Submitted by Mi Patil aahe. on 13 December, 2018 - 21:05
राजकीय घडामोडी पाहता पुन्हा एकदा कांग्रेस विराजमान सध्या ४राज्यात झाली आहे,हे पाहता लवकरच कांग्रेस सत्तेत परतत आहे,हे फक्त राज्यात होत आहे की भारताची सत्ता ही पुन्हा कांग्रेस च्या हाती जाणार---- मग पंतप्रधान कोण असेल कांग्रेस चा?????
की पुन्हा कमळ उगवणार,सत्तेत?
की लोकशाहीत काहीही होऊ शकते,याची पुन्हा प्रचिती येणार की राजकीय मंडळी घेणार, की जनता-जनार्दन देणार?
भारताचा पंतप्रधान पुढील 5 वर्षांसाठीचा कोण होणार?
हे कोण ठरवणार?
लोकशाही?
पक्षशाही?
मायबाप मतदार?
तुम्ही की आम्ही?
पक्षनेता की पक्षाध्यक्ष?
सामान्य कार्यकर्ता?
चालू घडामोडी?
गतकाळातील घडामोडी?
भारताचा पुढील ५वर्षांसाठीचा पंतप्रधान कोण होईल?
काय सांगावे कदाचित ती जोखिमपूर्ण जबाबदारी तुमच्याही खांद्यावर येऊ शकेल!!! B carefully!!!
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मोदींना राफेल प्रकरणात
मोदींना राफेल प्रकरणात न्यायालयाकडुन क्लीनचीट
ती क्लीन चीट नाही.. भाजप सांगेल त्यावर विश्वास ठेवणार असाल तर ठेवा.. न्यायालयाचा पूर्ण निर्णय उपलब्ध आहे उघडून वाचा...
सरकार चक्क खोटे बोलली आहे कोर्टात आणि ते आता फक्त संसदीय समितीसमोर सिद्ध होऊ शकते.. कोर्ट काही करू शकत नाही. कोर्टाला मर्यादा आहेत असे कोर्ट म्हणाले..
<< सोनिया ह्या परदेशी
<< सोनिया ह्या परदेशी असल्याचे कारण दाखवुन जाणत्या राजांनी निराळा पक्ष काढला व सत्ता जातीय हे बघून त्या परदेशी पाहुण्यांशीच हातमिळवणी करून राज्य देशोधडीला लावून पुन्हा जाती-आधारित मोर्च्यांबाबत प्रक्षोभक विधाने करायला व पुतण्याच्या जिभेवर व सिंचन प्राकरणावर लगाम ठेवता येत नाही हे सांगायला मोकळे झाले >>
-------- जे काम काँग्रेसने अनेक दशकांत केले ते मोदी सरकारनी करुन दाखवले.... पद्मविभूषणाने गौरवले, आता भारतरत्न द्या. सेनेला दुर ठेवण्यासाठी किंवा खिजवण्यासाठी जवळीक केलेली चालते.... अरे पण हे गुरुस्थानी आहेत. मोदी अडचणीच्या वेळी सल्ला मागतात... नुकत्याच झालेल्या पडझडी नंतरचे या गुरुंचे मत अभ्यासा....
चार दोन दिवसांत/ वर्षात परक्या घरात जन्मलेल्या सुनेला मुलगी समजण्याची आपली उच्च अशी भारतीय संस्कृती आहे. अनेक दशकानंतरही त्या अजुनही "परदेशीच" आहेत... छान.
<< त्यामुळे ते आता कायमचे मांडलिक झाले व ह्यावर उदय ह्यांचे संतुलित व संभ्रमित प्रतिसाद येणार ह्यात वाद नसून त्यांचा प्रतिवाद नाही केला तरी पाच सहा अनियमित व दोन तीन नियमित झमपट त्यावर पोस्टी ओतणार हे नक्की >>
------- संतुलित व संभ्रमित प्रतिसाद असे तुम्हाला वाटत असतील तर ठिक आहे. प्रतिसाद तुम्हाला अडचणीत टाकण्यासाठी नसतात पण तुम्ही सोयीस्कर तेच उचलतात त्यावर टिपणी करतात हे खटकते. मी जे मनाला पटते तेच लिहीतो. देशाचे भले करणारे सरकार मला हवे आहे मग ते केजरीवाल/ मायावती/ राहुल गांधी/ मोदी देणार असतील तरी चालेल. मोदी यांनीच सरकार द्यायला हवे असे नाही. मोदी तसेच प्रत्येक नेत्याच्या मर्यादा आहेत हे मी जाणतो.
