Submitted by झकासराव on 7 January, 2013 - 07:07
सध्या नवीन ठिकाणी शिफ्ट झालोय.
तेथे पाण्याचा एक प्रॉब्लेम आहे.
सध्या टाकीमध्येच कॉर्पोरेशनच व बोअरच पाणी मिक्स होतं.
त्यामुळे वॉटर प्युरीफायर घ्यायचा आहे.
हा धागा सध्या मार्केट मध्ये अस्तित्वात असलेल्या वॉटर प्युरीफिकेशन सिस्टीम्स बद्दल, त्यांच्या मेन्टेनन्स कॉस्ट, त्यांची उपयुक्तता, त्यांची सर्व्हीस, त्यांचे फायदे ह्याची चर्चा व्हावी ह्या उद्देशाने काढलाय.
सोबतच पाण्यातील टिडीएस लेव्हलस त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम अशी माहितीही मिळाली तर अजुन छान.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
. त्याला ३००० रु खर्च आलाय.
. त्याला ३००० रु खर्च आलाय. अजुन ़ओडले नाहिय. मला माझ्या वापरानुसार ते दर १५ दिवसांनंतर रीजनरेट करावे लागेल>> हायला, लयी स्वस्तात बनवलाय तुम्ही.
बाहेरच्या एका कंपनीचा १२ की १३ केला होता.
आणि प्रत्येक काही दिवसानी रिजनरेशन्साठी त्यात मिठाचं पाणी ओतायचं.
क्षार कमी करणे हे समजण्यासारखे आहे कारण जास्त क्षार शरीराला अपायकारक असतात (उदा. मुतखडा होणे)>> हे ऐकलय. कोल्हापुरातल्या डॉ नी देखील सांगितलय.
पण फक्त हेच क्षार (कॅल्शियमचे वै ) नव्हे तर काहि क्षार असे आहेत जे शरीराला घातक आहेत.
जसे की हेवी मेटल्स. अर्सेनिक अस एक नाव ऐकल होतं. ही मात्र केवळ ऐकीव माहिती.
पुरंदरेनी छान माहिती दिली आहेच.
आणि प्रत्येक काही दिवसानी
आणि प्रत्येक काही दिवसानी रिजनरेशन्साठी त्यात मिठाचं पाणी ओतायचं.>>> हां तेच ते.
इब्लिस, मीही शोधतो. रेझिन वर आयोडीनची व्हॅलंसी (बहुतेक हं नक्की आठवत नाही) बदलते त्यामुले अॅटो इम्युनो थॉयरॉइडीटीस होउ शकते अस्सा काहीसा प्रकार होउ शकतो.
इथे चेन्नईत शिफ्ट झाल्यावर
इथे चेन्नईत शिफ्ट झाल्यावर घरातले तिघंही आजारी पडलो होतो. इकडची मेडिकल प्रॅक्टीस अगदीच राजकारणाला शोभेल अशी असल्याने डॉक्टरांनी टायफॉइड असे निदान करून घाबरवून ठेवलं होतं. दुसर्या एका "मराठी" डॉक्टरांनी मात्र पाण्याचा फिल्टर लावून घ्या. त्यांनी आर ओ फिल्टर सजेस्ट केला होता. चेन्नईचे पाणी अत्यंत मचूळ, जड आणि घाण आहे. (इथले लोकल सुद्धा हे पाणी प्यायला वापरत नाहीत. २५ रू.चा "बिसलेरी" (५ लिटरचा) कॅन विकत घेतात. घरोघरी रोज सकाळी हे कॅनवाले पाणी पुरवत असतात, एवढे पाणी दिवसाभराला पुरत नाहीच. त्याच्यापेक्षा अॅक्वागार्ड लावून घेतलेला परवडला आम्हाला. १६०००ला आरओ टेक्नोलॉजीचा अॅक्वागार्ड लावून घेतला. अजून तरी काही त्रास नाही. पाणी पिता येतय आणि चव चांगली आहे.
वाटर प्युरिफायरचे तीन प्रकार
वाटर प्युरिफायरचे तीन प्रकार असतात.
