चटपटीत मिरच्या

Submitted by मंजूताई on 21 December, 2018 - 10:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मिरच्या वाटीभर (धुवून,पुसून बोटांच्या पेरा एवढ्या चिरुन) एक चमचा प्रत्येकी जिरे,मोहरी,मेथ्या,कलौंजी, बडीशोप, आमचूर पावडर , अर्धीवाटी तेल व मीठ चवीनुसार आणि शास्त्रापुरती हळद
इतर साहित्य: गॅस, लाईटर/काडेपेटी/आगकाडी, कढई छोटी ( जो पदार्थ किती प्रमाणात करायचा त्यानुसार भांड/कढई घेतल्यास ऊर्जा वाया जात नाही) हलवायला चमचा, मिरची झाल्यावर काढून ठेवायला सट

क्रमवार पाककृती: 

गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तेल टाकावे तेल तापले की प्रत्येकी एक चमचावाले जिन्नस टाकावे. मेथ्या लाल झाल्या की मिरच्या टाकल्याबरोबर झाकण ठेवावे. एक मि.नी झाकण काढून हळद, मीठ वआमचूर पावडर टाकली की चांगले हलवून गॅस बंद करावा. थंड झाली की चटपटीत मिरची सटात काढून ठेवावी.
थंडीच्या दिवसात भरीत भाकरी, मटार/तुरीच्या दाण्याची कचोरी, मेथीचे गोटे (आगामी पाकृ) मेथीच्या पराठ्यांबरोबर भारी लागते.

वाढणी/प्रमाण: 
कसं सांगू ? आपल्या सोसण्याच्या क्षमते नुसार
अधिक टिपा: 

यंदा मिरच्यांच पीक जरा जास्तच आलंय Happy वर दिल्याच आहेत पण मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या. जास्त दिवस टिकत नाही. फ्रीजमध्ये आठवडाभर टिकेल.

माहितीचा स्रोत: 
कुठल्यातरी शोवर बघितलेली.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रेसिपी. मी पोपटी मिरच्या आणते ज्या अजिबात तिखट नसतात. मिरची सढळहस्ते वापरता येते त्यामुळे.