किंग खान बरोबर नाचु या.

Submitted by अश्विनीमामी on 9 January, 2019 - 14:38

व्हॅलेंटाइन्स डे वीकेंडला फुकेत मध्ये एका पार्टीला जाय चे आहे. त्या साठी तयारी म्हणून आंख मारे च्या स्टेप्स बघायला युट्युब उघडले. साइडला माबो असतेच. शाहरुख खान ला नाचता येते का असा एक प्रश्न एका बाफ वर वाचला. त्या अनुषंगाने आठवायला सुरुवात केली तर प्ले लिस्ट मध्ये
फेवरिट केलेली गाणी सापडली. त्याच्या बरोबरीने आपण जीवनातल्या किती दशकांमध्ये नाचलो आहोत ते लक्षात येउन मग खालची लिस्ट केली.

१) मेहंदी लगा के रखना. डोली सजाके रखना: चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे:

एक क्लासिक लग्ना आधीच्या मेहंदी, संगीत सेरिमनी मध्ये लावायचे गाणे. नवरा नवरीच्या सर्व नातेवाइकांना व मित्र मैत्रीणींना नाचायला उत्साहित करेल असे मस्त धमाल गाणे. शाहरूख व मंदिरा फुल्टू जोशाने नाचतात. कोरीओ ग्राफी बहुतेक सरोज खानची असल्यासारखी वाट्ते.
प्रत्येक शब्दावर अ‍ॅक्षन . कपडेपट पण फार डोळे दिपवील इतका भारी नाही. काजोलचा भयानक पोपटी ड्रेस तर अगदी डोळ्यात खुपतो. पण मंदिरा छान दिसते. रस्ता हमारा तकना... कडव्यात शाह रुख ने एक्स्प्रेशन्स व अ‍ॅक्षन चांगली केली आहे. चपळतेने नाचतो. शेवटी बायकांच्यात
जाउन ओढणी घेउन नाचतो व समोर मुलीचे बाबा पक्षी अमरीश पुरी आल्यावर हवा टाइट!!! त्यात तेव्हा दोघांचे शाहरुख व काजोलचे वय लहान होते तो उत्साह दिसतो. भारतीय लग्नात मस्ट गाणे.

२) रुक जा ओ दिल दिवाने चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे.

हे गाणे कॅची आहे. सिचुएशन स्टेज्ड म्हणावी अशी आहे. मागच्या एक्स्ट्रा मुलींना एक सारखा फेक युरोपीअन मुलींचा ड्रेस दिला आहे.
ह्यातही शाहरुखचा नाच वेस्टर्न व बॉलिवुड दोन्हीची सांगड घालून आहे. अगदी बारीक दिसतो. कपडे लूज फिटिंग वाटतात. पण त्याने खूप
एनर्जी वापरून कसर भरून काढली आहे.

सिनेमाच लिजंडरी हिट असल्याने, अजूनही मराठा मंदि र ला चालू आहे, ह्याची दोन गाणी घेतली.

३) कोई लडकी है जब वो हंस ती है,,, बारिश होती है ... चित्रपट दिल तो पागल है.
ह्या चित्रपटातली व्हॅलेंटाइन डे पार्टीतले बोअर गाणे सोडले तर सर्व गाणी मला खूप आवड तात. पण त्यातही हे खास फेवरिट. खास भारतीय धाटणीचे, कडक उन्हाळ्या नंतर आलेल्या पावसाचे स्वागत करणारे, तसेच सुरेख रोमँटिक , प्रेमात पडायच्या पहिल्या दुसृया फेज मध्ये असलेले नायक व नायिका.... मस्त पाउस, फुल एनर्जेटिक मुले, व सर्वाला चार चांद लावणारी माया नृत्याप्सरा माधुरी. किती गोड दिसतात दोघे. मध्येच गाणे करिश्माच्या तिथे हॉस्पिटल मध्ये जाते व ती पण नाचात सहभागी होते. सिनेमा आला तेव्हा सर्व लहान मुले हा नाच करून दाखवतच. घरी भे टायला गेले की मावशी नाच बघ. की सुरू चक धुम धुम. सोप्या पण हाय एनर्जी स्टेप्स, साधे ड्रेस, पावसात भिजवलेली नटी असूनही व्हल्गर न दिसणे. एक प्रकारचा होलसम इनोसन्स आहे गाण्यात. अगदी शेवटी तो तिला सोडायला येतो तेव्हा त्याला रोमॅन्स चा स्पर्श होतो. जो त्या दशका बरोबरच गायब झाला. पण ह्या गाण्यासोबत नाच करून आपण त्या भावनेला परत भेटू शकतोच. व्हेन लाइफ गिव्ह्ज यू
गुलाब जामुन्स..... यु जस्ट ग्रॅब टू!!!