१) फिल्टर
२) अल्ट्रा वायोलेट(युव्ही) फिल्टर
३) आर. ओ. (रिवर्स ओसमोसिस)
फिल्टरच्या कांड्याना जी छिद्र असतात त्यावरुन त्या कांडिचं नाव पडतं. जस कि ५ मायक्रोन पोअर साईज फिल्टर म्हणजे ५ मायक्रोनची भोकं असलेली फिल्टरची कांडी.
टि.डी.एस.(टोटल डिजोल्व्ड सॉलिड्स):- म्हणजे पाण्यात विरघळेल्या एकूण पदार्थांचे प्रमाण. मग हे पदार्थ कुठले? ते डिपेंड असतं जमिनीवर. अगदी बिहारच्या मातीतले डिझॉल्व्ड सॉलिडस अन राजस्तानातल्या पाण्यातील सॉलिड्स यांच्यात बराच फरक असतो. टिडीस मोजणे म्हणजे कोणता पदार्थ विरघळलेला आहे हे तपासणे नसून विरघळलेल्या पदार्थांचे प्रमाण काय? हे तपासणे होय. पुण्यातल्या कार्पोरेशनच्या पाण्यात याचे प्रमाण ६० टिडीएस पर्यंत असते. म्हणजे पाणी पिण्यासारखे असते. या पाण्यातले सॉलिड्स काढण्याची गरज नाही. तरी ईतर ट्रिटमेंट कधी कधी गरजेची असते. जसे की फिल्टर करणे, बॅक्टेरीया मारणे(?), वास नाहिसा करणे वगैरे.
१) फिल्टर:-
फिल्टर म्हणजे नुसतं पाणि गाळून देतो. त्याच्यात नुसतं एक फिल्टर (५ मायक्रोनचा) असतो. काही फिल्टर मधे दोन फिल्टर्स असतात (५ मायक्रोन व अक्टिवेटेट कार्बन फिल्टर) हा ५ मायक्रॉनचा फिल्टर फक्त गाळून देण्याचे काम करतो अन कार्बन फिल्टर मात्र पाण्यातील वास/दुर्गंध वगैरे सोशून घेतो. त्याला ओडोर ऑब्सॉर्बर असही म्हणतात.
पाणि: जर तुमच्याकडे कार्पोरेशनच पाणि येत असेल अन फक्त गाळु घ्यावं एवढाच उद्देश/गरज असल्यास हे फिल्टर उत्तम.
२) अल्ट्रा वायोलेट(युव्ही) फिल्टर:
हा फिल्टर सुद्धा वरील फिल्टर सारखाच आहे. फक्त अॅडिशन काय आहे तर ती अल्ट्रावायोलेट ट्यूब. अन याच्या काही ब्रंड वाले अक्टिवेटेटे ग्रन्युअल कार्बनची कांडी देतात तर काहिजण देत नाहीत. जर ती कार्बनची कांडी नसेल पाण्यातला वास तसाच राहतो.
युव्ही ट्यूबचं काम काय तर, पाण्यात जे बॅक्टेरीया असतात त्या बॅक्टेरीयाचा डिएनए ऑल्टर होतो. बॅक्टेरीया मरत नाहीत. बॅक्टेरीयाचं मल्टिप्लाय होणं थांबतं एवढच. मार्केटींग करणारे सांगतात की युव्हीमुळे बॅक्टेरीया मरतो वगैरे. पण मुळात ते मरत नाही हे ट्रेनिंगमधे शिकवलं असतं. तरी सेल्सवाले बॅक्टेरीया मरतात म्हणून ठोकून देतात. युव्हीला ईलेक्ट्रिसीटी लागते. जेंव्हा युव्हीची टयूब चालू असते तेंव्हा त्यातून जे किरण बाहेर पडत असते त्या किरणाच्या संपर्कात आल्या आल्या बॅक्टेरीयाचा डिएनए ऑल्टर होतो व त्यांचं प्रोडक्शन थांबतं. पण या युव्हीच्या लाईटचीकी एक कपॅसिटी असती. तीन हजार तास, पाच हजार तास, दहा हजार तास वगैरे. तितके तास झाले की मग ती लाईट जरी पेटली तरी काम मात्र करत नाही. म्हणजे बॅक्टेरीयाचा ऑल्टरेशन होत नाही.
पाणी: कॉर्पोरेशनच पाणी असावं. अन बॅक्टेरीया कंट्रोल करणे. एवढ्यासाठी युव्ही कामी येतो.