नियमित झमपट नोंद (अर्थात who cares ?) केली आहे. तुमची अशी भाषा खालावली तर मग शिष्यगणाला काय दोष द्यायचा.
<< पुढील पंतप्रधान जर मोदी होऊ शकले नाहीत तर राहुल गांधी होतील आणि ह्या देशाची राहुल गांधी पंतप्रधान असण्याची संपूर्ण योग्यता आहे >>
------- याच देशाची मोदी यांच्यासाठी पण योग्यता आहे.
<< ते पंतप्रधान झाले की चिनी राजदूतांना उजळ माथ्याने भेटणे, उजळ माथ्याने वार्षिक पंचावन्न दिवस थाई सुट्टी घेणे, जमावातील स्त्रिया खळ्यांवर भाळून चुंबन घ्यायला धावल्या तरी ढिम्म न हलणे ह्या गोष्टी शक्य होतील व शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी हे प्रश्न चुटकीसरशी सुटतील >>
------- चिनी नेत्यासोबर झोका झुलणे चालते.... तो मुत्सद्दीपणाचा मास्टरस्ट्रोक. अरे मग डोकलाम येथे तोंडघाशी पडल्याचे देशवासीयांपासुन लपवले, (डोकलामच्या वेळी) आंतर-राष्ट्रिय व्यासपिठावर चिनी राष्ट्रअध्यक्षांची भेटही घेता आली नाही.
नावब शरिफांची भेट घेणे, साडी/ चोळी/ मिठाई किती किती गोड... त्याच्या घरच्या लग्नासाठी अचानक भेट देणे हा मुत्सद्दीपणा... हाफिज सैदसोबत मुलाखत घेण्यासाठी बॅक चॅनेलने एक पत्रकार पाठवला होता.... कोण होता हा पत्रकार ? तो पत्रकार कुणाच्या सांगण्यावरुन गेला होता? त्या पत्रकाराचा TV वर अर्णबसोबत चर्चा/ वाद बघितला आहे.
<< विविध महादेव मंदिरांबाहेर रांगा लागतील व ओवेसी परराष्ट्र मंत्री होऊन देशाच्या सर्व सीमा सुरक्षित होतील >>
--------- सामान्य जनतेच्या मनात भिती/ असुरक्षितता निर्माण करुन काही मते % वाढतो का मास्टरस्ट्रोक. निव्वळ मांस बाळगल्याच्या संशयावरुन मानवी हत्या, पोलिसांची हत्या देशात होत आहेत. आधी देशाच्या नागरिकांच्या जिवीताची चिंता करा... मग बाकी.
राफेल चा मुद्दा चितळे
राफेल चा मुद्दा चितळे मास्तरांकडे न्या! इकडे पाटील साहेबांना पुढचा पंप्र कोण याची चिंता सतावतेय!
बोलून चालून रजनीकांत ने भाजपात प्रवेश केला, भाजप चे पुरेसे संख्याबळ, परंतु बहुमत नाही. अश्या स्थितीत रजनीकांत चे नाव भाजप पुढे करेल काय? तिकडे दक्षिणेकडील लोकांना हरकत नसावी. इकडे महाराष्ट्रात सुध्दा काही हरकत नसावी(भूमिपुत्र ना तो).
आपले काय मत?
काँग्रेस मध्ये जोवर गांधी
काँग्रेस मध्ये जोवर गांधी फॅमिली आहे तोवर कुणी दुसरे स्वप्नात तरी पंतप्रधान व्हायचा विचार करू शकते का
>> +१११
सोनिया ह्या परदेशी असल्याचे कारण दाखवुन जाणत्या राजांनी निराळा पक्ष काढला व सत्ता जातीय हे बघून त्या परदेशी पाहुण्यांशीच हातमिळवणी करून राज्य देशोधडीला लावून पुन्हा जाती-आधारित मोर्च्यांबाबत प्रक्षोभक विधाने करायला व पुतण्याच्या जिभेवर व सिंचन प्राकरणावर लगाम ठेवता येत नाही हे सांगायला मोकळे झाले>> +१११
तरीही महाआघाडीने काँ ची आडवणूक केल्यास जाणते राजे होऊच शकतात पंप्र. अथवा दीदी, बहन यांपैकीही कोणीही.
