रिन
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

DJ साधारण २० ते २२ दिवस टिकत असावी , आमच्याकडे हि चटणी केल्यावर ५ ते ६ दिवसातच संपते. त्यामुळे काही आयडिया नाही