३) आर. ओ. (रिवर्स ओसमोसिस)
आर. ओ. म्हणजे पाण्यावरचा खराखूरा उपाय. मग पाणि कुठलही असो. आर. ओ. नी ते शुद्ध करता येते. आर. ओ. मधे ५ मायक्रोन व ग्रॅन्युअल अक्टिवेटेड कार्बनच्या दोन कांड्या सतात. पण या व्यतिरिक्त आजून एक कांडी असते त्याला 'हार्ट ऑफ द आर.ओ." म्हणतात. त्या काडीचं नाव आहे मेंब्रेन.
मेंब्रेनचा पोअर साईज ०.०००१ एवढा बारीक असतो. मेंब्रेनच्या भोकातून पाणि पास होऊच शकत नाही. त्यासाठी लहानशी मोटार वापरली जाते अन प्रचंड फोर्सनी ते पाणी मेंब्रेन मधी पाठवलं जातं. मग या पाण्यातील सर्व क्षार व ईतर विरघळलेले घटक ज्याचा साईज ०.०००१ पेक्षा मोठा आहे तो रिजेक्टला पास होतो व ०.०००१ पेक्षा लहान असलेला घटक म्हणजे पाणि प्रोडक्टला पास होतो. ते प्रोडक्ट आउटलेटचं पाणी म्हणजेच मिनरल वॉटर.
जे पाणी आर. ओ. त घालायचे आहे ते थेट मेंब्रेन पर्यंत पोहत नाही. त्या आधी काही प्राथमिक शुद्धिकरण होते. जसे की ५ मायक्रोन मधून पास केले जाते, कधी कधी तर १० मायक्रोनची कांडिही वापरली जाते. त्या नंतर अक्टिवेटेड कार्बन मधून व सर्वात शेवटी मेंब्रेन मधे पाठविल्या जाते. मात्र मेंब्रेनच्या भोकांची साईज ही ०.०००१ एवढी असल्यामुळे टिडीएसयुक्तपाणी पुढे सरकतच नाही. मेंब्रेनला इनलेट एक असतो व आउटलेट दोन. पाण्यात डिजॉल्व्ड झालेल्या घटकाना वेगळे करण्याची प्रक्रिया ईथे सुरु होते. आलेल्या पाण्याला शुद्ध करुन विरघळलेले घटक वेगळे करण्यासाठी मोटारच्या फोर्सनी पाणी मेंब्रेनीत प्रचंड वेगानी ढकलले जाते. या वेगामुळी पाणी मेंब्रेनच्या आउटलेटवर येऊन धडकते. पाण्यातील क्षार वेगळे करण्याची मुख्य प्रक्रिया ईथेच होते. क्षारयुक्त पाणी प्रोडक्टच्या आउटलेटवर आदळते, क्षार तिथेच अडविले जातात(कारण ते ०.०००१ मधून पास होऊ शकत नाहीत) अन पाणि मात्र ईथे क्षाराना बाय बाय करत शुद्ध रुप घेऊन प्रोडक्ट आउटलेट द्वारे बाहेर येते. वेगळे झालेले क्षार रिजेक्टच्या आउटलेटकडे ढकलले जातात व रिजेक्टच्या पाण्यासोबत बाहेर पडतात.
१) प्रोडक्ट आउटलेट (पिण्याचे पाणी)
२) रिजेक्ट आउटलेट (टाकाऊ पाणी)
प्रोडक्ट आणि रिजेक्टचा रेशिओ मात्र थक्क करणारा आहे. तो आहे २०:८० म्हणजे तुम्ही आर. ओ.त १०० लिटर पाणी घातलात तर २० लिटर पाणि प्रोडक्ट आउटलेट मधून बाहेर पडत तर ८० लिटर रिजेक्ट मधून. हे रिजेक्टचं पाणी फेकून द्यावं लागतं. किंवा झाडांसाठी वगैरे वापरता येतं.
पाणि: कितीही टी.डी.एस. असलेलं पाणी घाला आर. ओ. तून बाहेर पडताना हा टी.डी.एस. २०-३० पर्यंत असतो. थोडक्यात मिनरल वॉटर(आपली बिस्लरी).