सोनिया गांधीनी भारतीय
सोनिया गांधीनी भारतीय नागरिकत्व घेतले नव्हते म्हणून त्या पंप्र होऊ शकल्या नव्हत्या.
>>>>
असे काय सोने लागलेय ईटालीच्या नागरीकत्वाला जे त्यासाठी चक्क पंतप्रधानपद नाकारले!
<< सोनिया गांधीनी भारतीय
<< सोनिया गांधीनी भारतीय नागरिकत्व घेतले नव्हते म्हणून त्या पंप्र होऊ शकल्या नव्हत्या.
>>>>
असे काय सोने लागलेय ईटालीच्या नागरीकत्वाला जे त्यासाठी चक्क पंतप्रधानपद नाकारले!
>>
---------- सोनिया गांधी यांनी १९८३ मधे भारताचे नागरिकत्व स्विकारले, इटालियन पास्पोर्ट परत केला, त्याच वेळी इटालियन नागरिकत्व रद्द झाले. इटालियन कायद्याप्रमाणे दुहेरी नागरिकत्व असा प्रकार १९९२ च्या आधी नव्हता.
https://en.wikipedia.org/wiki/Sonia_Gandhi
पाटिल यान्च अभिनदन! डान्स
पाटिल यान्च अभिनदन! डान्स कुटला पासुन ते माबो असे, मग कसे , अरे असे कसे अस करत करत शेवटी त्याना १००० एक पोस्टी हमखास पाडणारा विषय एकदाचा सापडला आता भागडा बघा इथला...
सर्वोच्च न्यायालयात राहुल
सर्वोच्च न्यायालयात राहुल गेला होता का मुळात? त्याने जे मुद्दे मांडलेत ते सर्वोच्च न्यायालयासमोर आले आहेत का?
फोडलाय तोडलाय झोडलाय करत लागले नाचायला.
<< जमावातील स्त्रिया खळ्यांवर
<< जमावातील स्त्रिया खळ्यांवर भाळून चुंबन घ्यायला धावल्या तरी ढिम्म न हलणे ह्या गोष्टी शक्य होतील >>
-------- भारतीयांना यात मर्यादापुरुषोत्तम दिसेल. लग्न करुन बायकोला/ सोडुन देण्यापेक्षा अशी वागणूक लाख पटीने चांगली.
परवाच्या निवडणुकीच्या
परवाच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत ज्योतीरादित्य आणि वाचाळवीर दिग्विजय सिंग यांच्यात राहुल यांच्यासमोरच वाद झाला. यावरुनच त्यांना त्यांच्या पक्षात किती महत्व दिल जाईल. हे समजते. बहुतेक त्यांच्या पक्षातले नेते स्वत्:ला रागा पेक्षा मोठे समजतात. अशी व्यक्ती प्रधानमंत्री झाली तर २.५ वर्ष स्वपक्षातील वाद मिटवण्यातच जातील.
भाजपे - खोटे
भाजपे - खोटे
काँग्रेसी - खरे
या खऱ्या कॉंग्रेसीना काल कोर्टाने खोटे पाडले. असो.
सुप्रीम कोर्ट जसा निकाल देईल तसे ते काँग्रेसी किंवा भाजपे होत असते.
काल ते भाजपे होते.
कॉंग्रेसीना काल कोर्टाने खोटे
कॉंग्रेसीना काल कोर्टाने खोटे पाडले
>>
कोर्टाचा निकाल वाचा हो.
कोर्ट काही करू शकत नाही.
कोर्ट काही करू शकत नाही. कोर्टाला मर्यादा आहेत असे कोर्ट म्हणाले..>
ह्या मर्यादा सगळ्या केसेस मध्ये असतात. पण आपल्याला हवा तसा निकाल लागला की सत्याचा जय दिसतो व नको तसा लागला की मर्यादा दिसतात.
समस्त भारतीयांची दृष्टीच अधू आहे, फक्त स्वतःपुरते पाहणारी. तुमचा व्यक्तिगत दोष नाही, मनावर घेऊ नका उगीच.
