झिरो परीक्षण

Submitted by अज्ञातवासी on 23 December, 2018 - 11:59

गणेशोत्सवात गावोगावी खूप देखावे उभारलेले असतात.पण प्रत्येक गावाचं आकर्षण असतो, तो एक देखावा, जो सगळ्या देखाव्यात उठून दिसतो. आपल्याला माहिती असतं, हा एक देखावा आहे, मूळ घटना यापेक्षा खूप भव्यदिव्य आहे. पण तरीही आपण तो देखावा मनापासून एन्जॉय करतो, त्या देखाव्यातील सत्यतेत कितीही भगदाडे असली तरी!

झिरो बघून मला काय मिळालं?
आनंद? हो थोडासा.
मी भावनिक झालो? नाही.
माझ्या मनावर काही खोलवर ठसा उमटला? नाही.
तरीही हा चित्रपट मी एन्जॉय केला. एका तटस्थ नजरेतून. ना मला कंटाळा आला, ना मला असं वाटलं हा चित्रपट संपू नये.
कारण भव्य देखावे सगळ्यांना आवडतात, पण देखावा संपल्यावर कुणालाही तिथे थांबावं वाटतं नाही!
या चित्रपटाची कथा सांगायची झाली तर बव्वा सिंग नावाची व्यक्ती वयाच्या ३८ व्या वर्षीही अविवाहित असते. कारण सगळ्यांना माहितीये, तो बुटका असतो. लग्नासाठी तो आसुसलेला असतो, आणि असच एका लग्न जुळवणार्या संस्थेत त्याला एक फोटो मिळतो. त्या मुलीला तो बघताच पसंद करतो, पण तिला प्रत्यक्षात बघून तो शॉक होतो, कारण ती असते नासाची वैज्ञानिक व तिला सेरेब्रल पालसी चा आजार असतो. मात्र आता बव्वा हट्टाला पेटलेला असतो, तो तिला पटवतो, मात्र त्याच्या आयुष्यात येते बबिता, आणि सुरू होतो प्रेमाच्या त्रिकोणी प्रवास. खाचखळग्यांचा प्रवास!
कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं, तर मी उतरत्या क्रमाने बोलेन. सर्व सहकलाकार, मग बव्वाचे आई वडील असो, लग्न जुळवणार्या संस्थेत असलेला पांडे असो, किंवा बव्वाचा मित्र असो, हे सर्व हिंदी पट्ट्यातील सिनेमामधील अत्यंत कसलेले कलाकार आहेत. त्यांच्या वाटेला कोणतीही भूमिका येवो, त्यांनी ती चोखपणे बजावली आहे, आणि येथेही त्यांच्या वाटेला जेवढं काम आलंय, ते त्यांनी चोखपणे बजावलंय, ना कमी ना जास्त. चोख व्यवहार.
आता मुख्य तीन कलाकारांविषयी म्हणायचं ठरलं, तर सगळ्यात कमी भूमिका कतरिनाची आहे. एक अल्कोहॉलिक, नैराश्य आलेल्या पण अजूनही अहंकार असलेल्या बबिताची भूमिका कतरिना करते, आणि नेहमीप्रमाणे, कतरीना कुठेही या रोलमध्ये फिट बसत नाही, आणि तिने या रोलसाठी मेहनत घेतलेलीही कुठे जाणवत नाही. सगळ्यात जास्त तिने माती खाल्ली असेल, तर हिंदी पट्ट्यातल्या उच्चारांमध्ये. इतकी वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत राहून जर साधे शब्दोच्चार न जमणारी ऐक्ट्रेस फक्त सुंदरतेच्या बळावर आज टॉपला असेल, (आता कतरिनाला मी ती आता सुंदर दिसत नाही असं म्हणणार नाही, कारण अजूनही ती छान दिसते. भलेही तिचा जुना चार्म गेलाय तरी!) तर हॉलीवूड बॉलीवूडला भारतातच का मागे टाकतय, याचं उत्तर मिळतं.शब्दोच्चार जरी सोडलेत, तरीही अभिनयाच्या बाबतीतही कतरिना कुठेही बबिता जाणवत नाही. दिसते ती फक्त कतरीना.
आता अनुष्काविषयी बोलूयात. तोंड वेंगाडून बोलणे, वाकडं चालणे ह्या दोन गोष्टी करून अनुष्का स्वतःला सेरेब्रल पालसीची रुग्ण दाखवते. पण तिच्या देहबोलीत कुठेही तो आजार, अथवा मर्यादा जाणवत नाही. कितीही आशावादी असलं, तरीही या आजारांनी शारीरिक मर्यादा येतातच. पण वरवरची शारीरिक लक्षणे घेऊन भूमिकेचा अभ्यास न करता, अनुष्काने ही भूमिका साकारलीये, मग त्या व्यक्तीची मानसिकता दूरच राहिली. अनुष्काच्या भूमिकेत पावलोपावली तो भडकपणा व उथळपणा जाणवत राहतो.
आता या कथेतील सर्वात मुख्य पात्र, ज्याच्यावर या चित्रपट मार्केटिंगचा सर्वात जास्त फोकस होता, त्या शाह रुख खानवर येऊ. एका शब्दात सांगायचं झालं, तर या चित्रपटात शाहरुखने फक्त माती खायची बाकी ठेवलीये. मी बाकी ठेवलीये असं यासाठी म्हटलो की नेहमीच गालात हसणं, शरीर वाकवून रोमान्स करणं, भडकपणे राग दाखवणं, मान हलवून अभिनय करणं, यात शाहरुख पैकीच्या पैकी मार्क घेतो. पण एका बुटक्या व्यक्तीचा लहेजा, शारीरिक मर्यादा, त्यातून येणारा न्यूनगंड, लग्न जमत नसल्याने येणारी निराशा, काहीतरी नवीन करण्याची प्रचंड उर्मी व आशावाद, या सर्व आघाडीवर तो सपशेल माती खातो.