४) कोई मिल गया.... चित्रपट कुच्छ कुच्छ होता है...

टिपिकल कॉलेज फेस्ट मधले नाच गाणे. ह्यात शा हरुख व काजोल राणीचा क्लू घेउन नाचायला व गायला सुरुवात करतात. हे ही खूप हाय एनर्जी व कॅची गाणे आहे. नाचायला बेस्ट. पिक्चर आला तेव्हा तीन महिन्याच्या बाळाला घेउन सिंगल स्क्रीन थिएटर मध्ये मी हा चित्रपट पाहिलेला. मुंबईत राहायचा, पूर्ण पणे गृहिणी व नवमाता असण्याचा एक शीण व थकवा आला होता. रोजच्या ड्रजरीची सवय होत नव्हती तेव्हा ह्या चित्रपटातल्या नाच व गाण्यांनी एक दम मजा आणली व नव्या जोमाने जीवनाला भिडता आले. शाहरुखची एक फ्लोअर वर घसरत जाताना ची स्टेप आहे तेव्हा गुढघे( त्याचे) चांगलेच सडकले असतील. मी ह्या गाण्यांची कॅसेट घेतली होती!!!!!

५) ये कैसा लडका है... व ६) लडकी बडी अन जानी है.. दोन्ही कुछ कुच्छ होता है.

एक कॉले ज विद्यार्थ्यांचे व एक लहान मुलांना करता येतील अश्या स्टेप्स असलेले अशी ही दोन गाणी खूपच पेपी व हाय एनर्जी आहेत. करण जोहरच्या सिनेमात कुठल्या तरी शाळा कम कॉलेज मध्ये असले एक गाणे असतेच. गॅपचा हूडी वगैरे तेव्हा फारच ट्रेंडी वाटायचे व कूल वाला नेकलेस!!! हाउ टॅकी!!

७) चल छैया छैया..... दिल से. ९) जिया जले ... दिल से.

जर आपल्यात मेल्या नंतर पुरायची किंवा ममी बनवायची पद्धत असती तर मी ह्या सिनेमा च्या गाण्या ची सीडी बरोबर ठेवा असे नक्की लिहून ठेवले असते. पूर्ण अल्ब म आला तेव्हा अगदी धूम मचली होती. छैया छैया तर एकदम मनोरंजनाची जबरद्सत कॅपसुल आहे. ट्रेन च्या छपरावर नाच. तो ही मलाइका सारख्या अशक्य बारीक व ग्लॅमरस सुंदरी बरोबर. पण शाहरु ख मॅचेस हर स्टेप फॉर स्टेप. त्यात गाणे
अप्रतीम वेगळा लेखच लिहायला हवा खरेतर. पण जो यार है खुश्बू की तरह जिसकी जुबां उर्दू की तरह. आणि पांव तले फिरदोस जले.
काफी है. मलाइका चा कपडेपट क्लासी आहे साधी ओक्सिडाइज्ड सिल्वह् र ज्वेलरी पण किती खुलून दिसते. ह्यातल्या स्टेप्स, कोरिओ
ग्राफीमुळे फर्हा खान एकदम प्रसिद्धीत आली. शाहरुखला एक ढगळ लाल जॅकेट आहे. पण कोरिओ ग्राफी तसेच हलत्या ट्रेन मध्ये नाचायचे
चॅलेंज त्याने उत्तम् रीत्या पेलले आहे. ही दोन्ही गाणी माझ्या प्लेलिस्ट मध्ये कायम असतातच.