मर्यादा सगळ्या केसेस मध्ये
मर्यादा सगळ्या केसेस मध्ये असतात
>>
म्हणजे राफेल घोटाळ्यात भ्रष्टाचार झालाय हे मान्य का तुम्हाला? नाही, म्हणजे निकाल तुमच्या बाजूने लागला म्हणून काँग्रेसी तोंडघशी पडले असं म्हटलं तुम्ही.
मुळात सुप्रीम कोर्टात
मुळात सुप्रीम कोर्टात काँग्रेस गेलेली का ते शोधा. ज्या मुद्द्यांवर काँग्रेस बोलतंय, ते न्यायालयाच्या कक्षेत आहेत का? ते पहा.
टुजी प्रकरणी IAC आणि १.७६ लाख करोडच्या बोंबा मारणार्यांना सी बी आय न्यायालयाचा तो निकाल मान्य असेलच. तिथे तर न्यायाधीश म्हणाले की मी वाट पाहत बसलोय, कोणी येईल आणि पुरावे देईल. पण कोणी येईनाच.
"I may also add that for the last about seven years, on all working days, summer vacation included, I religiously sat in the open Court from 10 a.m. to 5 p.m., awaiting for someone with some legally admissible evidence in his possession, but all in vain,
जमावातील स्त्रिया खळ्यांवर
जमावातील स्त्रिया खळ्यांवर भाळून चुंबन घ्यायला धावल्या तरी ढिम्म न हलणे >> दीपा मेहेत्रे वर ललित या लेखकनेच पाडलंय ना??
म्हणजे राफेल घोटाळ्यात
म्हणजे राफेल घोटाळ्यात भ्रष्टाचार झालाय हे मान्य का तुम्हाला? नाही, म्हणजे निकाल तुमच्या बाजूने लागला म्हणून काँग्रेसी तोंडघशी पडले असं म्हटलं तुम्ही>>>
कोर्टाला मर्यादा असतात हे आलेय की वर. मग कसे ठरवणार
आणि मी ठरवायला मी कोण तज्ञ लागून गेलेय?
तज्ञाने लिहिलेले वाचून ठरवायचे तर इथे वाचक व लेखक दोघेही भाजपे व बिगर भाजपे या दोन प्रमुख गटात विभागले गेलेत. मी एकाला तज्ञ समजून वाचायला जाईन तर दुसरे दहा त्याला वरील पैकी एका गटात ढकलून त्याची पिसे काढतात. खरे व निर्भेळ मत ज्यांच्याशी सगळे सहमत होतील असे आज कुठेही वाचायला मिळेल असे वाटत नाही.
साधना,
साधना,
या विषयाला वाहिलेला धागा असताना हा विषय इकडे आणण्याचे कारण?
>>>>>>खरे व निर्भेळ मत ज्यांच्याशी सगळे सहमत होतील असे आज कुठेही वाचायला मिळेल असे वाटत नाही.>>>>>
सगळे सहमत होतील असे सोल्युशन खुद्द भगवंतांना काढता येत नाही, आपण तर मर्त्य मानव आहोत.
>>>>>कोर्टाला मर्यादा असतात
>>>>>कोर्टाला मर्यादा असतात हे आलेय की वर. मग कसे ठरवणार
आणि मी ठरवायला मी कोण तज्ञ लागून गेलेय?>>>>
कशाला ठरवायला जाताय? आणि जीवाला त्रास करून घेताय? You have done your choice, isn't it?

उद्या मोदींनी पैसे खाल्ले असे सिद्ध झाले तर तुम्ही भाजप ला मत देणार नाही असे काही आहे का?
उद्या तुमच्या लोकसभा मतदार संघात भाजप च्या तिकीटवरून भाई ठाकूर उभा राहिला, तर तुम्ही त्याला मत देणार नाही असे काही आहे का?
तसे नसेल तर मग भ्रष्टाचार झाला की नाही झाला हा प्रश्न तुमच्यासाठी असंबद्ध आहे, या सगळ्याकडे दुर्लक्ष करा
सगळे सहमत होतील असे ---
सगळे सहमत होतील असे ---
फक्त आपल्याला वाटेल तेच खरे मानायचं तर इतरांचं वाचायची गरजच काय राहते? नैका?
गपा हो सिम्बा, संतुलित सनव
गपा हो सिम्बा, संतुलित सनव रोमात गेल्यावर संतुलितपणाची धुरा समर्थपणे वाहताहेत संतुलित साधनाताई.