("अगदी इनलेटच्या पाण्यात तुम्ही विष जरी घातलात तरी प्रोडक्टला येणारं पाणी हे बीनविषारी असेल. एवढं ते शुद्धिकरण" हे आमच्या एका बॉसचं वाक्य असायचं)
ईलेक्ट्रिसीटी लागते.
थोडक्यात तुमच्याकडे कुठली पाणी आहे त्यावरुन ठरवायचं की प्युरीफायर कुठला असावा. नुसतं गाळून घ्यायचं असल्यास वरचा ५ मायक्रोन इस बेस्ट. दुर्गंध वगैरे व बॅक्टेरीया असल्यास युव्ही इज बेस्ट. अन हाय टीडीएस (१०० च्या वर असल्यास) आरओ इस बेस्ट.
कार्पोरेशनच्या पाण्याचा टिडीएस ८० च्या आतच असतो म्हणून आरओची गरज नाही.
http://www.newfrontier.com/as
http://www.newfrontier.com/asheville/water.htm
हे पण जरा वाचिन बघा. वॅलिडेशन बघायला हवं
. अगदी इनलेटच्या पाण्यात
. अगदी इनलेटच्या पाण्यात तुम्ही विष जरी घातलात तरी प्रोडक्टला येणारं पाणी हे बीनविषारी असेल. एवढं ते शुद्धिकरण.>> येस्स, कोब्राच विष मिक्स झालं तरी ते रिजेक्शन मधुन जाणार. कार ते प्रोटिन आहे.
अगदी इनलेटच्या पाण्यात तुम्ही
अगदी इनलेटच्या पाण्यात तुम्ही विष जरी घातलात तरी प्रोडक्टला येणारं पाणी हे बीनविषारी असेल. एवढं ते शुद्धिकरण.
<<
चुकीची माहीती. कृपया संपादित कराल का?
मेंब्रेनमधून मिथिल अल्कोहोल होईल का हो पास?
"ट्रेनिंगमधे शिकवलं असतं. तरी सेल्सवाले बॅक्टेरीया मरतात म्हणून ठोकून देतात.." याच धरतीवरचे वरील वाक्य आहे. तुमचा जीव जाईल अशी अनेक विषे तुमच्या आर.ओ. मधून पुढे काढता येतात. अगदी ब्लड-ब्रेन बॅरियर किंवा प्लासेंटल बॅरियर क्रॉस करणारी विषे आहेतच की
कोब्राच विष मिक्स झालं तरी ते
कोब्राच विष मिक्स झालं तरी ते रिजेक्शन मधुन जाणार. कार ते प्रोटिन आहे.>>> झकासराव कोब्राच विष खाल्ल तरी चालतं (जर डायजेस्टीव्ह सिस्टीम मद्ये ज्खम नसेल तर) असं शाळेत वाचलं होतं
अगदी ब्लड-ब्रेन बॅरियर किंवा
अगदी ब्लड-ब्रेन बॅरियर किंवा प्लासेंटल बॅरियर क्रॉस करणारी विषे आहेतच की>>> इब्लिस, ०.०००१ या पोअर साईज मधून ते विष पास होतं का? त्याचे टेक्निकल डिटेल्स द्याला का?
झकास, मी शिफ्ट झालो तिथे
झकास, मी शिफ्ट झालो तिथे टँकरचं पाणी होतं. अजूनही परिस्थिती फार बदलली नाही. आल्या आल्या केन्टच मशिन लावून घेतलं. (यात हेमामालिनीचा काही संबंध नाही. ती काळाची गरज होती. :)) चार वर्षापुवी १४ के दिले होते. पाण्याची चव सुरेख असते. पण मेन्टेनन्स फार खर्चिक आहे. आतले फिल्टर वर्षभरात बदलावे लागतात. पण इथल्या टँकरच्या पाण्याची गुणवत्ता बघता सध्या तरी हाच पर्याय योग्य वाटतोय.
येस्स, कोब्राच विष मिक्स झालं
येस्स, कोब्राच विष मिक्स झालं तरी ते रिजेक्शन मधुन जाणार. कार ते प्रोटिन आहे.>> अर्थात हे एका विकणार्याने सांगितलय म्हणुन मी तर त्यात विष घालुन खरोखरी विषाची परीक्षा करणार नाहिये बॉ..
एम, गूगलून पहा. सोपे आहे.
एम, गूगलून पहा. सोपे आहे.
