Submitted by सान्वी on 29 August, 2018 - 05:38
धागा काढायला बराच उशीर झाला आहे. खरंतर मागच्या पर्वाचा भरगोस प्रतिसाद पाहता या पर्वावर लवकरच धागा येईल असे वाटले होते परंतु नाही आला अजून. आणि मला मायबोलीवर स्वतःचा पहिला धागा काढण्याची संधी मिळाली. असो.
तर कार्यक्रमाबद्दल वेगळं सांगण्याची काही गरज नाही. या वेळी सूत्रसंचालिका बदलून माझी आवडती स्पृहा जोशीला घेतलं आहे, त्यामुळे तीचे ओघवते सूत्रसंचालन आणि नेहमीचे कॅप्टन अशी मस्त भट्टी जमली आहे. सगळ्यात कहर म्हणजे ती छोटी मुले, zee वरील सारेगमप लिटिल चांप्स ची जादू परत अनुभवायला मिळते आहे. रटाळ मालिका च्या भाऊगर्दी मध्ये निरागस मुलांचे सूर सुखद वाटताहेत. तुम्हाला काय वाटतं?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आज प्यारेलाल आलेत म्हणून
आज प्यारेलाल आलेत म्हणून आवर्जून बघायला बसलो तर पहिलं गाणं सुरू व्हायला तब्बल अर्धा तास लागला!
स्पृहा कसली घाणेरडी नाचते.
स्पृहा कसली घाणेरडी नाचते.
स्वराली जिंकली. मस्त.
स्वराली जिंकली. मस्त.
हो
हो
ती जिंकली हे छान झाले
तसे सगळ्यांना जेव्हा अवॉर्ड दिले तेव्हाच अंदाज आला होता, मला वाटते तीच रँकिंग असावी
पण सगळ्यात भारी हर्षद होता.
पण सगळ्यात भारी हर्षद होता. त्याचे लाड देखील छान केले , खुश झाला तो. फक्त तो का रडला हे कळले नाही मला
स्क्रिप्ट मध्ये असेल रडायचे
स्क्रिप्ट मध्ये असेल रडायचे म्हणून.
कधी रडला तो. डोळे पुसताना
कधी रडला तो. डोळे पुसताना दिसला पण डोळ्यात टिपूस नव्हतं त्याच्या. स्पर्धकांपैकी एकीची चुलत बहिण माझ्या आॅफिसात काम करते, ती गेली होती फायनलला प्रेक्षक म्हणून. ती सांगत होती की हर्षदला खूप त्रास देतात, मनासारखा शाॅट मिळत नाही तोपर्यंत रिटेक करायला लावतात, कंटाळून गेला होता तो. अवधूत वगैरे जे काही बोलतात ते त्यांना लिहून दिलेलं असतं.
स्पृहाची साडी छान होती पण फिनालेेेेच्या मानाने फार साधी वाटली. अंशिका छान दिसत होती. गाणी सगळ्यांची मस्त झाली.
फिनाले झाला का? सुटले बिचारे
फिनाले झाला का? सुटले बिचारे बालमजूर झीच्या कचाट्यातून! Especially तो छोटा मुलगा!
स्क्रिप्ट मध्ये असेल रडायचे
स्क्रिप्ट मध्ये असेल रडायचे म्हणून.>>> हो हो. स्क्रिप्ट लिहिणारे मायबोलीकरच आहेत ना?
सुटले बिचारे बालमजूर झीच्या
सुटले बिचारे बालमजूर झीच्या कचाट्यातून! >> झी नाही
कलर्स च्या कचाट्यातून.
अंशिका छान दिसत होती. गाणी
अंशिका छान दिसत होती. गाणी सगळ्यांची मस्त झाली. >>>>>>>> ++++++++११११११११ अंशिकाला मात्र उगाच डिमोटिवेट केल आशाताईन्नी रिमिक्स गाण्यावरुन. तिला जुन्या गाण्यान्वर स्वतःचे प्रयोग करावेसे वाटतात त्यात काय चुकल? तेवढी टॅलेन्टेड ती नक्कीच आहे. आशाताईन्नी सुद्दा स्वत:च्या गाण्यान्ची रिमिक्स केली होती की. सगळीच रिमिक्स गाणी काही वाईट नसतात. हेमावैम. बाकी स्पृहाने छान साम्भाळून घेतल अंशिकाला.
स्पृहाची साडी छान होती पण फिनालेेेेच्या मानाने फार साधी वाटली >>>>>>> ती साडी आरती वडगबाळकरने डिजाईन केली आहे.
शशान्क केतकरच्या बाजूला सायली सन्जीव मॅचिन्ग कपडयात बसलेली दिसली. ति तिकडे का आली?
मृणाल दुसानीस सिरियल सोडते की काय?
ह्याचे एपि कुठे पाहायला
ह्याचे एपि कुठे पाहायला मिळतेल,
वूट??
आणि सायली किती थकलेली,
आणि सायली किती थकलेली, निस्तेज दिसत होती !!!
स्पृहाचे सूत्रसंचालन उत्तम
स्पृहाचे सूत्रसंचालन उत्तम झालं. आशा भोसल्यांनी तिच्या साडीचं, फुलाचं आणि तिच्या गोड बोलण्याचं फारच मस्त कौतुक केलं. लव्ह्ड ईट.
बाकी स्पृहाने छान साम्भाळून
बाकी स्पृहाने छान साम्भाळून घेतल अंशिकाला. >>> अगदी! पण हे तिथेच थांबायला हवं होतं. आशा भोसलेंनी त्यावरही जी कमेंट केली ते ऐकून त्या उतरल्याच मनातून.
