मार्क्स यांना बुद्धी देवो

Submitted by Nayan@144 on 8 October, 2018 - 06:29

मानवीय समाजामध्ये विचारधारा हि लहानपणा पासून रेखाटली जाते, यामध्ये त्या निरागस चेहऱ्याचा काहीही दोष नसतो. कोणाचे विचार कितपत योग्य किंवा वाईट आहे याचे मापदंड नको ठरवायला. भारतामध्ये सद्या ‘लाल सलाम’ च्या घोषणा जोर-जोरात सुरु आहे आणि JNU च्या प्रसंगा नंतर त्या￰￰ला अत्त्याधिक पाठिंबा मिळाला . यामध्ये सर्वाधिक हे विध्यार्थी दशेतील तरुण होते. ते नैसर्गिकच आहे कारण जेव्हा पण मार्क्स यांचं नाव ऐकायला येते तेव्हा धमन्यांतील रक्त खळवंडल्या शिवाय राहणार नाही . मार्क्स यांचं व्यक्तिमत्व अत्त्यंत प्रभावशाली आणि संघर्ष्याच्या लेखणी मधून उभरून आलय. तो नक्कीच थोर व्यक्ती होता आणि त्यांनी जगाला नवी विचारधारा दिली. त्यामुळे त्यांचे कितीही आभार मानले तरीपण ते कमीच आहे.
मार्क्स यांनी वर्ग संघर्षबद्दल सिद्धांत मांडला आणि तो तेथील व्यवस्थेवर उपयुक्त असा सिद्धांत आहे पण जेव्हा आपण भारतीय व्यवस्थेचा विचार करतो तेव्हा आपल्याला जाणवेल कि हि व्यवस्था जातीवर आधारलेली आहे.
मराठीमध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे “जी जात नाही ती जात." जातिव्यवस्थेचा हा भस्मासुर वर्ग संघर्षापेक्षा मोठा आहे . गरीब माणूस केव्हाही श्रीमंत होवू शकतो वा श्रीमंत माणूस गरीब सुद्धा होऊ शकतो पण जाति व्यवस्थेमध्ये श्रीमंत माणूस हा आपल्यापेक्षा वरच्या जातीतील गरीब लोकांच्या सोबत बसू शकत नाही.यामध्ये श्रीमंत किंवा गरीब भेद नसून हा प्रत्यक्षात जातीभेद आहे .
एका प्रतिष्टीत व्यक्तीला शूद्र आहे म्हणून मंदिरामध्ये प्रवेश नाकारला जातो . यामध्ये कुठेही वर्ग संघर्ष दिसत नाही . मार्क्स म्हणतो कि शोषितांच्या चळवळीचे नेतृत्व हे शोषितच योग्य प्रकारे करू शकतात . शोषण करणारे हे चळवळीची फाटाफूट करतात. दलितांच्या चळवळी विखुरण्याचे मुळात हेच कारण आहे . आज भारतीय मार्क्सवादी चळवळ हि अश्याच नेतृत्वाच्या हाती आहे.

©2018,Nayan Patil (MSW-TISS) All rights reserved. https://www.facebook.com/nayan.patil.144

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरे आहे.
जात ते साम्यवाद अशा बर्‍याच विषयांचा धांडोळा तुम्ही ह्या स्फुटात घेतला आहे.

काही 'करायच (?)' म्हणलं की ही जात मधे येते. मग आम्ही काहीच करायचं (?) नाही का? अशी काही समाजाची तक्रार आहे. जाती निर्मुलनातून सत्प्रवृत्त समाज तयार व्हायला हवा.

काही 'करायच (?)' म्हणलं की ही जात मधे येते. मग आम्ही काहीच करायचं (?) नाही का? अशी काही समाजाची तक्रार आहे. जाती निर्मुलनातून सत्प्रवृत्त समाज तयार व्हायला हवा.