अगदी ब्लड-ब्रेन बॅरियर किंवा
अगदी ब्लड-ब्रेन बॅरियर किंवा प्लासेंटल बॅरियर क्रॉस करणारी विषे आहेतच की>>> इब्लिस, ०.०००१ या पोअर साईज मधून ते विष पास होतं का? त्याचे टेक्निकल डिटेल्स द्याला का? >>>>
एम. यांच्याकरता -
मला इथे वाद घालायची इच्छा नाहीये पण सायनाईड सारखे व मिथॅनॉल सारखे विषारी पदार्थ कोणी वॉटर प्युरिफायर तयार करणारा इनलेट पाण्यात घालून दाखवेल का ? - कॉमन सेन्स वापरायला नको का आपण? (पार्ट्स पर मिलियन (पीपीएम) व पार्ट्स पर बिलियन (पीपीबी) मधे असे विषारी पदार्थ शरीराला अपायकारक आहेत का गुगलून पहा... तुम्हालाच उत्तर सापडेल)
कोब्राचे विषाचा (वा तत्सम विषाचा) इथे काहीही संबंधच येत नाहीये.
डॉक (इब्लिस) म्हणताहेत ते बरोबर आहे, एम. - तुम्ही कृपया तुमची पोस्ट संपादित करा - उगाचच इतर मंडळींची दिशाभूल होईल असे लिहू नका वा इथे वाद निर्माण होतील अशी विधाने करु नका - ही नम्र विनंती.
एम, गूगलून पहा. सोपे
एम, गूगलून पहा. सोपे आहे.
>>
एम. महोदय,
मघा वरील प्रतिसाद लिहिला तेव्हा कीबोर्ड नव्हता, मोबाईलवर तितकेच लिहिणे शक्य होते.
https://www.google.co.in/search?q=methyl+alcohol+RO+filter&ie=utf-8&oe=u...
ही लिंक वापरलीत, तर बरेच काही दिसेल.
उदा.>>
books.google.co.in/books?isbn=1574446061
Mohammad Shafiur Rahman, Shafiur Rahman - 2007 - Technology & Engineering
Most other constituents were found at trace levels in the permeate except methanol, which can cross the membrane freely [103,104]. Selective RO membranes ...
यातील मिथॅनॉल किती विषारी आहे हे लिंक पाहून समजेलच.
तुमचा फिल्टर्स बाबतचा अभ्यास चांगला असला तरी तो फक्त बॉसने शिकविलेल्या "मार्केटिंग" लेक्चर पुरता मर्यादित दिसतो, असे खेदाने म्हणतो. नुसते शुद्ध पाणी देखिल मानवास विषारी ठरू शकते हे तुम्हाला ठाऊक आहे काय?
तेव्हा अमुक फिल्टर विष सुद्धा काढून टाकू शकतो असे लिहिणे हे मिसलिडींग आहे, ते कृपया काढून टाका, ही विनंती.
धन्यवाद!
हॅलो, मी आधीचे धागे वाचले पण
हॅलो,
मी आधीचे धागे वाचले पण मला वॉटर प्युरिफायर घेताना नक्की कशी सुरुवात करावी कळले नाही.
आर ऑ चे खूपच मिक्स्ड रीव्युज आहेत. त्यामुळे गोंधळ उडाला आहे.
मला मुंबईतल्या पाण्यासाठी कुठला प्युरिफायर घ्यावा सुचवाल का?
ह्या माझ्या गरजा आहेत,
१) पाणी स्वच्छ असावं पण क्षार वगैरे किती ते कसं कळणार्?(फिलटर घेण्याआधी कसं माहिती करावं क्षार किती आहेत रहात्या ठिकाणच्या पाण्यात?)
२) कस्टमर सर्विस उत्तम
३) खूप मेन्टेन्स नसावा.
(खूप बहुदूधी आहे का?)
Pureit आणि टाटा या दोन(च)
Pureit आणि टाटा या दोन(च) कंपन्यांची यंत्रं उत्तम आहेत.
आम्ही नसाका गेली ४.५ वर्षे
आम्ही नसाका गेली ४.५ वर्षे वापरत आहोत. आम्हाला आवडले. (सर्विसही चांगली आहे - पुण्यात तरी)
Pureit आणि टाटा या दोन(च)
Pureit आणि टाटा या दोन(च) कंपन्यांची यंत्रं उत्तम आहेत.>>What do you mean by this. Kent, Eureka Forbes are bad? What is the reason?