आता या चित्रपटाच्या VFX अथवा CGI कडे वळू. एका शब्दात म्हणायचं झालं, तर वेल ट्राय, पण बुटका आणि लहान हे शब्द कितीही समानार्थी वाटत असले, तरी यांचा स्पष्ट अर्थ ना समजल्यास काय अनर्थ होऊ शकतो, याच उत्तम उदाहरण. एखाद्या १२ वर्ष वय असलेल्या मुलावर तुम्ही शाहरुखला चिकटवला, असं वाटत राहतं, आणि ते बेमालूमपणे झालंय. पण त्याची चित्रपटात गरज नाही, आणि ज्याची गरज आहे, ते कुठेही दिसत नाही. म्हणून लहान शाहरुखला पैकीच्या पैकी मार्क, बुटक्या शाहरुखला शून्य मार्क, आणि गरज बुटक्याची होती राजा...
छायालेखन ज्या मनू आनंदने केलंय, त्यांना सलाम. देशी मातीपासून अंतरिक्षपर्यंत जो एक टच आहे, तो त्यांनी छान जपलाय. प्रत्येक फ्रेम नेत्रसुखद वाटते. भव्य वाटते. चित्रीकरण तर अत्यंत टवटवीत वाटत. एकंदरीत हा खुप छान अनुभव वाटतो.
म्युजिक मध्ये अजय अतुलने तुम्ही हिंदीत का नेहमी माती खाताय? असा प्रश्न मला यावेळीही विचारण्याची संधी दिलीय. 'मेरे नाम तू' सोडलं तर सगळी गाणे विस्मरणीय आहेत. आणि 'मेरे नाम तू' वर 'सैराट झालं जी'चा प्रभाव जाणवत राहतो.
आता बोलूयात कथेविषयी आणि पटकथेविषयी. कथा खरंच भव्य आहे. कथेची कल्पनाच मुळात अतिशय एपीक म्हणावी अशी आहे (मी एपिक म्हटलंय, युनिक नाही. गैरसमज नको). मात्र पटकथा, जी चित्रपटाचा आत्मा असते, तिच्यातच जीव नाही. मुख्य त्रिकोण सोडला तर, कुठल्याही व्यक्तिरेखेची चित्रपटात नीट वाढ किंवा ओळख होत नाही. मुख्य व्यक्तिरेखाही खूप उथळ लिहिलेल्या वाटतात. छोट्या छोट्या गोष्टी का व कशा घडतात, याचं स्पष्टीकरण मिळत नाही, व प्रेक्षक गोंधळून जातो.
आता शेवटचा व मुख्य भाग दिग्दर्शन. आनंद राय ही व्यक्ती उत्तर भागातील चित्रपट बनवणारा हुकुमी एक्का. तिथल्या व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करणं, ही त्यांची खासियत. पण या चित्रपटात नेमकं त्यांना व्यक्तिरेखा उभ्याच करता आल्या नाहीयेत,कारण...
...त्यांचं सगळं लक्ष शाहरुखच्या स्टारडमकडे केंद्रित झालंय...
वरची ओळ मी यासाठी हायलाईट केली, कारण याच एका कारणाने चित्रपट दणक्यात आपटतो. बव्वा सिंग जरी बुटका आहे, तरी तो शाह रुख असल्याने त्याची वागणूक स्टारसारखीच असणार, हे धरून सगळा चित्रपट त्याभोवती केंद्रित केलाय, आणि परिणाम... शून्य!
समारोपात मी असं म्हणेन की शेवटी ही कथा भव्य आहे, देखाव्याच्या कथेसारखी. पण देखावा दाखवताना त्या कथेला करावी लागणारी डागडुजी स्पष्ट दिसते. पण भव्यदिव्य देखावा उभं करायलाही कसब लागत...
हा चित्रपट म्हणजे असाच एक देखावा आहे. भव्य कथा, पण भगदाड पडलेली पटकथा. सर्व कलाकार अभिनयाचा देखावा करतायेत, पण कुणीही तो जगत नाहीये. सादरीकरण सुंदर आहे, पण ओढ लावणारं नाही. एखाद्या सुंदर देखाव्याकडे माणूस क्षणभर ओढला जाऊन तटस्थ होतो, तसंच इथे होतं. हा चित्रपट ना हुरहूर लावतो, ना टिकणारा आनंद देतो. आपण चित्रपट बघायला आलोय, चित्रपट संपलाय, चला आता घरी जाऊन अर्जंट मेल टाकायचाय...
...आणि शून्यापासून सुरुवात करून बाहेर पडताना तो शून्य होऊनच पडतो...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा तुमचा प्रतिसाद आवडला आणि पटलाही. बॉलीवूड हादरलं ते बाहुबलीमुळे. बाहुबलीमध्येही बऱ्याच इंग्रजी चित्रपटांची कॉपी होती, पण अस्सल रंग देशी मातीतला होता. बाहुबलीला मिळालेलं यश बघून अहं अथवा न्यूनगंड म्हणा, सर्वांना भव्यदिव्य काहीतरी रचण्याची स्पर्धा लागली. तशा कथा हॉलीवूडमध्ये असल्याने कशीही उचलेगिरी चालू झाली. आधीच सुपरस्टारडम, त्यात बजेट बघून लोक चित्रपट बघायला येतात हा गैरसमज, जीव नसलेल्या कथेत VFX चा भडिमार, आणि अजीर्ण होईल इतकं मार्केटिंग, यामुळे चित्रपट बजेट कोटींची उड्डाणे घेऊ लागला, आणि जेव्हा फ्लॉप ठरला, तेव्हा अक्षरशः तोंड झोडायची पाळी आली. (वितरकांवर आणि निर्मात्यांवरही)