जिया जले रूढ अर्थाने नाचायचे गाणे नाही. पण सिनेमात मस्त घेतले आहे . फक्त प्रिटी झिंटा नको होती. माधुरी असतीतर गाणे अधिक खुलले असते. ते मल्या ळी कोरस काय उंजीर अंजीर खंजीर म्हणतात ते लाखोवेळा गाणे ऐकूनही पाठ होत नाही. लोकेशन जबरी आहे

१०) आंखे खुली तो.... चित्रपट मोहोब्बते....

चित्रपट अतिशयच बोअर आहे. पण हा सेट पीस गाणे मस्त आहे. स्कूल कम कॉलेज मधली प्रॉम नाइट का कसले तरी सेलिब्रेशन.
अति शय फास्ट नाच व काँप्लि केटेड स्टेप्स, खूप सारे कलाकार एकावेळी. पण माझ्या आवडीचा भाग म्हणजे हेलेन मुलींना चला आवरा म्हणते तर शाहरुख तिला थांबवतो व विनंती करतो. अशी विनंती केली तर कोण बाई नाही म्हणू शकेल...... मग ओ हसीना जुल्फो वाली वर थोडा फास्ट नाच आहे. शीअर मॅजिक. अशीच जुनी मॅजिक राधा ऑन द डान्स फ्लोअर गाण्यात रिशी कपूरने डफली वाले गाण्यावर केली आहे. लव्हली.... गो अहेड जज मी ऑल यु वाँट.....

११) प्रिटी वुमन चित्रपट कल हो ना हो.. टिपिकल भांग डा. मला भांगडा पॉप हा प्रकार खूपच आवडतो. गाण्याला व स्टेप्स ना एक फ्रेश लुक आहे. एनर्जी आहेच. एकदम देसी वाटायला लावते हे गाणे. मागे प्रॉप्स अगदीच प्राथमिक आहेत.

बोनस ट्रॅक...

१२) माही वे..... चित्रपट कल हो न हो.

लेखाचा शेव्ट परत लग्नाच्या संगीत ने. हे ही जाम फेवरिट. परवा लेक कॉलेजला परत गेली तेव्हा लूप वर ऐकले व तिच्या लग्नात मेंदी/ संगीत मध्ये हे नक्की नक्की वाजेल. ह्यात शाहरुख व सैफ च्या स्टेप्स नक्की बघा. दोघा च्या शेरवान्या पण सुरेख आहेत. तेव्हा त्यांची फार क्रेझ होती.
हे गाणे जिम मिक्स मध्ये पण नेहमी असते. फास्ट व भारतीय बॉलिवूड पद्ध्हतीचा नाच आहे शीअर फन.

डान्स अवे पीपल. मज्जानु लाइफ विथ किंग खान.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

chapras i will update this tomorrow. need to catch up some zz.

अमा, मस्तच! ८ नंबर नाही दिला कुठल्या गाण्याला - लुंगी डान्स किंवा वन टू थ्री फोर माझ्यातर्फे नॉमिनेटेड.
माझी प्लेलिस्टः १. शीशे से शीशा टकराए २. यार तू ही दिलदार ३. लेफ्ट लेग आगे आगे ४. दिवानगी दिवानगी ५. छम्मकछल्लो ६. इटस क्रिमीनल ७. लुंगी डान्स ८. इश्क कमिना ९. इश्क कमिना १०. इश्क कमिना Wink
खरंच पार्टीत नाचायची वेळ आली तर मात्र शारूखला पास.

मजा आली जुनी गाणी आठवून.चैय्या चैय्या खरोखरच मॅजिकल.खरं तर पूर्णच दिल से.
अमा, सतरंगी वर युट्युब वर रशिया च्या मयुरी ग्रुप चा डान्स आहे.प्रचंड आवडेल.आणि त्या ग्रुप चे इतर डान्स पण.

थ्री चीअर्स फॉर शाहरूख & अमा ..
क्लॅप क्लॅप क्लॅप !! क्लॅप क्लॅप क्लॅप !! यू मेड माय डे Happy

यातली बरीचशी गाणी शाहरूख डान्स स्पेशलसाठी माझीही फेव्हरेट...