>>उद्या तुमच्या लोकसभा मतदार
>>उद्या तुमच्या लोकसभा मतदार संघात भाजप च्या तिकीटवरून भाई ठाकूर उभा राहिला, तर तुम्ही त्याला मत देणार नाही असे काही आहे का >> simba हे दोन्ही कडून लागू असेल असं वाटतं. भाजप कडून लोकसभेला आज निलकेणी किंवा नारळीकर किंवा टाटा उभे राहिले आणि त्याचवेळी काँग्रेस कडून गुंड उभा राहिला तर लिबरल लोक एकतर मतदान करणार नाहीत किंवा तिसऱ्या व्यक्तीला मत देतील असं वाटतं.
लिबरल लोक एकतर मतदान करणार
लिबरल लोक एकतर मतदान करणार नाहीत किंवा तिसऱ्या व्यक्तीला मत देतील असं वाटतं.>>>>>
हेच म्हणतोय मी,
अमुक एक व्यक्तीचे भक्त नसल्याने एक नको असेल,(भाजप उमेदवार), दुसरा पटत नसेल(काँग्रेस गुंड) तर तिसरा पर्याय घेण्याचा विवेक जागृत ठेवायचा पर्याय लिबरल लोकांकडे असतो, असला पाहिजे.
या उलट , फक्त मोदी हवेत म्हणून, आपल्या मतदार संघात गुंडाला निवडून देण्यासाठी भक्तांचे डोके हवे,
लोकसभा निवडणुकीत, भाजप ने आयात केलेल्या उमेदवारांना त्यांचे कोअर मतदार लोक सोडून या असल्याच लोकांनी मते देऊन विक्रमी मतांनी विजयी केले.
जे महान लोक मायबोलीवरचे
जे महान लोक मायबोलीवरचे असंतुष्ट आत्मे सांभाळू शकतात ते देश का सांभाळू शकणार नाहीत. पुढचे पीएम तेच बनावेत.
पाटलीणबाईंना गृहमंत्री बनवावे म्हणजे धागे विणून देशवासियांना जाळ्यात फसवून बिझी ठेवता येईल.
सध्यातरी मोदीच होतील असे
सध्यातरी मोदीच होतील असे वाटतेय!
https://www.entrepreneur.com
https://www.entrepreneur.com/article/324025
Entrepreneur India Magazine
*The Man Who Predicted 2014 Indian Election, 2016 United States polls and recently held Punjab and Uttar Pradesh elections Reveals Who Will Take The Throne In 2019*
A top ten global social CIO, cyber security, Information Technology expert, data scientist, strategist, advisor, Gaurav Pradhan is a brand in himself. What makes this man interesting is that his political predictions are always on point.
He isn’t a psephologist or a numerologist but someone who predicts things based on data and mood of the people. Entrepreneur India caught up with data scientist Gaurav Pradhan at the World AI Show, Mumbai organised by Trescon to know his observation for the most talked about elections.
*Predicting Elections Through Mood Analytics*
“It is based on what people are talking across social media on all the platforms. Then there is intelligence information, and then geopolitics. So if Pakistan wants Hilary and Saudi wants Hilary that means the nation is moving towards Trump,” explains Pradhan.
“In 2014, the youth was the undercurrent. People were sick of scams, it was everywhere. That time the component was not the seasoned voters like me or my grandfather. It was the youth and they wanted to change the future. This was capitalized by Narendra Modi as a nationalist movement. The last election was not about the party but the leader. Similarly, the 2019 election will also be about the leader. The seasoned people are talking about party politics while the youth is focused on the leader,” he points out.
*US Election 2016: It was Never Trump Vs Hillary*
While for the majority the United States 2016 election was about Donald Trump vs Hillary Clinton, for Pradhan it was always about Mr Clinton vs Mrs Clinton! While this statement might sound aberrant his facts don’t.
“See, understand Trump is rich. Hillary is not that rich, she wants to make money for herself. Trump on the other hand wants to make money for the United States. Nationalism was picking up, everyone was sick of jobs being taken by people from around the globe. So the mood set was Nationalism,” says Pradhan.
*Decoding Punjab and Uttar Pradesh Election*
The result of Uttar Pradesh election shocked millions. “I strongly wrote that Punjab election should go to Congress. I am the one who pointed out that BJP will get 300+ seats in the UP election. No one else predicted it, not even Modi or Amit Shah. I drove my car 12,500 kilometers at my own expense. I picked up data points from the community, small villages and framed a chat that said it will be 300+. Everyone laughed and look what happened? In fact, in 2015, I also wrote a thread about Yogi Adityanath and said he would be the CM, there I am.”