रश्मी मला तुमचा त्रागा कळतोय, पण एक मानवी स्वभाव सांगतो, कुणाला काही बोलण्यापेक्षा त्याला खिजगणतीतही न धरणं कधीही चांगलं. मीही बोलणार नाही, वाटलं तर पुन्हा धागा स्थलांतरित करेन, कारण मायबोलीवर लिहिण्यासाठी व वाचण्यासाठी खूप छान धागे आहेत.
आणि काही लोकांना कितीही उत्तरे दिलीत ना, त्यांना फरक पडत नाही, पण तेच जर तुम्ही त्यांना दुर्लक्षित केलं, तर त्यांचा जळफळाट होतो.
शेवटी एक सुवचन आहेच. मूर्खांशी कधीही भांडू नका, ते आधी तुम्हाला त्यांच्या स्तराला आणतील, आणि मग गट करून तुम्हाला हरवतील.

आशुचँप जे काही चाललंय ते खूप हास्यास्पद आहेच, पम दुःख एकच वाटत की कुल्फीसारख्या कथा पुन्हा वाचायला मिळणार की नाहीत.
एक सिद्धहस्त लेखक, ज्याचा मी खरंच चाहता होतो, त्याने स्वतःची अशी अवस्था करून घ्यावी म्हणून वाईट वाटतं. पण असो!!

कुल्फीसारख्या कथा पुन्हा वाचायला मिळणार नाही हे मलादेखील वाटतं पण त्याचे कारण 'सिद्धहस्त लेखकाने स्वतःची अशी अवस्था करून घेतली' असे मला वाटत नाही.
Either he is grieving loss of so called friends
or चांगली कथा लिहिण्याइतकी मेहनत घ्यायच्या लायकीचे इथले वाचक आहेत असे त्यांना वाटेनासे झाले आहे.