१) पाणी स्वच्छ असावं पण क्षार
१) पाणी स्वच्छ असावं पण क्षार वगैरे किती ते कसं कळणार्?(फिलटर घेण्याआधी कसं माहिती करावं क्षार किती आहेत रहात्या ठिकाणच्या पाण्यात?)>>> जो कोणी प्युरिफायर विकणार आहे तो त्याच्या मशीनने चेक करुन देइल.
क्षार जास्त असतील तरच आर ओ घ्यावा असं सजेशन देतात ते.
बा द वे, मी धागा काढला पण प्युरिफायर घेतलाच नाही !
पिंची महानगरपालिकेच पाणी साध्या तांब्याच्या फिल्टर मध्ये गाळुन वापरतोय.
इम्युन सिस्टीम डेव्हलप झाली असेल अथवा होतेय.
पावसाळ्यात फक्त पाणी उकळुन घेतो.
झक्या, मी सुद्दा कोणे एके
झक्या, मी सुद्दा कोणे एके काळी प्युरिट आणला होता. वापरला पण दर आठवड्याला सगळी असेंब्ली उचकटून साफ करायला कंटाळून काढून टाकला. स्वच्छ फडक्याने गाळून आणि भरपूर उकळून प्यायचं पाणी वापरते आता. पाणी गार झालं की तांब्याच्या छोट्या पिंपात ओतून ठेवते. तेच सोप्प आणि चांगलं वाटतंय.
आमचं अॅक्वागार्ड आरओ.
आमचं अॅक्वागार्ड आरओ.
कस्टमर सर्विस बंडल हाच एक शब्द आहे. कोणीही आंडू पांडू येतो बरेच फोन केले की...
तरी हेच घेतले आधीचे खराब झाले तरी. इमानी पणा ज्यास्त आहे आमच्यात बहुधा,
टाटा आणि आणि एक चोकलेटी
टाटा आणि आणि एक चोकलेटी रंगाचा प्युरीफायर वापरला. टाटामध्ये डिझाईन फ्लो होते पाणी न गाळताच खाली यायचं, नंतर ते सगळं रेक्टीफाय झाल्यावर सुद्धा ते वापरानं जिकिरीचं वाटलं. बाबा बऱ्यापैकी handy आहेत आणि चिकाटीपण आहे, तरीही दोन्ही डबडे १-२ वर्ष वापरल्यावर सध्या माळ्यावर आणि पाणी उकळून पिणे ही स्थिती आहे.
माझ्याकडे आक्वागार्डचा
माझ्याकडे आक्वागार्डचा अॅक्वाशुअर आहे. गेली ४-५ वर्षे तरी वापरतेय. नीयमित सर्विसिंग करुन घेतेय. काल सर्विसिंगला जो बाब्या आला त्याने आल्याआल्या मिरॅकल नावाचे एक नविन मशिन बाहेर काढले. सर्विसिंग बाजुला ठेऊन तो आमच्या मशिनवर कसा ताण येतोय, मशिन कशी ४०% च कशी काम करतेय, मिरॅकलमुळे हेवी मेटल्स निघुन जातात पाण्यातुन व.व. सांगायला सुरवात केली.
त्याचा एकुण आविर्भाव पाहिला असता तो हे मिरॅकल माझ्या गळ्यात मारण्याच्याच हेतुने आलेला हे दिसत होतेच. शिवाय याची किंमत २००० आणि आकार आधिच्या मशिनएवढाच.
मी त्याला लगेच काही कमीट न करता शनवारी यायला सांगितले. तोवर नेटवर गुगलले तर मिरॅकलबद्दल अॅक्वागार्डाच्या साईटखेरीज इतर कुठेही माहिती नाहीय.
नव्या मुंबईचे पाणी ब-यापैकी बरे आहे. त्याच्या हेवी मेटल्स मिसळली असावीत अशी बोंब अजुन तरी ऐकली नाहीय. अशा परिस्थितीत उगीच २००० घालवण्यात अर्थ नाही असे मला वाटतेय.
कुणी घेतलेय का हे मिरॅकल?
साधना, नको उगीच खर्च करूस.