*2019 Election – Who will Take the throne?*
Those who think BJP has lost its support and people are unhappy might want to hear this.
“People who are making those comments are either middle class or the small business class who were saving taxes and now they have lost it. Now here comes data science. I am picking data from rural India. How many families have benefited from the easy supply of cooking gas and electricity? How many have got access to toilets and how many kids are going to school now? When I study this I get a conservative figure of 40 crore or so. I divide it by two, it is twenty crore. You know in 2014, the elections were won by a small margin of 1.4 crore and here you have a larger swing. So my calculation says 2019 belongs to Modi.”
हम्म... समजलं simba
हम्म... समजलं simba
नोटाबंदीमुळे पोळलेल्या
नोटाबंदीमुळे पोळलेल्या लोकांचा डेटा नसेलच.
भरत मला राजकारणात काडीचा
भरत मला राजकारणात काडीचा इंट्रेस्ट नाही.
कोणतीही पार्टी आली तरी माझ्यासारखी सामान्य जनता कायम होरपळली होती आणि पुढेही असेल .... ह्याच्या मागील कारणाला मोदी किंवा रागा कोणीच अपवाद नाही आणि नसते.
पण मला ती लिंक मधील माहिती छान वाटली म्हणून ईथे शेयर केली. त्या व्यक्तिचा लक्ष्यपूर्ति करिताचा ध्यास आणि निरीक्षण म्हणून तो निव्वळ भविष्यवाणीटाइप न राहता एक छान अभ्यासु विषय वाटला
मोदीजींना निवडून आणण्यात
मोदीजींना निवडून आणण्यात त्यांच्या समर्थकांपेक्षा (भक्त म्हणा हवं तर) विरोधकांचाच (यांना मात्र अंधद्वेष्टे असले तरी म्हणायचं नाही बरं का...) मोठा वाटा असतो.
https://www.loksatta.com/lekha-news/girish-kuber-article-about-popular-l...
इथे या मोदी विरोधक शिरोमणींनी मोदीजींच्या राजवटीला विरोध करायचा म्हणून एकपक्षीय राजवटीपेक्षा आघाडी सरकारे जास्त प्रगती करतात असं ठोकून दिलंय. नेहरु आणि इंदिरांच्या प्रदीर्घ राजवटीत प्रगती झालीच नव्हती म्हणे. ती नरसिंह राव यांच्या आणि मनमोहनसिंग यांच्या पहिल्या टर्ममध्ये झाली (आणि चक्क वाजपेयींच्याही काळात झाल्याचंही कबूल केलंय पण तरीही त्यांच्याबद्दल २००४ साली अटलबिहारी बाजपेयी सरकार पडलं तेव्हा कोणता पर्याय समोर होता? यातल्या प्रत्येक पंतप्रधानाला सत्ता सोडावी लागली त्याला ते स्वत:च कारणीभूत होते. असंही ठोकून दिलंय). आज सारा देश ज्या मोबाइल टेलिफोनच्या आधारे जगतो त्या मोबाइल टेलिफोनची मुहूर्तमेढ देवेगौडा यांच्या कार्यकाळात घातली गेली. हे विधान करताना एस्टीडी आयएस्डी पीसीओ तसेच संगणक क्रांती ज्या काळात घडली त्या राजीव गांधींची कारकीर्द एकपक्षीय असल्याने तिच्यात प्रगती झालीच नाही असं म्हंटलंय. मनमोहन सिंग यांच्या दुसर्या टर्मला चुकूनही चांगलं म्हणता येणार नाही याची खात्री असल्याने ती टर्म एकपक्षीय राजवट असल्याचा जावई शोधही कुबेरांनी लावलाय.
असे लेख पाडणारे मोदीविरोधक मोठ्या संख्येने माध्यमांत सक्रिय असेपर्यंत दुसर्या कोणाला पंतप्रधानपदी येण्याची थोडीतरी संधी आहे का? पूर्वी राज्यकर्त्यांविषयी जनतेच्या मनात असंतोष असे आणि त्यांच्याविरोधात लिहिणार्या पत्रकारांना मनापासून पाठिंबा मिळे. इतिहासात पहिल्यांदाच असं घडलेलं पाहायला मिळतंय की राज्यकर्त्यांच्या विरोधात लिहिणारे हास्यास्पद बनत चाललेत आणि मनापासून पाठिंबा देणार्या जनतेला भक्त म्हणून हिणवत हे माध्यमवीर स्वतःला जनतेच्या मनातून अजुनच उतरवत आहेत.