त्यांनी स्वतःसाठी का होईना चांगले लेखन करावे, माबोवर नाही टाकले तरी ठिकय, दुसऱ्या काही साईट असतीलच, इंग्लिश वाचकांच्या/लेखकांना मदत करणाऱ्या, त्यांना इंग्लिशमधेदेखील चांगले लिहता येईल असे वाटते.

कुल्फीसारख्या कथा पुन्हा वाचायला मिळणार नाही हे मलादेखील वाटतं पण त्याचे कारण 'सिद्धहस्त लेखकाने स्वतःची अशी अवस्था करून घेतली' असे मला वाटत नाही.
Either he is grieving loss of so called friends
or चांगली कथा लिहिण्याइतकी मेहनत घ्यायच्या लायकीचे इथले वाचक आहेत असे त्यांना वाटेनासे झाले आहे.

त्यांनी स्वतःसाठी का होईना चांगले लेखन करावे, माबोवर नाही टाकले तरी ठिकय, दुसऱ्या काही साईट असतीलच, इंग्लिश वाचकांच्या/लेखकांना मदत करणाऱ्या, त्यांना इंग्लिशमधेदेखील चांगले लिहता येईल असे वाटते.>>> असं असेल तर त्यांना या कार्यासाठी शुभेच्छा. पण अजून एक सुभाषित आहेच "टवाळ मित्रापेक्षा सज्जन शत्रू परवडतो"

रश्मी मी शाहरूखचा चाहता आहे... भक्त नाही.
मी त्याच्या चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट बोलतो.
मात्र कोणी त्यावर न पटणारी टिका करत असेल तर मी ती खोडून काढणारच !

जसे की हा चित्रपट फसलाय अशी चर्चा होतेय हे कबूल !
मात्र शाहरूखने धमाल केलीय हे सुद्धा कानावर येतेय ..

आमच्या गावकडं येक म्हण हाय ....
माक्ड म्हणतं माझीच लाल

:}

आता कुणीही अवांतर लिहू नका. आता फक्त चित्रपटाविषयी चर्चा करू.
तसंही चित्रपटाविषयी लिहिण्यासारखं बरच आहे...

इंग्लिश पाहिला नाही पण बुटके चित्रपट अप्पूराजा हा लँडमार्क आहे.माझी कल्पना त्याच्या पुढे जातच नाही.
झिरो बघणार नाही.ठग ची इतकी जाहिरात होऊन मी वाट पाहून त्याचे घाण रिव्ह्यू आले.आता असे बिग बजेट पिक्चर तिकीट काढून पाहण्याची शक्ती राहिली नाही.

झिरो तीन दिवसात ५८ कोटी रुपये. शुक्रवार आणि रविवार सेम कलेक्शन. रविवारतर पूर्ण दिवस सुट्टी असते.
सोमवार ही चित्रपटासाठी अग्निपरीक्षा असेल. जर झिरो १५ कोटीच्या पुढे गेला, तर चित्रपट फ्लॉप होण्याची शक्यता कमी होईल. मंगळवारी नाताळच्या सुटीचा फायदा होईल.
शुक्रवारपासून सिमबा येतोय... मसाला इंटरटेनर असल्याने झिरो च्या सिंगल स्क्रीन अतिशय नगण्य होतील.
सो, झिरोला औपचारिकरित्या फ्लॉप म्हणायला हरकत नसावी.

हायझेनबर्ग आणि ऋन्मेष यांच्यावर चर्चा करायला आणि सुवचने लिहायला आपण स्वतंत्र धागा काढू शकतो.

@ धागाकर्ता, आपण स्वत: जर अश्या चर्चेत सामील झालात तर दुर्दैवाने धागा स्थलांतरीत करायचा हक्क गमावून बसाल.

शाहरूखच्या चित्रपटाच्या धाग्यावर त्याचीच चर्चा व्हावी.
चर्चा पुन्हा रुळावर आणूया...

विकेण्डला कलेक्शन जरा घसरल्यानंतर आता हळूहळू पुन्हा उलटे वारे वाहू लागलेत. चित्रपटाच्या चांगल्या बाबी हळूहळू अघोरेखित होत आहेत. माऊथ पब्लिसिटी चित्रपटाला तारेल आणि हा चित्रपट लंबी रेस का घोडा ठरेल असे वाटू लागलेय.