साधना, नको उगीच खर्च करूस. बदलायचाच असेल प्युरीफायर तर डायरेक्ट आर-ओ घेऊन तुकडा मोडणे. तसंही एकदा त्या प्युरीफायरच्या पाण्याची सवय झाली की दुसरीकडचं कुठलं पाणी पचत नाही सहजी असा अनुभव आहे. स्पेशली गावांत वगैरे जास्त जाणवतं हे.
मलाही तेच वाटतेय.
मलाही तेच वाटतेय.
आर ओ च्या पाण्याचंही तसंच आहे
आर ओ च्या पाण्याचंही तसंच आहे ना पण? म्हणजे आर ओ ब्रँड असेल तर माहिती नाही, पण आर ओ = रिवर्स ऑस्मोसिस पद्धतीने शुद्ध केलेलं पाणी प्यायची सवय लागली की अगदी अॅक्वागार्ड किंवा प्युअर मिनरल वॉटरही पचत नाही अशा १-२ केसेस साबुंनी सांगितल्या होत्या. आम्ही २-३ दिवस प्यायलो ट्रायल म्हणून पण साबुंना या १-२ केसेस समजल्यावर बंदच केलं असलं काही.
युप! माझ्या जवळच्या
युप! माझ्या जवळच्या नातेवाकांकडे सेम केस आहे. ठाण्यात राहातात, आधी पाणी खराब येतं असा संशय असल्यानी, वरची टाकी कितीदा साफ होते वगैरे प्रश्न असल्यानी फिलिप्स चं वॉटर प्युरीफायर घेतलं. काही महिन्यांतच त्याची एवढी सवय झाली की आता गावाला वगैरे जाऊन चारदोन दिवस राहायचं काम पडलं की यांची पोटं बिघडतातच. आमच्या कडे गावाला तसही ८-१० दिवसांतून एकदा पाणी असतं नळाला. त्यामुळे फिल्टर असूनही अगदी रोज वापरल्या जातोच असं नाही.
रिव्हर्स ऑसमॉसिस टाईप फिल्टर्सचंही तेच होत होणार. पण ऑलरेडी ज्यांना सवय आहे फिल्टरच्या पाण्याची अन आधीचा फिल्टर बदलायचा असेल तर एक जास्त चांगला पर्याय सुचवला, इतकच.
म्हणजे ज्यांना महिन्याचे
म्हणजे ज्यांना महिन्याचे बरेच दिवस घराबाहेर राहावे लागत असेल त्यांनी या भानगडित न पडलेलेच.

मी आता ज्या ठिकाणी राहते आहे
मी आता ज्या ठिकाणी राहते आहे तिथे मनपा आणि बोरींगचे पाणी मिक्स होते. पाण्याची चव अजिबात पिण्यालायक नाही. क्षार अति असणार अर्थातच.
वरचा धागा वाचून पुरेशी कन्फ्युज झाले आहे. आर ओ वापरून इम्युनिती जाऊ द्यायची नाही कारण प्रवास भरपूर असतो आणि अगदीच बिघडलेले पाणी नसेल तर पचते बहुतेक सगळे.
माझ्याकडे प्युरीट आहे. ते या क्षारसंपृक्त पाण्याला पिण्यालायक बनवू शकेल काय?
आर ओ मध्ये खूप पाणी डिसकार्ड
आर ओ मध्ये खूप पाणी डिसकार्ड केले जाते.हे डिसकार्ड पाणी झाडांना किंवा आणि कुठे वापरता आल्यास उत्तम.
आमचा पाणी भरायचे प्युरीट, आणि आता बटन दाबल्यावर पाणी भरून घेणारे प्युरीटमार्व्हेला दोघांचा अनुभव चांगला आहे.भरायचे प्युरीट साफ करणे किचकट, आणि त्याचा कार्बन ड्रम बदलल्यावर तो फेकावा लागतो.ते परत घेऊन जात नाहीत.बाहेर फेकला तर कोणी नवा म्हणून विकेल अशी भीती वाटते.
प्युरीट चव बदलते असा त्यांचा जाहिरातीत तरी दावा आहे.ऍक्वागार्ड चा पण.
किंवा मग अगदी पिण्यापुरतं बॉटल वॉटर.आणि बाकी बोअर पाणी.
Pages