दोन्ही पक्षांना बोलणी लावून
दोन्ही पक्षांना बोलणी लावून काहीतरी समतोल साधायचा प्रयत्न करताहेत गिरीश कुबेर. लेखातील सार जर लक्षात घेतला तर गिरीश कुबेर ह्यांच्या मते देशात आघाडी सरकार असेल तरी काही बिघडत नाही. कुण्या एकाच पक्षाच्या हाती सत्ता नसावी आणि मोदी तर नकोच नको असे ते कुठेही म्हणाले नाहीत. आकडेवारीत आणि एकूण विश्लेषणात बरीच गफलत केलीये गिरीश कुबेरांनी.
परंतु माझं पण मत गिरीश कुबेरांसारखंच आहे. आघाडी सरकार जरी असलं तरी फारसं बिघडत नाही. १९९६ ते १९९९ ह्या काळात जेव्हा देशाने ३ वेगवेगळे पंप्र बघितले, तेव्हा सुध्दा विकासाचा दर चांगलाच होता की.
बऱ्याच वेळा पाशवी बहुमतातील सरकार हे देशास घातक ठरू शकतं. ३९१ जागा घेऊन राजीव गांधी सत्तेत आले, परंतु ह्याच पाशवी बहुमताच्या जोरावर त्यांनी शाहबानो प्रकरणात ढवळाढवळ केली. आणि त्यावर सारवासारव म्हणून राम मंदिराचे दरवाजे उघडले (माझा काही आक्षेप नाही)
मोदी सुद्धा बहुमत घेऊन सत्तेवर आले, परंतु त्यानंतर धर्मांधांनी देशात जो हैदोस घातलाय, तो आपण बघतच आहात
कुबेरांनी तुलनेसाठी १९८९
कुबेरांनी तुलनेसाठी १९८९ पर्यंतचे आणि नंतरचे आर्थिक वृद्धीचे दर लक्षात घेतलेत.
लक्षणीय घटनांचा/निर्णयाचा तेवढा विचार केलाय.
कोणतंही सरकार जातं ते स्वकर्माने हे सांगणारं त्याचं विवेचन पटण्याजोगं आहे
कडबोळं सरकार वाटतं तेवढं वाईट नसतं हेही चांगलं मांडलंय. २००९ मध्ये एकपक्षीय सरकार नसलं तरी निवडणू़कपूर्व आघाडी बहुमताच्या खूप जवळ होती. पायाखालची जमीन सरकण्याचा धोका नव्हता.
२००४ साली TINA There is no alternative हा भाजपच्या प्रचाराचा मुद्दा होता आणि १९९७ सालचं बजेट अजूनही ड्रीम बजेट मानलं जातं.
देवेगौडांच्या उदाहरणावरून पंतप्रधानपदावरची व्यक्ती फारशी महत्त्वाची नसते, असंही सुचवत असतील.
त्यांनी म्हटलेल्या दुसर्या लबाड गटाच्या प्रतिनिधीच्या बोलक्या प्रतिक्रियेवरून लेख व्यवस्थित पोचतोय, हे दिसलंच.
मागच्या काही सरकारांचा विचार
मागच्या काही सरकारांचा विचार करता
नरसिंह राव: आर्थिक उदारीकरण , बाबरीपतन ,हर्षद मेहता ;
वाजपेयी पोखरण, कारगिल आणि निर्गुंतवणुकीकरण, गुजरात दंगे, युनिट स्कीम १९६४/ युटीआय, केतन पारीख ;
युपीए १ - नागरी अणू करार, माहिती अधिकाराचा कायदा , जागतिक आर्थिक मंदीत भारतीय अर्थव्यवस्थेचा बचाव,
युपीए २ - भ्रष्टाचाराचे आरोप आणि न्यायालयीन हस्तक्षेपांमुळे निर्णयप्रक्रियेला बसलेली खीळ आणि तरीही गाठलेला उच्चांकी वृद्धी दर, शिक्षण हक्क कायदा, अन्न सुरक्षा कायदा यांसाठी लक्षात राहतील.