महेशचा यमनरंगचा कार्यक्रम अफलातून होता.
काल फॉरवर्ड करतच फिनालेचा
काल फॉरवर्ड करतच फिनालेचा उत्तरार्ध पाहिला. उत्कर्ष चे गाणे आवडले. मीरा आणि अंशिका चांगल्या गायल्या. मात्र स्वराली मला पूर्वी आवडत असून फिनालेत तिची गाणी अजिबात आवडली नाहीत. कर्कश्य वाटत होती. चैतन्य पण लाउड वाटला.
मॉनिटर मात्र भयंकर गोड! त्याचे डायलॉग्ज, तो पोवाडा सगळेच क्यूट !! शेवटी तो फटाक्यांमुळे घाबरून रडायला लागला बहुतेक. स्पृहा त्याला म्हणत होती आता नाही लावणार हं फटाके.. वगैरे.
आशाताईंच्या गप्पा पण आवडल्या. ८५ वर्षांच्य आहेत त्या, त्यांची एनर्जी काबिले तारीफ आहेच पण हे जजेस त्यांचे फार हाल करत होते सारखी ऊठ बस करायला लावून असे वाटले !
>>आशा भोसलेंनी त्यावरही जी
>>आशा भोसलेंनी त्यावरही जी कमेंट केली<<
मला तर त्यात काहिहि वावगं वाटलं नाहि; मे बी आयॅम ओल्ड स्कूल. शिवाय तिने केलेले बदल भिषण होते, थोड्क्यात सांगायचं म्हणजे ताज महालाला विटा लावण्याचा प्रयत्न होता तो...
महेश काळेचं शुरा मी... आणि यमन रागाची मेडली अप्रतिम!! मझा आ गया!!!
शिवाय तिने केलेले बदल भिषण
शिवाय तिने केलेले बदल भिषण होते, थोड्क्यात सांगायचं म्हणजे ताज महालाला विटा लावण्याचा प्रयत्न होता तो...>>> +११११
मला आवडतात रिमिक्स, पण अंशिका ची गाणी नाही आवडली इतकी.
मला स्वराली जास्त आवडायची, सो ती जिंकल्याचा आंनद झाला.
<<<सायली किती थकलेली, निस्तेज दिसत होती !!! >>>+१११ मलाही ती आजारी असल्यासारखी वाटली
ह्याचे एपि कुठे पाहायला
ह्याचे एपि कुठे पाहायला मिळतेल,
वूट?? >>>>>
http://expertblogz.com/sz6b1605-8566-4611-b085-0fea430a6525/1cd788beae43...
शिवाय तिने केलेले बदल भिषण
शिवाय तिने केलेले बदल भिषण होते, >>> हे अगदी खरं आहे. त्यासाठी पहिल्यांदा जे बोलल्या ते ओके होतं. पण एका फक्त १३ वर्षांच्या मुलीला दुसर्यांदा डीमॉरलाइज करणं , ते देखील भर मैफिलीत , नाही पटलं. असो.
आशाताईंच्या मागे एक लाल
आशाताईंच्या मागे एक लाल चौकडीचा शर्ट घातलेले गृहस्थ होते त्यांच्या पोटावरच्या २ बटणांच्या मधल्या जागेनी आ वासला होता. त्यांना कळलं देखिल नसेल, कॅमेरा वाल्यानी सांगायला हवं होतं
मला मीरा आणि उत्कर्ष आवडायचे. पण ते जिंकणार नाहीत आणि स्वरालीच जिंकेल हे ही माहिती होतं. कायमच कार्तिकी, उर्मिला, स्वराली सारख्या आवाजाचे स्पर्धक जिंकत आलेले आहेत.
कार्तिकी गायकवाड आता काय करते
कार्तिकी गायकवाड आता काय करते?
त्या batch मधील केतकी, आर्या, मुग्धा आणि प्रथमेश कुठे कुठे/सोशल मीडियावर दिसत असतात पण कार्तिकी कुठेच दिसली नाही त्यानंतर.
शिवाय तिने केलेले बदल भिषण
शिवाय तिने केलेले बदल भिषण होते, >>> हे अगदी खरं आहे. त्यासाठी पहिल्यांदा जे बोलल्या ते ओके होतं. पण एका फक्त १३ वर्षांच्या मुलीला दुसर्यांदा डीमॉरलाइज करणं , ते देखील भर मैफिलीत , नाही पटलं. असो. >>>>>>>>> ++++++++१११११११
कायमच कार्तिकी, उर्मिला, स्वराली सारख्या आवाजाचे स्पर्धक जिंकत आलेले आहेत. >>>>>>>>> मला सई जोशी जिन्कावी अस वाटत होत.
सा रे ग म पा लिटिल चॅम्प कोणी
सा रे ग म पा लिटिल चॅम्प कोणी पाहत का झी(हिंदी) वर. छान सिंगर्स आहेत
नवा सिझन सुरु झालाय, नवा बीबी
नवा सिझन सुरु झालाय, नवा बीबी निघाला का ?
ऑडीशन्सना पुष्कर जोग होस्ट म्हणून अत्यंत बंडल वाटला, ना प्रेझेन्स ऑफ माइंड ना आवाजाचे चढ उतार, त्यात ते बोबडे उच्चार !
आय होप स्पृहा एकटी करेल अॅक्चुअल प्रोग्रॅमचं होस्टींग !
Fuskiiii alaay ka... waah
Fuskiiii alaay ka... waah
Pages