पहिल्य फिलिप कोटलर पुरस्काराबद्दल आदर्णीय नरेंद्रजी मोदीजींचे अभिनंदन

Submitted by भरत. on 15 January, 2019 - 23:54

आपल्या सगळ्यांचे लाडके पंतप्रधान आदर्णीय नरेंद्रजी मोदीजीं यांना पहिला वहिला Philip Kotler Presidential Award प्रदान करण्यात आला आहे. फिलिप कोटलर हे जगभरात मार्केटिंग गुरू म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या नावे दिला जाणारा हा पुरस्कार आदर्णीय नरेंद्रजी मोदीजींना मिळावा याचा आनंद प्रत्येक भारतीयाला झाला असेल. या आनंदात संक्रांतीचे तिळगूळ, पोंगल इ.इ. अधिकच गोड लागले असतील.
अवॉर्ड , अवॉर्डदाता यांबद्दल अधिक माहिती हाती येताच इथे नोंदवली जाईल.
तोवर आदर्णीय नरेंद्रजी मोदीजींचे मनापासून अभिनंदन.modi-kotler-1200x600.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन!!
हा पुरस्कार कोण देतात? कोणाच्या नावाने देतात? पुरस्कार मिळण्यासाठीचे पात्रता निकष काय? अजुन कोण नॉमीनी होते? मोदींना कसा काय मिळाला? हे अपडेट्स कधी येणार?

फिलिप कोटलर हे जगभरात मार्केटिंग गुरू म्हणून ओळखले जातात. >>>> एम.बी.ए अभ्यासक्रमात ह्यांची भली मोठी पुस्तके वाचली आहे.कंटाळा येत नाही.

हे अपडेट्स कधी येणार?>>>>>
पाय धु म्हंटले तर म्हणे तोरड्या कितीच्या...
किती त्या चौकश्या,
त्यांचे निकष ठरले की सांगतील ना..काय घाई आहे Wink

पारितोषिक वितरण सोहळा डिसेंबर मध्ये झाला म्हणे,
GAIL इंडिया (सरकारी कम्पनी) , PATANJALI, रिपब्लिकन TV इत्यादी लोकांनी तो स्पॉन्सर केला होता

पुरस्कार निवड समितीत कोण कोण होते..?
पुरस्कार देण्यासंबंधी पेपरमधे काही जाहिरात आली होती का..??
प्रधानसेवकांचे नाव पुरस्कारासाठी देण्यासाठी कुणा-़कुणाच्या आणि कधी शिफारशी गेल्या..???
सदर पुरस्काराचे हे पहिले आणि शेवटचे वर्ष असेल काय..????

मार्केटिंग गुरूच्या नावाचं पहिलंच पारितोषिक मोदीजींना मिळालं यापेक्षा भारी अजून काय असू शकतं. त्यांच्या स्व-मार्केटिंगच्या अथक प्रयत्नांचंच हे फलीत असणार.

> मार्केटिंग गुरूच्या नावाचं पहिलंच पारितोषिक मोदीजींना मिळालं यापेक्षा भारी अजून काय असू शकतं. त्यांच्या स्व-मार्केटिंगच्या अथक प्रयत्नांचंच हे फलीत असणार. > +१ Lol

<< मार्केटिंग गुरूच्या नावाचं पहिलंच पारितोषिक मोदीजींना मिळालं यापेक्षा भारी अजून काय असू शकतं. त्यांच्या स्व-मार्केटिंगच्या अथक प्रयत्नांचंच हे फलीत असणार. >>
-------- Happy

खरेतर राहुल जास्त चांगला व मोस्ट डिजरविंग कॅण्डीडेट होता>> या येत्या निवडणुकीत नक्कीच पंप्र बनण्यास मदत झाली असती ..

अरेरे! हा धागा आदर्णीय मोदीजींना मिळालेल्या अवॉर्डबद्दल आहे. पप्पूला इथे आणून तो भरकटवू नका. कृपया.

आदर्णीय मोदीजींना हा अवॉर्ड मिळाल्याने त्यांना येती निवडणूक जिंकायला मदत होईल का? खरं तर त्यांना अशा मदतीची जराही गरज नाही. पण फक्त ५१% बहुमतापेक्षा २/३ बहुमताकडे जायला मदत होईल.

ग्रेट अभिनंदन!

मोदींनी शाहरूखला मागे टाकत हा एवार्ड पटकावला Happy

मी आधीपासूनच म्हणायचो,
राजकारणात मोदी
आणि बॉलीवूडमध्ये शाहरूख
यांना सेल्फ मार्केटींगमध्ये तोड नाही.
याबाबतीत दोघे माझा आदर्श आहेत आणि तसे बनायचा कायम प्रयत्न असतो !

ग्रेट अभिनंदन!

मोदींनी शाहरूखला मागे टाकत हा एवार्ड पटकावला Happy

मी आधीपासूनच म्हणायचो,
राजकारणात मोदी
आणि बॉलीवूडमध्ये शाहरूख
यांना सेल्फ मार्केटींगमध्ये तोड नाही.
याबाबतीत दोघे माझा आदर्श आहेत आणि तसे बनायचा कायम प्रयत्न असतो !

हा धागा आदर्णीय मोदीजींना मिळालेल्या अवॉर्डबद्दल आहे. पप्पूला इथे आणून तो भरकटवू नका >> असं कसं? NaMo is incomplete without the mention of RaGa Happy

तुफान फेकूगिरी आहे राव ही.. कोटलरच्या नावाने पुरस्कार, आणि तो द्यायला एक पण विदेशी पाहुणा नाही.