मोदी सरकार कशासाठी लक्षात राहील?
१ नोटाबंदी. २ आधारची जबरदस्ती (यात दोहोंत किती मनुष्यतास वाया गेले असतील याचा प्रत्येकाने स्वतःवरून हिशोब करावा) ३. निरव मोदी, ४. बँकांचे एन पीए ५ .हिंदुत्वाची वेगवेगळी रूपे - घर वापसी-लव्ह जिहाद- गोरक्षक.. ६ उज्ज्वला, सौभाग्य योजना आणि स्वच्छ भारत (यांची जमीनी हकीकत काय आहे , ते माहीत नाही) सध्या प्रधानमंत्री आवास योजनेचा झपाटा असल्याचे दाखवले जात आहे. { हे सगळं फुकट्यांना दिलं जातंय का याचीही कल्पना नाही) तसंच जनधन योजनेचं फलित ?
पूर्ण बहुमत नसतानाही राव, वाजपेयी, मनमोहन सिंग सरकारांनी जे साध्य केलं त्याच्या तुलनेत मोदींच्या सक्सेसफुल मिशन २७२ ची उपलब्धी काय?
आता २७२ आहेत का? शत्रुघ्न सिन्हा आणि कीर्ती आझाद अजूनही पक्षात आहेत का? असतील तर का? नुकताच सावित्रीबाई फुले नावाच्या खासदार बाईंनी रजीनामा दिलाय.
शाही लग्नात वाढपी, आचारी,
शाही लग्नात वाढपी, आचारी, भांडी घासणारे, झाडू लारणारे, पत्रावळ्या लावणारे अशी विविध कामे पार पाडलेल्यांपैकी कुणीही होऊ शकेल.
"राहुल गांधी यांनी तीन
"राहुल गांधी यांनी तीन राज्यांमध्ये चांगला विजय मिळविला आहे. आता तो पप्पू नाही तर 'पप्पा' झाला आहे." ~ रामदास आठवले
सहमत. डीएमकेच्या स्टालिनने
सहमत. आज डीएमकेच्या स्टालिनने पन्तप्रधानपदासाठी राहुल गान्धीन्चेच नाव सुचवले आहे.
इथे वाचलेल्या प्रतिसादावरून
इथे वाचलेल्या प्रतिसादावरून असे दिसते कि मोदिभक्त व मोदी शत्रु हे तसेच राहतील. उच्च कोर्टाचे म्हणणे मोदीशत्रुना मन्जुर नाहि तर मोदीभक्ताना पसन्त आहे. राफाल प्रकरणावर आलेले चितळे यान्चे लेख कोणीहि वाचलेले दिसत नाहीत तसेच दासाल्ट्च्या सीइओचे एक्सप्लनेशन पण मोदीशत्रुना मान्य नाही.त्यान्चा फक्त राहुल गान्धीच्या वक्तव्यावर विश्वास आहे. हाच राहुल मध्यप्रदेश मधल्या विजयानन्तर शेतकर्यान्च्या कर्जमाफीबद्दल किम्वा बेरोजगाराना भत्ता देण्याविषयी काही बोलत नाही तरीहि नेहेमी मोदीना फेकु म्हणणारे मोदीशत्रु आज गप्प आहेत. असो मोदी जिन्कले किम्वा हरले मला त्यात काही लाभ अथवा तोटा नाही कारण मी परदेशी राहतो. पण प्रतिसाद देणार्यानी प्रामाणिकपणा दाखवावा हि अपेक्शा आहे.
हे. हाच राहुल मध्यप्रदेश
हे. हाच राहुल मध्यप्रदेश मधल्या विजयानन्तर शेतकर्यान्च्या कर्जमाफीबद्दल >>>>>>
Wa मेसेज पाहिलात वाटते... ओरिजिनल प्रेस कॉन पहा, राहुल कर्जमाफी बद्दल काय बोलला ते दिसेल
दिगोचि हे छुपे नाहीत तर उघड
दिगोचि हे छुपे नाहीत तर उघड अंधभक्त आहेत हे उघड केल्याबद्दल अभिनंदन त्यांचे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाची फसवणूक झाली वगैरे विषय त्यांना स्पर्श करू शकणार नाहीत हे समजून घेता येईल.
Pages