अरे बाप्रे! शाहरूखच्या सिनेमाच्या धाग्यावर ऋन्मेष सोडून हायझेनबर्ग ट्यार्पी खाऊन राहिले. Rofl
मै कहा हूं... कही ये सपना तो नही है Proud

तर माझ्याबद्दल काळजी/प्रेम/राग (थोडक्यात काहीही) व्यक्त करणार्‍या सगळ्यांना धन्यवाद. तुमचे प्रेम असेच कायम राहू द्या. Wink

मागच्या वर्षी अशाच एका शाहरूखच्या सिनेमाच्या धाग्यावर मी ऋन्मेष ह्यांच्या शाहरूख प्रेमातून धागे भरकटवण्याच्या विरोधात कळकळीने बोलत असतांना तुमच्यापैकी किती जणांनी हायझेनबर्गच्या सपोर्ट मध्ये लिहिले होते.... हात वर करा पाहू.
'काही' लोकांनी सोयीस्करपणे मी 'विनाकारण ऋन्मेषच्या मागे पडलो होतो' असा पश्चात आरोप केल्यानंतर तुमच्यापैकी किती जणांनी 'नाही, हे चूक आहे' म्हणून लिहिले होते.... हात वर करा पाहू.

थोडक्यात जनता गाढवावर बसूही देत नाही आणि सोबतही चालू देत नाही पण गाढवाच्या नदीत पडण्याचा तमाशा बघायला येते आणि नंतर 'बिचारे गाढव' म्हणत हळहळते. Lol

ह्याऊपर कोणी हात वर करणारा/री असेलच तर मला ऊत्तर द्यायला आवडेल.... तोवर चालू द्या Lol

हायझेनबर्ग आणि ऋन्मेष यांच्यावर चर्चा करायला आणि सुवचने लिहायला आपण स्वतंत्र धागा काढू शकतो. >> +११११११११११११११११११११११

शाहरूखच्या चित्रपटाच्या धाग्यावर त्याचीच चर्चा व्हावी.
चर्चा पुन्हा रुळावर आणूया... >>>> +१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

हायझेनबर्ग तेव्हा मी त्या चर्चेत नसेन, नाहीतर माझा हात नक्की वर राहिला असता आज.
मी वर जे लिहिलंय ते कळकळीने, किंबहुना तुम्ही कुठंही लिहीत असला तर मला लिंक द्या, कारण तुमचं लेखन मला मनापासून आवडत. तुमच्या सगळ्या कथा मला आवडतात.
असो.या जमलं तर दुस्तरचा पुढचा भाग लिहा कधीतरी. बघू तरी दे आम्हाला, शेवटी खोलीत पुन्हा धान्याच्या राशी पडल्या, की खोलीच उरली नाही...

Barring one sequence where all the stars gather post interval, which disconnected me. No easy resolutions, stretching the imagination, it’s really a brave film.
>>>>

याला कोणीतरी मराठी करा ना प्लीज.. >>
अनुराग कश्यप म्हणतोय 'ईंटर्वल नंतरचा एक सीन ज्यात अनेक स्टार लोकांची मांदियाळी जमवली आहे (ते ओम शांती ओम मधल्या 'दिवानगी दिवानगी' गाण्यासारखे काहीतरी असेल') तो सोडून मला हा सिनेमा खूप खूप आवडला. कल्पनाशक्तीने भारलेला, बाळबोध नसलेला, अतिशय धाडसी सिनेमा आहे हा. सिनेमाने मला शेवटपर्यंत खुर्चीला बांधून ठेवले. मला वाटते लोकांच्या (अवास्तव) अपेक्षांमुळे त्यांना निराशा आली असावी.. '

तो पुढे असेही लिहितो की ,' सगळ्यांनी एकदा तरी हा सिनेमा बघितलाच पाहिजे. ह्या सिनेमाने मेन्स्ट्रीम सिनेमासाठी अनेक नवनवीन दारे ऊघडली आहेत आणि शाहरूख सहित सगळ्या कलाकारांनी त्यांची नेहमीची पठडी/स्टाईल सोडून अभिनयात नवीन ऊंची गाठण्याचा प्रयत्न केला आहे'

थोडक्यात लोकांना अजूनही 'दिल तो पागल है', 'दिलवाले दुल्हनिया' मधला शाहरूखच बघायचा आहे.... त्यांना शाहरूखबरोबर मोठे आणि प्रगल्भ व्हायचे नाहीये... हेच खरे शाहरूख सारख्या मोठ्या सुपरस्टारचे दुर्दैव आहे. Sad

शारुख, मोठा आणि प्रगल्भ हा आक्सिमोरान निदर्शनास आणुन दिल्याबद्दल धन्यवाद!

