तुझ घर

Submitted by प्रतिक सोमवंशी on 30 April, 2019 - 01:48

जेंव्हा हातात काही उरत नाही माणूस घर शोधायला लागतो. ते चार भिंतीच असावाच, त्याला कौलारू छप्पर असावाच, त्यात एखाद्या बाथटब मध्ये गरम पाण्यात शांत निजाव वा शॉवर मधून पडणाऱ्या पाण्याच्या सरीला पाऊस मानून त्यात मोकळ व्हाव अस काही नसत. त्याला फक्त घर हव असत, जे त्याला जवळ करेल, मायेने विचारपूस करेल, कितीही कटकट केली तरी शेवटी त्याची सांत्वना करेल. त्याला नेहमी समजून घेऊन फक्त न फक्त त्याच्याशी एकनिष्ठ राहील. कुणा परक्याला दारातून आत घेऊन त्याला इनसेक्यूअर फील नाही होऊ देणार. त्याच्या होणाऱ्या सगळ्या मूड स्विंगस ला आपलस करेल पण त्याला कधीच तो बेघर असल्याच जाणवू देणार नाही. त्याच्या चालणाऱ्या प्रत्येक लढाईत त्याच्या मागे ठाम पणे उभे राहिल, त्याला सतत सांगत राहील की तू फक्त लढ, परिणामांची चिंता करू नकोस मी आहे इथेच तुझ्या पाठीशी. जिंकलास तर त्याला आनंद सर्वात जास्त होईल, हरलास तर त्याच्या जखमांना मलम लावण्यापूर्वी त्या जखमांवरून मायेन हात फिरवून त्याला सांगेल तू खूप स्ट्रॉंग आहेस असच राहा, कायम, अगदी तुझ्या आयुष्याच्या शेवटापर्यंत.
मला तुझ ते घर व्हायचंय जे श्वासागणिक हळूहळू कमी होत चाललेल्या आयुष्यात तूला रोज नव्याने जगायच बळ देईल. तुला सतत जाणवून देत राहील, तुला जगायचंय, मनसोक्त जग, पण नेहमी लक्षात असू दे, तू थकशील, तू हरशील, तुला धोका मिळेल, तुझा विश्वासघात होईल पण हे घर चार भिंतींच नाही ज्यावर कुणीही बुलडोझर फिरवले की नेस्तनाबूत होईल आणि एका क्षणात तुला बेघर करेल. हे घर तुझ आहे, हे घर तू माणसात शोधलस, माणसे वाईट असतात पण सगळेच नाही. हे घर तुझ माहेर आहे अस समज, बाहेरच्या जगाचा सासुरवास भोगून हेच तुला आपलस करणार आहे, रोज संध्याकाळी सूर्यास्ताचा संधीप्रकाश पाहताना तुझ्या सोबत उभा राहून तुझी न थांबणारी, दिवसभर जे मनात दाटून आलेली पण कुणासमोर न व्यक्त झालेली बडबड ऐकत राहील, अगदी शांत, त्या सूर्याच्या तैलचित्रा प्रमाणे. जेंव्हा तो अल्लड वारा तुझ्या बटांना छेडत राहील आणि त्यामुळे तुला होणारा डिस्टर्बनस तुझ्या बटांना हळूवार तुझ्या कानामागे करून कमी करण्याचा प्रयत्न करील. जेंव्हा काही सांगताना तू तुझ्या डोळ्यातल्या आसवांना बांध घालायचा प्रयत्न करशील ना, ते माझ्यापुढे साध्य होणार नाही, तू रडशील मोकळी होशील, पण खांदा माझा असेल. तू जिंकशील काहीना काही आचिव्ह करशील तर तुझ्या पाठीवरची थाप असेल.
आयुष्याचे शेवटचे क्षण मोजताना जेंव्हा मी तुझ्या बाजूला वा तू माझ्या बाजूला एकमेकांना कुरवाळत बसलेले असू ना तेंव्हा आपल्या तोंडून फक्त एवढच निघाव, “yes, we did it” तू जे जे बोललास ते सगळ करून दाखवलस.
मला माहित आहे हे जे काही लिहिलंय ते तुझ्या लेखांसारख आहे, त्यातल्या प्रेमळ नात्यांसारख आहे, प्रत्यक्षात रिऍलिटी वेगळी असते, पण नाही, थांब इथे तू चुकशील, कारण मी तुला रोज वाचतो, तुला रोज शोधतो, आणि तुला जस हवंय तसच द्यायचा प्रयत्न करतो आणि करेलही नेहमी. पाखर कितीही उंच उडाली तरी त्यांना ओढ मात्र घरट्याचीच असते. मला तुझ ते घर, तुझ ते घरटं बनायचय. बनवशील? मी वाट बघतोय...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच.
'पाखर कितीही उंच उडाली तरी त्यांना ओढ मात्र घरट्याचीच असते." अगदी खर आहे.

जब कोई तुम्हारा ह्रदय तोड दे तडपता हुआ जब कोई छोड दे तब तूम वापस आना प्रिये.......हे मुकेश चं गाणं आठवलं हे वाचल्यावर.