आमच्या घरी रोज किमान अर्धा तास नाचायची पद्धत आहे.
त्यात सध्या शाहरूखचे फॅन टायटल गाणे, आणि वरच्या तुमच्या लिस्टमधील
३) कोई लडकी है जब वो हंस ती है,,, बारिश होती है ... चित्रपट दिल तो पागल है.
ही शाहरूखची दोन गाणी सध्या नाचाच्या लिस्टमध्ये आहेत.
अप्रतिम नाच कोरीओग्राफी म्युजिक सारेच फ्रेश फ्रेश आहे त्या घोडे जैसी चाल हाथी जैसी दूम गाण्यात

अजूनही कैक दुर्मिळ गाणी सापडतील ज्यात शाहरूखच्या काही स्पेशल स्टेप्स लक्षात राहतात...

आता ईथे रात्रीचे दोन वाजले आहेत तर झोपतो. उद्यापासून ह्ळूहळू हा धागा सजवूया..

अरे हो,

ते मै हू ना मध्ये शाहरूखला पार्टीमध्ये डान्स करायची वेळ येते त्यासाठी तो शिकताना दाखवलाय ते अफाट मनोरंजक आहे. यूट्यूबवर विडिओ मिळाला तर टाकतो उद्या लिंक. शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज Happy

शाहरुख खान ला नाचता येते का असा एक प्रश्न एका बाफ वर वाचला>>
मीच विचारला तो. पण का विचारला हे त्याच्या वरचीच पोस्ट वाचले की कळले असते. Lol

असो.
बिल्लू बार्बर मधली ही एक दोन नाच आहेत त्याचे चांगले.
खुदाया खेर, आणि लव्ह मेरा हिट हिट.

होले होले हो जाएगा प्यार..

अजून एक गाणं.
वन टू थ्री फोर, गेट ऑन द डान्स फ्लोर!
मस्त वाटतं ऐकायला, आणि दोन्हीही छान नाचलेत.
Chammmak challo सुद्धा भारिये!

अमा मस्तच लिहिलंत.
सगळी गाणी आवडली. दिल तो पागल है ची तर सगळीच गाणी आवडती.
ही गाणी माझ्या टीनेज-कॉलेजच्या वेळची. वो शाहरुख मेरा था. Happy
वॉन्ना बी माय छम्मक छल्लो - रा वन, १,२,३,४ गेट ऑन द डान्स फ्लोर - चे एक्स, दर्दे डिस्को - ओ शां ओ, गोरी गोरी गोरी गोरी-मै हु ना

एक चित्रपट होता म्हणजे आहे चलते चलते. त्याची ही सर्व गाणी छान आहेत सुरुवातीला एक नौवारी नेसलेल्या मुंबईच्या कोळीणीं बरोबर केलेले समुह नृत्य आहे. व राणी बरोबरची रोमँटिक गाणी छान आहेत. शाहरुख खान ट्रक ड्रायवहर असतो ते. ती शिरीमंत व लग्न करतात मग भांडणे.
मुलीची सावत्र आई . ह्याच शुटींग दरम्या न सलमान ऐश्वर्याला ओढुन घेउन गेला होता.

अरे बापरे! हा माणूस किती दिग्गज आयडी ह्यॅक करत चालला आहे. काही दिवसांनी वेबमास्टर आणि अ‍ॅडमिन सुद्धा ह्यॅक झालेले दिसतील आणि सगळी मायबोलीच शाखामय झालेली पाहावी लागणार तर..

नॉस्टॅल्जियाचा भाग जास्त आहे:) शाहरुख किंवा सिनेमे महत्त्वाचे नाहीत कधी, केव्हा, कुठे, कोणाबरोबर, का अशी सगळी पर्सनल कारणं आठवतात मला, काय ते दिवस, किती मजा केली असं सगळं आठवतं. आईच्या किती मागे लागलो एखादा सिनेमा बघायला ने ते स्वतः एकटं (मैत्रिणी, सहकारी बरोबर) जाऊन स्वतःच्या पैशाने सिनेमा बघता आला असा मोठा प्रवास!