या सिमेमाचा विएफेक्स गंडलेला आहे हे ट्रेलरमध्ये दिसुन येतंच होतं. तरिहि पैसे काढुन चित्रपट बघणार्‍यांच्या धाडसाचं कौतुक. काहिं तर पोपट आता मेला आहे, हि सत्यपरिस्थिती डावलुन डिनायलमध्ये गेलेले आहेत...

हायला!!
हे काय विचित्र झाले? माझा अर्ध्या तासापुर्वीचा प्रतिसाद असा सहा-सहा वेळा कसा रिपिट झाला?
माफ करा... काही साईट मेंटेनन्स वगैरे चालू असावा.

I have not read Kashyap's complete post, but could not stop myself to not read expectation statement in sarcasm.

मागच्या वर्षी अशाच एका शाहरूखच्या सिनेमाच्या धाग्यावर मी ऋन्मेष ह्यांच्या शाहरूख प्रेमातून धागे भरकटवण्याला एकांडी खिंड लढवत विरोध करत असतांना तुमच्यापैकी किती जण हायझेनबर्गच्या सपोर्ट मध्ये ऊभे राहिले होते...हात वर करा पाहू.>> मी केला होता तुला सपोर्ट पण अचानक तो तुला तुझा आवडता लेखक( तुमचा अभि का अस कुणी) असल्याचा साक्षात्कार होवुन तुच माघार घेतलिस.

हरेकाचा शाहरूख वेगळा आहेसं दिसतंय. या सार्याच्या पलीकडे एक खराखुरा शाहरूख खान अजूनही खरंच अस्तित्वात आहे ही भारीच गोष्ट म्हणली पायजे. Proud शाहरूखच्या महानपणाचा पुरावा.

बुद्धिमान लोकांना आपण कोण कुठे कसे आहोत हे नीट माहिती असतं..आपण चर्चा करतो.

हरेकाचा शाहरूख वेगळा आहेसं दिसतंय. या सार्याच्या पलीकडे एक खराखुरा शाहरूख खान अजूनही खरंच अस्तित्वात आहे ही भारीच गोष्ट म्हणली पायजे. Proud शाहरूखच्या महानपणाचा पुरावा.

बुद्धिमान लोकांना आपण कोण कुठे कसे आहोत हे नीट माहिती असतं..आपण चर्चा करतो.

Submitted by साजिरा on 24 December, 2018 - 23:03

√√√√√

पोस्ट ऑफ द मंथ डिसेंबर !

अनुराग कश्यप म्हणतोय 'ईंटर्वल नंतरचा एक सीन ज्यात अनेक स्टार लोकांची मांदियाळी जमवली आहे (ते ओम शांती ओम मधल्या 'दिवानगी दिवानगी' गाण्यासारखे काहीतरी असेल') तो सोडून मला हा सिनेमा खूप खूप आवडला. कल्पनाशक्तीने भारलेला, बाळबोध नसलेला, अतिशय धाडसी सिनेमा आहे हा. सिनेमाने मला शेवटपर्यंत खुर्चीला बांधून ठेवले. मला वाटते लोकांच्या (अवास्तव) अपेक्षांमुळे त्यांना निराशा आली असावी.. '

तो पुढे असेही लिहितो की ,' सगळ्यांनी एकदा तरी हा सिनेमा बघितलाच पाहिजे. ह्या सिनेमाने मेन्स्ट्रीम सिनेमासाठी अनेक नवनवीन दारे ऊघडली आहेत आणि शाहरूख सहित सगळ्या कलाकारांनी त्यांची नेहमीची पठडी/स्टाईल सोडून अभिनयात नवीन ऊंची गाठण्याचा प्रयत्न केला आहे'

थोडक्यात लोकांना अजूनही 'दिल तो पागल है', 'दिलवाले दुल्हनिया' मधला शाहरूखच बघायचा आहे.... त्यांना शाहरूखबरोबर मोठे आणि प्रगल्भ व्हायचे नाहीये... हेच खरे शाहरूख सारख्या मोठ्या सुपरस्टारचे दुर्दैव आहे. शद्

∆∆∆∆∆∆∆∆∆∆

आरेरे... या अनुराग कश्यपचा आयडी सुद्धा ऋन्मेषने ह्याक केला Happy

Pages